उधळायचे तर उधळून घे माधळून घे

Primary tabs

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
17 Apr 2017 - 10:32 am

उधळायचे तर उधळून घे माधळून घे
परतून ढुसण्या देऊ नकोस म्हणजे झाले

निखळायचे तर निखळून निथळून जा
पांथस्थाच्या पायांना जखमा करू नकोस म्हणजे झाले

काफीला सोडावयाचा तर सोडून जा
भिंती आडून फसवे युद्ध छेडू नकोस म्हणजे झाले

कापूराचे क्षणभर पेटणे जगायचे तर जगून घे
पणत्या पेटवणार्‍या ज्योतींना विझवू नकोस म्हणजे झाले

हृदये कितीकांची ढवळायची ती ढवळून घे
हृदय स्वतःचेही हलकेसे ढवळू दे म्हणजे झाले

चांद सूर्यापर्यंत जगायचे तर जगून घे
पृथ्वीला भंगवू नकोस म्हणजे झाले.

अल्प प्रेर्ना

कविता

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

17 Apr 2017 - 8:00 pm | टवाळ कार्टा

आरारा....कैच्याकै कच्चा माल सापडलाय यात....डुरडुरणार्या ईडंबणासाठी =))