टायपो ( कथा )
टायपो ( कथा ) ( काल्पनीक )
घनदाट जंगलांनी व्यापलेला अॅमॅझॉन खो-याचा विस्तीर्ण आणी तेवढाच दुर्गम भुभाग . या जंगलामधे अनेक नरभक्षक रानटी टोळ्या , जंगली हिंस्त्र श्वापदे यांचा कितीतरी शतकांपासुन वावर आहे . किवागो ही या रानटी टोळ्यांमधली एक शक्तीशाली जमात . किवागो योद्धे हे कायम आपल्या हद्दीच्या रक्षणासाठी विषारी तीरकामठे घेउन पहारा देत असत . कुणा इतर टोळीने येथे प्रवेश करायचा प्रयत्न जरी केला तरी त्यांची खैर नसे . किवागो योद्धयांच्या विषारी बाणांना ते एका क्षणात बळी पडत .
दिवस संपुन हळुहळु अंधार पडु लागला होता . नेहमीप्रमाणेच किवागो योद्धे आपल्या हद्दीवर डोळ्यात तेल घालुन पहारा देत होते . त्यांच्या हातात विषारी तीरकामठे सज्ज होते . पाठीवरच्या भात्यांमधे विषारी बाण भरलेले होते . तर काही किवागो योद्धे हातात भाले घेउन गस्त घालत होते .
अचानक त्यांना समोर विजा चमकल्याचा भास झाला . पण तो भास नव्हता . समोर खरोखरच विजेच्या ठिणग्या पडत होत्या . काही क्षणांत या ठिणग्या नाहिशा झाल्या . त्या ठिणग्यांमधुन अवतरला एक अजस्त्र महाकाय मनुष्य . एखाद्या राक्षसासारखा भासणारा तो महाकाय मनुष्य किवागोंच्याच दिशेने संथपणे एकेक पाउल टाकत येत होता . त्याच्यापुढे किवागो योद्धे एखाद्या खेळण्यासारखे दिसत होते . किवागो आधी थोडे चरकलेच . पण लगेच सावध होउन त्यांनी आपापली शस्त्रे सरसावली , आणी ते त्या अजस्त्र मनुष्यावर विषारी बाणांचा , भाल्यांचा वर्षाव करु लागले .
पण त्या महाकाय मनुष्यावर त्या बाणांचा काहिच परिणाम झाला नाही . त्याच्यासमोर एखाद्या सुईसारखे नाहितर काडीसारखे वाटणारे ते बाण त्याच्या अंगाला आपटुन खाली पडले . किवागो घाबरुन मागे मागे सरकु लागले . ते पुरते गोंधळुन गेले . तेवढ्यात त्या राक्षसी आकाराच्या मानवाच्या डोळ्यांतुन प्रखर प्रकाश किरण बाहेर पडु लागले . किवागो अजुनच घाबरले . त्यांच्यामधे पुरता गोंधळ उडाला .
त्याच वेळी या प्रसंगापासुन कितीतरी वर्षे दुर असलेल्या एका सैनिकी केंद्रामधे बरीच गडबड चालु होती . त्या केंद्राचे प्रमुख आपल्या केबिनमधे आतुरतेने येरझारा घालत होते . ते कशाची तरी अधीरतेने वाट पाहात होते . तेवढ्यात केबिनमधला फोन खणखणला . त्यांनी तो त्वरेने उचलला . त्यांना अपेक्षित असलेला तो फोन त्यांच्या सहका-याचाच होता . केबिनजवळच्या संगणक कक्षातुन त्याने तो फोन केला होता .
" यस ?" प्रमुखांनी आतुरतेने विचारले .
" सर ... द फिनीक्स हॅज लँडेड सक्सेसफुली ." पलिकडुन आवाज आला . एका अत्यंत महत्वाच्या आणी अत्यंत खर्चीक अशा सैनिकी प्रोजेक्टचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार पडल्याचा तो सांकेतीक भाषेतला संदेश होता . प्रमुखांच्या चेह-यावर समाधानाचे हसु उमटले .
"दॅट्स अ ग्रेट न्युज . कॉन्ग्रॅटस टु ऑल ." असे म्हणुन त्यांनी फोन ठेवला आणी ते त्वरेने केबिनजवळच्या संगणक कक्षामधे गेले . त्यांची टीम तिथेच बसलेली होती .
सर्वांनी प्रमुखांचे हसुन स्वागत केले . प्रमुखांनीही परत सर्व टिमचे अभिनंदन केले . आता त्यांना उत्सुकता लागुन राहिली होती , ती या प्रोजेक्टच्या पुढल्या टप्प्याची .
" ग्रेट जॉब जोकर्स . सो द फर्स्ट फेज ऑफ द प्रोजेक्ट T- 333/301 इज डन . द मोस्ट अॅडव्हान्स्ड अॅन्ड स्ट्रॉन्गर मॉडेल डेव्हलपड बाय अस . हाऊ द नेक्स्ट फेज इस गोईंग ऑन ? हॅव वी रिसीव्हड स्नॅप्स फ्रॉम द T- 333 आफ्टर लँडिंग ? " प्रमुखांनी चौकशी केली .
"यस सर . T- 333 हॅज स्टार्टेड टु ट्रान्समीट द स्नॅप्स ऑफ द सरांउंडिंग्स थ्रु सिग्नल्स . " टिममधील एकाने उत्तर दिले . आणी समोरच असलेल्या मॉनीटरकडे बोट केले . T- 333 ने पाठवलेली छायाचित्रे तिथे दिसत होती . प्रमुख बारकाईने ती छायाचित्रे पाहु लागले . त्यांच्या कपाळावर किंचीत आठ्या पडल्या .
" बट .. दिज स्नॅप्स डजंट लुक लाईक ऑफ अ डेव्हलप्ड एरीया ? कॅन यु चेक अगेन ? " त्यांनी टिमकडे पाहुन विचारले . टिममधल्या लोकांनाही तो फरक लक्षात आला . सगळे गोंधळुन एकमेकांकडे पाहु लागले . कुणीच काही बोलेना . नक्की काय गडबड झाली असेल ते कुणालाच समजत नव्हते .
" लँडींग पॅनलपाशी कोण होतं ? हु वॉज ऑपरेटींग द लँडींग पॅनल ? " प्रमुखांनी कठोर आवाजात विचारले . एका गटाण्या डोळ्याच्या माणसाने हात वर केला .
"मिबीन तु ? तुला कोणी तिथं बसवलं ? समवन चेक व्हॉट हि हॅज डन . " प्रमुखांनी फर्मावले . टिममधल्या एकाने तत्परतेने मिबीनचे पॅनल , त्यावरील याआधी रन केलेले कोड तपासले . काय प्रकार झाला ते त्याच्या लक्षात आले . तो काळजीने प्रमुखांना म्हणाला .
"सर . इट वॉस अ टायपो . मिबीनने २०१७ च्या जागी १०१७ टाइप केले . हि टाइप्ड 1017 अॅट द फेज ऑफ लँडींग "
"टायपो ? व्हॉट डु यु मीन बाय टायपो ? हा टायपो आपल्याला केवढ्याला पडला ? डु यु हॅव एनी आयडीया ? ज्या T- 333 ला २०१७ सालामधे पाठवायचे होते , त्याला तु १०१७ सालामधे पाठवले ? हा टायपो आपल्या मानवजातीला केवढा भारी ... " संतापाच्या भरात प्रमुखांच्या तोंडुन शब्द फुटेनासे झाले . ते मिबीनकडे पाहुन रागारागाने नुसतेच हातवारे करु लागले .
"उं.. म्याउ..." म्हणत मिबीन घाबरुन तिथल्या एका खुर्चीखाली जाउन लपुन बसला .
त्याचवेळी समोरच असलेल्या मॉनीटरवर T- 333 कडुन आलेले पुढचे संदेश झळकत होते .
"वेटिंग फॉर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन.." , "वेटिंग फॉर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन.." , "वेटिंग फॉर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन.." , "वेटिंग फॉर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन.." .
आता लवकर काहितरी निर्णय घेणे भाग होते . प्रमुखांनी स्वताला कसेबसे सावरले . आपल्या पुढ्यातला स्पिकर त्यांनी ऑन केला . ते बोलु लागले .
" T- 333 , धिस इज द चीफ ऑफ द मिशन फिनीक्स . द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन फॉर यु इज , धिस मिशन हॅज बीन टर्मिनेटेड . स्टार्ट द सेल्फ डिस्ट्र्क्शन प्लान नाउ . "
" रॉजर दॅट ."
"आय रिपीट , गो अहेड फॉर द सेल्फ डिस्ट्र्क्शन ." प्रमुखांनी परत जड आवाजात सुचना केली .
"आय आय सर ."
"ओव्हर अॅन्ड आऊट ." असे बोलुन प्रमुखांनी पुढ्यातला स्पिकर ऑफ केला . मिबीन आता शांतपणे खुर्चीखालुन बाहेर आला .
किवागो योद्ध्यांच्या दिशेने सरकणारा तो अजस्त्र महाकाय मनुष्य अचानक जागच्या जागी थांबला . त्याच्या डोळ्यांतुन बाहेर पडणारे प्रखर प्रकाश किरणही आता बंद झाले होते . किवागो योद्धे जरा सावरुन त्याच्याकडे बघत होते . मनातल्या मनात आपल्या टोळीच्या किवारा देवाचा ते धावा करत होते . या अमानवी संकटातुन आता तोच आपल्याला वाचवेल अशी त्यांना शेवटची आशा होती .
त्या अजस्त्र मनुष्याने अचानक आपल्या डाव्या मनगटावर असलेल्या यांत्रिक कळीवर दाब दिला . समोरच्या किवागो योद्ध्यांकडे पाहुन तो पुटपुटला .
"आय विल बी बॅक ."
त्याच्या नुसत्या पुटपुटण्यानेही किवागो योद्धे घाबरुन परत मागे सरकले . तो आवाज त्यांच्या कानात चांगलाच घुमला .
पुढच्याच क्षणी एक मोठा स्फोट झाला . त्या अजस्त्र महाकाय मनुष्याच्या शरीराच्या पार चिंधड्या उडाल्या . त्यामधुन धातुंचे असंख्य तुकडे उडुन इकडे तिकडे विखरुले गेले . त्याच्या शरीराचे अनेक भाग दुरवर जाउन पडले .
आपल्यावर चालुन आलेल्या राक्षसाचा नाश झालेला पाहुन किवागो योद्धे खुश झाले . आनंदाने बेभान होउन ते विजयोत्सव साजरा करु लागले . ही आपल्या किवारा देवाचीच किमया असे समजुन ते आकाशाकडे हात करुन देवाचे आभार मानु लागले .
किवागो योद्धे आनंदाने बेभान होउन नाचत होते . विजयोत्सव साजरा करत होते .
दुरवर एका दगडांच्या ढिगाखाली दोन यांत्रिक दिवे बराच वेळ लुकलुकत होते .
-------------- समाप्त --------------- काल्पनीक ------ एका गाजलेल्या चित्रपटावर आधारीत फॅन फिक्शन -------------------------------------
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जबरी हो!
Terminator ..
मस्तच जमलीय हो सिरुसेरीजी,
जबरी कथा! आवडली.
भारी कथा..
छानच आहे ! पण अशीच म्हणजे
येऊ द्या हो
टेर्मिनेटर
कथा आवडली!
कथेतला हा टायपो लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद
भारी कथा
छान कथा.
आपणा सर्वांचे
वा!
मस्त!
चांगली कथा
टर्मिनेटर / TERMINATOR