✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

फुलपाखरु मनाचे हळुवार होत आहे!

स — सत्यजित..., Wed, 04/05/2017 - 15:38
मग्रूर काजव्यांचा संचार होत आहे पणती जपून ठेवा अंधार होत आहे! वाटेत सावल्यांचे थांबे नकोत मजला माझ्याच सावलीचा मज भार होत आहे! झाली नवीन ओळख,माझी मला अशी की ऐन्यासमोर चिमणी बेजार होत आहे! सुरवंट वेदनेचा कोषांत वाढताना फुलपाखरु मनाचे हळुवार होत आहे! हे कोणत्या ऋतूचे नादावलेत पैंजण? एकेक पाकळीचा गुलजार होत आहे! —सत्यजित

प्रतिक्रिया द्या
4211 वाचन

💬 प्रतिसाद (16)

kyaa baat hai, mast

शैलेन्द्र
Wed, 04/05/2017 - 17:56 नवीन
kyaa baat hai, mast
  • Log in or register to post comments

हे कोणत्या ऋतूचे नादावलेत

अत्रुप्त आत्मा
Wed, 04/05/2017 - 19:39 नवीन
हे कोणत्या ऋतूचे नादावलेत पैंजण? एकेक पाकळीचा गुलजार होत आहे! ››› तू सॉल्लिड है बॉस! साला लपेट लपेट के मारता है!
  • Log in or register to post comments

व्वा व्वा ! सुंदर

संदीप-लेले
Wed, 04/05/2017 - 22:08 नवीन
पण ... ऐन्यासमोर चिमणी बेजार होत आहे! ... हे नाही झेपलं
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

सत्यजित...
गुरुवार, 04/06/2017 - 15:19 नवीन
हां...होतं असं कधी कधी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप-लेले

'चिमणी' शब्दाच्या अर्थछटेवर

माहितगार
गुरुवार, 04/13/2017 - 11:50 नवीन
'चिमणी' शब्दाच्या अर्थछटेवर अवलंबून आहे का? कविचं 'हृदय' अशी अर्थछटा फिट बसते का ? आणि 'चिमणी' या शब्दाची अर्थछटा कच्ची बच्ची पिलावळ (लहानमुले) घेतली तर झेपणे अवघड गेल्यास नवल नसावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप-लेले

कच्ची बच्ची पिलावळ (लहानमुले)

माहितगार
गुरुवार, 04/13/2017 - 11:51 नवीन
कच्ची बच्ची पिलावळ (लहानमुले) अशी अर्थछटा कविस अभिप्रेत असेल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

तसं नव्हे!

सत्यजित...
गुरुवार, 04/13/2017 - 21:42 नवीन
स्वतःला शोधत असताना (सोबतच व्यवहाराच्या कसोटीवर स्वतःचे यश-अपयश जोखताना) स्वतःची एक अशीकाहीशी प्रतिमा कवीसमोर येते आहे,ज्यामुळे त्याच्या मनात एक विचित्र द्वंद्व उभे होते आहे!ज्याप्रमाणे एखादी चिमणी आरश्यातला आपल्याच प्रतिमेला कुणी और (प्रतिस्पर्धी ई.) समजून सारखी चोचीने टोचणी मारत राहते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

धन्यवाद!

सत्यजित...
गुरुवार, 04/06/2017 - 15:20 नवीन
धन्यवाद शैलेंद्र,अत्रुप्त आत्मा
  • Log in or register to post comments

मस्त आहे.. तिसरे कडवे नसते

पुंबा
Sun, 04/09/2017 - 10:53 नवीन
मस्त आहे.. तिसरे कडवे नसते तरी चालले असते असे वाटते..
  • Log in or register to post comments

'ए दिल मुझे बता दे' ची चाल

पुंबा
गुरुवार, 04/13/2017 - 12:17 नवीन
'ए दिल मुझे बता दे' ची चाल इथे पण फिट्ट बसतेय. हे कोणते वृत्त वगैरे आहे का?
  • Log in or register to post comments

होय!

सत्यजित...
गुरुवार, 04/13/2017 - 21:47 नवीन
गझल ही वृत्तबद्ध कवितांची मालिकाच असते,म्हणायला हरकत नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

वाह!

पैसा
गुरुवार, 04/13/2017 - 12:52 नवीन
सुरेखच!
पणती जपून ठेवा अंधार होत आहे!
यातली 'पणती जपून ठेवा' ही आधी वाचलेली कल्पना आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

सत्यजित...
गुरुवार, 04/13/2017 - 21:48 नवीन
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments

सुरेख !!!

मितान
गुरुवार, 04/13/2017 - 22:01 नवीन
सुरेख !!! शेवटचे चरण तर खासच !
  • Log in or register to post comments

वा! सुरेख!

रुपी
गुरुवार, 04/13/2017 - 22:33 नवीन
वा! सुरेख!
  • Log in or register to post comments

धन्यवाद मितान,रुपी!

सत्यजित...
Fri, 04/14/2017 - 00:59 नवीन
धन्यवाद मितान,रुपी!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा