खो कथा (२)- कथा पुर्ण करा आणी शिर्षक सुचवा.

औरंगजेब's picture
औरंगजेब in जनातलं, मनातलं
1 Apr 2017 - 2:08 pm

साल-१९३७-मे महिना

सकाळ नुकतीच झाली होती. मे महिना असल्याने आंब्याने झाडे लहडली होती. रामभाउ खोत नुकतेच प्रातर्विधी उरकुन ओसरीवर चहा भुरकत बसले होते.
येवढ्यात गणप्या गड्याने गाडी लावल्याची वर्दी दिली. रेशमी बंडी, जरीकाठी धोतर कपाळी पुणेरी पगडी वरती कानात अत्तराचा फाया असा वेश करुन रामभाऊ गाडीत बसले.
यथावकाश गाडी गावाबाहेर पडली. जंगल सुरु झाले. तालुक्याला जायचे म्हणजे वाट जंगलातुनच असायची. खोत आपले मजेत तक्याला टेकुन पान जमवत बसले होते. जंगलातल्या भैरोबा देवापाशी गाडी थांबली. खोतांनी नारळ वाढवला. तशी ही गावची परंपराच होती. यामागे एक कारण होते १ वर्षी खालच्या वाडीतल्या जनाबानी नारळ वाढवायला नकार दिला होता तर त्याचा मुडदा सुध्दा कुणाच्या द्रुष्टीस पडला नाही. त्यामुळे भैरोबाला नारळ अनिवार्यच होता.
यथावकाश खोत प्रवास संपवुन तालुक्याला आले. कचैरीत सारा भरणा केला. मग निवांत विड्या फुंकत गाडीत बसले. परतीचा प्रवास सुरु झाला होता पण तो कधीच संपणार नव्हता........

पुढचा खो मी open ठेवला आहे कोणीही लिहिले तरी चालेल.फक्त लिहिण्या आधी प्रतिसादात नोंद करावी ही विनंती.

खो कथेचा हा पहिलाच प्रयत्न आहे. चुकभुल द्यावी घ्यावी.

कथालेख

प्रतिक्रिया

पैसा's picture

2 Apr 2017 - 9:37 am | पैसा

छान प्रयत्न

Ranapratap's picture

2 Apr 2017 - 11:47 am | Ranapratap

मजा येणार, जितें रहो, लिखते रहो.