मराठीतला पहिला पॉडकास्ट: विश्वसंवाद

Primary tabs

mandardk's picture
mandardk in तंत्रजगत
25 Mar 2017 - 4:51 am

"विश्वसंवाद" या पहिल्या मराठी पॉडकास्टचे एपिसोडस "मिसळपाव"वर प्रसिद्ध करण्याची संधी मला मिळते आहे, ही आनंदाची बाब आहे.

मराठीतला हा पहिला पॉडकास्ट. नव्यानं ओळख झालेल्या या माध्यामानं गेली काही वर्षं अगदी झपाटून गेल्यासारखं झालंय. इंग्रजीतले अनेक, वेगवेगळ्या विषयांवरचे पॉडकास्टस ऐकल्यानंतर, मराठीत हा प्रकार आणायलाच हवा असं वाटत होतं. जवळजवळ वर्षभराच्या तयारीनंतर १ जानेवारी २०१७ पासून मी हा पॉडकास्ट प्रसिद्ध करतोय.

या मराठी पॉडकास्टचं स्वरूप आहे मुलाखतीचं. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या माणसांशी गप्पा मारत त्यांना समजून घेण्याचं कुतूहल आणि पॉडकास्टींग हा नवीनच सापडलेला छंद या दोन गोष्टींना एकत्र आणण्याचा हा उपक्रम. शीर्षक आहे: विश्वसंवाद. वेब-साईट: www.vishwasamwaad.com आणि फेसबुकवर: www.facebook.com/vishwasamwaad

आजपर्यंत प्रसिद्ध झालेल्या एपिसोडसमधले पाहुणे आहेत:
- ज्येष्ठ मराठी लेखक/समीक्षक विजय पाडळकर
- अंतराळात झेप घेण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या Scientist-astronaut candidate अनिमा पाटील-साबळे
- Friends of Anandwan या संस्थेच्या चंदा आठले

आणि काही आगामी पाहुणे असे:

- भारतीय तालवाद्यांच्या सिंथेसायझरचे जनक जयवंत उत्पात
- खगोल-संशोधक / शास्त्रज्ञ आशिष महाबळ
- मराठी कीर्तन परंपरेचे फ्रेंच अभ्यासक एरिक फेरिए
- बहुभाषिक डिजिटल डिक्शनरीचे जनक सुनील खांडबहाले

हे सगळे एपिसोडस यथावकाश "मिसळपाव"वर येतीलच. या सुरुवातीच्या पोस्टबरोबर या पॉडकास्टची आरंभ-धून देतो आहे. "मिसळपाव"च्या रसिक आणि चोखंदळ वाचकांच्या प्रतिक्रिया, सूचना समजून घ्यायला नक्कीच आवडेल.

* * पॉडकास्ट या माध्यामाशी परिचित नसणाऱ्या वाचकांसाठी:

पॉडकास्ट म्हणजे तुम्हाला हवं तेव्हा (on demand) ऐकता येईल असा ऑडिओ (किंवा विडिओ) कार्यक्रम. सर्वसाधारणपणे पॉडकास्ट हे अगदी फुकट ऐकता येतात. जगभरात पॉडकास्ट हे बहुतेक वेळा मोबाइल फोनवरून ऐकले जातात पण वेब-साईटवरूनही ऐकणं सहज शक्य असतं. काही लोकप्रिय पॉडकास्टना जाहिरातदारांचं पाठबळ असतं पण बाकी पॉडकास्ट हा स्वान्त-सुखाय आणि हौसेचाच मामला असतो.

* * कसा ऐकाल "विश्वसंवाद" पॉडकास्ट?

- पॉडकास्टच्या वेब-साईटवरून (www.vishwasamwaad.com)
- Google Play Music वरून (www.bit.ly/mandar-vs-gplay)
- iPhone वर Podcasts नावाचं App आहे, ते वापरा.
- Stitcher नावाचं App कोणत्याही मोबाईल फोनवर (iPhone, Android, Windows) चालतं. यापैकी कोणत्याही App मध्ये जाऊन "vishwasamwaad" असं नाव शोधा. Subscribe केलंत तर नवे एपिसोडस आपोआप डाऊनलोड होतील आणि नवीन एपिसोडस आल्याचंही कळेल.

प्रतिक्रिया

स्रुजा's picture

25 Mar 2017 - 5:37 am | स्रुजा

अरे वा ! उत्तम उपक्रम... तुम्हाला भरपूर शुभेच्छा. मिपावर उपलब्ध करुन दिल्याबद्दल अनेक आभार. यातुन आमच्या माहितीत निश्चित च मोलाची भर पडणार आहे. मराठीचा पहिला पॉडकास्ट ! सहीच वाटतंय !!!

पिलीयन रायडर's picture

1 Apr 2017 - 3:01 am | पिलीयन रायडर

+१११

नक्कीच ऐकेन!

स्रुजा's picture

25 Mar 2017 - 5:37 am | स्रुजा

अरे वा ! उत्तम उपक्रम... तुम्हाला भरपूर शुभेच्छा. मिपावर उपलब्ध करुन दिल्याबद्दल अनेक आभार. यातुन आमच्या माहितीत निश्चित च मोलाची भर पडणार आहे. मराठीचा पहिला पॉडकास्ट ! सहीच वाटतंय !!!

छान उपक्रम. शुभेच्छा.

फुत्कार's picture

25 Mar 2017 - 8:59 pm | फुत्कार

व्वा ! उत्तम प्रकल्प. शुभेच्छा !

आरंभधून इंग्लिश चॅनेल्स सारखी वाटली.
मराठमोळी किंवा भारतीय असायला हवी असे वाटते.

mandardk's picture

25 Mar 2017 - 10:51 pm | mandardk

आता या पॉडकास्टसाठी बदल करणं अवघड आहे पण माझे इतर पॉडकास्टस करताना नक्की लक्षात ठेवेन.

mandardk's picture

25 Mar 2017 - 10:51 pm | mandardk

धन्यवाद, सुजा, एस आणि फुत्कार!
तुमच्या प्रतिक्रिया हुरूप वाढवणाऱ्या आहेत, त्यांचं स्वागतच आहे.आमच्या फेसबुक पेजला Like करून Share केलंत आणि तुमच्या मित्र-मंडळींना या पॉडकास्टबद्दल सांगितलंत तर हा प्रयत्न जगभरातल्या मराठी मंडळींपर्यंत पोहोचविण्यासाठी खूप मोलाची मदत होईल.

www.facebook.com/vishwasamwaad

चौथा कोनाडा's picture

25 Mar 2017 - 10:54 pm | चौथा कोनाडा

अतिशय सुंदर उपक्रम !
या निमित्ताने छान छान मराठी पॉडकास्ट अनुभवायला मिळत आहेत.

मिपा-डिशभर शुभेच्छा ! इथे धागा टाकल्याबद्दल खुपआभार !

अत्रुप्त आत्मा's picture

25 Mar 2017 - 11:54 pm | अत्रुप्त आत्मा

@मिपा-डिशभर शुभेच्छा ! इथे धागा टाकल्याबद्दल खुपआभार !››› +++१११.

एक प्रश्न असा की याला मुलाखतींचा ल्बॉग असं नम्हणता पॉडकास्ट असं वेगळच नाव का देतात? पॉडकास्ट म्हणतात ते का? काय याचं वेगळेपण? की नुस्तच एक नाव?

प्रतिसादाबद्दल आभार. तुमच्या प्रश्नाला थोडक्यात उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.

* ब्लॉग हा शब्द मुळात "वेब-लॉग" चा शॉर्ट-फॉर्म आहे. सहाजिकच तो लिखित स्वरूपात सुरु झाला आणि अजूनही आहे.

* श्राव्य स्वरूपातल्या ब्लॉगला ऑडिओ-ब्लॉग म्हणणं शक्य आहे पण तो शब्द फारसा प्रचलीत नाही. त्यामानाने video blogला "vlog" असा काहीसा चमत्कारिक शब्द काही वेळा वापरलेला दिसतो.

* पॉडकास्ट या शब्दाचा जन्म Apple नं iPod आणला त्या सुमारास झाला - iPod मधला pod आणि broadcast मधला cast.

* पॉडकास्टचं वेगळेपण असं:
-- मुलाखती हा पॉडकास्टचा फक्त एक format आहे. चर्चा / गप्पा, एकाच व्यक्तीचं बोलणं (भाषण, सांगितलेली माहिती, मनोगत), audio documentary आणि श्रुतिका / नभोनाट्य (Audio Drama) असे इतर बरेच प्रकार आहेत.
-- ९९ टक्के पॉडकास्टस हे पूर्णपणे मोफत असतात.
-- सुरुवातीला iPod आणि स्मार्ट-फोन आल्यापासून कोणत्याही स्मार्ट-फोनवरून पॉडकास्टस ऐकता येतो. Portability हे महत्त्वाचं वैशिष्ट्य ज्यामुळे गाडी चालविताना, घरात काम करताना, व्यायाम करताना पॉडकास्टस ऐकता येतात.
-- अर्थातच वेब-साइट्सवरूनही पॉडकास्ट ऐकणं शक्य असतंच. ज्यांना काही कारणांनी स्मार्ट/मोबाइल फोनवरून ऐकायचे नसेल, त्यांच्यासाठी ती सोय आहे.

संजय क्षीरसागर's picture

26 Mar 2017 - 12:19 am | संजय क्षीरसागर

लगे रहो .

अत्रे's picture

26 Mar 2017 - 5:08 pm | अत्रे

मस्त. ऐकून बघतो.

रेकॉर्डिंग सेटअप काय आहे? माइक वगैरे?

प्रत्येक एपिसोडचा रेकॉर्डिंग सेट-अप वेगळा असू शकतो. पाहुण्यांची प्रत्यक्ष भेट होणार असेल तर SM-58 हा माइक्रोफोन आणि h2n hand-held recorder वापरतो. नाही तर Skype Call Recording असतं. शिवाय नंतर बरंच audio editing, mixing, processing करावं लागतं.

राघवेंद्र's picture

28 Mar 2017 - 3:57 pm | राघवेंद्र

खुप दिवसापासुन मराठी पाॅडकास्ट शोधत होतो. पहिले तीन भाग ऐकले, मस्त झाले आहेत. विजय पाडळकरांना संपर्काचा आॅनलाईन पत्ता भागाच्या शेवटी हवा होता.

पण मुलाखत एकदम मस्त!!! पुढील भाग सुध्दा ऐकेल.

राघवेंद्र, दिलखुलास अभिप्रायाबद्दल आभार.

आजच विजय पाडळकरांची वेब-साईट सुरु झालीये, तिथून तुम्हाला त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

http://www.vijaypadalkar.com/

धन्यवाद मंदार !!!

वेबसाईट बघेल आता.

खूप छान काम केले आहे. दर १५ दिवसाला एक भाग असे दिसत आहे.
सगळे भाग ऐकले खूपच छान !!!! खूप वेगवेगळे विषय हाताळत आहात.

उद्याच्या भाग हि ऐकायला आवडेल.

मदनबाण's picture

1 Apr 2017 - 8:15 pm | मदनबाण

सुंदर उपक्रम !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- भाग्यद लक्ष्मी बारम्मा । नम्मम्म नी सौभाग्यद लक्ष्मी बारम्मा ॥ :- [ Sooryagayathri ]

बोका-ए-आझम's picture

6 Apr 2017 - 7:02 pm | बोका-ए-आझम

उपक्रम! WhatsApp audio चा podcast करता येऊ शकतो का?

आनंदयात्री's picture

7 Apr 2017 - 1:58 am | आनंदयात्री

अभिनंदन. उत्तम उपक्रम आहे. नक्की ऐकेन.

राघवेंद्र's picture

1 May 2017 - 7:03 pm | राघवेंद्र

मे १ चा ही भाग उत्तम झाला आहे.

नोटा बंदी.
सिनेमा आणि नाटक
नाशिक
जनरिक मेडिसिन
आदिवासी लोंकाना मार्गदर्शन
जागतिक अर्थव्यवस्था
आणि सगळ्यात महत्वाचे अमेरिकेतुन भारतात जाऊन कसे काम करता येईल
या बद्दल दीपक करंजीकर यांची उत्कृष्ट मुलाखत.

धन्यवाद मंदार !!!