चलती का नाम गाडी...

Primary tabs

शब्दबम्बाळ's picture
शब्दबम्बाळ in तंत्रजगत
17 Mar 2017 - 10:32 pm

car

हल्ली आपल्या आजूबाजूला बऱ्याच प्रकारच्या आणि बऱ्याच श्रेणी मधल्या अनेक चार चाकी गाड्या पाहायला मिळतात. त्यामुळे त्यांच्याविषयी फारसे अप्रूप राहिलेले नाही. पण आपल्या पैकी बऱ्याच जणांना गाडी नक्की कशी चालते किंवा त्यामध्ये येत राहणाऱ्या नवनवीन सुविधा कशा काम करतात याविषयी पूर्ण माहिती असेल असे नाही.
या धाग्याचा उद्देश गाड्यांविषयी किंवा त्यामधल्या कोणत्याही तांत्रिक बाबींविषयी प्रश्न विचारून त्याची उत्तरे शोधण्याचा आहे.

पहिली गाडी बनवून आता जवळपास सव्वाशे वर्षे उलटून गेली आहेत! पण अजूनही बहुतांश गाड्या जैविक इंधनावर चालतात.
हायब्रीड किंवा इलेकट्रीक हि नावे कानावर येत राहतात पण रस्त्यावर तितक्या प्रमाणात येत नाहीत! यामागेही अनेक कारणे आहेतच...
अशाच प्रश्नांवर चर्चा होऊन या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी अधिकाधिक माहिती इथे देत राहावी, त्यामुळे कदाचित काही विद्यार्थ्यांनाही फायदा होऊ शकेल.

आता, मला पडलेला एक प्रश्न...
कोणतीही चारचाकी गाडी airtight असते का? म्हणजे सगळ्या काचा आणि दारे लावून घेतली आणि ac बंद असेल तर बाहेरची हवा कुठून आत येऊ शकते का?
कारण बऱ्याचदा वाचण्यात येते कि गाडीमध्ये झोपलेल्या लोकांचा गुदमरून मृत्यू होतो. यामागचे मूळ कारण ऑक्सिजन चा अभाव असतो का?

पण मग गाडी पाण्यात पडल्यावर बुडते देखील! गाडीमध्ये पाणी शिरते म्हणजे गाडी मध्ये हवा शिरायला देखील जागा असणारच!
मग असे असेल तर गाडी मध्ये गुदमरून मृत्यू होण्याचे नक्की कारण काय असेल?

प्रतिक्रिया

रामपुरी's picture

17 Mar 2017 - 11:53 pm | रामपुरी

कोणतीही चारचाकी गाडी airtight असते का? - पूर्णपणे नाही. बाहेरचे पावसाचे पाणी वगैरे सहजासहजी आत येउ शकत नाही.
गाडीमध्ये झोपलेल्या लोकांचा गुदमरून मृत्यू होतो. यामागचे मूळ कारण ऑक्सिजन चा अभाव असतो का ? - ऑक्सिजनच्या अभावापेक्षा कार्बन डाय/ मोनो ओक्साईड ची प्राणघातक मात्रा
हवा शिरायला देखील जागा असणारच. - हो पण जवळजवळ हवा बंद असल्याने कार्बन .. ऑक्साईड तयार होण्याचा वेग जास्त असतो.

संदीप डांगे's picture

17 Mar 2017 - 11:54 pm | संदीप डांगे

गाडी एअरटाईट नसते. पण मनुष्याला श्वसनासाठी जो प्राणवायू लागतो त्याचे उपलब्ध हवेमधले प्रमाण कमी झाले तर गुदमरुन मृत्यू होतो. पाण्यात गाडी बुडाल्यावर बारिक भेगांमधून हळूहळू पाणी शिरते. त्यापद्धतीने हवा शिरू शकत नाही. हवेचा प्रवास आणि पाण्याचा प्रवास यात थोडा फरक आहे. श्वसनासाठी जेवढ्या प्रमाणात ताजी हवा लागते तेवढ्या प्रमाणात व त्या वेगाने गाडीत हवा उपलब्ध झाली नाही तर गुदमरायला होतं.

- मी तज्ञ नाही पण अंदाजपंचे उत्तर दिलंय. बरोबरच असेल असा दावा नाही.

५० फक्त's picture

18 Mar 2017 - 10:44 am | ५० फक्त

+१ रामपुरी...

गाडी ९९ टक्के ऐअर टाइट असते, अगदी छोट्या जागा बहुदा जॉईंट्जवळ्च्या तिथुन हवा आत येउ शकते, एसिचा हवाझोताचा नॉब फ्रेश वर ठेवला तर बाहेरची हवा आत येण्याची व्यवस्था असते ती १००% बंद होत नसते. तसेच जिथुन स्टिअरिंग रॉड बाहेर जातो, वायरिंग इंजिन बे मध्ये जातं त्या जागा देखिल १००% बंद नसतात. अगदी गिअर नॉबच्या वर जे कव्हर असते त्या खालची जागा देखिल १००% बंद नसते.

पण बंद गाडीत जिव जातो ते, काडाऑ किंवा कामोऑ चे प्रमाण जास्त झाल्याने, बहुदा अशांचे पोस्ट मार्टेम रिपोर्ट्स फुफुसामध्ये / रक्तामध्ये खुप जास्त काडाऑ जमा झाल्याने असे असतात.

शब्दबम्बाळ's picture

20 Mar 2017 - 11:01 pm | शब्दबम्बाळ

हो काही मुद्दे मीही वाचले.
काही ठिकाणी गाडीच्या आतमध्ये वाढलेले तापमान हे हि कारण दिले आहे. गाडी मध्ये हवा बंद राहत असल्याने बाहेरच्या तापमानापेक्षा अगदी १०-१५ डिग्रीचा देखील फरक पडू शकतो. दुपारच्या वेळी या वाढलेल्या तापमानामुळे चक्कर येऊन त्यानंतर गुदमरून मृत्यू होऊ शकतो.
लहान मुलांना कधीही गाडीत एकटे सोडून न जाणेच श्रेयस्कर अशा वेळी!

शेणाचा बाइओगॅस इंधन म्हणून वापरलाय का?८० टक्के मेथेन असतो त्यात.

कारला फ्लोअर लॅमिनेशन करून घेणे कितपत योग्य आहे? काही ठिकाणी नकारात्मक प्रतिक्रिया वाचल्या आहेत. त्यापेक्षा थ्री-डी (त्रिमितीय) फ्लोअर मॅट्स जास्त चांगल्या का?

मराठी कथालेखक's picture

22 Mar 2017 - 7:31 pm | मराठी कथालेखक

काही ठिकाणी नकारात्मक प्रतिक्रिया वाचल्या आहेत

काय होत्या त्या प्रतिक्रिया ?

कालांतराने लॅमिनेशनखाली बुरशी होते आणि दुर्गंध येऊ लागतो. तसेच खराब झाल्यावर बदलणे कटकटीचे असते.

कंजूस's picture

20 Mar 2017 - 6:02 pm | कंजूस

गाडी आदळल्यावर पेटते हे पाश्चिमात्य चित्रपटात नेहमी पाहात असलो तरी इकडे फक्त चकणाचूरच होत असत. काल मात्र अश्विन सुंदर आणि त्याची बायको गाडी पेटून मेले ही बातमी आली. इतक्या झटकन की गाडी हल्ली पेटण्याचे कारण CNG ?

गाडीचे इंजीन मॉडिफाय केलेले होते त्यामुळे आग लागली असे वाचले पेपर मधे.

ऋतु हिरवा's picture

25 Mar 2017 - 5:13 pm | ऋतु हिरवा

उपयुक्त माहिती