धनाढ्य एकवीशी

धनाढ्य एकवीशी (प्रेरणा- हनुमान चालीसा)

जय धन मान सकळ सुखसागर
माया वसत त्रीखंडी निरंतर

पैसा पैसा पैसा पैसा
दिसतो ऐसा, आहे कैसा?

लपविला जर टॅक्सची खासा
काळा शार बने मग पैसा

भरता सरकाराऽचे देणे
शुभ्र धन नांदे अभिमाने

हिरवा रंग नोटांचा तुमच्या
नयनी दिसे झणी लोकांच्या

काळ्या नोटा, दिली सुपारी
लाल रंग मग धन ते धारी

रंगबिरंगी अती पैसा वरचा
परीटाकडून शुभ्र करायचा

पैसा अपुला रोड भासतो
दुसऱ्याचा तो लठ्ठ जाहतो

खोटी नाणी, चपळ फ़िराई
तांब्याची मोडीत विकाई

पेटीत ठेवून कोऱ्या नोटा
तुकडेवाल्या जोडून वाटा

पैसा नश्वर, आरोप खोटा!
शाश्वत आहे प्लास्टीक नोटा

उधारीचा तो पैसा प्लास्टीक
जपून ठेवती पैसा बॅन्कीक

पैसा ॐ निर्गूण निराकारा
सांगे वेबचा ई व्यवहारा

पैसा जाई पैसा जिकडे
गरीबांशी तो धरी वाकडे

धनिका घरी धनाची गंगा
तरीही भुकेला सदाची नंगा

पैसा पैसा पैसा पैसा
दिसतो जैसा, नाही तैसा!

श्रमाविना जे धऽन कमवले
तृणमुल्य ते सतत भासले

स्वकष्टाची जरी कांदा भाकर
संतुष्ट करी जशी लोणी साखर

चिंतापिशाच जवळ ना येई
भ्रम खोटा बघ धन ते देई

पैसा मिळता शांती पळाली
पैसा पळता झोप उडाली

म्हणे गोपालसुत धनवाना
मायाऽऽपाशा सोडून द्याना

Taxonomy upgrade extras: 

प्रतिक्रिया

छान लिहिले आहे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

स्वकष्टाची जरी कांदा भाकर
संतुष्ट करी जशी लोणी साखर

वा! या ओळी सर्वात आवडल्या..! smiley

आपला,
(पैसेवाला) तात्या.

-- या आमच्या शिळोप्याच्या ओसरीवर.. बसा घटकाभर..!

प्राजु, तात्या. प्रतिसाद नोंदवल्यासाठी आभार.

अस्ला तरी बी वांध नस्ला तरी बी वांध पोटापान्या पुरता अस्ला म्हजि झालं. पन हे ठरवनार कोन व कसं?
बाकी धनाढ्य एकवीशी झकास
प्रकाश घाटपांडे

प्रकाश घाटपांडे
फलज्योतिष चिकित्सा मंडळ

आता प्वाटापुर्ता पयसा मंजे कीती त्ये आपापलं प्वाट बगूनच आपलं आपनच ठरवायच की!
पन असं करायच सोडून उगाच लोक दुसर्याइच प्वाट बगून दुकी व्ह्तात म्हनून तर सारा इस्कोट होतो बगा!
धन्यवाद.

काय काय मनात येतं कविलोकांच्या काही सांगता येत नाही.
बाकी एकविशी म्हटल्यावर थोड्या गुदगुल्या झाल्या होत्या.

खरयं रामदासजी. कवी कधी पैसा, कधी गोलगुबार **, कधी जरीचे धागे, कुठल्या कुठल्या भन्नाट चीजा बघत असतो! गुदगुल्या होणारच की! smiley
आभार. तुमच्या कविता, लेखन मला खूप आवडते.