✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शिट्टी

श
शैलेन्द्र यांनी
Fri, 02/24/2017 - 23:26  ·  लेख
लेख
नाना आणि तात्या, दोघ शेतकरी, नानाच कुरण तसं जुनं, नानाचे बैल मस्त पोसलेले, नानाच गवत जोरात वाढायच, बैल चरून तुस्त व्हायचे.. तात्यांची जमीन खडकाळ, जागाही लहान, पण तात्यांकडे बोकड होते, ते बिचारे दिवसभर खुराने जमीन उकरत काही तरी खायचे, मधूनच एखादं झाड ओरबाडायचे, कधी नानाच्या शेतात घुसायचे, स्वतःच्याच लेंड्या शेतात जिरवून जमिनीचा कस वाढवायचे.. हळूहळू गम्मत व्हायला लागली, तात्यांचे काही बोकड कुठून काय खाऊन आले काय माहित, पण त्यांनी टाकलेल्या लेंड्यांमधून एक वेगळंच भगवं गवत उगवलं, सुसाट वाढायला लागलं, इतकं कि या बोकडानी कितीही खाल्लं तरी संपेना..तिकडे नानाच्या शेतावर आक्रीत घडलं, सारखं गवत काढून काढून जमीन थकली, त्यातच काही बैलांनी मस्ती करून गवत झोपवलं, ते गवत सीडलेस जातीचं, सिंचनाशिवाय, खताशिवाय ते परत येईना.. नानाचे बैल उपासमारीने मरतील कि काय, अशी वेळ आली. पण नाना मोठा हुशार, धोरणी.. त्यांनी काय केलं, बैलांना एक शिट्टी शिकवली, शिट्टी मारली कि बैल परत येणार.. शिक्षण पूर्ण झाल्याची जशी खात्री झाली तशी त्याने ती शिट्टी तिजोरीत ठेवून दिली.. मग तो गेला तात्याकडे, बैठका झाल्या, अटी शर्ती झाल्या.. नानाचे बैल तात्यांच्या कुरणात सोडायचे, त्या बदल्यात बैलाच दूध तात्याने घ्यायचं आणि बैलाला वासरू झालं तेही तात्यांच्या मालकीचं, असा पक्का शब्द दिला गेला.. आता नानाचे बैल तात्यांच्या कुरणात मस्त चरतायेत, तात्यांचे बोकड घाबरून कडेला बसलेत... आणि तात्या बैलाला वासरू व्हायची आणि मग दूध काढायची स्वप्न बघतोय. नाना हळूच तिजोरीतल्या शिट्टीकडे बघून हसतोय.. आणि हो, या पोस्टचा राजकारणाशी अजिबात संबंध नाही.. निवडणुकांशी त्याहून नाही.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7934 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

हाहाहा

लालगरूड
Sat, 02/25/2017 - 19:32 नवीन
हाहाहा
  • Log in or register to post comments

नाही बुवा समजली. राजकारणाचे

पिलीयन रायडर
Sat, 03/11/2017 - 02:48 नवीन
नाही बुवा समजली. राजकारणाचे संदर्भ फारसे माहिती नसतात म्हणुन असेल! राजकारण विभागात शिट्टी म्हणुन काय लेख आहे म्हणुन उत्सुकतेने आले =))
  • Log in or register to post comments

खूप स ह ज आहे हो

शैलेन्द्र
गुरुवार, 03/16/2017 - 00:18 नवीन
खूप स ह ज आहे हो
  • Log in or register to post comments

लई भारी

dhananjay.khadilkar
Wed, 03/29/2017 - 23:01 नवीन
लई भारी
  • Log in or register to post comments

जबरा....

नीलकांत
गुरुवार, 04/27/2017 - 22:27 नवीन
सहीच लिहीलंय. मस्त...
  • Log in or register to post comments

=))

पैसा
Fri, 04/28/2017 - 09:46 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments

ते ना

snehal salunkhe
Wed, 07/05/2017 - 15:51 नवीन
तात्या BJP नाना Shivsena रे
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा