शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ नवा दृष्टीकोन

रुपी's picture
रुपी in जनातलं, मनातलं
23 Feb 2017 - 6:46 am

a

खांद्यावर पर्स, हातात छत्री, डबा, गळ्यात मंगळसूत्र आणि ओढणी सांभाळत स्टॉपपासून पन्नास मीटर लांब जाऊन थांबलेल्या बसमध्ये चिखलातून वाट काढत गर्दीतून स्वतःला आत घुसवलं.
खिडकी नीट बंद होत नसल्यामुळे काल पावसाचं पाणी आत आलं होतं, त्यामुळे आज आयलकडच्या सीटवर जागा मिळाली, बरंच वाटलं.

'मॅनेजरला काय उशीरापर्यंत मीटींग ठेवायला? चापेल घरी जाऊन आयतं.'

कॉलेजकन्यकांचा घोळका खिदळत बसमध्ये शिरला. माझ्याहून फार लहान नसणार, पण अल्लड नक्कीच.

'बसमध्ये अजून तासभर, दहा मिनिटे चालत, घरी पोहचून कपडे बदलून स्वयंपाक.'

पुन्हा खिदळणं.

'नॉनसेन्स.'

तेवढ्यात पाऊस आलाच. आज बसचे छतच मध्यभागी गळके!

'बकवास पीएमटी.'

कॉलेजकन्या पुन्हा का खिदळतायेत? अच्छा, गळक्या बसलाच?

'भिजूद्या, असेही कपडे बदलायचेच होते'.

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

स्रुजा's picture

23 Feb 2017 - 8:52 am | स्रुजा

:)