✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ दिवसाची लाईट

च
चांदणे संदीप यांनी
गुरुवार, 02/23/2017 - 06:42  ·  लेख
लेख
a "तू लाईट चालू करतो का नाय?", लेबर कॉलनीतला सदाशिव सकाळी सकाळी सोसायटी गेटवरच्या वॉचमनवर भडकलेला. "वरनंच आडर हाय, दिवसा ९ ते ६ बंद ठ्वा सांगील्ती, बाकी काय म्हायीत नाय" इति वॉचमन. हतबल होऊन सदाशिव आला तसा तणतणत गेला. बिल्डीन्गमध्ये कुणाचे पडदे किलकिलले तर कुणाच्या गॅलरीतल्या चहाचे झुरके मंदावले. मग दुपारी एकेकजण खाली गेटवर वॉचमनकडे विचारपूस करून सकाळच्या चर्चेचा आढावा घेऊ लागले. पहिला मजला: अरे, एवढी मस्ती आहे तर हेड ऑफिसला बोल की म्हणावं! आमच्या झोपेच खोबरं कशाला? तिसरा : वाईट ओ! इथ गरीबाचं पडलयं कुणाला? आठवा : पण ह्या लोकांना कशाला पाहिजे दिवसा लाईट? बारावा : ह्या...ह्या...ह्या...असं झालं तर... बरं!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
1281 वाचन

💬 प्रतिसाद (1)

प्रतिक्रिया

चहाचे झुरके>>> झुरके

विनिता००२
गुरुवार, 02/23/2017 - 16:12 नवीन
चहाचे झुरके>>> झुरके सिगारेटचे असतात ना???
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा