शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ स्वप्नं

निरु's picture
निरु in जनातलं, मनातलं
23 Feb 2017 - 6:39 am

aaa

"शाळेत अतिरेकी लपल्याची खबर मिळाल्यामुळे आम्ही क्षेपणास्त्र डागलं. अतिरेकी मेले पण शाळेची इमारत कोसळली आणि तुमच्या यजमानांना आणि काही विद्यार्थिनींना हकनाक प्राण गमवावे लागले. पण तुम्ही या दुःखात अडकून न पडता निर्वासितांच्या छावणीत शाळा पुन्हा सुरु केलीत हे खरोखरच कौतुकास्पद आहे. काही मदत लागली तर सांगा", असं छापील बोलून तो ऑफिसर निघून गेला.
पण तिला मदतीची गरज नव्हती. तिच्याकडे साधनं, माणसं आणि पैसे, सगळं काही होतं. बाकी होतं ते फक्त एक स्वप्न प्रत्यक्षात आणणं… तिनं आणि तिच्या नवऱ्यानं मिळून बघितलेलं…
त्या भागातल्या लहान मुलींसाठी शाळा चालवायचं स्वप्न… आणि शिक्षणाच्या नावाखाली अतिरेकी तयार करून फिदायीन हल्ल्यांनी अख्खं जग हादरवून सोडण्याचं स्वप्न!

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

स्रुजा's picture

23 Feb 2017 - 8:55 am | स्रुजा

बाप रे ! काटाच आला अंगावर.

पद्मावति's picture

23 Feb 2017 - 12:23 pm | पद्मावति

+१

विनिता००२'s picture

23 Feb 2017 - 4:00 pm | विनिता००२

छान लिहिलेय कथा :)