मराठी भाषा दिन २०१७: वोवळां सर (पद्ये ब्राह्मणांची बोली)

Primary tabs

पिशी अबोली's picture
पिशी अबोली in लेखमाला
21 Feb 2017 - 6:27 am

1
*************************
१.
माड्यां-सुपार्‍यांनी खेळटे धन,
माडये तेकल्ल्या ज्या खांदये हालोवन पडटात वोवळां,
त्या एका खांदयेर माझें भुरगेंपण

२.
वोवळीण मारली,
तेधवां थोडी मुळां मज देवन् गेली,
थोडी, थोडी करून मनांत पातळत र्‍हायली

३.
वाटेर थांबून
तुवेन् वोवळां विकती घेतली,
तेधवां मनातलीं वोवळीण परतून राशींनी फुलली

४.
तूं गेला, वोवळां गेली,
वास सोपलां नाय, रासय नाय सोपली,
तुज राशींनी फुलतना, मीच वोवळीण जाली

***************************
1

अर्थः
वोवळ- बकुळ
माडी- सुपारीचे झाड
खांदी- फांदी
वोवळीण-बकुळीचे झाड
मारणे- झाड तोडणे
पातळणे- पसरणे
परतून-परत

1

प्रतिक्रिया

पैसा's picture

21 Feb 2017 - 7:44 am | पैसा

पद्ये हायकू!

सुरेख! शेवटचे फारच सुंदर आहे.

"भुरगेंपण" म्हणजे काय? १ चा अर्थ समजला नाही.

यशोधरा's picture

21 Feb 2017 - 8:02 am | यशोधरा

भुरगेंपण = मूलपण, लहानपण, अल्लडपण

सुरेख!

प्रीत-मोहर's picture

21 Feb 2017 - 8:26 am | प्रीत-मोहर

भटी भाशेंत काव्य! ! क्लास आहे.
मी वॊट्सेपार धाडटे गो सगळ्यांस. कोठेंच वाचली नव्हती भटी भाशेंतली कविता.

सूड's picture

21 Feb 2017 - 12:34 pm | सूड

भारीच!

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Feb 2017 - 1:14 pm | कैलासवासी सोन्याबापु

मला मुळात पद्ये ब्राह्मण कोण तेच ठाऊक नाही, तर भाषा माहिती असायचा संबंधच नाही. हे थोर आहे, नवीन भाषा कळली एक. तुमचे असंख्य आभार.

अरे वा! ज्ञानेश्वरकालीन भाषा वाचल्यासारखं वाटू राहिलं. छानच!

पद्मावति's picture

21 Feb 2017 - 1:58 pm | पद्मावति

सुरेख!

सपे-पुणे-३०'s picture

21 Feb 2017 - 2:03 pm | सपे-पुणे-३०

भटी भाषेतली हायकू प्रथमच वाचली. मला २ रे आणि ४ थे विशेष आवडले.

उल्का's picture

21 Feb 2017 - 2:28 pm | उल्का

शब्दांका सुरेख गुंफलस गो...
वळेसर सुरेख असा हयो...
बरोबर आहे का?

एस's picture

21 Feb 2017 - 4:43 pm | एस

छान आहे.

नंदन's picture

21 Feb 2017 - 4:58 pm | नंदन

हायकू-एस्क रचना आवडली.

अभ्या..'s picture

21 Feb 2017 - 6:31 pm | अभ्या..

मस्त गं पिशे.
लडीवाळ भाषा आहे अगदी. माऊलींचेच शब्द जणू.
.
आता दोन प्रश्न.
१) हे पद्ये ब्राह्मण कुठे असतात? स्थानाप्रमाणे की उपजात्/शाखा वगैरे?
२) तू आहेस काय? ;)

पिशी अबोली's picture

22 Feb 2017 - 12:00 am | पिशी अबोली

१. मागच्या वर्षी लिहिलेले उत्तर चोप्य-पस्ते करते.

पद्ये बोली ऐकण्यासाठी गोव्यात यावं लागेल. केरी, रिवण, काणकोण, डिचोली अशा अनेक भागांमधे ही बोली बोलतात. या वेगवेगळ्या भागांतील बोलीमधेही फरक आहे. काही ठिकाणी कोंकणीचा प्रभाव फार दिसून येतो.

कऱ्हाडे ही एक ब्राह्मणांची पोटजात आहे. असे म्हणतात की यांना शिलाहारांनी ब्राह्मणाचा दर्जा दिला. सह्याद्रीखंडात कऱ्हाड़यांबद्दल उल्लेख आहे(तो फारसा स्तुतिपर नाहीये, पण उल्लेख आहे एवढंच ;))
कऱ्हाडे आणि पद्ये यांच्या संबंधांबद्दल दोन मते वाचली आहेत. एक, शिलाहारांनी ब्राह्मण म्हणून दर्जा दिल्यावर जे कऱ्हाडे गोव्यात येऊन स्थायिक झाले, ते पद्ये. दुसरा, सगळे कऱ्हाडे गोव्याचे, जे इथे राहिले ते पद्ये आणि बाहेर पडले ते कऱ्हाडे.

पद्ये लोक गोव्यातील बऱ्याच देवस्थानांमधे पुजारी आहेत. बागायती व्यवसायामधेही आहेत. त्यांची एकूण सामाजिक स्थिती चांगली आहे. शिक्षणही आहे.

२. नाही. ;)
पण मला ही बर्‍यापैकी बोलता येते.

अभ्या..'s picture

22 Feb 2017 - 12:09 am | अभ्या..

थ्यांकू.
लिहित जा ह्यात. छानंय बोली.

प्राची अश्विनी's picture

21 Feb 2017 - 6:49 pm | प्राची अश्विनी

किती गोड कल्पना आणि लाघवी भाषा आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Feb 2017 - 7:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुन्हा एकदा वाचतो. पण छान.

-दिलीप बिरुटे

मित्रहो's picture

21 Feb 2017 - 7:52 pm | मित्रहो

रचना आवडली. समजायला वेळ लागला

कवितानागेश's picture

21 Feb 2017 - 9:03 pm | कवितानागेश

खूप आवडलं

पिशी अबोली's picture

22 Feb 2017 - 12:02 am | पिशी अबोली

धन्यवाद लोकहो.

ही बोली काही माझ्या नेहमीच्या वापरातली नाही. त्यामुळे कवितेसारखं काही लिहिताना थोडं दडपण होतं. पण लिहून झाल्यावर माझं मलाच छान वाटलं. :)

पिलीयन रायडर's picture

22 Feb 2017 - 12:49 am | पिलीयन रायडर

मला समजलंच नाही बरंचसं. परत वाचावं लागेल. पण गोड वाटलं वाचताना. :)

सस्नेह's picture

22 Feb 2017 - 1:02 pm | सस्नेह

अर्थ समजायला वेळ लागला. कधी कानावर पडत नाही ही बोली !

इडली डोसा's picture

22 Feb 2017 - 1:27 pm | इडली डोसा

चौथी रचना फारच आवडली (खाली अर्थ दिले नसते तर काही अर्थ लागला नसता :D )

सानझरी's picture

22 Feb 2017 - 1:57 pm | सानझरी

अहाहा, किती सुंदर.. चौथ्या रचनेवर फिदा झालेय मी..

नूतन सावंत's picture

22 Feb 2017 - 5:30 pm | नूतन सावंत

बकुळीच्या नाजूक फुलान्सारखीच नाजूक शब्दातली सुगंधित कविता आहे.
हांवे चsड आवडतत वोवळा.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

22 Feb 2017 - 6:52 pm | अॅस्ट्रोनाट विनय

रचना छान. नवीन बोली वाचायला मिळाली. लिहीत जा अधून मधून या बोलीत म्हणजे आम्हालाही वाचण्याचा सराव होईल. विनंती समजा हवं तर

बबन ताम्बे's picture

22 Feb 2017 - 7:00 pm | बबन ताम्बे

एक नवीन बोली माहेत झाली.

प्रचेतस's picture

22 Feb 2017 - 7:33 pm | प्रचेतस

सुंदर

मितान's picture

23 Feb 2017 - 11:21 am | मितान

सुरेख !!!!

रेवती's picture

24 Feb 2017 - 12:50 am | रेवती

तुज राशींनी फुलतना, मीच वोवळीण जाली
सुरेख.

रातराणी's picture

25 Feb 2017 - 11:18 am | रातराणी

कविता वाचता वाचता आम्ही पण बकुळीची फुले झालो! अशक्य सुंदर लिहलंय!

पिशी अबोली's picture

26 Feb 2017 - 9:59 pm | पिशी अबोली

सर्वांना धन्यवाद!