✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: अडनड

ब
बबन ताम्बे यांनी
Fri, 02/10/2017 - 21:43  ·  लेख
लेख
aaaaaa आये , सरकारनी हजार पाचशेच्या नोटा बंद केल्यात.नाय बदलल्यातं त्याला किंमत ऱ्हाणार नाय", किसना म्हातारीला म्हणाला. "माह्याकं काह्याचा पैका." म्हातारी फणकारली. "हां ! माजघरात ठिवलेत गठुड्यात. पण अडनडीला म्हून रुपया द्याची वासना झाली नाही" सून आतून कडाडली. "तू माह्या पैशावंच टपून बस. औशादपाण्याला कवा धीला मोकळ्या मनानी पैका? " म्हातारी तणतणत परसदारी निघून गेली. पायरीवर तिचा नातू डोक्याला हात लावून बसला होता. "कारे दत्तूबाळा?" म्हातारीने विचारले. "आज्जे पुण्याला पोलिसभरती हाये. गाडीभाडं आन एक दिवस रहायला हजार रुपय लागतील. बापूकं नायहेत येव्ह्ढे पैशे." दत्तू म्हणाला. "अरं द्यावा !!", म्हातारी कणवेनी म्हणाली, " माह्याकं तुह्या आत्त्यानी दिलीली हजारची नोट हाये. जा घिऊन!”
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
1850 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

वास्तववादी आणि मस्त...!!!

जव्हेरगंज
Fri, 02/10/2017 - 22:41 नवीन
वास्तववादी आणि मस्त...!!!
  • Log in or register to post comments

मजेशीर कथा

सिरुसेरि
Sat, 02/11/2017 - 11:15 नवीन
मजेशीर कथा
  • Log in or register to post comments

मस्त, सुरेख शशक !

चौथा कोनाडा
Sun, 02/12/2017 - 13:27 नवीन
मस्त, सुरेख शशक ! नातवाच्या अडनडीला म्हातारीचा आधार ! या म्हातारी प्रमाणे ज्यांनी पुंजी म्हणुन दडवुन ठेवल्या अन जुन्या नोटा वठवल्या नाहीत त्या पुंजीचे कागद झाले !
  • Log in or register to post comments

धन्यवाद चौ . को.

बबन ताम्बे
Sun, 02/12/2017 - 13:33 नवीन
खरे आहे. ज्यांनी कुणालाच कळू नये म्हणून दडवून ठेवला तो पैसा वाया गेला .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा