Skip to main content

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: नोटबंदीचा एक अर्थ असाही

लेखक शब्दानुज यांनी बुधवार, 08/02/2017 06:40 या दिवशी प्रकाशित केले.
aaaaaa घरात तीन हजाराच्या आसपास कॅश असेल,खरेदीसाठी राजेश, तेजसकडे उधारी करता येईल. माझ्याकडे आणि हिच्याकडे कार्डस तर आहेतच, त्यावरचे पॉईंटस बघून घ्यायला हवेत. माझ्या मनातली आर्थिक गणिते अव्याहतपणे चालूच होती. "डॅडा" माझ्या छकूलीच्या आवाजाने मी एकदम भानावर आलो. "या नोटा कॅन्सल झाल्याने किती छान झालयं ना ? " नोटबंदीचा या छोट्याश्या मुलीवर कसा काय परिणाम झाला असेल? मी बुचकळ्यात पडलो. "आता नोटा नाही म्हणजे पैसे नाही, म्हणून आता तुला नोकरी करावी लागणार नाही. तुला सगळा टाईम मला देता येईल ना! तू आलास की त्या लॅपिला घेऊन बसतोस.आता तुला रोज माझ्यासोबत खेळता येईल." तिची पैशाची आणि नात्यांची गणित खरचं किती सोपी होती
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2122
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

मस्त !! विचार करायला लावणारी कथा..

छान.

खूपच छान विचार !

Zakas