✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: अनुत्तरित

व
वेल्लाभट यांनी
Fri, 02/03/2017 - 23:02  ·  लेख
लेख
aa त्याचं विचित्र वागणं आता सगळ्यांनाच माहिती झालं होतं. दिवसभर समुद्रावर भटकणार्‍या मोहनला लोक एव्हाना वेडा म्हणायला लागले होते. एकटा मुरुगप्पाच रोज रात्री मोहनला आपल्या घरी घेऊन जाई, जेवायला घाली आणि मुलासारखं थोपटून झोपवी. मित्रत्वाच्या व्याख्येपलिकडे जाऊन तो मोहनला जपत होता; बायकोचा रोष ओढवूनही. एका अशाच संध्याकाळी मुरुगप्पा मोहनला शोधत किनाऱ्यावर आला. मोहन वाळूत घर बनवत होता. दर लाटेगणिक ते तुटत होतं, आणि तो पुन्हा पुन्हा नवीन बनवत होता. बराच वेळ बघून मग एक उसासा टाकत मुरुगप्पा मोहनच्या बाजूला बसला. त्याने मोहनच्या खांद्यावर हात ठेवला. मोहनचे वाळूतले हात सावधपणे थांबले. स्तब्धपणे जमिनीकडे बघतच मोहन म्हणाला, 'का आली रे सुनामी, माझ्या घरावर?'
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
2402 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

आवडली !!!

राघवेंद्र
Fri, 02/03/2017 - 23:48 नवीन
आवडली !!!
  • Log in or register to post comments

छान.

अत्रुप्त आत्मा
Sat, 02/04/2017 - 07:09 नवीन
छान.
  • Log in or register to post comments

कल्पना आवडली!!!

जव्हेरगंज
Sat, 02/04/2017 - 10:09 नवीन
कल्पना आवडली!!!
  • Log in or register to post comments

छान

अॅस्ट्रोनाट विनय
Sat, 02/04/2017 - 10:52 नवीन
छान
  • Log in or register to post comments

+१

पद्मावति
Sat, 02/04/2017 - 14:22 नवीन
+१
  • Log in or register to post comments

आवडली!

शब्दबम्बाळ
Mon, 02/06/2017 - 10:19 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments

छान कथा...

चिनार
Mon, 02/06/2017 - 10:21 नवीन
छान कथा...
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा