शतशब्दकथा स्पर्धा २०१७: लाटा
एका तपानंतर आज ती भेटली.
त्याच्याविषयीच्या प्रेमाबद्दल, जगाबद्दल भरभरून बोलली. रडली. तिच्या प्रेमसागराला पौर्णिमेचं भरतं आलं होतं. सर्व सीमा ओलांडणारं.
तो सुन्न होऊन ऐकत राहिला.
तिच्याविषयी आकर्षण असणाऱ्या भूतकाळात शिरला.
तारुण्याच्या नकळत्या वळणावर त्यांची चूकामूक झाली होती.
आज ती प्रेमाचा सागर असूनही त्याची तहान भागवू शकत नव्हती.
सागर जवळ असूनही तो किनाऱ्यावरच्या वाळूसारखा कोरडा राहिला.
तिने प्रयत्न सोडले नाहीत. तिच्या प्रेमाच्या लाटा किनाऱ्यावर आदळतच राहिल्या. पुन्हा पुन्हा त्याला भिजवतच राहिल्या.
तो हि भिजल्यासारखे दाखवत आतून कोरडाच राहिला.
वेळ संपली तेव्हा तो निघाला. तिच्या प्रेमभावनांचं ओझं घेऊन. त्याची पावलं वाळूत खोल रुतत होती.
लाटा अजून किनाऱ्यावर आदळतच होत्या, आदळतच राहणार होत्या.वर्गीकरण
प्रतिक्रिया
नै जमलं! शेवटात लाट फिरावी
+१
हम्म
चांगली वाटली.. तारुण्यात