✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वास्तव

व — विशाल कुलकर्णी, Fri, 12/02/2016 - 08:21
पोचले कोणी तिथे स्पर्शून ते चंद्रास आले उंबऱ्याने बांधलेले शेकडोंनी 'चंद्र' येथे ... झुंजले काळासवे ते मृत्यूसही जिंकून गेले 'मी'पणाने जिंकलेले शेकडोंनी 'इंद्र' येथे ... जोखडाचे हार आम्ही माळलेले मस्तकावर कस्पटासम देह तरीही वाटते भीती जराशी आरश्याची मृगजळेही पाडती मोहात जिवा ना इथे पर्वा जगाची, झुंज माझी 'आतल्याशी' माणसा रे माणसा, जाणून घे नियती स्वतःची जात-धर्म, प्रांत-भाषा हीच परिमाणे जगाची माणसाची जात कोणा ओळखू ना ये कधीही मान टेकावी जिथे ती असे पोळी सुळाची विशाल...

प्रतिक्रिया द्या
5752 वाचन

💬 प्रतिसाद (19)

खल्लास!!! लगा गॉड गिफ्ट हाय

कैलासवासी सोन्याबापु
Fri, 12/02/2016 - 08:25 नवीन
खल्लास!!! लगा गॉड गिफ्ट हाय रं तुला!
  • Log in or register to post comments

+ १ . टू बापू.

अत्रुप्त आत्मा
Fri, 12/02/2016 - 08:58 नवीन
+ १ . टू बापू. @आरश्याची मृगजळेही पाडती मोहात जिवा ना इथे पर्वा जगाची, झुंज माझी 'आतल्याशी' ››› कातिल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

_/!\_

विशाल कुलकर्णी
Fri, 12/02/2016 - 10:26 नवीन
_/!\_
  • Log in or register to post comments

वाह

मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 12/02/2016 - 17:23 नवीन
व्वाह, सुंदर
  • Log in or register to post comments

सुंदर !

मितान
Fri, 12/02/2016 - 17:26 नवीन
सुंदर !
  • Log in or register to post comments

अप्रतिम!!!

ज्योति अळवणी
Fri, 12/02/2016 - 18:14 नवीन
अप्रतिम!!!
  • Log in or register to post comments

मस्तच हो विशालभाऊ....

शार्दुल_हातोळकर
Fri, 12/02/2016 - 22:37 नवीन
दणदणीत कविता !!
  • Log in or register to post comments

धन्यवाद लोक्स .

विशाल कुलकर्णी
Sat, 12/03/2016 - 08:29 नवीन
धन्यवाद लोक्स .
  • Log in or register to post comments

छान कविता!

नगरीनिरंजन
Sat, 12/03/2016 - 08:58 नवीन
छान कविता!
  • Log in or register to post comments

मस्त... फारच आवडली ही रचना...

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 12/03/2016 - 12:32 नवीन
भावनांचे गूंतवळ अन आठवणींची लक्तरे इवल्याशा मेंदू मधे ठासली किती ही दप्तरे शिंपल्यावर आसक्त होउन दीनरात त्या कुरवाळले मी शिंपल्याच्या आतला मोती कधी ना पाहिला मी अशी काहीशी अवस्था आहे आपल्या सगळ्यांचीच. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

मस्त....

शार्दुल_हातोळकर
Sat, 12/03/2016 - 18:41 नवीन
अतिशय नेमक्या शब्दात सांगितले पैजारबुवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

वाह्ह ...

विशाल कुलकर्णी
Fri, 12/09/2016 - 10:22 नवीन
वाह्ह ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

खूपच छान !!

कवि मानव
Sat, 12/03/2016 - 17:17 नवीन
खूपच छान !!
  • Log in or register to post comments

भारी. पैजारबुवांची कविताही

एस
Sat, 12/03/2016 - 18:56 नवीन
भारी. पैजारबुवांची कविताही छान.
  • Log in or register to post comments

ह्रदयस्पर्शी, जळजळीत सत्य

गौरी कुलकर्णी २३
Sat, 12/03/2016 - 19:10 नवीन
ह्रदयस्पर्शी, जळजळीत सत्य सांगणारी कविता...!
  • Log in or register to post comments

वा!

पैसा
Sat, 12/03/2016 - 23:18 नवीन
मस्त लिहिलीय!
  • Log in or register to post comments

Surekh!

रातराणी
Mon, 12/05/2016 - 13:52 नवीन
Surekh!
  • Log in or register to post comments

Surekh!

रातराणी
Mon, 12/05/2016 - 13:52 नवीन
Surekh!
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक आभार मंडळी !

विशाल कुलकर्णी
Fri, 12/09/2016 - 10:22 नवीन
मनःपूर्वक आभार मंडळी !
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा