✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(पडुन आहे नोट अजुनी)

स — स्वामी संकेतानंद, Mon, 11/14/2016 - 14:10
पडुन आहे नोट अजुनी, राजसा थकलास का रे? एवढ्यातच रांग सोडुन, तू असा बसलास का रे? अजुनही सरल्या न गड्ड्या, त्या हजारापाचशेंच्या अजुन बँका सरल्या कुठे रे, हाय तू हरलास का रे? सांग, नोटा शोधणाऱ्या पंटरांना काय सांगू? उगवले एजंट सारे, आणि तू निजलास का रे? बघ तुला दिसतील नंतर मॉरिशसच्या चोरवाटा गोरगरिबांच्या अकाउंटांस वापरलास का रे? उसळती खोक्यांत साऱ्या पाचशेच्या बंद नोटा आयटीच्या रेडला तू आज घाबरलास का रे? - स्वामी संकेतानंद

प्रतिक्रिया द्या
9183 वाचन

💬 प्रतिसाद (42)

लोल!

चांदणे संदीप
Mon, 11/14/2016 - 14:23 नवीन
लोल विडंबन! आवडले! Sandy
  • Log in or register to post comments

असंवेदनाशील

पैसा
Mon, 11/14/2016 - 14:29 नवीन
असंवेदनाशील बुर्झ्वा कवी कुठला! तुमचे दिल्लीश्वर मुख्यमंत्री बघ लोकांच्या दु:खाने कसे कळवळत आहेत ते! नाहीतर तू!! =))
  • Log in or register to post comments

त्यामुळेच

नाखु
Mon, 11/14/2016 - 14:44 नवीन
स्वाम्याला दिल्लीत तिकिट देणार नाहीत "आप"ला समजून. बाकी विडंबन, मस्तच स्वगतः(बुवा कसे नाही आले अजून धाग्यावर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आम्हीच पार्टी काढणार आहोत

पैसा
Mon, 11/14/2016 - 15:02 नवीन
आम्हीच पार्टी काढणार आहोत. तुम्हाला तिकीट पाहिजे तर हळूच सांगा आधी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

सगळे डोनेशन online भरायचे. ;)

स्वामी संकेतानंद
Mon, 11/14/2016 - 18:32 नवीन
सगळे डोनेशन online भरायचे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हाहा!

पैसा
Mon, 11/14/2016 - 19:21 नवीन
म्हणजे नोटांचा प्रश्नच नाय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

हाहाहा

पाटीलभाऊ
Mon, 11/14/2016 - 14:39 नवीन
मस्त जमलीये...
  • Log in or register to post comments

स्वामी

तिमा
Mon, 11/14/2016 - 15:27 नवीन
स्वामी तिन्ही जगाचा नोटेविना भिकारी!
  • Log in or register to post comments

मीटर गंडलं, अन्यथा उत्तम.

सूड
Mon, 11/14/2016 - 15:37 नवीन
मीटर गंडलं, अन्यथा उत्तम.
  • Log in or register to post comments

एका जागी 2 मात्रा जास्त

स्वामी संकेतानंद
Mon, 11/14/2016 - 18:19 नवीन
एका जागी 2 मात्रा जास्त पडल्याचे लक्षातच आले नव्हते. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आणि चौथ्या कडव्यात यतिभंग

स्वामी संकेतानंद
Mon, 11/14/2016 - 18:21 नवीन
आणि चौथ्या कडव्यात यतिभंग झाल्याचे माहित आहे, त्याला चांगला पर्याय शोधतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मीटर गंडलं असलं की चुकीचं

सतिश गावडे
Mon, 11/14/2016 - 23:44 नवीन
मीटर गंडलं असलं की चुकीचं रिडींग दाखवत असेल ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

खतरनाक :))) एक्दम आवडली

कवि मानव
Mon, 11/14/2016 - 15:57 नवीन
खतरनाक :))) एक्दम आवडली
  • Log in or register to post comments

स्वाम्याची निरीक्षणशक्तीची

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 11/14/2016 - 15:58 नवीन
स्वाम्याची निरीक्षणशक्तीची कमाल नोटा बंद झाल्यापासून चौफेर उधळली आहे बाबौ!! स्वाम्या, हलकट तुझ्या नोटा बदलून घे मेल्या नाहीतर नुसत्या कवितेच्या रेवड्या पाडत बसशील अन मग वेळेवर भिकारबंबू हातात चंबू होईल.
  • Log in or register to post comments

विडंबन एक्क्क नंबर झालंय!

वेल्लाभट
Mon, 11/14/2016 - 17:04 नवीन
विडंबन एक्क्क नंबर झालंय! फक्त दोन बदल सुचवावेसे वाटतात. 'पडुन आहे 'कॅश' अजुनि' म्हटलंत तर विडंबन, मूळ काव्यातल्या स्वरांशीही अधिक जवळीक साधेल. आणि पहिल्या कडव्यातल्या दुसर्‍या ओळीचा पूर्वार्ध 'अजुन बँकाही न सरल्या' असं म्हटलंत तर मीटरमधे अधिक चांगलं बसेल. बाकी कडक!
  • Log in or register to post comments

धन्यवाद. नोट, कॅश दोन्ही

स्वामी संकेतानंद
Mon, 11/14/2016 - 18:19 नवीन
धन्यवाद. नोट, कॅश दोन्ही मीटरमध्ये असले तरी कॅश जास्त चपखल होईल हे बरोबर आहे. माझ्या डोक्यात तेव्हा हे आलेच नव्हते. नोटा रद्द केल्याने नोट हाच शब्द डोक्यात होता. आणि मीटरचा घोटाळा लक्षात आणून दिल्याबद्दल पण विशेष आभार. तिथे 2 मात्रा जास्त पडल्या हे लक्षातच आले नव्हते. दोन्ही बदल स्वीकारण्यात येत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

=)) =)) =))

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 11/14/2016 - 17:09 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments

झ्कास

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 11/14/2016 - 18:37 नवीन
मस्त. मजा आली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

क्या बात है !!!!

मारवा
Mon, 11/14/2016 - 19:28 नवीन
जबर विडंबन !!!!!
  • Log in or register to post comments

=))) मस्त जमलंय विडंबन.

अजया
Mon, 11/14/2016 - 19:36 नवीन
=))) मस्त जमलंय विडंबन.
  • Log in or register to post comments

स्वामिज्जी महान आहेत.

अत्रुप्त आत्मा
Mon, 11/14/2016 - 20:57 नवीन
स्वामिज्जी महान आहेत. कुठल्या दिवशी कोणती नोट काढतील? नेम नै. ! =))
  • Log in or register to post comments

आले आले... गुर्जी आले!

पीके
Mon, 11/14/2016 - 22:39 नवीन
आले आले... गुर्जी आले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

=))

टवाळ कार्टा
Mon, 11/14/2016 - 20:59 नवीन
=))
  • Log in or register to post comments

स्वाम्या तु हजारची नोट आहेस!!

प्रीत-मोहर
Mon, 11/14/2016 - 22:47 नवीन
स्वाम्या तु हजारची नोट आहेस!!!
  • Log in or register to post comments

दोन हजाराची नोट म्हटले तरच

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 11/14/2016 - 23:33 नवीन
दोन हजाराची नोट म्हटले तरच कॉंम्प्लिमेंट होईल, हजाराची नोट बाद झालीय आता :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

जबर विडंबन !!!!!

टिवटिव
Mon, 11/14/2016 - 23:20 नवीन
=))=))
  • Log in or register to post comments

बाबाजी की जय हो...

Rahul D
Mon, 11/14/2016 - 23:31 नवीन
बाबाजी की जय हो...
  • Log in or register to post comments

बाबाजी की जय हो...

Rahul D
Mon, 11/14/2016 - 23:31 नवीन
बाबाजी की जय हो...
  • Log in or register to post comments

मस्त रे स्वाम्या.

सतिश गावडे
Mon, 11/14/2016 - 23:46 नवीन
मस्त रे स्वाम्या.
  • Log in or register to post comments

मस्त

अभिजीत अवलिया
Tue, 11/15/2016 - 02:03 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

लोल विडंबन !

सस्नेह
Tue, 11/15/2016 - 06:55 नवीन
लोल विडंबन !
  • Log in or register to post comments

स्वामु

इरसाल
Tue, 11/15/2016 - 11:28 नवीन
ही कविता मला वॉट्स्प वर "मिसळपाव" वरुन साभार म्हणुन आलीय ;)
  • Log in or register to post comments

माझं नाव होतं की नव्हतं खाली?

स्वामी संकेतानंद
Tue, 11/15/2016 - 13:16 नवीन
माझं नाव होतं की नव्हतं खाली? ;) कारण मलाही आज सकाळी कायप्पावर आली, पण नावासह आली. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

नही

इरसाल
Tue, 11/15/2016 - 16:41 नवीन
नाही नाव नव्हतं कळवलय तसं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

विडंबन छान

आदिजोशी
Wed, 11/16/2016 - 11:42 नवीन
मिटरचं जमवा थोडं. मजा येत नाही अन्यथा वाचायला. कवितेची/गाण्याची मूळ गेयता हरवायला नको.
  • Log in or register to post comments

फेसबुकवर केलेत ते बदल. दुसरा

स्वामी संकेतानंद
Wed, 11/16/2016 - 15:02 नवीन
फेसबुकवर केलेत ते बदल. दुसरा शेर वेल्लभटांनी सांगितल्याप्रमाणे बदलला. चौथ्यातील यतीभंगाचं अजून काही केलेलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

पण तोपर्यंत हे विडंबन

स्वामी संकेतानंद
Wed, 11/16/2016 - 15:07 नवीन
पण तोपर्यंत हे विडंबन त्याच्या जुन्या स्वरूपातच वायरल झाले च्यायला. :( :( आता काही फायनल बदल करून आपल्यापुरते ठेवावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

मस्तं जमलंय विडंबन =))

पद्मावति
Wed, 11/16/2016 - 15:12 नवीन
मस्तं जमलंय विडंबन =)) मलाही व्हतस अप वर आली तुमच्या नावासकट आणि खाली मिसळ पाव ची लिंक ही आहे.
  • Log in or register to post comments

छान झालंय विडंबन!

चतुरंग
Wed, 11/16/2016 - 21:49 नवीन
मीटर गडबड आणि यतिभंगामुळे मात्र मिठाचा खडा... :( पाककृतीत किंचित बदल करुन कशी दिसती आहे ते सांगा स्वामीजी! पडुन आहे नोट अजुनी, राजसा थकलास का रे? एवढ्यातच रांग मोडुन, तू असा फिरलास का रे? अजुनही सरल्या न गड्ड्या, बघ हजारापाचशेंच्या अजुनही बँका न हरल्या, हाय! तू हरलास का रे? सांग, नोटा शोधणाऱ्या पंटरांना काय सांगू? उगवले एजंट सारे, आणि तू लपलास का रे? बघ तुला दिसतील आता मॉरिशसच्या चोरवाटा रंकखाती वापराया तू असा टपलास का रे? दडपल्या खोक्यांत साऱ्या पाचशेच्या बंद नोटा रेडला तू आयटीच्या आज घाबरलास का रे? (शेफ्)रंगा
  • Log in or register to post comments

रंकखाती वापराया तू असा टपलास

स्वामी संकेतानंद
गुरुवार, 11/17/2016 - 06:22 नवीन
रंकखाती वापराया तू असा टपलास का रे? जमले जमले, मस्त. धन्यवाद. दुसऱ्यात तुम्ही आणि वेल्लभट दोघांनी केलेले बदल उत्तम आहेत. कोणतेही वापरता येईल फायनल व्हर्जनला! विडंबन crowd funding मध्ये लिहायला पाहिजे, दहा डोके लागतील तर भन्नाट जमत जातील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

crwod sourcing

स्वामी संकेतानंद
गुरुवार, 11/17/2016 - 06:23 नवीन
crwod sourcing
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

मस्त कविता.wa वर फिरतेय

नूतन सावंत
Wed, 11/16/2016 - 23:06 नवीन
मस्त कविता.wa वर फिरतेय नावासह आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा