"स्व"....
कोणी शब्दबंबाळ...कोणी गोष्टीवेल्हाळ ....
कोणी अर्थजंजाळ...कोणी नुसतेच पाल्हाळ....
व्यक्ती असतील वेगवेगळ्या पण वागणूक तीच.....
जगात काय तो एकटा शहाणा मीच !
एक आपला "स्व" मोठा , बाकी कस्पटासमान.....
आपण त्यांच्याबरोबर नाही हे इतरांचेच नुकसान !?
आपण काय म्हटले .....त्याने हाती काय लागले ?
का म्हणून सगळेचजण आपल्याशी असे वागले ?
जमत असेल तर एकदा तटस्थपणे करावा विचार.....
स्वत:ला थोडे बाजूला ठेवून विचार करावा सारासार..!
सगळेच काहीतरी म्हणतात म्हणजे त्यात काही तथ्य आहे
माणूस आहोत,माणुसकीने वागू...बाकी सगळे मिथ्य आहे
जेव्हा वेळ पडेल तेव्हा "स्व"नाही ..स्वभाव कामी येतो
"स्व" मध्येच अडकलात तर....पण लक्षात कोण घेतो ????
सुंदर कविता... आवडली...
तुमच्या काव्याच्या शिर्षकात
हा 'स्व' खोटाच आहे.....
बादवे....
बाब्बो, आता तुम्ही कविता पण
पंखा लि़खाण