डीसेंडींग ट्रेक - लोणावळा (कुरवंडे) ते खोपोली (चावणी) - उंबरखिंड - सह्याद्री ग्रुप - २ ऑक्टोबर २०१६ - (भाग २)

Primary tabs

कविता१९७८'s picture
कविता१९७८ in जनातलं, मनातलं
6 Oct 2016 - 8:40 pm

मिपाकर किसन शिंदे यांची लोणावळा रेल्वे स्टेशनवरच भेट झाली. कुरवंडे गावात उतरलो तेथे गाईड गौरु भाउ आमची वाट पाहातच होते. किती जण आले आहेत हे पाहण्यासाठी काउंटींग घेउन चालायला सुरुवात केली तो पाउस सुरु झाला.

१० मिनीटे चढ चढल्यावर चावणी गावापर्यंत उतरणीचा रस्ता असल्याने सर्व अगदी मजेत , फोटो काढत चालले होते. चढ संपल्यावर छोटा पठारसदृश भागात उभे राहील्यानंतर आधी सर्वांची ओळख परेड झाली. आम्ही जिथे उभे होतो तिथेच कुठेतरी शिवाजीमहाराजांनी छावणी बांधली होती असे बरोबर असलेल्या श्री. नागेश धोंगे यांनी सांगितले आणि ऐतिहासिक उंबरखिंडीची खुप छान माहीती सांगितली ती अशी.....

1

उंबरखिंडी लढाई ही इतिहासातील एक अजरामर लढाई आहे, शाहीस्तेखानाने कारतलबखान उजबेक आणि राणी रायबाघन हिला कोकणावर स्वारी करायला पाठवले. कारतलबखान फौजफाटा घेउन पुण्याहुन निघुन त्याने चिंचवड - तळेगाव - वडगाव या मार्गाने कुच केले. कारतलब खान लोह्गड किल्ल्याच्या दक्षिणोत्तर रस्त्याए जायला सुरुवात केली. ती वाट अगदी उंच डोंगरातुन जाणारी पाउलवाट होती. त्यामुळे इतक्या अरुंदवाटेवरुन चालणे कारतलबखानाच्या सैन्याला खुपच कठीण वाटु लागले. रस्ता हा अतिशय अरुंद म्हणजे एकावेळी एकच सैन्य जाईल असा, आडवळणाचा, घनदाट जंगलाचा आणि भयाण असा होता. मुघल सैन्याला कधीच डोंगराची , जंगलाची सवय नव्हती . राणी रायबाघनला राहवेना, आपली भलतीच कोंडी होते आहे आणि शत्रुला जर हे माहीत पडले तर आपली कत्तल होईल हे तिला समोर दिसत होते. तीस हजार सैन्य, शस्त्रास्त्रे, हत्ती - घोडे बरोबर नेताना शिवाजी महाराजांच्या हेरखात्याने त्यांना नेमके हेरले आणि महाराजांपर्यंत खबर पोहोचवली. त्यावेळी शेतीचा हंगाम सुरु होता सर्व मावळे शेतीच्या कामात गुंतले होते, त्या सर्वांना एकत्र करुन जवळपास १००० मावळे घेउन महाराजांनी राजगड सोडला आणि उंबरखिंडी कडे प्रयाण केले. लोहगडाजवळ असलेल्या तुंगारण्यात महाराजांच्या सैन्याला कारतलबखानाचे सैन्य जरी दिसत असले तरी त्यांनी कारतलबखानाला काहीही आडकाठी केली नाही. त्यांना तुंगारण्याच्या भयंकर कोंडीत गाठुन झोडपुन काढण्याची योजना शिवाजीमहाराजांनी आखली होती. तसा हुकुम त्यांनी नेताजी पालकरांना केला.

खानाच्या फौजेला प्यायला पाणी मिळेना, सैन्याचे खुप हाल झाले. कारतलबखान कसाबसा उंबरखिंडीच्या वाटेवर आला. राणी रायबाघन निमुटपणे सगळे पाहत होती आणि पुढे जात होती. फौज कशीबशी ऐन मध्यात आली आणि अचानक कर्कश्श शिंगे फुंकल्याचा आवाज येउ लागला, नौबती वाजु लागल्या. खानाची सर्व फौज घाबरुन इथे तिथे पाहते तोच चहुबाजुला झाडीत , झाडावर दडलेले मावळे तलवारी उपसुन खानाच्या फौजेवर धावले. लढाई पेट्ली पण खानाच्या फौजेत लढाईचे त्राणच उरले नव्हते. मावळ्यांनी मुघल फौजेची भयंकर कत्तल मांडली. त्यामुळे कारतलब खान आणि राणी रायबाघन एकदम घाबरुन गेले. शिवाजीमहाराज उंबरखिंडीच्या वाटेवर उभे राहुन हा संग्राम पाहत होते. राणी रायबाघन कारतलब खानाला म्हणाली , "खानसाहेब , तुम्ही फार मोठी चुक केली , शिवाजीशी लढण्यासाठी तुम्ही या जंगलात सर्वांना आणले पण आता आपली हार निश्चित आहे. तुम्हाला जर सर्वांना वाचवायचे असेल तर आत्ताच्या आत्ता शिवाजीस शरण जा आणि मृत्युच्या तावडीतुन सर्वांची सुटका करा."

कारतलबखानापुढे दुसरा उपायच उरला नव्हता. शेवटी राणी रायबाघन ने शिवाजी थोर -दिलदार आहे त्याच्याकडे धर्मवाट मागा असे सुचवले. तेव्हा कारतलबखानाने त्याच्या व राणी रायबाघनच्या वतीने शिवाजी महाराजांकडे एका शहाण्या माणसाला वकील म्हणुन पाठवले. वकीलाने महाराजांकडे धर्मवाट मागितली. आता या थोड्या सैन्यांना अपमानित करुन जीवंत माघारी पाठवले तर माघारी जे मोठे सैन्य लढाई साठी निघण्यास सज्ज आहे त्यांना धाक बसेल व ते घाबरुन जाईल असा मुत्सद्दी विचार करुन शिवाजी महाराजांनी धर्मवाट द्यायचे कबुल केले आणि मुघल सैन्याने आपली सगळी शस्त्रास्त्रे , सामान, हत्ती घोडे सर्व शिवाजी महाराजांच्या हवाली करुन निघुन जावे असा आदेश दिला व लढाई थांबवली.

अतिशय सुंदर माहीती ऐकल्यावर आपण या सर्व परीसरातुन जातोय ही गोष्टच अभिमानास्पद वाटायला लागली. सगळे अगदी भारलेल्या अवस्थेत चालु लागले. खुपच सुंदर वातावरण होते, ट्रेक असावा तर असा , ट्रेक कसला पिकनिकच होती ती. बरेच मेंम्बर्स अनोळखी , पहिल्यांदाच आले होते. डोंगराळ , हिरव्यागार भागातुन जाताना अतिशय प्रफुल्लित वाटत होते. रस्त्यावर जागो जागी ढग उतरले होते त्यामुळे स्वर्गातुन चालल्यासारखेच वाटु लागले. रस्त्यात जागोजागी कारवीची फुले , रानफुले फुलली होती, अधुन मधुन छोटे ओहोळ लागत होते. थंडगार स्वच्छ पाण्यात पाय टाकल्याबरोबर अतिशय बरोबर दोन फोटोग्राफर होतेच फोटो काढायला. भरपुर फोटो काढले.

.

.

.

.

.

.

.

..

.

.

(क्रमशः)

प्रवासआस्वाद

प्रतिक्रिया

वर्णन छान झालेय. फोटू आवडले.

हिरवेगार फोटो आणि वर्णन मस्तच! उत्साही आहेस अगदी _/\_

अजया's picture

6 Oct 2016 - 8:57 pm | अजया

छान वृत्तांत.

खूप छान. वृत्तांत फारच आवडला. पुढील भाग येणार आहे का?

कविता१९७८'s picture

6 Oct 2016 - 9:06 pm | कविता१९७८

होय , क्रमश: लिहायचे विसरले

झिंगाट's picture

6 Oct 2016 - 9:17 pm | झिंगाट

मस्तच लिहिलंय

नूतन सावंत's picture

6 Oct 2016 - 9:30 pm | नूतन सावंत

मस्त वृत्तांत आणि फोटो.तो जाळ्याचा मस्तच.

प्रचेतस's picture

6 Oct 2016 - 9:45 pm | प्रचेतस

पुभाप्र

रातराणी's picture

6 Oct 2016 - 11:45 pm | रातराणी

अप्रतिम फोटो! आता वाचते :)

ह्या ट्रेकमध्ये निसर्गाचे छान दर्शन होते. आणखी फोटो येऊ द्या..

पद्मावति's picture

7 Oct 2016 - 1:28 pm | पद्मावति

खूप छान वर्णन आणि फोटो.

प्राची अश्विनी's picture

7 Oct 2016 - 3:50 pm | प्राची अश्विनी

+11

पैसा's picture

7 Oct 2016 - 3:57 pm | पैसा

छान लिहिलंस. फोटोही छान आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Oct 2016 - 10:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>मिपाकर किसन शिंदे यांची लोणावळा रेल्वे स्टेशनवरच भेट झाली.

पुढे वाचलं नाही. किसना बरोबरचा प्रवास सुखाचा होऊ शकतो यावर माझा विश्वासच नै. बाकी फोटो चाळले, लेख चाळला. फोटोच्या बरोबर सेंटरला सह्याद्री हे नाव वाचून लय भारी वाटलं. फोटोच्या चार कोप-याला चार नावं दिली असती तर फोटो अगदी नवरात्रीचा मंडपासारखा सजला असता असे वाटले. बाकी वृत्तांत कमी आणि इतिहासाचा धड़ा वाचतोय असं सारखं फिलिंग येत होतं.

पुढील इतिहासासाठी सॉरी वृत्तांतासाठी शुभेच्छा !!! ;)

-दिलीप बिरुटे

अरेरे.. एक मिपाकर म्हणून.... वैगैरै.. वैगैरै..

बोका-ए-आझम's picture

7 Oct 2016 - 11:10 pm | बोका-ए-आझम

पुढचा भाग लवकर टाका!

छान वृत्तांत आणि फोटोही मस्त आहेत.

कविता१९७८'s picture

8 Oct 2016 - 9:56 am | कविता१९७८

सर्वाना धन्यवाद

इडली डोसा's picture

9 Oct 2016 - 9:02 am | इडली डोसा

सह्याद्रीत कुठेही कॅमेरा फिरवा चांगलेच फोटो येणार... ट्रेक आणि सोबतची माहितीही छान...

पण ५० लोक म्हणजे जास्त झाले... आपण फारसा विचार नाही करत पण जास्त लोकांच्या येण्या जाण्याने छोट्या छोट्या जैव समुहांचे खूप नुकसान होते. त्यामुळे बाहेरच्या देशात ट्रेलवरच चालण्यावर फार भर देतात जे आपल्याकडे क्वचितच पाळले जाते.

सुप्रसिद्ध निसर्गमित्र जॉन म्यूअर नेटिव अमेरीकन इंडियन्सबद्दल म्हणतात,

“Indians walked softly and hurt the landscape hardly more than the birds and squirrels” .

आपल्याला पण असे जमेल का?