Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by फिझा on Wed, 09/28/2016 - 12:00
खरा खुरा रंगमंच ..... ! हुरहूर मनात घेऊन वेशभूषेत मग्न कधी तर कधी चेहऱ्यावर रंग उमटवलेला ! संगीताच्या तालात दंग कधी तर कधी रंगीत छटांचा प्रकाशात रमलेला ! अभिनयास सज्ज कधी तर कधी नुसताच प्रेक्षक बनलेला ! हा रंगमंच ! नटसम्राटांची कारकीर्द असो वा असो अध्यात्माचा वास वीरांची असो शौर्यकथा वा कधी फुटकळ परिसंवाद कधी लख्ख दिव्यज्योतींमध्ये शांत तर कधी कुजबुजलेला अंधारात , हा रंगमंच ! कधी बोबडे बोल कधी वार्धक्याची हाक कधी गुलाबी संवाद साधलेले , कधी अश्रुंचे कधी हास्याचे चोख अभिनय साकारलेले, कुणाच्या नशिबाची जुगारी कधी कुणाच्या आयुष्याची लाचारी, कधी तरंग कथा, तर कधी सत्य व्यथा, हा रंगमंच ! रंगमंच असते आयुष्य प्रत्येकाचे परतीची वाट नाही, ना रंगवेषभूषेला वाव , भूमिका प्रत्येकाची ठरलेली इथे जमवलेला प्रत्येकाने तो संवाद , सखेसोबती इथेच भेटी नेपथ्य अन सोहळे इथेच होती , कलाकार तोच प्रेक्षकही तोच पडदा पडतो तेव्हा डोळे बंद करणाराही तोच !! हा रंगमंच !!! ---------- फिझा

Submitted by पद्मावति on Wed, 09/28/2016 - 23:57

Permalink

सुरेख!

सुरेख!
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 09/29/2016 - 05:56

Permalink

सुरेख...

सुरेख...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दिल ले डूबा मुझको अराबिक आँखों में आज लूटा लूटा मुझको फ़रेबी बातों ने... :- AIRLIFT
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on गुरुवार, 09/29/2016 - 08:02

Permalink

सुंदर

फारच सुंदर.. छान जमून आलीये रचना..
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 818 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com