✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

... असंही होतं ना कधी कधी....

श — शिव कन्या, Sat, 09/17/2016 - 10:32
... असंही होतं ना कधी कधी.... अंगणातलं सुखाचं बी बहरातली पाखरांची गाणी हरवून जातात कुठंकुठं.... पण मनाचा सर्च कायम असतो दिसलं जरी एखादं पातं हिरवंगार मनातलं मांजर हसतंच कि मजेदार! ... असंही होतं ना कधी कधी.... बियांना कोंब येईपर्यंत आपलाच नसतो पेशन्स ! दु:खाच्या माजणार्या ताणावर आपलाच नसतो कंट्रोल! वैफल्याने सगळंच उकरून फेकून देतो, पण तशा वैराण रानातही एखादे रानफुल हसून बोलतंच कि एखादा निळा पक्षी गिरक्या घेतोच कि! ... असंही होतं ना कधी कधी.... आटून जातात सगळे झरे वाटत नाही काहीच खरे पण अभेद्य पाषाणाखालून थंडगार झरे झुळझुळतातच कि! स्वप्नापुस्तकात तरी कुठून येतात प्रेमाविश्वासाच्या कहाण्या? दिवे विझून टाकणारी वादळे श्वासाश्वासात असतात, पण दिव्याभोवती ओंजळ नसतेच हे तरी खरे कुठे? प्रेमळ असणे strongच राणी, प्रेम न उमजण, हा तर राजाचा विकनेस! आपण धुमसत्या वेदनेला संपवून टाकतोही आतल्याआत! पण घाव बसल्या फांदीवरतीच नवी पालवी तरारून फुटते.... .... असंही होतंच कि.... जाळून उरल्या वेदनेची उडून जावी वार्यावरती, इतकी हलकी राख होत नाही! ती भस्म होऊन कणखरपणे दोन भिवयांमध्ये विराजमान होते. दोन निर्लेप डोळ्यांनी भूत भविष्य पहात राहते... सुखाच्या बियांची लालसा धुमसत्या वेदनांची ठसठस... सरते उरते उ र ते स र ते.... मनाच्या पाखराचा मग मस्त Kaleidoscope होत जातो..... - शिवकन्या

प्रतिक्रिया द्या
13581 वाचन

💬 प्रतिसाद (26)

http://www.misalpav.com/node

शिव कन्या
Sat, 09/17/2016 - 10:38 नवीन
http://www.misalpav.com/node/37387 रातराणीची ही कविता वाचता वाचता, मनात ही कविता उमटत गेली...
  • Log in or register to post comments

छान आहे कविता. मांजरांचा

अनुप ढेरे
Sat, 09/17/2016 - 10:44 नवीन
छान आहे कविता. मांजरांचा तिटकारा असूनदेखील मनातलं मा़ंजर कल्पना आवडून गेली.
  • Log in or register to post comments

आता कळलं तुम्ही माझ्या मतांचा विरोध का करता ते ;)

बोका-ए-आझम
Sun, 09/18/2016 - 12:15 नवीन
ह.घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

:)

अनुप ढेरे
Sun, 09/18/2016 - 13:06 नवीन
हा हा हा __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

अप्रतिम... खूप सुंदर...

प्रभास
Sat, 09/17/2016 - 10:49 नवीन
अप्रतिम... खूप सुंदर... मनातलं मांजर तर प्रचंड आवडून गेलं...
  • Log in or register to post comments

एखादे रानफुल हसून बोलतंच कि

प्रभास
Sat, 09/17/2016 - 10:50 नवीन
एखादे रानफुल हसून बोलतंच कि एखादा निळा पक्षी गिरक्या घेतोच कि! पण अभेद्य पाषाणाखालून थंडगार झरे झुळझुळतातच कि! जबरदस्त बहर आलाय प्रतिभेला... एक नंबरच...
  • Log in or register to post comments

छान....आवडली.

Jabberwocky
Sat, 09/17/2016 - 10:56 नवीन
छान....आवडली. खरच अस होत कधीकधी.....
  • Log in or register to post comments

कहर!! अप्रतिम उतरलीये!!

रातराणी
Sat, 09/17/2016 - 12:22 नवीन
कहर!! अप्रतिम उतरलीये!!
  • Log in or register to post comments

जबरी जवाब !

सस्नेह
Sat, 09/17/2016 - 12:47 नवीन
ये भी सच है...!
  • Log in or register to post comments

ज्जे बात

चाणक्य
Sat, 09/17/2016 - 13:24 नवीन
मस्तच.
  • Log in or register to post comments

मस्तच.

अंतरा आनंद
Sat, 09/17/2016 - 15:37 नवीन
मस्तच.
  • Log in or register to post comments

सुरेख!

पद्मावति
Sat, 09/17/2016 - 16:06 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

सुरेख

एक एकटा एकटाच
Sat, 09/17/2016 - 16:18 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments

कविता आवडली, हे वेगळे मला

विवेकपटाईत
Sun, 09/18/2016 - 09:32 नवीन
कविता आवडली, हे वेगळे मला मांजर आवडत नाही...
  • Log in or register to post comments

कविता सुंदर!

पैसा
Sun, 09/18/2016 - 10:04 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments

मनातलं मांजर!

बोका-ए-आझम
Sun, 09/18/2016 - 12:17 नवीन
भारी कल्पना आहे. थोडी गुलजार style वाटली, विशेषतः सर्च सारख्या शब्दांचा वापर.
  • Log in or register to post comments

वाह मस्तच!

निनाव
Sun, 09/18/2016 - 17:49 नवीन
वाह मस्तच!
  • Log in or register to post comments

आवडली

ज्योति अळवणी
Sun, 09/18/2016 - 21:04 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments

मस्त मस्त मस्त!

अजया
Sun, 09/18/2016 - 21:13 नवीन
मस्त मस्त मस्त!
  • Log in or register to post comments

वा फारच छान ! मनातले मांजर,

पथिक
Mon, 09/19/2016 - 10:51 नवीन
वा फारच छान ! मनातले मांजर, नि निळा पक्षी दोन्ही आवडले. बाय द वे, इकॉलॉजिकली "तण" हि प्युअरली "अँथ्रोपोसेंट्रिक" कोंसेप्ट आहे :)
  • Log in or register to post comments

नवी माहिती कळाली. धन्स. :-)

शिव कन्या
Mon, 09/19/2016 - 18:51 नवीन
नवी माहिती कळाली. धन्स. :-) बारीकशी नोंद.... कवितेत दुखाच्या माजणार्या 'ताणावर' असंच आहे तणावर नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पथिक

अर्थ तोच निघतो.. म्हणून मला

पथिक
Tue, 09/20/2016 - 10:53 नवीन
अर्थ तोच निघतो.. म्हणून मला वाटलं टायपींग मिष्टेक असावी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिव कन्या

भन्नाट उतरली आहे

सामान्य वाचक
Mon, 09/19/2016 - 11:20 नवीन
मांजर आणि निळा पक्षी जाम पटला
  • Log in or register to post comments

हेही एकदम मस्त. Alice चं

इनिगोय
Mon, 09/19/2016 - 11:25 नवीन
हेही एकदम मस्त. Alice चं मांजर आठवलं :)
  • Log in or register to post comments

सर्व रसिक, अभ्यासू वाचकांचे

शिव कन्या
Mon, 09/19/2016 - 18:53 नवीन
सर्व रसिक, अभ्यासू वाचकांचे दिल से आभार.
  • Log in or register to post comments

आवडली.

यशोधरा
Tue, 09/20/2016 - 07:23 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा