Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चिनार on Tue, 09/06/2016 - 17:35
एका मित्राचे नुकतेच लग्न ठरले आहे. सध्या प्रेमरसात न्हाऊन निघत असल्यामुळे ट ला ट जुळवून रोज तो एक प्रेमकविता करतो. मला कवितेतलं खूप काही कळतं असा त्याचा समाज असल्यामुळे तो आधी मला पाठवतो मग तिला..आज सकाळी त्याने पाठवलेल्या कवितेचे विडंबन करण्याचा मोह मी टाळू शकलो नाही.. मित्राची कविता.. भिडत होती नजर मोहक ती... माझ्या नजरेस जेंव्हा जेंव्हा... उमटत होते प्रतिबिंब तूझे ते... या ह्रुदया मधे तेंव्हा तेंव्हा... पडत होते शब्द तूझे ते या कानांवर जेंव्हा जेंव्हा... तरंग उठत होते प्रेमाचे या मनामधे तेंव्हा तेंव्हा... येत होता हात नाजूक तो या हातांमध्ये जेंव्हा जेंव्हा... धस्स होत होते ते या काळजात तेंव्हा तेंव्हा... पाहून मजला उमटत होते स्मितहास्य मुखावर जेंव्हा जेंव्हा... हरवून जात होतो मी त्या हसण्या मध्ये तेंव्हा तेंव्हा... जवळ येत होतीस या ह्रुदयाच्या तू जेंव्हा जेंव्हा... शहारून येत होते ते या तनामध्ये तेंव्हा तेंव्हा... येत होती वेळ नजीक दूर जाण्याची जेंव्हा जेंव्हा... घालमेल होत होती ती या वेड्या जीवाची तेंव्हा तेंव्हा... सतावतो मजला हा एकटेपणा आता जेंव्हा जेंव्हा... घेता मिटून डोळे ते जवळ जाणवतेस तु तेंव्हा तेंव्हा...
लग्नानंतर या कवितेचे स्वरूप कसे असेल ह्याविषयी केलेले चिंतन..
भिडत होती नजर मोहक ती...माझ्या नजरेस जेंव्हा.. देवा!! काय मागशील तू आता..खर्च किती अनं केंव्हा ! पडत होते शब्द तूझे ते...या कानांवर जेंव्हा... शांत कधी बसशील का?..विचार एवढाच तेंव्हा ! येत होता हात नाजूक तो.. या हातांमध्ये जेंव्हा... तुका म्हणे क्षणिक हे सारे..मोहपाश हे सुटतील केंव्हा !! पाहून मजला उमटत होते..स्मितहास्य मुखावर जेंव्हा.. घाबरत होतो मी..काय चुकलो मी देवा अनं केंव्हा ! येत होती वेळ नजीक... दूर जाण्याची जेंव्हा.. क्षण कधी येईल तो..वाट त्याचीच तेंव्हा ! सतावतो मजला हा एकटेपणा आता जेंव्हा.. बाकी काहीच नाही ..भुकेची जाणीव फक्त असते मला तेंव्हा..! -चिनार

Submitted by प्रभास on Tue, 09/06/2016 - 17:44

Permalink

भारीच!!!

भारीच!!!
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Tue, 09/06/2016 - 18:15

Permalink

एक नंबर !!!

एक नंबर !!!
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 09/06/2016 - 18:31

Permalink

खतरनाक!

खतरनाक!
  • Log in or register to post comments

Submitted by चिनार on Tue, 09/06/2016 - 19:47

Permalink

धन्यवाद!!

धन्यवाद!!
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Tue, 09/06/2016 - 19:50

Permalink

किती तो दुत्तपणा मित्राबरोबर!

किती तो दुत्तपणा मित्राबरोबर! विडंबन आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by वाल्मिक on Tue, 09/06/2016 - 23:37

Permalink

मोकळ्या दही दिशा ची आठवण आली

मोकळ्या दही दिशा ची आठवण आली
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on Wed, 09/07/2016 - 10:41

In reply to मोकळ्या दही दिशा ची आठवण आली by वाल्मिक

Permalink

कूच भी बाता करते क्या मियाँ

कूच भी बाता करते क्या मियाँ
  • Log in or register to post comments

Submitted by पाटीलभाऊ on Wed, 09/07/2016 - 01:39

Permalink

मस्त

मस्त विडंबन
  • Log in or register to post comments

Submitted by रुपी on Wed, 09/07/2016 - 02:06

Permalink

दोन्ही चांगल्या आहेत :)

दोन्ही चांगल्या आहेत :)
  • Log in or register to post comments

Submitted by पथिक on Wed, 09/07/2016 - 09:42

Permalink

हा हा हा मस्त!

हा हा हा मस्त!
  • Log in or register to post comments

Submitted by चिनार on Wed, 09/07/2016 - 09:45

Permalink

धन्यवाद!!

धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 09/07/2016 - 09:45

Permalink

नाही आवडली.

नाही आवडली. वाचली, विसरुन गेलो. एक शब्द ही लक्षात राहिला नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Wed, 09/07/2016 - 09:55

Permalink

पहिली पास झाल्याखेरीज

दुसरीत घेत नाहीत म्हणे... त्या स्थित्यंतराचा अविषाकर आवडला... मित्राला सांत्वनपर कवीता नंतरच पाठव. ====================================
"अरे चिनार्या अस्म घाबरवू नकोस मित्राला, शादी वो लड्डू है जो खाये वो पछताए,ना खाये वोभी पछताए तो खा कर पछताना अच्छा असे हे सांगत होते काल चंपावन्संना,त्या हळदी कुंकाला आल्या होत्याना काल,बोहरी आळीत आलास की चक्कर टाक इकडे, आले पाक ठेवलाय तुझ्यासाठी"

पुन्हा मिसामा

  • Log in or register to post comments

Submitted by चिनार on गुरुवार, 09/08/2016 - 09:52

In reply to पहिली पास झाल्याखेरीज by नाखु

Permalink

माई..तुझ्या शब्दाबाहेर नाहीये

माई..तुझ्या शब्दाबाहेर नाहीये मी..जरा गावी जाऊन येतो महालक्ष्मीसाठी..मग आलोच बघ आलेपाक घ्यायला..
  • Log in or register to post comments

Submitted by ज्योति अळवणी on Fri, 09/09/2016 - 18:24

Permalink

धम्माल.... झक्कास... आवडली...

धम्माल.... झक्कास... आवडली...
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on Sun, 09/11/2016 - 16:58

Permalink

कविता आवडली. लग्नानंतरचे सत्य

कविता आवडली. लग्नानंतरचे सत्य जास्त आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by मोक्षदा on Sun, 09/11/2016 - 17:30

Permalink

सुंदरच

कविता व विडंबन चांगले
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 2557 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com