Skip to main content

१४ ऑगस्ट २०१६

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 14/08/2016 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
८३ वर्षाचा झालो.आज मनात आलं.... सुचलं तेव्हडं लिहावं दिसलं त्तेव्हडं वाचावं रुचलं तेव्हडं ऐकावं आवडलं तेव्हडं बोलावं विचारलं तेव्हडं सांगावं दिलं तेव्हडं घ्यावं पचलं तेव्हडं खावं जमलं तेव्हडं चालावं जीवन तृप्त असावं आणि कुणी म्हटलं तसं "ह्या जन्मावरं ह्या जगण्यावरं शतदा प्रेम करावं" शुभेच्छा देण्यार्‍यांचे आणि न देण्यार्‍यांचेही आभार. श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7698
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

2033 ला पण असाच लेख तुम्ही लिहावा

सामंतकाका, धागा पाहून आनंद झाला. तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. पंचाहत्तरीचा धागा आलेला आठवतोय.

सामंतसाहेब, तुमचे जुने लेख अजून आठवतात. उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा. - तिमा

अरे वा!! मनापासून शुभेच्छा!!!!!

वाढदिवसाच्या शुभेच्छा! लिहीत राहा. आवडेल वाचायला.

सामंतसाहेब, वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !!! लिहीत राहा. -दिलीप बिरुटे

In reply to by मुक्त विहारि

"विचारलं तेव्हडं सांगावं दिलं तेव्हडं घ्यावं पचलं तेव्हडं खावं जमलं तेव्हडं चालावं." ह्याला प्रचंड अनुमोदन

सामंतकाका, बहोत खुशी महेसुस हुयी ..अव्वल तो आपको सालगिरह की दिल की गहराईयों से पुरखुलुस मुबारकबाद !! और फिर खुदा से आपके सेहतमंद जिंदगी के लिए ढेर सारी दुवाएं :-) वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! ~ वाहीदा

ह्याप्पी बड्डे आजोबा! माझे आजोबा असते तर आता तुमच्या एवढेच असते आणि असंच बोलले असते अगदी! :)

सामंतसाहेब, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमचा तो बी ए आर सी च्या संशोधनावरचा लेख लिहायचा राहिलाय, आठवण करून देतो आहे...

In reply to by बहुगुणी

पहिला संगणक! रोमांचक आठवणी असणारेत....

थोड्या उशीराने, वाढदिवसाच्या शुभेच्छा. आज आपण ८३ वर्षांचे आहात म्हनजे स्वातंत्र्य मिळाले तेवव्हा जवळजवळ १४-१४ वर्षांचे होतात. तेव्हाच्या आणि नंतरच्याही म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या, डांगे-जोशी-अत्रेंच्या, महाराष्ट्र राज्य झाले त्याच्या, कमांडर नाणावटी खूनखटल्याच्या, अंतुले-सीमेंट खटला, चीन युद्ध, भारतपाकयुद्धे, बांगलादेशमुक्ती, नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे मृत्यू, इंदिरा गांधींच्या कारकीर्दीत घडलेला पहिला अणुबाँबस्फोट्/चाचणी, ऑपरेशन ब्लू स्टार यांविषयीच्या लोकांतल्या मनातल्या अभिमानाच्या/संतापाच्या/खळबळीच्या आपल्या काही आठवणी असतील. जरूर इथे लिहावे. अगदी मुघले आझम किंवा शोलेला कशी गर्दी लोटत असे, अलबेला पाहून लोक थिएटरमध्ये कसे नाचत असत, बिनाका गीतमाला, रेडिओ सीलोन, अमीन सायानी हे सगळे वाचायला आवडेल. खरोखर, पुन्हा एकदा आपल्या आठवणींना ताण द्या ही विनंती.

In reply to by राही

सामंतकाका तुमच्या आठवणींमधून त्या कालखंडाचा एका व्यक्तीच्या नजरेतून घडलेला प्रवास समोर येईल जो अतिशय रोमांचकारी असेल यात शंका नाही!

In reply to by राही

वाढदिवसाच्या शुभेच्छा आता ८३ आणि ७५ मधे ८ वर्षांचे अंतर हे आकडेमोडीनुसार झाले परंतु जगताना मात्र हे अंतर फार वाटते . हे अंतर काटून सामंत काका तुम्ही माझा आधार झालात तुम्हाला भेट म्हणून आठवणी लिहून काढतो वाहतो हि दुर्वांची जुडी हे बाळ कोल्हटकरांच्या लोकप्रिय नाटकानंतर आलेल्या त्यांच्या '' वाऱ्यात मिसळले पाणी ''नाटकाबद्दल या नवीन नाटकाचे पहिले पाच प्रयोग advance booking लाच हाउसफुल झाले आणि पहिल्या दोन तीन प्रयोगात लोकांचा झालेला हिरमोड इतका तीव्र होता कि पुढील प्रयोग झालेच नाहीत . त्या वेळी दादा कोंडके यांचे '' विच्छा माझी पुरी करा '' जोरात चालले होते . आणि दादांचे comments अफलातून असत दादा एका प्रयोगात सोड्याची बाटली फोडण्याची action करत म्हणाले '' वाऱ्यात मिसळले पाणी म्हणजे सोडा '' त्या वेळी सोड्याच्या बाटल्या एका गोटीने बंद केलेल्या असत . हि गोटी खाली दाबली कि बाटलीचा गळा मोकळा होई आणि सोडा बाहेर येत असे गोटी आत ढकलली म्हणजे फस्स असा आवाज येत असे आणि नाटक फस्स झाले हेहि लक्षात येत असे