मढे घाट
“ शिखर फाऊंडेशन ” ने या वर्षातला पहिल्याच पावसाळी ट्रेक चे आयोजन केले होते . या मध्ये ४७ सदस्यांनी मोठ्या उत्साहाने आपला सहभाग नोंदवला . या ट्रेक चे वैशिष्ट्य म्हणजे , शिखर ने हा ट्रेक मोटारसायकल एक्सपेडिशन म्हणून घोषीत केला होता , पण सदस्यांच्या कुटुंबा चा अतिउत्साह आणि ट्रेक करण्याचे धाडस पाहून त्यांना दिलेल्या परवानगी मुळे मोटारसायकल एक्सपेडिशन चे मोटार एक्सपेडिशन मध्ये कधी रूपांतर झाले ते काळलेच नाही .
चार टाटा नॅनो , एक टाटा झेस्ट , एक टाटा मांझा , आणि एक i 20 आणि दहा बुलेट च्या मदतीने सत्तेचाळीस उत्साही ट्रेकर्स नी सकाळी सात वाजता चिंचवड येथून प्रस्थान ठेवले . राजकीय पक्षाच्या रॅली ला लाजवेल आशा थाटात सर्व जथ्था पुणे - बेंगलोर हायवे वरून पुढे सिंहगड रोड ने जाऊन खडकवासला धरणाच्या चौपाटीवर थांबला . प्रवीण दादा , राजेश चिंचवडे सह पुण्यातून येणारी मंडळी रॅलीत सहभागी झाली .
धुक्यात हरवलेल्या सिंहगडाचे मुख दर्शन घेऊन, गाड्यांची रांग पाबे घाटाच्या चढणीला लागली . गर्द झाडीतून नागमोडी वळणे घेत आणि सतत कोसळणाऱ्या आषाढ सरी अंगावर झेलत आणि रस्त्यावरून वाहणारे पाणी उडवत रॅली पाबे घाटाच्या पायथ्याला थांबली . आषाढ सरी अंगावर झेलत आणि गवताच्या गालिच्यावर साठलेले पाण्याचे टपोरे थेंब पायाने उडवत पावसाचा आनंद लुटला . सिंहगडा च्या तान्हाजी कड्यावरून कोसळणाऱ्या अवखळ धबधब्याचे आणि हिरवा शालू नेसून नटलेल्या डोंगर रंगाचे आणि रंगी बेरंगी पोशाखत अंग लपेटून घेतलेल्या ट्रेकर्स चे छायाचित्रण गुलाबराव जारांडे च्या कॅमेऱ्या मध्ये कैद करत सर्व जण पाबे घाटाच्या दिशेने रवाना झाले . पाबे घाटाच्या खिंडीत पुन्हा एकदा थांबा घेत नव्या पिढीच्या सेल्फी वर फिदा होत पाबे घाटातून दिसणाऱ्या गुंजवणी खोऱ्यातील तुडुंब भरलेल्या भात खाचराच्या आणि हिरवळीने नटलेल्या डोंगर रांगांच्या पार्शवभूमीवर सेल्फी चा मनमुराद आनंद लुटला . पुढे उताराची वळणे घेत तोरणा गडा च्या पायथ्याशी असलेल्या वेल्हा मधील हॉटेल स्वप्नील मध्ये ,काल रात्री पासून अन्नाचा एक कण ही न गेलेल्या पोटाला ठसकेबाज मिसळ ने आधार देण्याचे काम केले . गरमा गरम भजी , सँपल मारके मिसळ , वाफळलेला चाहा आणि वेटर च्या राजकीय संवाद फेकीने तृप्त झालेल्या अवघ्या जनांनी आमचे शिखर चे सहकारी संतोष झेंडे यांनी ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानत मढे घाटाच्या दिशेने कूच केली . चापेट धरणा च्या उजव्या बाजूने नागमोडी वळणे घेत , रस्त्यात भेटलेल्या धबधब्या मध्ये भिजत तरी कधी पावसाच्या सरी अंगावर झेलत , तर मध्येच सैराट मधील आर्ची आणि पारशा च्या डायलॉग ची पेरणी करत सर्व उत्साही ट्रेकर्स धुक्यात लपलेल्या मढे घाटाच्या पठारावर पोहचले .
धुक्यात हरवलेला लक्ष्मी धबधबा आणि कोकणचा जलमय भूप्रदेश दिसतच नव्हता . वाऱ्यामुळे धबधब्यातून उडणारे तुषार अंगावर झेलत दुधाची ताहान ताकावर भागवली , पण शिवाजी ने खिंडीतून खाली उतरणाऱ्या रस्त्याची चाचपणी केली आणि सर्वांना खाली घेऊन जाण्याची तयारी केली . ४ फेब्रुवारी १६७० च्या कोंढण्याच्या लढाई मध्ये नरवीर तान्हाजी मालुसरे धारातिर्थि पडले तेव्हा त्यांचे पार्थीव याच वाटेने त्यांच्या मूळ गावी म्हणजे पोलादपूर जवळील उमरठे या गावी नेण्यात आले होते म्हणून या वाटेला मढे घाट नाव पडले आहे . प्रवीण सरांनी खाली उतरण्या संबधी सूचना दिल्या , तर शिवाजी आंधळे यांनी पुन्हा एकदा शिव काळा मध्ये घेऊन जात शिवकालीन इतिहासाला उजाळा दिला . पाण्याच्या नाळेने धडपडत सर्व जण सुरक्षित खाली गेले तेव्हा निसर्गाला ही लाजल्या सारखे वाटले आणि संपूर्ण सह्याद्री वरचे धुक्याचे मळभ हटले . २५० ते ३०० फुटावरून कोसळणाऱ्या लक्ष्मी धबधब्या खाली चिंब होऊन भिजण्याचा आनंद लुटत सर्वांनी धमाल केली . आनंद लुटताना भान ही राखले पाहिजे या हेतूने प्रविण दादा नी सर्वांना वर येण्याची सूचना केली . वर येऊन पठारावरून दिसणाऱ्या कोकणचे आणि सह्याद्रीचे शृंगारीक रूप डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवत परतीचा मार्ग धरला . पुढे गावा मधील एका घराच्या पावसाळी वातावरणामध्ये धुंद झालेल्या पडवीत घरीहून घेतलेल्या जेवणावरती येथेच्छ ताव मारला . आणि फणसाचे गरे तोंडात चघळत तुफानी पावसातच पुण्याचा रस्ता धरला .
शिवाजी आंधळे
९८५०५५५९५२
वाचने
8505
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटो?
इतक्या गाड्या पाहून मढे
+१००
In reply to इतक्या गाड्या पाहून मढे by प्रचेतस
सहमत आहे.
In reply to इतक्या गाड्या पाहून मढे by प्रचेतस
ते तर आहेच देवा!
In reply to इतक्या गाड्या पाहून मढे by प्रचेतस
कर्णवाडी ??
ट्रेक?
In reply to कर्णवाडी ?? by स्वच्छंदी_मनोज
बिस्किटांचे रॅपर्स, चिप्स ची
असल्या भुरट्या पोलिटिकल रॅली
In reply to बिस्किटांचे रॅपर्स, चिप्स ची by सूड
पटल....
In reply to असल्या भुरट्या पोलिटिकल रॅली by अभ्या..
हेच म्हणायला आलो होतो. असल्या
In reply to पटल.... by विखि
हेच म्हणायला आलो होतो. असल्या
In reply to पटल.... by विखि
प्रतिसाद
दहा बुलेट्स घेउन कुठेही जाउन
In reply to प्रतिसाद by Nitin Palkar
आसूड
In reply to दहा बुलेट्स घेउन कुठेही जाउन by सूड
....................
ट्रेकर्स? या शब्दाची व्याख्या
लांबलचक वाक्यरचना आवडली,
पाण्याच्या नाळेने धडपडत सर्व
अतिशय उत्तम आणि ओघवतं वर्णन.
लोलवा, भटकंती वर्णन कमी आणि
In reply to अतिशय उत्तम आणि ओघवतं वर्णन. by पक्षी