"लव" इज द "गेम"!

मृगनयनी's picture
मृगनयनी in जनातलं, मनातलं
24 Sep 2008 - 3:48 pm

मनाच्या गाभार्‍यात , कधीकधी भरुन येतात भूतकाळाचे मेघ...
आणि मग एकेक लडींप्रमाणे उलगडत जातात, त्या आठवणी...
मी म्हणायचे, "मला आवडते काळ्या दगडावरची रेघ. "
तू म्हणायचास, " मला मात्र भुरळ पाडतं अळवावरचं पाणी. "

मी विचारायचे, "राधा खरी की रुक्मिणी ? "
तू विचार करुन म्हणायचास, "मीरा च खरी विरहिणी. "

मी : म्हणजे राधेच्या प्रेमात, नव्हतीच का कधी भक्ती?
तू : हो..... पण विष पचवायलाही लागते मोठी शक्ती...!
मी : तरी पण सांग ना..... कोण खरं....?
तू : खरंतर लग्नपेक्षा प्रेमच बरं !
मी : फक्त प्रेमासाठी म्हणुन, का राधेने समाजनिंदेला तोंड द्यावं ?
तू : आता प्रेम करायचं, म्हटल्यावर तेवढं सहन करायलाच हवं!
मी : पण म्हणुन, समाजाचा फक्त राधेवर तेवढा रोष.....
तू : समाजच तसा आपला, यात माझा काय दोष?.....
मी : ठाऊक आहे ना तुला, राधेने वासनेच्या पलीकडलं प्रेम केलं होतं....
तू : हो ... पण या कलीयुगात, पलीकडच्या तीरावर... पाण्यातुनच जावं लागतं!
मी : असं म्हणतात, खर्‍या प्रेमात स्वार्थ बघायचा नसतो!
तू : हो... पण खर्‍या प्रेमाचा अर्थ आपणच ठरवायचा असतो.....!!!

मी थोडी नाराज होऊन म्हणाले, " हे मात्र छान!.. प्रत्येक शब्दाचा अर्थ बदलवता येतो
तुला!"
तू माझ्या डोळ्यांत बघत म्हणालास, " हो!.. कारण आयुष्याच्या प्रत्येक खेळात रस आहे मला!!"
मी : म्हणजे, आयुष्यातली प्रत्येक गोष्ट, खेळ म्हणुनच खेळायची असते?
तू : हं..... एखादी खेळी मुद्दाम हरुन जिंकायची असते!
मी : म्हणजे...तुझ्यावर प्रेम करणार्‍यांच्या भावनांचाही तू खेळच करतो का?
तू : विचार कर.. आपल्या भावनांचा कधी परस्परांशी मेळ असतो का!?!
मी : भावनांचा विचार करण्यासाठी त्यांचा भावनात्मक दृष्टीनेच विचार करायला हवा!
तू : म्हणजे.... त्यासाठी मला परत मांडावा लागेल खेळ नवा!!!
मी : तू ही माणुसच आहेस ना.... तरी नाहीच कशी तुला निर्व्याज प्रेमाची जाण.....
तू : माझ्या खेळात मला माहित आहे फक्त हृदयांची देवाण घेवाण.....

मी कळवळुन म्हणाले, " इतका कसा रे निष्ठूर तू, माझ्या आजवरच्या विश्वासाला तडा गेला.."
तू शांतपणे म्हणालास, "फासेच उलटे टाकलेस तू, म्हणुन तर तुझा डाव चुकला..."

मग फक्त आघात सोसत राहिले, मी होऊन नि:शब्द.....
अश्रूंच्या माळेतून आठवत राहिले, प्रेम आणि सौदा यातलं द्वंद्वयुद्ध!

निरोप घेताना तुझा मी इतकंच म्हणाले, "तुझा खेळ हरले मी... विसरुन जा माझं प्रेम..."
मग तू ही थोडा 'इमोशनल' होऊन म्हणालास, " You also forget it, at last LOVE is the GAME!

एवढं होऊनही विसरुनचं गेले मी तुला एक सांगायचं....
मला नवीन खेळाची माहिती दिल्या बद्दल "थँक यु" म्हणायचं!

तू काहीही म्हण आता... पण खरोखरच तुझे मानले पाहिजेत आभार.....
कारण माझ्या प्रेमाला तू फक्त "खेळ"च म्हटलास...... म्हणाला नाहीस "जुगार" !

कवितावाङ्मयमुक्तकसमाजविचार

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

24 Sep 2008 - 4:10 pm | आनंदयात्री

सुरेख लेखन !!
प्रश्नोत्तरात अशी कविता होउ शकते ??
अवाक झालो. खुप सुंदर कविता.
लिहते व्हा :)

विजुभाऊ's picture

24 Sep 2008 - 4:10 pm | विजुभाऊ

मला नवीन खेळाची माहिती दिल्या बद्दल "थँक यु" म्हणायचं!

थ्यांक यू.

डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

जैनाचं कार्ट's picture

24 Sep 2008 - 4:13 pm | जैनाचं कार्ट (not verified)

असल्या नमुन्याला चप्पलाने झोडायचं सोडून थ्यांक यू कश्याला म्हणता आहात कळालं नाई बॉ !

हदयाशी / भावनाशीं खेळ ह्या भावनेने वागणं हेच त्याच्या बुध्दीची दिवाळखोरी दाखवत आहे !!!!!!!!!!!!!!!

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

अवलिया's picture

24 Sep 2008 - 4:28 pm | अवलिया

राजे पेटु नका
शांत व्हा
आपल्याला अजुन बरेच पळायचे आहे....

मृगनयनी's picture

24 Sep 2008 - 4:16 pm | मृगनयनी

असल्या नमुन्याला चप्पलाने झोडायचं सोडून थ्यांक यू कश्याला म्हणता आहात कळालं नाई बॉ !

शान्त व्हा राजे..... ती कविता आहे.....एक काल्पनिक आभास!!

(त्या नाडीवाल्याचा राग तुमी कुटं बी काढायला लागले की वो... :-? )

टारझन's picture

24 Sep 2008 - 4:50 pm | टारझन

(त्या नाडीवाल्याचा राग तुमी कुटं बी काढायला लागले की वो...)
आयला ..... आजकाल एकच जण नाडी वाली सही करत आहे . तिकडे तर इशारा नाही ना ? बाकी राजे म्हणाले ते क्लास ...
राजे .. कुणाला फोडायचं असंल तर विमा माझ्याकडून काढायला सांगा हो
नैनीची कविता मर्सिडिज एस-क्लास .... (हे जनातलं-मनातलं आहे की कविता ? )

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

जैनाचं कार्ट's picture

24 Sep 2008 - 4:52 pm | जैनाचं कार्ट (not verified)

नाडीवाल्याचा राग तुमी कुटं बी काढायला लागले की वो...

नाय बॉ... आम्ही तीकडचं इ़कडे.. असले धंदे नाय करत ;)

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

इनोबा म्हणे's picture

24 Sep 2008 - 4:21 pm | इनोबा म्हणे

मस्त कविता गं!
खफ बंद झाल्यापासून, खफकर्स गंभीरपणे लेखन करत आहेत. वा वा!!

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

आनंदयात्री's picture

24 Sep 2008 - 4:34 pm | आनंदयात्री

हे असे काही दृश्य फायदे.
आमच्या विजुभाउंना पार बिघडवला होता त्या खफने !!

विजुभाऊ's picture

24 Sep 2008 - 5:01 pm | विजुभाऊ

सहमत
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

मिंटी's picture

24 Sep 2008 - 4:26 pm | मिंटी

मस्तच गं....

ईनोबांशी सहमत..... :)

पावसाची परी's picture

24 Sep 2008 - 4:28 pm | पावसाची परी

अतिशय छान! सोपी भाषा आणि मोजक्या शब्दात मस्त लिहिले आहेस.

>>You also forget it, at last LOVE is the GAME!
मला नवीन खेळाची माहिती दिल्या बद्दल "थँक यु" म्हणायचं!

>खरोखरच तुझे मानले पाहिजेत आभार.....
तुझे खुप खुप आभार्...........इतक सुन्दर लिहिलयस की तुझा प्रचन्ड आदर वाटत आहे

तुझी आदरकर्ती/आभारकर्ती

शेखर's picture

24 Sep 2008 - 4:45 pm | शेखर

मस्तच लिहलय.

सवाल जबाब १+

शेखर

मनस्वी's picture

24 Sep 2008 - 5:00 pm | मनस्वी

प्रश्नोत्तरातील कविता छान आहे.

मनस्वी
*डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*

रामदास's picture

24 Sep 2008 - 7:39 pm | रामदास

मृगनयनी ,आपला लेख वाचल्यावर मला दिदीच्या ह्या गाण्याची आठवण झाली.
साहीरनी लिहीलेली ही कविता मुकेश आणि सुधा मल्होत्राच्या आवाजात आहे.
त्यातल्या काही ओळी देत आहे. (या गाण्यापाठी एक दंतकथा आहे साहीर आणि सुधा मल्होत्राच्या प्रेम प्रकरणाची.खरं खोटं काही कळत नाही .पण या गाण्यातली वेदना मात्र जाणवते.)

मेरे दिल की मेरे जजबात की किमत क्या है
उलझे उलझे खयालात की किमत क्या है
मैने क्यु प्यार किया तुमने न क्यु प्यार किया
इन परेशान सवालात की किमत क्या है.
तुमजो ये भी न बताओ तो ये हक है तुमको
मेरी बात और है मैने तो महोबत की है.

http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

प्राजु's picture

24 Sep 2008 - 8:28 pm | प्राजु

अभिनंदन..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रभाकर पेठकर's picture

24 Sep 2008 - 10:43 pm | प्रभाकर पेठकर

कारण माझ्या प्रेमाला तू फक्त "खेळ"च म्हटलास...... म्हणाला नाहीस "जुगार" !

तेवढेच समाधान.

पारोळेकर's picture

25 Sep 2008 - 12:37 pm | पारोळेकर

माझ्या प्रेमाला तू फक्त "खेळ"च म्हटलास...... म्हणाला नाहीस "जुगार" !

मृग-नयना बाई काय लिव्हता व्हं तुम्ही लय बेस ......

बेधुन्द मनाची लहर's picture

25 Sep 2008 - 3:34 pm | बेधुन्द मनाची लहर

खुपच छान कविता.....

पुनम...
देखने ते रूप जे प्रन्जळचे आरसे, सावळे की गोमटे या नाही मोल फारसे.

विजुभाऊ's picture

25 Sep 2008 - 3:58 pm | विजुभाऊ

वसंत बापटांची " फुंकर" वाचलीय?
ये म्हणालीस म्हणून आलो
बसा म्हणालीस म्हणुन बसलो
बस्स इतकेच. बाकी मन नव्हते थार्‍यावर
...
.
.
.
.
एक सांग मी जाताना तुझ्या डोळ्यात पाणी का आले
नकोच सांगुस उगाच सुपारी लागली म्हणुन सांगशील
तेवढीच एक फुंकर मनाला

डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

अनिरुद्धशेटे's picture

10 Nov 2008 - 3:42 pm | अनिरुद्धशेटे

अप्रतिम ओळ,
तू काहीही म्हण आता... पण खरोखरच तुझे मानले पाहिजेत आभार.....
कारण माझ्या प्रेमाला तू फक्त "खेळ"च म्हटलास...... म्हणाला नाहीस "जुगार" !

प्रेम नसतो खेळ, किंवा तो नसतो जुगार,
जीवनातल्या निसटत्या क्षणांचा, तो असतो आधार !

अनिरुद्ध

मृगनयनी's picture

22 Mar 2018 - 1:20 am | मृगनयनी

Love you all....
After a loooooonnnggg years... I read it again... Love you... Just love you....

मृगनयनी's picture

22 Mar 2018 - 1:20 am | मृगनयनी

Love you all....
After a loooooonnnggg years... I read it again... Love you... Just love you....

शशिकांत ओक's picture

22 Mar 2018 - 11:44 pm | शशिकांत ओक
शशिकांत ओक's picture

23 Mar 2018 - 9:25 am | शशिकांत ओक
शशिकांत ओक's picture

23 Mar 2018 - 9:25 am | शशिकांत ओक
शशिकांत ओक's picture

23 Mar 2018 - 9:26 am | शशिकांत ओक

वर पाहताना टारझन, राज वगैरेंनी नाडी संदर्भात खोड्या काढलेल्या वाचून रंगत आली... कालांतराने वाचायला...
मी नाडी (विषयाची) सोडली असे नाही बरका नमस्कार...

शशिकांत ओक's picture

22 Mar 2018 - 11:44 pm | शशिकांत ओक
शशिकांत ओक's picture

22 Mar 2018 - 11:53 pm | शशिकांत ओक
शशिकांत ओक's picture

23 Mar 2018 - 9:22 am | शशिकांत ओक

मॄग्गा आणि तिच्च सगळ्यांवरच प्रेम.... ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आँखें मिलानेवाले, दिल को चुरानेवाले मुझको भुलाना नही... :- Nazia Hassan