( मी बी पिरेम करीन म्हनते ) : प्रेमळ तडका
सावळ्याची त्या जोगीन बनीन म्हनते,
मी बी पिरेम करीन म्हनते...
राया तो माजा
भ्येटंल काय, न भ्येटंल काय,
वाट पहायाची आपली
पुरी तयारी हाय,
दैवाचीबी परीक्शा
घेइन म्हनते,
मी बी पिरेम करीन म्हनते...
जीवाचा सखा
गावंल काय, न गावंल काय,
समदं ह्या कपाळी
लिव्हल्यालं हाय,
नशिबासंगं आज
पैज लावीन म्हनते,
मी बी पिरेम करीन म्हनते...
आयुक्शाचे परश्न
सुटले काय, न सुटले काय,
धन्यासाटी आगीशीबी खेळने
मंजूर हाय,
डोरलं त्येच्याच नावचं
गल्यात घालीन म्हनते,
मी बी पिरेम करीन म्हनते ...
एकाद्याले जीव लावून
सार्थक जन्माचे होते,
एकल्याने जगताना
जगने अधुरे राहते,
सजनाचे नाव फक्त
माज्या नावासंगं जुळावे,
साथ त्येची भेटली की
जन्माचे सोने व्हावे,
झोकून पिरेम करावे
बस मागने नाही लय,
समदे मिलून बोला जी,
पिरमाचाच व्हावा जय...
****************
प्रेरणा:
http://www.misalpav.com/node/36609,
http://www.misalpav.com/node/36747
प्रेम करा हो.अवश्य करा.
अरेच्या! प्रेमळ तडका आणि
अच्छा म्हणजे अस कनेक्शन आहे
आग बया एकदम दोन दोन....
ही रचना आवडली.
विडंबन ऐवजी स्वतंत्र कविता
+१
+२
+३