भेट.. तुझी अन माझी...
आयुष्यात काही 'व्यक्ती' अशा भेटतात, कि ज्यांचा सहवास किंवा भेट खूपच कमी वेळेची असते... काही सेकंदाची, फार-फार तर एक-दोन मिनिटांची... पण त्या आपल्या मनावर खूप खोल छाप मारून जातात.. कुठे तरी घर करून बसतात... आणि नंतर तुम्हाला परत-परत आठवत राहतात :P :P मी त्या वेळी इंजिनीरिंगच्या दुसऱ्या वर्षाला होतो... लोणी वरून बसने घरी जात होतो... 'राहुरी'च्या बस स्टँड वर अशीच 'ती' (व्यक्ती :P ) मला नजरेस पडली... ती बहुदा तिथेच कुठेतरी कॉलेजला असावी... बसची वाट पहात उभी होती... मस्त दिसत होती ती... आमची नजरेला नजर झाली... पाच-दहा सेकंड ती माझ्याशी काही तरी बोलली...नजरेने... बहुतेक शिव्या दिल्या असाव्यात :P :P माझी बस सुटली...नंतर ती मला कधीच भेटली नाही...पण अनेक वेळा तिचा तो चेहरा मला आठवत राहिला... अगदी मघाशी स्वारगेट बस स्टॉप वर असताना देखील :) :)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
म्हणून मग उतरल्या उतरल्या इथे
हे हे हे
पाच-दहा सेकंड ती माझ्याशी
-)
-)