✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बऱ्याचदा वाटतं....

व — वटवट, Wed, 07/20/2016 - 15:05
बऱ्याचदा वाटतं.... वागावं अगदी बावळटासारखं.... शर्टाच्या वरच्या दोन गुंड्या लावूच नयेत... लागली असावी खूप भूक... पोटात पेटलेला असावा वणवा..... आणि समोर ताट असतानाही, काही खाउच नये... उगाच हिंडावं आपण गावभर पायाने अनवाणी.... आणि सुखासुखी गावी उगाच दुःखाची गाणी... उगाच करावा चेहरा आपला चिंताग्रस्त.. आयुष्याने जणू करून टाकलं असावं आपल्याला अगदी त्रस्त... वाटावं सारया जगाला आपण अगदी वेडाखुळा ..... अगदी मोठ्ठ्या, भसाड्या आवाजात म्हणावीत गाणी फाडून आपला गळा... उगाच करत राहावं असलं काहीतरी... लोकांनी म्हणावं, बहुतेक इथे फसलंय काहीतरी... चुकवावेत साऱ्यांचे अंदाज..आपण अगदी सपशेल.... कधीतरी खेळूनच बघावा आपण आपल्या आयुष्याशी हा खेळ... बोलणं.... लिहिणं खूप सोपं आहे... पण वागणं खूप कठीण... इतक्या सहज नाही सुटत आपल्या सभ्यतेची वीण... मलाही अस खूप वागावं वाटतं पण मी स्वप्नातच तसं करतो... ;) आणि जाग आली कि... असलं काहीतरी लिहितो..... - चेतन दीक्षित

प्रतिक्रिया द्या
884 वाचन

💬 प्रतिसाद (2)

लैच भारी राव....

माम्लेदारचा पन्खा
Wed, 07/20/2016 - 15:41 नवीन
कस्काय जमतं तुमास्नी ?
  • Log in or register to post comments

चांगलं जमलंय

सामान्य वाचक
गुरुवार, 07/21/2016 - 10:25 नवीन
एक उनाड दिवस आठवला
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा