user

उन्हाळ्यातले थेंब (हायकू)

उन्हाळ्यातले थेंब
(तिहेरी तिहाई)
*
तापली धूळ बसून
पानावर नक्षी दिसते
सुकल्या दवाची
*
*
*
*
*
लाल धूळकण
वाहातायत सैरभैर
खार तुषार
*
*
*
*
*
ऊन धुळीत थेंब
कोळपली पालवी वाफवून
मलूल करतात
*
*
दवाचा एक बिंदू
पानाला लोंबतो
तसा जड नाही तो
*
*
*
*
*
मागे ठिबक ठिबक
समोर ओढ्याचे पात्र
आहे भेगाळ
*
*
*
*
*
ऊन धुळीत थेंब
चुरचुरून वाफ झालेले
मातीचे मोती
*
*
सूर्य उगवला
दवाची उठलेली वाफ
कोरड पांघरते
*
*
*
*
*
निरभ्र निळे
नभ भगभगते
मृद्गंध उठला
*
*
*
*
*
ऊन धुळीत थेंब
आषाढ दरवळतो
भर वैषाखात
*
*****************************************************
Summer Droplets
(Triple triplets)
*
The hot dust settling
Traces patterns on leaves
Of long dried dew
*
*
*
*
*
Red dust particles
Swirl helter skelter
Spraying embers
*
*
*
*
*
Sprinkles on hot dust
Steam up the browned trees
The leaves wilt more
*
*
A drop of dew
Hangs from a leaf tip
Too light to drop
*
*
*
*
*
Drip drip somewhere
Here the brook's bed
Is cracked earth
*
*
*
*
*
Sprinkles on hot dust
Sizzle and hiss and steam
Rolling brown pearls
*
*
The sun arisen,
The dew is misting up
The parched scene
*
*
*
*
*
A cloudless blue
Smoldering hovers above
An earthy fragrance
*
*
*
*
*
Sprinkles on hot dust
Smell of cool monsoon
And dampen summer
*
*****************************************************

(हायकू हा जपानी काव्यप्रकार शांताबाईंनी आणि अन्य कवींनी मराठीत रचला आहे. येथे मी मूळ जपानी नियमांप्रमाणे रचना करतो आहे, त्यामुळे काही फरक आला असू शकेल. यात जास्तीत जास्त ३ ओळी असतात, आणि १७ मात्रा असतात. स्वयंपूर्ण कडव्यात केवळ मूर्त नैसर्गिक विषय हाताळले जातात. अमूर्त भावनांचा नावाने निर्देश निषिद्ध आहे. तरी वाचकाच्या अंतर्मनात भावनागर्भाचा साक्षात्कार होण्यातच हायकूचे साफल्य आहे. वाटल्यास वरील ९ स्वतंत्र हायकू म्हणून वाचावेत. वाटल्यास आडव्या पंक्तीत लिहिलेल्या, वाटल्यास उभ्या रांगांमध्ये लिहिलेल्या, तीनतीन कडव्यांच्या तीन कविता म्हणून वाचाव्यात. काही भाषांतरे मराठीतून इंग्रजीत आहेत, तर काही उलट दिशेने.)

कोरड पांघरते !!!

क्या बात है धनंजय !!!!!!

हृदयविकाराविषयी संशोधन करता करता, असले शब्द तुमच्या मेंदूला स्फुरतात, ह्याचे किती कौतिक करावे तेवढे थोडेच....

सूर्य उगवला
दवाची उठलेली वाफ
कोरड पांघरते

क्या बात है !!!!!

- (दिगभ्भांपाठोपाठ धनंजयचा मेजर फ्यान) सर्किट

सुंदर

तापली धूळ बसून
पानावर नक्षी दिसते
सुकल्या दवाची

या पेक्षा जास्त शब्दांची गरज वाटत नाही.

अमूर्त भावनांचा नावाने निर्देश निषिद्ध आहे.

हा काव्यप्रकार तरी सुटला म्हणायचा प्रेमभंगविरांच्या तावडीतून.

अभिजित

ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

सुरेख

निरभ्र निळे
नभ भगभगते
मृद्गंध उठला

(अजून एक फ्यान्) मनिष

कविराज, शब्

कविराज,
शब्द त्रिकुटे थोडीशी आतून आलेली न वाटता मेकॅनीकल वाटली इतकी माफक तक्रार सोडली तर कलेचा तुम्ही अतिशय उच्च अविष्कार घडवला आहे.

तिकडे तत्वांना गद्ध्याच्या **त सारुन ढोंगी राजकारण खेळणारे बेगडी राजकारणी आणि त्यांची प्यादी, अपशब्द चिखल फेकाफेकी आणि मी पणाचा असह्य दर्प मारणारे 'सो कॉल्ड' तंत्रज्ञ आणि त्यांचे फॅनक्लब ह्या सगळ्या गदारोळात आपला पांढरा शुभ्र स्वच्छ शर्ट तुम्ही भट्टीतून आणल्यासारखा सुरकुत्या विरहीत कसा काय ठेवता बुवा?
-कि'गार
****************************************************************
अल्कोहोलचा परिणाम दुसरे काय?

काही भाग थोडे मोजून बेतशुद्ध आहेत हे खरे

एकच उत्तम हायकू लिहायला (आणि एक लिहून झाल्यावर थांबायला!) आध्यात्मिक पोच लागते. म्हणजे वर्षांच्या विचाराचा अर्क अल्पाक्षरात, पण उत्स्फूर्त असा सांगावा लागतो.

इथे संच बनवणार असे आधी ठरवल्यामुळे काही थोडी कडवी उत्स्फूर्त आहेत, आणि काही त्या अनुषंगाने विचाराअंती रचलेली आहेत. त्यामुळे काही प्रमाणात ओतीव पेक्षा घडीव आकृती दिसते. अभिप्रायाबाबत धन्यवाद.

मातीचे मोती

मातीचे मोती

जियो धनंजय जियो !! अत्यंत सुंदर कल्पना, नवीन आहे.

अंतर्मनात भावनागर्भाचा साक्षात्कार होण्यातच हायकूचे साफल्य आहे.

अगदी खरे.

धनंजयराव, मानले बुवा तुम्हाला, ते आधी केलेले क्लिष्ट गोष्टीचे भाषांतर अन आता ही हायकुची मेजवानी !! धन्यवाद.

(धनंजय फ्यान क्लबात सामील)

प्रसाद मुळे

ता.क. आमच्या जापानी जाणकार गँगला ही लिंक पाठवायला विसरलो नाही Smile

सुरेख

ऊन धुळीत थेंब
चुरचुरून वाफ झालेले
मातीचे मोती

अप्रतिमच!

(धनंजयांचा सर्वात जास्त फ्यान) आजानुकर्ण

-- आजानुकर्ण
(माझा हा प्रतिसाद तुम्हांला अश्लील तर वाटत नाही ना?)

धन्याशेठ,

तुझ्या प्रतिभेला दंडवत रे बाबा! फारच सुंदर आणि कल्पक लिहिलं आहेस..

तुझ्यासारख्या प्रतिभावंताचा मिसळपावला अभिमान वाटतो...!

अजूनही लिही, अगदी भरपूर लिही, मनमुराद लिही, हीच तुला रिक्वेष्ट...Smile

तात्या.

--Life is a questions nobody can answer It… and the Death is an answer, nobody can question it..!

+१

अजूनही लिही, अगदी भरपूर लिही, मनमुराद लिही, हीच तुला रिक्वेष्ट...Smile
सहमत आहे . म्हणजे जरा दर्जेदार मराठी संकेतस्थळावर वावरतोय, असे तरी वाटेल Smile
(सहमत)बेसनलाडू

अरे बेसनाच्या लाडवा,

म्हणजे जरा दर्जेदार मराठी संकेतस्थळावर वावरतोय, असे तरी वाटेल Smile

अरे बेसनाच्या लाडवा, मिसळपाव दर्जेदारच आहे तेव्हा त्यात वेगळं काय वाटायचंय? Smile ते जर दर्जेदार नसतं तर तिथे तुझ्यासारखी, धन्याशेठसारखी प्रतिभावान लोकं आलीच नसती! काय खरं की नाही? Smile

हां परंतु या संस्थळाचं नांव 'मिसळपाव' असल्यामुळे इथे काहीच वर्ज्य नाही. भल्याबुर्‍याची, दर्जा-दर्जाहीनतेची ही एक मिसळच आहे! Smile

असो, आता मी इथेच थांबतो. इथे पुन्हा नव्याने आपल्या दोघांचे तिरके तिरके प्रतिसाद नकोत! Smile

तात्या.

--Life is a questions nobody can answer It… and the Death is an answer, nobody can question it..!

हम्म

असो, आता मी इथेच थांबतो. इथे पुन्हा नव्याने आपल्या दोघांचे तिरके तिरके प्रतिसाद नकोत! Smile

कुठे थांबावे हे कळणे हेच सर्वात महत्त्वाचे.

- आजानुकर्ण

-- आजानुकर्ण
(माझा हा प्रतिसाद तुम्हांला अश्लील तर वाटत नाही ना?)

येथेही +१

आता मी इथेच थांबतो. इथे पुन्हा नव्याने आपल्या दोघांचे तिरके तिरके प्रतिसाद नकोत! Smile
--- बघताना आकाराने तिरके तिरके चालतील हो Wink पण 'तिरके' नकोत Wink
('तिरका')बेसनलाडू
कुठे थांबावे हे कळणे हेच सर्वात महत्त्वाचे.
--- सहमत.
(सहमत)बेसनलाडू

वाह!

ह्या थेंबांनी अजुनच तहान जागवली.

अगदी मनमुराद चिंब भिजवले गेलो तरी देखील...

सुरेख!

अप्रतिम

हायकू. डी. एफ. सी. (धनंजय फॅन क्लब) मध्ये मीही सामील Smile

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

धनंजय पंखा परिवार

मी आणखी एक सदस्य...
मानले बुवा! धनंजय ही एकच व्यक्ती नसून लेखक, कवी, भाषांतरकार, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, इतिहासतज्ञ यांची सिंडीकेट आहे असे वाटू लागले आहे. Smile
उत्तम हायकूमाला...

अगदी असेच

मानले बुवा! धनंजय ही एकच व्यक्ती नसून लेखक, कवी, भाषांतरकार, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, इतिहासतज्ञ यांची सिंडीकेट आहे असे वाटू लागले आहे. Smile

(डी.एफ्.सी लाईफ मेंबर) कोलबेर

हायकु.....मस्त !

धनंजयराव,
हायकु आवडले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडल्या.

मस्त. आवडल्या हायकू.

एकदम भारावून

अहो इतके नका हरभर्‍याच्या झाडावर चढवू! पुढचा प्रयोग पडला की सरासरी पुन्हा मध्यावर येईल Smile

पण चांगल्या अभिप्रायाने उत्साह वाढतो हे मात्र नक्की. मनापासून धन्यवाद.

पण आपले संशोधन विसरू नका !

धनंजय,

आमच्या अभिप्रायाने आपला साहित्यिक उत्साह वाढतोय हे खरे.

पण आम्हाला येत्या पाच-दहा वर्षांत हृदयविकाराचा झटका आला, आणि त्यात आम्ही दगावलो, तर ह्या उत्तेजक प्रतिसादांना आम्ही दोष देणार हे नक्क्की ! नरकातून काहीतरी स्फोटक लिहू मिसळपावावर (नाहीतरी इथले *** सदस्य नरकातच असतील, तेव्हा)!

कारण ह्याच उत्तेजक प्रतिसादांमुळे आपण *आमच्या* हृदयाविषयी संशोधन रहित करून असे हायकू/भषांतरे/व्याकरणविषयक लेख लिहीत बसणार, आणि एल डी एल कमी करण्याच्या पद्धतींविषयीचे आपले संशोधन कमी करणार.

ह्या हायकूंनी फार फार तर आमच्या मनाला बरे वाटते. पण आम्ही जगलोच नाही तर कोण आपले हाय्कू एन्जॉय करणार ?

तेव्हा आमच्या जनुकांचा आमच्या एल डी एल चा संबंध, ह्या संशोधनात पूर्ण वेळ घालवा. हायकू काय आम्ही पण करू.

धनंजय रावांचे
हृदय संशोधन संपले
आणि आमचे हृदय निकामी

कसे आहे ??

- सर्किट

Scroll to Top