त्यासाठी 'स्टिल' रहाण्याची गरज नाही. हललात तरी चालेल.
सांगलीत सगळी चांगलीच ठिकाणे आहेत. विश्रामबाग, खणभाग परिसरात आणि कुपवाड रोडला आहेत बरीच.
नांवं लक्षात नाहीत, पण चवी पक्क्या लक्षात आहेत..!
नाही जमत. Tried on keyboard and as suggested on the link provided. I can reply on any other thread in marathi. But can not start new thread. Sorry for spelling mistakes if any. (In advance)
गुगल मराठी आपल्या काम्पुटर वर डाऊन लोड करून घ्या. आंग्ल भाषेत टंकन केले तरी मराठी लिहिता येते. मी हेच करतो. बाकी आंग्ल भाषेची तंगडी तोडण्याची आपली महान परंपरा आहेच.
गुगल मराठी आपल्या काम्पुटर वर डाऊन लोड करून घ्या. आंग्ल भाषेत टंकन केले तरी मराठी लिहिता येते. मी हेच करतो. बाकी आंग्ल भाषेची तंगडी तोडण्याची आपली महान परंपरा आहेच.
गुगल मराठी आपल्या काम्पुटर वर डाऊन लोड करून घ्या. आंग्ल भाषेत टंकन केले तरी मराठी लिहिता येते. मी हेच करतो. बाकी आंग्ल भाषेची तंगडी तोडण्याची आपली महान परंपरा आहेच.
सांगली मध्ये गणपती मन्दिर, कृष्णेचा घाट, मारुती चौक, कॉंग्रेस भवन चा भाग, राममन्दिर, विश्रामबाग चौक, प्रतापसिंह का कुठलं उद्यान वगैरे बरंच काही आहे.
५०किमी च्या परिघात नरसोबा वाडी, हरिपुर, औदुंबर, तासगाव गणपती आणि अनेक रम्य ठिकानं आहेत.
खाद्य पदार्थांबाबत गवि आणि अन्य जाणकार सांगतील.
कुठल्याही हाटिलात घुसतो चा मागवतो आणि "गरम काय आहे" विचारतो.ते मागवून गिळतो॥हाटेलचे रेटिंग,किती मिशलिन स्टारस आहेत ,चेक्डइन वगैरे काही करत नाही.
चांगली मिसळ नेहमी बस डेपोसमोरच्या एखाद्या टपरीत मिळते.जुनाट बाकडी असतात."साउथ डिशेस" लिहिले असेल तर मेदुवडे ( उडीदवडे ) घेऊन कळते काय लायकीचे हाटिल आहे.
१. फर्मास मटणासाठी हॉटेल गिरीजा (खिलारे मंगल कार्यालयाजवळ). इथली मटण भाकरी मस्तच. पार्सल पण मिळते. सह कुटुंब जाण्यासारखे नाही. दुसरे म्हणजे बेलवलकरांचे ओरिजिनल अनुराधा, जे सरकारी दवाखान्याजवळ तळघरात आहे. हे पण सह कुटुंब जाण्यासारखे नाही. चिकन व बुर्जी साठी कॉलेज कॉर्नरवर शिंदेची गाडी असते. माशाविषयी फार माहिती नाही पण स्टॅण्डवर अपूर्वा आणि फिशलँड आहे.
स्वतःची गाडी असेल तर नंदनवन (कोल्हापूर रोडवर) छान आहे. मारुती रोडवर आपटे फुलवालेंच्या बोळात (गल्लीत) गुड इव्हनिंग नास्ता सेंटर आहे. फक्त संध्याकाळीच. ब्राह्मणी पदार्थ आणि मिसळ चांगली असते. पाव भाजी साठी इंदिरा भुवन जवळ न्यू नटराज आणि नवरत्न आहे. पुष्पराज (कर्मवीर भाऊराव पाटील) चौकात हॉटेल रोहिणी पण छान आहे. पुण्यातील दुर्वांकुर प्रमाणे वाट्याचं वाट्या असलेली शाकाहारी थाळी मारुती रोड वर अभिषेक, साई आणि गेस्ट हाऊस जवळ अँबॅसिडोर मध्ये पण छान आहे. बाकी नंतर सवडीने अजून माहिती देऊ शकेन
Please do visit st depot of Sangli jillha or any taluka or any village in this district.
Conductor driver or any st karmachari or passengers will help you to find good kind of eateries near.
नरसोबाच्या वाडीला गेलात तर जवळच कुरुंदवाड अाहे. तिथली साखर न घातलेली बासुंदी प्रसिध्द. घरी अाणून साखर घालून खायची. साखर ४० रू किलो, बासुंदी २००/२५० च्या अासपास. अजून ही ईमानदार पध्दत अाहे तिथे. खरं सांगायचं तर काही भाग सोडला तर सांगली अजून बकाल झाली नाही मोठ्या शहरांसारखी. त्यामुळे संध्याकाळी गावात फिरायला गेलात तर बरेच वाटेल. कधीतरी ताकारीजवळ सागरोबाच्या डोंगराला जा सहलीला. शुभेच्छा.
वालचंदच्या समोर आनंदरावची गाडी असेल तर तिथले 'फुल्ल-फ्राय' सँडविच नक्की खा. उस्मानकडे समोसा-पाव खा. विश्रामबागेत चौकात सकाळी गरम दूध आणि जाड साय ओरपा, संध्याकाळी 'दामोदर निवास' ('सुप्रसिद्ध' असलेले) च्या समोर रसाच्या टपर्यांवर निवांत बसून, समोर बर्फ आणि मीठ ठेऊन, जगातला ब्येष्ट ऊसाचा रस तांब्या-तांब्या प्या. ऐश करा..
मिरज पंढरपूर रस्त्यावर मिरजेपासुन २२ २५ किमि अंतरावर दंडोबाचा छान डोंगर आहे.
याच रस्त्यावर , अगदी लगेच मिरज कोलेज जवळ वहिनींचा वडा (बटाटे वडा) फार प्रसिध्ध आहे.
मी मिरजेचाच!
चला.. मी कांही नेहमी करत असलेली खादाडी सांगतो.
१) स्टॅंड समोर जेथून पुणे / कोल्हापूरच्या गाड्या बाहेर पडतात तेथे एक चहावाला आहे. अप्रतीम चहा..!!!
२) कॉलेज कॉर्नर रोड किंवा स्टँडमागे "स्वामी समर्थ इडलीवडा" येथे इडली वडा मिळतो, गरमागरम इडलीवडा आणि मालकही वसवस न करता आगत्याने आग्रह वगैरे करतो.
३) जेवणाचे बरेचसे ऑप्शन्स आले आहेतच.. तरीही श्रावण डायनींग हॉल वरच्या लिस्ट मध्ये वाचले नाही. अँबेसेडर हॉटेल, विश्रामबाग येथे वर कोणीतरी उल्लेख केला आहे ती थाळी श्रावणचीच.
बाकी सांगलीतल्या जेवणाबद्दल पास. पंजाबी जेवण वगैरे सांगलीत कोठेही चांगले मिळत असेल यावर विश्वास नाही*
४) कॉलेज कॉर्नर समोर एकच सँडवीचवाला आहे त्याच्याकडे कोणतेही सँडविच खा. भारीच असेल.
५) बापटबाल शाळेसमोर समोर एक मुलगा दाबेली आणि सँडवीचचा गाडा लावतो. (ओळखण्याच्या खूण = छोटा हत्ती / रिक्शा मध्ये हा स्टॉल असतो)
..आणखी एक झकास दाबेलीवाला म्हणजे टाटा पेट्रोल पंप विश्रामबाग येथे "सुनिल" चा गाडा. याच्या स्टॉलचे नांव माहिती नाही शोधाशोध करावी लागेल.
६) मथुबाई गरवारे समोर एक जादुगाराची पाटी असलेला रस्ता आहे. तरूण भारत - मथुबाई गरवारे अशा रस्त्याने आलात तर नो एंट्रीतून घुसावे लागेल. तेथे "स्टार टेक्सास" नामक गाडा आहे. त्याच्याकडे शेवपुरी, दहीपुरी आणि पाणीपुरी खा.
..त्याच्याकडे भेळही मिळते पण चांगली भेळ फक्त कोल्हापूरला राजाभाऊंकडे मिळते.
७) काळ्याखाणीकडून कॉलेज कॉर्नरला जात असताना उजवीकडे बघितले तर दूध कोल्ड्रींकचा एक स्टॉल दिसेल यांचे नांव बहुदा "लागू" असावे.. त्यांच्याकडे काहीही प्या.
८) गोटी सोडा कोर्टासमोरच्या चौकात मिळेल किंवा पोस्टाकडून महानगरपालिकेकडे जाताना डाव्या हाताला किल्ल्यासारखा बुरूजाचा दरवाजा दिसेल त्या रस्त्यावर मिळेल.
९) गांव भागात लागूंचे पेढे मिळण्याचे एक ठिकाण आहे. शोधाशोध करावे लागेल. प्रतापसिंह उद्यानासमोर भगवानलाल कंदी आहेतच.
१०) माळी थिएटर समोर एका ठिकाणी मख्खन पान मिळते. संपूर्ण गोठवलेले आणि फार जाड नसलेले एकदम पातळ असे मसाला पान मिळते. ते गालात ठेवून द्या आणि निवांत भटका. हळूहळू पान नॉर्मलला येते आणि एक एक फ्लेवर सुटा होत जातो. लै भारी पान आहे ते.
११) मिलेनीयम होंडा शेजारी आणि जिल्हा परिषद समोर जो रस्ता मोडक हॉस्पीटलकडे जातो तेथे तळघरात ऊसाचा रस मिळतो.
१२) कुल्फी आईसक्रीम खाण्याचा कधी प्रसंग आला नाही पण १० / १५ वर्षांपूर्वी एकदा हरभट रोडवर पाटील कोल्ड्रींक्समध्ये बरेच वेगवेगळे प्रकार ट्राय केले होते. ते दुकान अजून आहे का ते बघा..
१३) कुमठा फाट्याला नॉन व्हेज चांगले मिळते.
*सांगलीमधले बहुतांश पंजाबी हॉटेलवाले सांगली व्हर्जनची पंजाबी भाजी देतात आणि "पुण्यासारखी भाजी द्यायची आहे पण सांगलीच्या दरात" असा त्यांचा कायम गोंधळ उडालेला असतो.
पुण्यासारखे किंवा पुण्या पेक्षा अंमळ जास्त स्वादिष्ट पंजाबी जेवण मिळते
दार आता आठवत नाहीत
पण पुण्यापेक्षा तर नक्कीच कमी आहेत
शिवाय मिशन चौकाजवळ अन्नपूर्णा आहे
तिथे इडली वडा चांगला मिळतो
मला फक्त सांगलीची माहिती आहे मिरज इल्ला.
मिरजेला फक्त औषध घ्यायला जातात असा ठाम समज एके काळी होता. तसेच मिरजेला आवर्जुन काहीतरी खाण्यासाठी जाण्याचा प्रसंग आला नाही.
प्रतिक्रिया
How to write in marathi?
How to write in marathi?
हे वाचा.
In reply to How to write in marathi? by Vidyadhar1974
इथे टाईप करा
In reply to How to write in marathi? by Vidyadhar1974
late शब्द वाचून मला निर्वाण
Sorry spelling mistake. I am
In reply to late शब्द वाचून मला निर्वाण by सतिश गावडे
त्यासाठी 'स्टिल' रहाण्याची
In reply to Sorry spelling mistake. I am by Vidyadhar1974
अरेरे
In reply to Sorry spelling mistake. I am by Vidyadhar1974
Not only late, somebody late
वाचाळ तर वाचाळ
नाही जमत. Tried on keyboard
नाही जमत.
In reply to नाही जमत. Tried on keyboard by Vidyadhar1974
Due to marathi keyboard in
In reply to नाही जमत. by वाल्मिक
Android tablet असेल तर
In reply to Due to marathi keyboard in by Vidyadhar1974
गुगल मराठी आपल्या काम्पुटर वर
In reply to नाही जमत. Tried on keyboard by Vidyadhar1974
गुगल मराठी आपल्या काम्पुटर वर
In reply to नाही जमत. Tried on keyboard by Vidyadhar1974
गुगल मराठी आपल्या काम्पुटर वर
In reply to नाही जमत. Tried on keyboard by Vidyadhar1974
सांगली मध्ये गणपती मन्दिर,
धन्यवाद.
In reply to सांगली मध्ये गणपती मन्दिर, by धनंजय माने
जमतंय
In reply to धन्यवाद. by Vidyadhar1974
ध.मा.
In reply to सांगली मध्ये गणपती मन्दिर, by धनंजय माने
:)
In reply to ध.मा. by सुहास
मीपण
In reply to :) by धनंजय माने
कुठल्याही हाटिलात घुसतो चा
वा रे वा
In reply to कुठल्याही हाटिलात घुसतो चा by कंजूस
...
सांगली....खादाडी!!!
फर्मास मटणासाठी हॉटेल गिरीजा
नंदनवन (कोल्हापूर रोडवर) छान आहे
विद्याधर १९७४, नमस्कार. आपण
भावा, मला पण तेच म्हणायचं हाय
In reply to विद्याधर १९७४, नमस्कार. आपण by दा विन्ची
3 वर्षे तरी असेन.
In reply to विद्याधर १९७४, नमस्कार. आपण by दा विन्ची
Oh my god.
भडंग
शिवाप्पा की बसप्पा?
In reply to भडंग by सिरुसेरि
शिवाप्पाची लस्सी आणि
In reply to शिवाप्पा की बसप्पा? by मोदक
मुंबईहून अक्लूज ला जायला
मुंबईहून अक्लूज ला जायला सर्वात जलद रस्ता
शाळामुंबईहून अक्लूज ला जायला सर्वात जलद रस्ता
थ्यांक्स सर
In reply to मुंबईहून अक्लूज ला जायला सर्वात जलद रस्ता by सिरुसेरि
फलटण मार्गे वेळ लागेल काय?
In reply to मुंबईहून अक्लूज ला जायला सर्वात जलद रस्ता by सिरुसेरि
फलटण मार्ग खराब असणेही शक्य
फलटण मार्ग खराब असणेही शक्य
फलटण मार्ग खराब असणेही शक्य
फलटण मार्ग खराब असणेही शक्य
ओके सर
In reply to फलटण मार्ग खराब असणेही शक्य by Vidyadhar1974
बासुंदी
वालचंदचे दिवस...
सांगलीचा असल्याने कॉलेजचे
In reply to वालचंदचे दिवस... by शिवोऽहम्
सांगलकरांसाठी (ते ली पूर्ण
In reply to वालचंदचे दिवस... by शिवोऽहम्
शोध
मिरज पंढरपूर रस्त्यावर
वहिनेचा वडा
In reply to मिरज पंढरपूर रस्त्यावर by शान्तिप्रिय
तिथंच मेन्टल हॉस्पिटल सुद्धा
In reply to वहिनेचा वडा by चंपाबाई
..
In reply to तिथंच मेन्टल हॉस्पिटल सुद्धा by धनंजय माने
चला.. मी कांही नेहमी करत
मिरजेला अक्षय हाटीलात
In reply to चला.. मी कांही नेहमी करत by मोदक
मला फक्त सांगलीची माहिती आहे
In reply to मिरजेला अक्षय हाटीलात by सामान्य वाचक
Rahamattulla, Bhauji cha wada
In reply to मला फक्त सांगलीची माहिती आहे by मोदक
बल्ले बल्ले
In reply to Rahamattulla, Bhauji cha wada by सुखी
अक्षयची टेस्ट भारीच, व्हरायटी
In reply to मिरजेला अक्षय हाटीलात by सामान्य वाचक
सांगली
त्यानिमित्याने कळले