✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

फार्म हाऊस की नुसतीच हौस???????

म
मुक्त विहारि यांनी
Mon, 07/04/2016 - 20:40  ·  लेख
लेख
डिस्क्लेमर : खालील लेख हा संपूर्ण काल्पनिक आहे.केवळ माझा वेळ जात नाही म्हणून लिहिला आहे.तुमचा वेळ जर अमुल्य असेल तर, खालील लेख नाही वाचलात तर फार उत्तम. ============================================ शेती करण्यापुर्वी बर्‍याच जणांचा सल्ला घेतला.त्यापैकी ज्यांनी खूप विरोध व्यक्त केला, ते सगळेच शहरातील.त्यातही बर्‍याच जणांचे मत असे पडले की, शेतीत पैसे घालवण्यापेक्षा , एखादे टूमदार फार्म हाऊस विकत घेतलेले परवडते.पुढे मग "फार्म हाऊस." ह्या संकल्पनेतील धोका लक्षांत यायला लागला आणि मी फार्म-हाऊस ही माझी नुसतीच हौस ह्या सदरांत मोडेल म्हणून तो विचार बाजूला सारला. पण गेल्याच आठ्वड्यांत आमच्या एका हितचिंतकाने, हा विचार परत मला ऐकवला म्हणून हा धागा प्रपंच. आमचा थोडक्यात संवाद असा. तो : तुम्ही शेत विकत घेताय म्हणे? मी : हो. तो : काय भावात पडले? मी : साधारणे सर्व खर्च वजा जाता एकरी २,५०,०००/- ला पडेल. तो : अरे.मग शेत घेण्यापेक्षा फार्म हाऊस विकत घ्यायचे.मी मागच्याच वर्षी एक विकत घेतले. मी : कितीला? तो : साधारण पणे ३०,००,०००/- खर्च झाले.जवळपास अर्धा एकर जागा आहे.शिवाय त्यात आंबा,नारळ इत्यादी झाडे पण आहेत. मी : अरे व्वा!!! मस्तच. तो : आता ६-७ वर्षांनी आम्ही तिथेच रहायला जावू. मी : मस्त. तो : सध्या आम्ही तिथेच एक कुटुंब ठेवले आहे.ते सध्या देखभाल करत आहेतच. मी : छान. तो : आता अजिबात शक्यच नाही झाले तर, ज्याने विकले आहे तो परत विकत घ्यायला किंवा विकायला मदत पण करणार आहे. मी : ओके. हे तर फारच उत्तम. तो : तुमच्या शेती पेक्षा, आमचे फार्म हाऊस फायदेशीर ठरणार बघ. मी : असे झाले तर फार उत्तम. तो : तू पण फार्म-हाऊसच विकत घ्यायला हवे होतेस. मी : हो ना.पण काय आहे, माझी जागे बाबतची संकल्पना फार वेगळी आहे.मी सामान्य माणूस असल्याने, अन्न-वस्त्र-निवारा, अशीच माझी चढती भाजणी आहे.शेतात जर अन्नच पिकत नसेल तर शेताचा उपयोग काय? तो : अरे, तू एकदा माझे फार्म हाऊस बघायला हवेस. मी : अरे हो.नक्कीच येईन.पण हे आहे कुठेशी? तो : अरे ते ढिकणेवाडीला आहे.म्हणजे फलाणेवाडी पासून साधारण १०-१२ किमी अंतरावर. मी : अरे व्वा!!!! मग कधी जावू या. तो : आता इतक्यात तरी काही शक्य नाही.ह्या डिसेंबरला त्या टलाण्या हॉटेल स्कीम मध्ये पैसे गुंतवले आहेत ना.ते थोडे वसूल करायला गोव्याला जाणार आहे.त्यामुळे उन्हाळ्यात नक्की जावू. मी : उन्हाळ्यात मला जमेल असे वाटत नाही.कारण ह्या उन्हाळ्यात शेतात बरेच खड्डे खणायचे आहेत. तो : बघ. ही शेती म्हटली की असे अडकायला होते.म्हणूनच फार्म हाऊस घ्यायचे.आपण मनांत आले की, लगेच निघू शकतो. मी : हो ना.पण ते जावू दे.मग उन्हाळ्यात तू नक्की जाणार ना? कारण वहिनी म्हणत होत्या की, इथला उन्हळा त्यांना झेपत नसल्याने तुम्ही ह्यावर्षी युरोपला किंवा कूलु-मनालीला जाणर म्हणुन. तो : हं.ते पण आहेच म्हणा.सध्या उकाडा इतका वाढला आहे की, एक स्वयंपाकघर सोडले तर प्रत्येक खोलीत ए.सी. मी : (मनांत.आता बाथरूम आणि संडासात पण ए.सी. लावतो की काय? असेल ही.) आता आजकाल उन्हाळा जरा जास्त्च वाढला आहे. तो : अरे ह्यावर्षी आम्ही नेमके उन्हाळ्यातच फार्म-हाऊस वर गेलो होतो.आमच्या फार्म हाऊसच्या इथे रेंज मिळत नाही.खूप प्रयत्न केला पण त्या आमच्या घरगड्याशी काही संपर्क होइना.घरी पोहोचलो तर घरी कुणीच नाही.आणि शेजारचे सगळेच बंगले रिकामे.मग काय? परत फलाणेवाडीला आलो आणि तिथल्याच एका हॉटेलमध्ये जेवलो आणि तिथेच राहिलो. मी : गूड.हे मस्त.शहर जवळ असल्याचा हा एक फायदाच की. तो : हो ना.मग दुसर्‍या दिवशी आम्ही तिथे गेलो तर काय.घरात बरीच घाण.दारे आणि खिडक्या बंद असल्याने घरात कोंदट हवा.शिवाय सध्या तिथे आसपास कुणीच नसल्याने, मुख्य टाकीत पाणीच न्हवते.रखवालदार पण नेमका उशीरा आला.तेंव्हा समजले की पंप जळालेला आहे आणि सोसायटीला अद्याप सेक्रेटरी नसल्याने, तो पंप काही दुरुस्त झालेला नाही.मग त्याच्या मदतीने कसे तरी संध्याकाळी वायरमनला गाठले.वायरमन म्हणाला आधी मागच्या कामाचे पैसे द्या.मगच हात लावतो.मग काय? वायरमनला पटवून त्या दिवसापुरता पंप चालू करून घेतला.चांगले ५००/-रु दिले. अर्थात सुरुवातीला ह्या अडचणी येणारच. पाणी सुरु होता-होता रात्र उजाडली तेंव्हा समजले की, घरातील काही ट्युब लाईट चालत नाही आहेत.खरे तर मागच्या वेळीच त्या बदलल्या होत्या पण आता परत बिघडल्या.रखवालदार म्हणाला की, तिथे लाईटचे फ्लक्च्युएशन जास्त असल्याने सगळ्याच घरातील ट्यूब लाईट जातात. कसे-बसे जेवण घेतले आणि झोपायची तयारी केली...तर काय? सगळ्या चादरींना कुबट वास आणि उंदरांनी पाडलेली भोके. आता घरी झोपायचा नाद सोडला आणि परत मुक्काम पोस्ट फलाणेवाडी. आता तिसर्‍या दिवशी माझी परत एक चक्कर फार्म हाऊसवर करायचा विचार होता.पण तो दिवस समुद्र किनार्‍यासाठी राखीव असल्याने मग सरळ समूद्र किनार्‍यावर गेलो.मुले तिथेच जास्त रमल्याने मग तिथेच २ दिवस राहिलो आणि मग परत मुंबईला आलो. आता परत एकदा फार्महाऊसवर जावे म्हणतो. मी : का रे? तो : अरे मागच्या वेळी, तो पंप दुरुस्त करण्याच्या वेळी, तो रखवालदार बोलता बोलता म्हणाला की, इथल्या एका सभासदाला त्याचे फार्म हाऊस विकायचे आहे.साधारण २-३ वर्षांपुर्वी त्याने २५ लाखाला विकत घेतले पण सध्या त्याला फारच आर्थिक अडचण असल्याने, तो २२ लाखाला पण द्यायला तयार आहे.बघ तुझी इच्छा असेल तर, आपण लगेच बोलणी करू. मी : बरे मला एक सांग.हे जर ३०,००,०००/- तू बँकेत ठेवले असतेस तर तुला ह्या वर्षी किती मिळाले असते. तो : आता फिक्स मध्ये ठेवले असते तर ह्या वर्षी २,५०,०००/- नक्की.पण का रे? मी : काही नाही.इतक्या व्याजाच्या पैशांत माझी आणि माझ्या बायकोची, एक १५-२० दिवसांची कंबोडिया ट्रिप नक्कीच झाली असती. तो : अरे कंबोडिया काय बघतोस? त्यापेक्षा आमचे फार्म हाऊस बघ. आता पुढे मला काही बोलवेना.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
63178 वाचन

💬 प्रतिसाद (135)

प्रतिक्रिया

दिवसाला २ धागे? कट्टा मानवला

टवाळ कार्टा
Mon, 07/04/2016 - 20:43 नवीन
दिवसाला २ धागे? कट्टा मानवला =)) आणि हो...मी पयला :)
  • Log in or register to post comments

दिवसाला २ धागे?

मुक्त विहारि
Mon, 07/04/2016 - 20:48 नवीन
टका, लेका नीट मोज. चार धागे झाले की. "कट्टा मानवला." नाही रे बाबा, आज खूप दिवसांनी शेतीच्या भानगडी तून सुटका झाली. अजून थोडा वेळ थांबलास तर, एका धाग्याला उत्तर पण द्यायचे होते, तेच लिहीत आहे. ते पण वाचता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अरे हो...४ धागे =))

टवाळ कार्टा
Mon, 07/04/2016 - 20:49 नवीन
अरे हो...४ धागे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

फार्म हाउससारखेच "वीकेंड होम"

टवाळ कार्टा
Mon, 07/04/2016 - 20:47 नवीन
फार्म हाउससारखेच "वीकेंड होम" यावर पण लिहा...माझ्या घरच्यांच्या डोक्यात खूळ शिरले आहे...आयुष्यात पहिल्यांदाच ढीगभर पैसे नसल्याचा आनंद झाला
  • Log in or register to post comments

"वीकेंड होम"ची किंमत आणि ठिकाण

मुक्त विहारि
Mon, 07/04/2016 - 21:00 नवीन
सांगीतलीस तर उपाय पण सांगतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

लोणावळा/नेरळ्/कर्जत...काय हवे

टवाळ कार्टा
Mon, 07/04/2016 - 21:04 नवीन
लोणावळा/नेरळ्/कर्जत...काय हवे ते नाव टाका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

ओके....

मुक्त विहारि
Mon, 07/04/2016 - 21:46 नवीन
म्हणजे साधारण ४५ लाखाच्या आसपास. तितकेच पैसे बँकेत टाका आणि त्या व्याजावर दरवर्षी एक महिना सहकुटुंब परदेशी सहल काढा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

बँकेत टाकायला तितके पैसे असले

टवाळ कार्टा
Mon, 07/04/2016 - 22:52 नवीन
बँकेत टाकायला तितके पैसे असले पाहीजे ना? हे प्लान्स पीएफचे पैसे + लोन काढून...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

कॄपा करुन असं नका करू हे सांग

संदीप डांगे
Mon, 07/04/2016 - 23:39 नवीन
कॄपा करुन असं नका करू हे सांग घरच्यांना... त्यापेक्षा आसनगाव वैगरेंकडे एखादं घर घ्या. इन्वेस्टमेंट उत्तम होईल. सेकंड होम हे लोन काढून घ्यायची गोष्ट नव्हे. तो ब्लॅकमनी लपवण्याची व्हाईट कॉलर मखलाशी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

+१

टवाळ कार्टा
Mon, 07/04/2016 - 23:42 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

+१

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 07/05/2016 - 06:50 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

पुरेश्या वेळे अभावी लेख वाचला

जेपी
Mon, 07/04/2016 - 21:21 नवीन
पुरेश्या वेळे अभावी लेख वाचला नाही. पण एका दिवसात चार पाच लेख .!? शेतकरी लोकांना शोभत नै.. (ह घ्याल अशी अपेक्शा)
  • Log in or register to post comments

दिवा विझण्यापुर्वी मोठा होतो....

मुक्त विहारि
Mon, 07/04/2016 - 21:47 नवीन
तसेच एका व्यवसायातून दुसर्‍या व्यवसायात शिरतांना मिळालेला फावला वेळ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

थोड्या दिवसांनी मुविकाकांच्या

अभ्या..
Tue, 07/05/2016 - 12:02 नवीन
थोड्या दिवसांनी मुविकाकांच्या लेखनाला अशा टिपा असतील. . बाया खुरपायल्यात, तवर टाकला एक लेख. पावसानं काय ओढ दिली नाही, तवर टाकला एक काकू. ट्रॅक्टर काय आला नाय अजून, टाकतो एक भटकंती. बागवान येतो म्हणाला बघायला, टाकतो एक कथामाला. डीसीसी ला आलेलो पीक विमा न्यायला, टाकतो एक क्रमश:. . मुविकाका शेती सिरियसली करा पण माझा प्रतिसाद हलका घ्या बरका. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

ठ्ठो....

मुक्त विहारि
Tue, 07/05/2016 - 12:05 नवीन
ह्या प्रतिसादा बद्दल एकदा जुन्या मठादिपती समवेत चर्चा करू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मठाधिपती सध्या गादीवाफ्यावर

अभ्या..
Tue, 07/05/2016 - 12:09 नवीन
मठाधिपती सध्या गादीवाफ्यावर वांगी लागवड करताहेत. . . पळा पळा, बुवा आले झाऱ्या घेऊन ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

...

चंपाबाई
Mon, 07/04/2016 - 23:05 नवीन
Farm / farm house and second home are 3 distinct catagories
  • Log in or register to post comments

खूप चांगला लेख.

खटपट्या
Tue, 07/05/2016 - 06:09 नवीन
खूप चांगला लेख.
  • Log in or register to post comments

फार्म हाऊस घेणाऱ्या लोकांना

सुबोध खरे
Tue, 07/05/2016 - 10:34 नवीन
फार्म हाऊस घेणाऱ्या लोकांना एकरी २-३ लाख रुपये महिना "करमुक्त" उत्पन्न येते. म्हणून लोक ते घेतात. मग त्या जागेत गवत किंवा तण माजलेले असेना का? सगळ्या सिने नटांची पनवेल कर्जत जवळ फार्म हाऊसेस आहेत. आणि तेथे उत्तम शेती होत असते आणि भरघोस उत्पन्न निघते असे आयकर विभागाच्या कागदपत्रांवरून समजते.
  • Log in or register to post comments

ज्यांच्या कडे आवश्यकते पेक्षा जास्त पैसा आहे....

मुक्त विहारि
Tue, 07/05/2016 - 11:17 नवीन
असेच लोक सर्वसामान्यपणे फार्म हाऊस वर पैसे खर्च करतांना मला दिसले. किंबहूना, कोकणातील जमिनींचे भाव वाढवायला आणि ज्याला मनापासून शेती करायची इच्छा आहे, त्याला अनावश्यक भांडवली खर्च करायला हे फार्म हाऊस वाले भाग पाडतात. मध्यंतरी एका जागेची टेलीफोन वरून चौकशी केली. त्याने पहिल्याच फटक्यात सांगीतले, की, ते फक्त डॉक्टर, सी.ए., किंवा बिझनेसमन ह्यांनाच जमिन देतात. कारण एकरी भावच ८० लाख (होय गुंठ्याला २ लाख) रुपये आहे.कारण जागेत भरपूर झाडे आहेत आणि तुम्ही हवे तितके उत्पन्न दाखवू शकता. असो, मी आपला ८० लाख कधी मिळालेच तर सरळ बँकेत ठेवीन आणि त्या व्याजावर जगीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मी आपला ८० लाख कधी मिळालेच तर

कानडाऊ योगेशु
Sun, 03/07/2021 - 11:32 नवीन
मी आपला ८० लाख कधी मिळालेच तर सरळ बँकेत ठेवीन आणि त्या व्याजावर जगीन.
आता बँकांचीही शाश्वती नाही राहीली हो काका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

विखरून ठेवायचे

मुक्त विहारि
Sun, 03/07/2021 - 11:36 नवीन
एकाच टोपलीत सगळी अंडी ठेऊ नयेत ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

हे तर गुंतवणूकीचे तत्वच आहे.

प्रकाश घाटपांडे
Sun, 03/07/2021 - 13:08 नवीन
हे तर गुंतवणूकीचे तत्वच आहे. वय, पिंड, कौटुंबिक जबाबदार्‍या यानुसार परत बदल होतात. वय वाढत गेल की रिस्की गुंतवणुक नको वाटते. सुरक्षित गुंतवणूकीकडे कल असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

वय वाढत गेल की रिस्की गुंतवणुक नको वाटते.....

मुक्त विहारि
Sun, 03/07/2021 - 13:54 नवीन
हे साहजिक आहे .... त्यात चुकीचे काहीही नाही.... मुली असतील तर, अजिबात रिस्क घेऊ नये... मुले असतील तर, शेती तील गुंतवणूक उत्तम...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

शेतजमिनीचा भाव दोनलाख गुंठा

Rajesh188
Sun, 03/07/2021 - 13:25 नवीन
कोकणात कोणत्या गावात आहे ह्यांची जरा माहिती देता का. हायवे किंवा शहराजवळ ची ठिकाण सोडून. जिथे फक्त शेती होवू शकते अशी जमीन दोन लाख गुंठा आहे हे काही पटत नाही. तुमच्या कडे सर्व ऐकीव माहिती असते.असे मला वाटत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मी दिलेला प्रतिसाद नीट वाचलात का?

मुक्त विहारि
Sun, 03/07/2021 - 13:55 नवीन
तो वाचा आणि मग ठरवा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

उत्तम आणि सत्यदर्शक लेखाजोखा.

गवि
Tue, 07/05/2016 - 11:00 नवीन
उत्तम आणि सत्यदर्शक लेखाजोखा. जियो मुवि.. !!! पुरत्या तयारीनिशी शेतीत उतरणारे तुम्ही पहिलेच दिसलात. उत्तम...!!!
  • Log in or register to post comments

पुरत्या तयारीनिशी

मुक्त विहारि
Tue, 07/05/2016 - 11:55 नवीन
अद्याप तरी तयारी परिपुर्ण नाही. पण निदान फार तोटा होणार नाही, इतपतच (कागदोपत्री) तयारी झाली आहे. किंबहूना शेती ही फार विविध प्रकारे केली जात असल्याने, प्रत्येक वर्ष हे प्रयोगाचे आणि देवाचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हाहाहा!

पैसा
Tue, 07/05/2016 - 11:21 नवीन
तीस लाखाला घर आणि अर्धा एकर जागा? फारच आतबट्ट्याचा व्यवहार आहे. मात्र वर चंपाबाई लिहितात त्याप्रमाणे शेती, फार्महाऊस आणि गुंतवणूक म्हणून दुसरे घर घेणे हे तीन वेगवेगळे प्रकार आहेत नक्कीच.
  • Log in or register to post comments

पैसा ताई

सुबोध खरे
Tue, 07/05/2016 - 11:29 नवीन
पैसा ताई सरकारी वरकड उत्पन्न असते त्यात अशी फार्म हाऊस विकत घेतली जातात सुरुवातीचा व्यवहार आतबट्टयाचा वाटतो( मध्यम वर्गीयाला) पण हेच फार्म हाऊस नंतरचे वरकड उत्पन्न पांढरे करायला उपयोगी पडते. आमच्या शेजारील इमारतीतील फ्लॅट २.५ कोटी रुपयाला आहेत तेथे राहणारे "महापालिके"तील सर्व लोक पगार ६०-७०,०००/- वाले आहेत. आयुष्यभराचा पगार टाकला तरी ते घर त्यांना विकत घेणे परवडणार नाही. पण घर जाऊन पाहिले तर इटालियन मार्बलची फरशी दिसते. तुम्ही आपले ग्राहक पेठेतून स्वस्त धान्य कुठे मिळेल याची चिंता करता. असेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

तो : साधारण पणे ३०,००,०००/-

मार्मिक गोडसे
Tue, 07/05/2016 - 11:31 नवीन
तो : साधारण पणे ३०,००,०००/- खर्च झाले.जवळपास अर्धा एकर जागा आहे.शिवाय त्यात आंबा,नारळ इत्यादी झाडे पण आहेत.
लेख जरी काल्पनिक असाला तरी, निदान महाराष्ट्रात कायदेशीरपणे अर्धा एकर जागेत फार्महाऊस बांधता येत नाही. कमीतकमी १ एकर शेतजमिनीची अट आहे व त्यावर जास्तीतजास्त १००० स्क्वे.फू. बांधकाम करता येते, शेतकरी असण्याची अट आहेच. शेतकरी नसलेंल्यांसाठी गुंठेवारी प्लॉट पाडून तेथे बंगले बांधून 'फार्महाऊस' म्हणून विकणारे व घेणारे भरपूर आहे. अशा जमिनीतून घेतलेले कोणतेही उत्पन्न हे करमुक्त नसते.
  • Log in or register to post comments

या तथ्याशी सहमत

damn
Fri, 07/08/2016 - 08:37 नवीन
परंतु, फुकटच्या पैशांनी सूज चढलेल्यांना या तथ्याशी काही घेणेदेणे नसते. सिस्टिम कुठे कशी किती वाकवता येते, याच्या स्वानुभवाने अशी मंडळी तरबेज झालेली असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

मुविंच्या शेतीची जाहिरात

स्पा
Tue, 07/05/2016 - 12:22 नवीन
मुविंच्या शेतीची जाहिरात जोरदार झालीये ४ धाग्यांनी
  • Log in or register to post comments

नुकतच पुंजी पणाला लावून फार्म

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 07/07/2016 - 10:52 नवीन
नुकतच पुंजी पणाला लावून फार्म हाउस घेण्याच्या बायकोच्या प्रयत्नाला अपयश आणण्यात यशस्वी झालो. तिला लेख वाचायला दिला. आम्ही आमच्या वडिलोपार्जित शेत्या विकल्या व गावकी आणि भावकी पासून दूर झालो. पुनर्वसनाच्या बोजा मुळे अजून ही नाव माझेच आहे शेतीवर. म्हणजे मी अजूनही शेतकरीच आहे.
  • Log in or register to post comments

या लेखाची लिंक मी अनेकांना

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 02/25/2021 - 11:48 नवीन
या लेखाची लिंक मी अनेकांना फॉर्वर्ड केली. एकदा का हौसेला मोल नसते हे मान्य केले की उत्साहापोटी त्यात किती पैसे घालावे याचे तारतम्य रहात नाही. इतरांनी फॉर्म हाउस बांधावीत व आपण त्यात चार दिवस जाउन एंजॉय करावे. ज्यांच्याकडे अतिरिक्त पैसा आहे त्यांनी जरुर ती घ्यावीत. म्हणजे इतरांचाही फायदा. एकदम विन विन सिच्युएशन. मग कधी घेताय फॉर्महाउस? :)
  • Log in or register to post comments

छान विषय निवडलात मुविकाका

राजेंद्र मेहेंदळे
गुरुवार, 02/25/2021 - 12:40 नवीन
फार्म हाउसच नव्हे तर सगळ्या मालमत्तांबाबत हीच तर्‍हा आहे. पहीले कर्ज काढुन मालमत्ता घ्यायची, मग अजुन पैसे घालत राहुन कधी विहिर, कधी कुंपण, कधी वीज्,रखवालदाराचा पगार, वावर नसल्याने अधेमधे होणार्‍या चोर्‍या किवा अतिक्रमणे,झाडे तोडणे हे नुकसान सहन करायचे आणि परतावा काय? तर वर्षात कधीतरी ४ दिवस तेथे जाउन राहायचे.फ्लॅट जरी घेतला तरी सोसायटीच्या कटकटी, मेन्टेनन्स, भाडेकरुच्या कटकटी, एजंट्चे ताप हे आहेच. थोडक्यात तुन्ही स्वतः रहाणार असाल तर कुठलीही मालमत्ता खरेदी करावी नपेक्षा मुविकाकांनी वर म्हटल्याप्रमाणे एफडीत नाहीतर म्युचुअल फंडात पैसे टाकुन सुखी असावे आणि वर्षाला एक परदेश दौरा करुन हौस भागवावी.
  • Log in or register to post comments

तो किडा असतो. उत्साहाच्या

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 02/25/2021 - 13:43 नवीन
तो किडा असतो. उत्साहाच्या भरात सर्वसामान्य लोक तिथे आकर्षित होतात. नंतर तोटा लक्षात आला तरी कॉग्निटिव्ह डिझोनन्स असतोच स्वतःची समजूत घालायला. शिवाय हौसेला मोल नसते याचा अर्थ हौस ही अमूल्य गोष्ट आहे तिची किंमत फायदा तोटा मधे करता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

हौसेला मोल नसते

मुक्त विहारि
Fri, 02/26/2021 - 12:05 नवीन
अर्थात, कुणी किती मोल त्यासाठी खर्च करावेत, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्र्न आहे, माझ्या ओळखीतील एकाने, 60-70 लाख, एके ठिकाणी गुंतवले आहेत. बंगला आणि 2-4 गुंठे जागा आहे ... गेल्या 7-8 वर्षांत, तो जेमतेम 15-20 वेळाच तिथे जाऊ शकला ... बंगला अशा ठिकाणी आहे की, तो भाडेकरू पण ठेऊ शकत नाही आणि देखभालीचा खर्च, दरमहा करावा लागतो, तो वेगळाच... मोठ्या लोकांच्या मोठया गोष्टी. सर्व सामान्य माणसाने, हे पांढरे हत्ती पोसू नयेत.... हे माझे वैयक्तिक मत आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

हौसेला मोल नसते याची आता मला भीती वाटू लागली आहे

प्रकाश घाटपांडे
Sat, 03/06/2021 - 13:11 नवीन
वेल्हे तालुक्यात कमलिनी कुटीर च्या जवळ एक शेतजमीन आपण दोन तीन जणात घ्यायची अस म्हणतीये. २० लाख तरी घालावे लागतील त्यासाठी पीपीएफ काढू, सोन काढू, एफडी मोडू, नातेवाईकांकडून व्याजाने/उसने घेउ असे बायको म्हणू लागली आहे. एकच मुलगी आहे व जावई आर्मीत आहे. ते त्यांच्या त्यांच्या कामात व्यस्त असतात. एक रो हाउस आहे . त्याचे भाडे येते. माझी पेन्शन आहे.माझे मते आता आयुष्याच्या उत्तरार्थात कोणती रिस्क न घेता. आवरते घ्यावे. पुंजी वा संचिताचा लाभ घ्यावा. स्थैर्य महत्वाचे आहे. माझे अल्पसंतुष्टत्व हे तिला आता डिप्रेशन वाटू लागले आहे. मरायची वाट बघत जगायचे याला काय अर्थ आहे ? असे ती म्हणू लागली आहे. मी हे गांभीर्याने लिहितो आहे. मला खरच चिंता वाटू लागली आहे. कृपया उपाय सुचवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

सध्या माझ्यावर कुठलेही कर्ज

प्रकाश घाटपांडे
Sat, 03/06/2021 - 13:19 नवीन
सध्या माझ्यावर कुठलेही कर्ज नाही.देणे नाही, सरकार वेळेवर पेन्शन देत आहे. वाचन, लिखाण, व्याखान , करमणूकीचे कार्यक्रम, वादसंवाद, संगीत, पुस्तके,नेट मुशाफिरी यात मला आनंद वाटतो. ते मी करतोच आहे. विनाश काले विपरित बुद्धी या सुभाषिताचे मला भय वाटते. या टप्प्यात कमी ताण घेउन आयुष्य आनंदात जगावे या मताचा मी आहे. ये जीना भी कोई जीना है लल्लू असे कुणीतरी अतिउत्साही मला म्हणतोय अस वाटतोय. असो विस्कळीत वाटल तसच मिपा आपल वाटल म्हणून लिहिल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

माझ्या जालीय प्रवासाचे इथे

प्रकाश घाटपांडे
Sat, 03/06/2021 - 13:53 नवीन
माझ्या जालीय प्रवासाचे इथे अनेक साक्षीदार आहेत. काही ठिकाणी मतभिन्नता असली तरी मिपाकर माझे हितचिंतक आहेत यावर माझा ठाम विश्वास आहे. म्हणून मी इथे हे लिहितो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

एक मध्यम पर्याय आहे ...

मुक्त विहारि
Sat, 03/06/2021 - 14:18 नवीन
भाड्याने शेती करायची.... पण, इथेही फसवणूक खूप होते... शिवाय, भाड्याने शेती करायची असेल तर, 5 महत्वाच्या गोष्टी आहेत. 1. किमान 30 ते 40 वर्षांसाठी हवी 2. एकरी 1-2 लाख रूपये खर्च करायची तयारी हवी 3. एकलकोंडे पणाची सवय हवी, गावकरी जवळ करत नाहीत 4. मजूर वर्ग लुबाडतोच 5. स्वतःकडे चारचाकी हवी, मेडिकल, शेतीचे सामान आणि इतर गोष्टींसाठी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

१. निवृत्तीनंतर शेतजमीन घेऊन

गवि
Sat, 03/06/2021 - 14:20 नवीन
१. निवृत्तीनंतर शेतजमीन घेऊन त्यातून उत्पन्न कसे मिळवणार हे नक्की केले आहे का? जमीन कसण्याबाबत कोणा इतरावर पूर्ण अवलंबून रहण्यात अर्थ नसतो. २. केवळ गुंतवणूक म्हणून जमीन घेऊन ठेवायची असेल तर दोघातिघांत मिळून घेण्याने पुढे अनेक पातळ्यांवर अडचणी येऊ शकतात. विक्री करुन आपला वाटा घेऊन एक्झिट करणे गुंतागुन्तीचे ठरू शकते. न होवोत, पण वाद होऊ शकतात (मी प्रत्यक्ष कष्ट केले, तुम्ही फक्त वाटा घेतला इ इ ). तुमचे मतभेद जरी झाले नाहीत तरी पुढच्या पिढ्यांचे काय? पुढे पिढ्या वाढल्या की वाटेकरी वाढतात. ते जगभर विखुरले जाऊ शकतात. विक्रीसाठी पुढाकार घेणारा मिळणे अवघड़ होते. असंख्य वाटे निर्माण झाल्याने प्रत्येकाला येणारा वाटा लहान होत होत कुणालाच पुरेसा इंटरेस्टिंग न वाटल्याने देश विदेशातून सर्वांना एकत्र आणणे दुरापास्त होऊ शकते. जमीन भिजत घोंगडे प्रकरण होऊ शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

दोन्ही मुद्दे बरोबर आहेत

मुक्त विहारि
Sat, 03/06/2021 - 14:23 नवीन
मुळांत, प्रत्येक जमिनीची प्रतवारी वेगळी असते, हवामान वेगळे असते, एकच गोष्ट काॅमन असते आणि ती म्हणजे फसवणूक....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

गवि

प्रकाश घाटपांडे
Sat, 03/06/2021 - 16:19 नवीन
१) उत्पन्न हा हेतुच नाही. केवळ हौस म्हणून घ्यायची असे बायकोचे म्हणणे आहे. मला त्यात काहीही रस नाही हे वर लिहिले आहेच २) हौसे परी हौस हाच मुद्दा. जमीनेचे भाव वाढतच असतात. त्यामुळे गुंतवणूक म्हणूनही त्याचा उपयोग होईल हा बायकोचा मुद्दा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

फोन वर बोलू

मुक्त विहारि
Sat, 03/06/2021 - 14:25 नवीन
फोन नंबर पाठवला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

माझा अनुभव

सन्जोप राव
Sun, 03/14/2021 - 18:56 नवीन
माझे फार्म हाऊस नाही, पण माझी शेती आहे. त्यातील माझा अनुभव असा: पश्चिम महाराष्ट्रात चांगल्या जमिनीला उत्तम किंमत येते. कितीही उत्तम उत्पन्न आले तरी (ऊसासारख्या पिकाची शेती करणार्‍या आमच्यासारख्या आळशी शेतकर्‍यांसाठी) वर्षाकाठी पाच टक्के देखील परतावा येत नाही. हे सगळे वंशपरंपरागत चालत आलेली शेती असताना. नवीन शेती विकत घेतली तर हे सगळेच हिशेब बदलतील. लहानपणापासून शेतीची माहिती असूनही माझी शेती अजिबात फायद्यात नाही. त्यावर माझे पोट अवलंबून नाही म्हणून ती मी आजवर विकली नाही, इतकेच. आनि शेवटी, पन्नाशीनंतर, साठी जवळ येऊ लागलेली असताना, मानसिक शांततेइतके दुसरे काहीच महत्त्वाचे नाही असे मला वाटते. फार्म हाऊसची उदाहरणे वर दिलेली आहेतच. शेवटी हे सगळे ज्याच्या त्याच्या 'कंफर्ट झोन' वर अवलंबून आहे. आपल्याला ज्यात आनंद वाटतो ते आपण करावे. या वयात सगळी पुंजी मोडून असे काही करावे असे मला अजिबात वाटत नाही, मग भले त्याला कुणी डिप्रेशन का म्हणो. पण हे माझे मत आणि प्रकाशराव, मीही तुमच्याच गोत्राचा माणूस. आपले विचार कुणाला अजिबात पटले नाहीत, तर मला नवल वाटणार नाही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

सहमत आहे ....

मुक्त विहारि
Sun, 03/14/2021 - 19:03 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव

आश्चर्य?

कपिलमुनी
Mon, 03/15/2021 - 02:17 नवीन
मग पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी सधन कसे काय गणले जातात मला शेतीचा वैयक्तिक 6 वर्षे अनुभव आहे. ( लहानपणीपासून मोजला नाही कारण तेव्हा निर्णय मी घेत नव्हतो , फक्त काम करत होतो) आजवर माझी ऊस शेती कधीही तोट्यात नाही. पावसाने एक लागण गेली पण नंतर खोडव्यात लेव्हल झालीच. सांगलीत आमच्या पंचक्रोशीत कोणीही शेती विकत नाही. योग्य पद्धतीने केली तर शेतीत फायदा नक्कीच आहे. लागण, लागवड , भांगलन , 3 -5 वर्षामागे ड्रीप चा खर्च, स्वतःची मजुरी पकडून सांगत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव

पुरूष एक वाल्या कोळी....

कर्नलतपस्वी
Sun, 12/12/2021 - 17:14 नवीन
घाटपाडें साहेब तुमचा विचार बरोबर आहे. आता स्वताःसाठी जगा. आजच सुचलीय बघा पटतय का? मी तर सगळी खाती बंद केली आहेत. सल्ला विचारला म्हणून देतोय....... पुरूष एक वाल्या कोळी आयुष्यभर विणतो जाळी पापाचा घडा मात्र शेवटी त्याच्याच भाळी जाळ्यात शिकार फसेल म्हणून वाट बघत बसतो कर्तव्य पुर्तीचा भ्रम उगाच जपत आसतो पुरूष एक वाल्या कोळी..... तहान नाही भूक नही. बसला होता नाक्यावर डोक आलं जाग्यावर आप्तानी जेव्हा मारलं फाट्यावर पुरूष एक वाल्या कोळी...... नारायण नारायण जाप करी नारदाची आली स्वारी ऐकुन विनंती वाल्याची म्हणती,त्रेता मधे एकच होता पुरूष एक वाल्या कोळी...... कलीयुगी सारेच वाल्या एवढे राम कोठून आणू नाही केवट नाही राम ज्याचे ओझे त्यालाच घाम कलियुग आहे बाबा, खुळ्या भ्रमात नको राहू दुसऱ्याच ओझं नको वाहू पुरूष एक वाल्या कोळी...... नारायण नारायण म्हणत गेले वाल्याचे डोके ठिकाणावर आले पण आता काय उपयोग जेव्हां सारे पोपट गेले उडुन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा