✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

त्याची आठवण,

ज — ज्ञानोबाचे पैजार, Sat, 07/02/2016 - 10:50
त्याची केव्हाही आठवण आली तरी, सर्वांगावर सरकन् काटा येतो, डोक्यावरचा केस न केस उभा रहातो, आणि थंडीच्या दिवसातही दरदरुन घाम फुटतो, अंधारलेल्या डोळ्या समोर, नाचतात आकृत्या भेसुर, जिभेला पडते कोरड आणि काना मधून निघतो धुर, कित्येकांना याने लाचार बनवले, भिकारी बनवले, याच्या दहशती मूळे कित्येक पापभिरु दूराचारी झाले, तो आहेच असा भितीदायक, आता पर्यंत भेटलेला सर्वात मोठा खलनायक, मी मी म्हणणा-यांची त्याच्या पुढे टरकायची, नुसत्या आठवणीने कित्येकांची बोलती बंद व्हायची, वर्ष सहा महिन्यातुन तो एकदा कधीतरी यायचा, पण त्याचा बोलबाला मात्र वर्षभर असायचा, किती उपाय झाले, नवस झाले सायास झाले, पण याच्या समोर कोणी सुध्दा नाही टिकले, एवढ्या वर्षांनंतर सुध्दा मला त्याचीच स्वप्ने पडतात, तेरा,सतरा,एकोणीस,सत्तावीसचे,पाढे अजूनही अडतात, कितिही अभ्यास केला तरी, ऐन वेळी, वाजवतो हा पुंगी, गणिताचा पेपर म्हटले की टाकतात सगळे नांगी, पैजारबुवा,

प्रतिक्रिया द्या
8497 वाचन

💬 प्रतिसाद (11)

:) मस्त. लेखन् विषयही आवडला.

खेडूत
Sat, 07/02/2016 - 10:55 नवीन
:) मस्त. लेखन् विषयही आवडला.
  • Log in or register to post comments

शेवटच्या कडव्याने सॉलीड

माहितगार
Sat, 07/02/2016 - 10:57 नवीन
शेवटच्या कडव्याने सॉलीड क्लायमॅक्स केलाय =))
  • Log in or register to post comments

भारी आहे

नाखु
Sat, 07/02/2016 - 11:09 नवीन
काही बाकी ठेवलं नाही वजा करताना! तरी भागाकार काही सुटेना! आणि (मुद्दलात)गुणाकार जमेना! हिशोबकच्चा नाखु
  • Log in or register to post comments

:)

रातराणी
Sat, 07/02/2016 - 11:46 नवीन
:)
  • Log in or register to post comments

+1

जव्हेरगंज
Sat, 07/02/2016 - 17:05 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

भारी आहे.

किसन शिंदे
Sat, 07/02/2016 - 13:12 नवीन
भारी आहे. शालेय जीवनात माझा नंबर एकचा शत्रू
  • Log in or register to post comments

नंतर मित्र झाला काय?

प्रचेतस
Sat, 07/02/2016 - 13:23 नवीन
नंतर मित्र झाला काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

=))

पद्मावति
Sat, 07/02/2016 - 13:26 नवीन
=))
  • Log in or register to post comments

हा हा हा

मिसळलेला काव्यप्रेमी
Sat, 07/02/2016 - 18:34 नवीन
हा हा हा..... मस्त
  • Log in or register to post comments

व्वाह. मज्जा आया.

अत्रुप्त आत्मा
Sun, 07/03/2016 - 11:56 नवीन
व्वाह. मज्जा आया.
  • Log in or register to post comments

हा: हा: !

सस्नेह
Mon, 07/04/2016 - 16:53 नवीन
भारी गनीम गणित म्हणजे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा