काल पाऊस आणण्यासाठी सह्याद्रीत भटकावे म्हणून राजमाचीला जाणं झालं.कोंदिवडेमार्गे चढताना पाऊस लागला त्याअगोदर जांभळं खायला मिळाली.यावेळेस फोटोग्राफर मिपाकर स्टीव रॅाजर्स/ स्पा/मन्या इत्यादी एकचसोबत होता.फोटोग्राफीच्या टिप्स मिळणार होत्या.येताना तो एक विशलिस्ट घेऊन आलेला.म्हटलं बघू त्यातलं किती जमतंय ते.कर्जत गाडी येवो नाहीतर स्टेशनवरच फिरून आणलेला डबा खाऊन परत जाऊ.
वेळेवर कर्जतला गेलो आणि वडा ,डोसा चहा घेऊन सिक्ससीटर ओटोरिक्षा नाका/आमराई नाकाकडे कूच केलं.कर्जत बाजारही बदलत चाललाय गावरानपणा हरवून नवीन दुकाने येत आहेत.चौदा किमी अंतर उल्हास नदीकाठाने जाऊन कोंदिवडे गावात पोहोचलो तेव्हा साडेआठ वाजले होते.पावसाळी हवा आणि दूरवर दिसणारे राजमाचीचे मनोरंजन शिखर पहात खरवंडी गावाकडे चालत निघालो.ही वाट अधिक रम्य आहे,झाडीची आहे आणि हळहळू वर चढते.परतताना कोंडाणे लेणी -कोंडाणे गावाकडून येणार होतो.ही चढाची वाट फार दमवते आणि उजाड वाटते.ओटोसाठी परत कोंदिवडे गावातच यावं लागतं.धरण झालं तरी ही वाट बहुतेक बंद होईल/फिरवतील.एक गाव उठण्याच्या बदल्यात इकडचं दृष्य फारच सुरेख होईल हे मात्र खरं.खरवंडी गावाच्या आमराईतले आंबे संपलेले पण विहिरींना पाणी भरपुर होतं.एक छोटंसं गणेश देऊळ माघी गणपतीत गावकय्रांस बोलावतं.वाटेने वर चढतानाच पाऊस सुरू झाला आणि स्पा'ने विशलिस्टच्या दुसय्रा आयटमवर चेक केलं.(जांभळं खाणं पहिलं होतं. आंब्याचं प्रश्नचिन्ह बाकी आहे.)वरती एक वाजता पोहचताना परत जाणाय्रा पर्यटकांची रांग 'भेटली'."खाली उतरायला किती वेळ लागतो?" या प्रश्नाने हे लोक लोणावळा मार्गे आल्याची खात्री पटली.पण इकडून का जात होते सर्व हे नंतर कळलं.वाटेत गाडी फसली होती.
रविवार दुपारी राजमाचीला पोहोचत होतो तेव्हा मोठ्या संख्येने आदल्या दिवशी आलेले पर्यटक खाली कोंडाण्याकडे उतरत होते.वरती शिरिष हॅाटेलचे जानोरे म्हणाले " काल इथे पाय ठेवायला जागा नव्हती.गडावर,तळ्याकडे,देवळाकडे मिळेल तिथे तंबू लागले होते.सर्वांचा एकच प्रश्न - काजवे पाहायला मिळणार का? एक पाऊस झाला की ते गायब होतात हे सांगून थकलो." हे सर्व फेसबुकच्या खरडींच्या प्रसिद्धीमुळे बहुतेक.रात्री दोन चार तुरळक काजवे चमकत होते पण हजारो काजव्यांचा डिस्कोलाइट शो असतो तो संपल्याने पर्यटक नाराज होऊन परतले.इतके दोन अडिचशे लोक वर राहूनही प्लास्टिक कचरा { राजगडावर असतो तसा} अजिबात नव्हता हे विशेष.
फोटो १) खरवंडी वाटेवरचे गणेश मंदीर

फोटो २) थोडे वरून

फोटो ३) वाटेत फोटो घेताना

फोटो ४) हॅाटेल शिरिष,पर्यटक आश्रयस्थान.

फोटो ५) तलावाकडे.

फोटो ६ ) तलाव.गोधनेश्वर मंदिराजवळ

फोटो ७) गोधनेश्वर मंदिर.

फोटो ८) गोधनेश्वर मंदिर. २

फोटो ९ ) नंदी, गोधनेश्वर मंदिर.

फोटो १०)पटांगण, गोधनेश्वर मंदिर

फोटो ११ ) मनोरंजन शिखर,गडाचा मुख्य पाण्याचा साठा यावर आहे.पुढे काळभैरव मंदिर.

फोटो १२)काळभैरव मंदीर

फोटो १३) फुलांचे फोटो काढताना

फोटो १४)रानफुले

फोटो १५) रानफुले

फोटो१६) कोंडाणे लेणी.

फोटो १७) कोंडाणे लेणी.२

फोटो १८) कोंडाणे लेणी.३

वरच्या रम्य वातावरणाने सुखावलो.शिरिष हॅाटेलात पोहे चहा घेऊन तलावाकडे गेलो. तसं राजमाचीला बय्राचदा जातो.विशेष लक्षात घेण्यासारखी स्थित्यंतरं दिसताहेत.स्वच्छता भयानक वाढलीय ,भयानक कारण इतर गडांवर वाइट होत चाललीय.गडाचं रूप निरनिराळ्या दगडी वाटा बांधकामांमुळे लोभस होतंय.माहितीच्या पाट्या.गडावर जेवण राहाणं सोयी पुरवणारे गावकरी वाढले आहेत. पर्यटकांची नवीन पिढी मात्र वेगळ्याच कोनातून पाहू लागली आहे."इथे येऊनच दोन खंभे घेऊ, रात्रीचा गड पाहू आणि सकाळी परत कामावर हजर राहू." गावकरी म्हणतात "सरळ उभे राहता येत नाहीये तरी तळ्यावर आंघोळीला जातात.मागल्या महिन्यात दोन बुडाले.दोनचारजण अती करताहेत पण दुर्घटना झाली की वाइट वाटते.काही गपचीप पडून राहातात ते ठीक आहे.रात्री तीनलाही पर्यटक उठवतात चहा पोहे मागवतात त्यांच्यासाठी करतोच पण हे पिणारे राडा करतात त्यांच्यासाठी उठावेसेही वाटत नाही." काल रात्री बाराला एक ग्रुप बाइक घेऊन आला.त्यापैकी एकजण श्रीवर्धनवरवर पाय घसरून पडला दोन वाजता. बेशुद्ध अवस्थेत खाली आणलं गावात.सकाळी धुक्यात दहा फुटांवरही दिसत नव्हते ते अंधारात दोन वाजता काय दिसणार होते? चार वाजता गाववाल्याच्या सुमोतून लोणावळ्याला नेलं.त्याची नवी कोरी बाइक तिथेच पडलीय. आता पोलीस पंचनामा होणार, ग्रुपमधल्या सगळ्यांची चौकशी होणार कोणी मुद्दामहून ढकलले का वगैरे. हेच लोक सकाळी हापिसात फुशारकी मारणार होते -" रातोरात गड 'मारला' आणि सकाळी हजर." एकूण गडांकडे बघण्याची वृत्ती बदलतेय. रात्री काजवे पाहाण्याची अपेक्षा नव्हतीच कारण पाऊस होऊन गेला होता इकडे.सोलर लाइट लागलेला तो दोन तासाने बंद झाल्यावर काजवे तुरळक दिसू लागले.सकाळी दोन्ही शिखरांवर जाऊन खाली गावात चहा पोहेसाठी आलो. ६ ) मनोरंजन शिखर,गडाचा मुख्य पाण्याचा साठा यावर आहे.पुढे भैरवनाथ मंदिर. परतताना कड्यावर एक ठाकरबाई आणि तिची दहाएक वर्षांची मुलगी करवंदं शोधत होताना दिसली. "तुमचं गाव हे उधेवाडी का?" " नाही,ते खाली दिसतंय मुंढेवाडी कोंडाण्याच्या बाजूला ते." "धरणात आमचं गाव उठतंय." "इतक्या वरती आलात?" "हो ,यावर्षी करवंद फार कमी लागलीत. ही घेऊन समोरच्या डोंगरावर ठाकरवाडी रेल्वे गाड्या थांबतात तिथे विकणार.सकाळी चार आणि दुपारी दोनच गाड्या थांबतात." तोपर्यंत मुलीने काढलेली करवंदं एका खळग्यात लपवून ठेवली. "पाटी भरत नाही म्हणून काढून ठेवतो,उद्या नेणार विकायला." अठराशे वर्षांपुर्वीची पाण्याची टाकं गावाला अजूनही पाण्याची सोय करतात, पंधराशे वर्षांपासून हा डोंगर वापरात आहे, चारशे वर्षांपुर्वी एक शिवाजी नावाचा राजा मोगलांशी लढण्यासाठी हा किल्ला वापरायचा,१८१८ मध्ये इतरांनी वापरू नये म्हणून इंग्रजांनी बरेचसे बांधकाम उध्वस्त केले. इथल्या जीवनावर 'माचीवरला बुधा' कादंबरी येऊन पन्नास वर्षं झाली, आता आमच्या मनोरंजनाचे काम सार्थकी लावतोय. कोंडाणे लेणीमार्गे आलो.लेण्यांची डागडुजी करण्याचं पुरातत्व खात्याने ठरवलेलं दिसतंय.उभे खांब पडलेले होते तिथे (कार्ल्याच्या लेणीत आहेत तसे) सिमेंटचे बसवत आहेत.स्तूप देखील दुरुस्त करणारेत.चला काही संपूर्ण तरी बघता येईल.आहे तसं तुटकंफुटकं बघण्यापेक्षा बरं. खाली मुंढेवाडी वस्ती आहे ती धरणात उठणार आहे मशिनरी येऊन जय्यत तयारी झालीय. कोंडाणे धरण नियोजित.काम पावसाळ्यानंतर सुरू होणार.पन्नासेक ट्रकस,डंपर,जेसिबी येऊन उभे आहेत आवारात.कोंडाणे गावापुढेच भिंत येणार. तिथल्या आमराईत एक पिकलेला आंबा मिळाला आणि विशलिस्टवर शेवटची खूण झाली.मी कोय आणली, या रायवळांची रोपे जोमदार होतात.

वाचने
21808
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरडफळ्यावरचे प्रतिसाद इथे
कंका,सुरेख.
राजमाची म्हटलं की आठवतं ते
खूप छान लिहिलंय.
चला, परत एकदा राजमाचीला जायला
सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन
छान
मस्तं!
राजमाची
काका
एकदम मनातलं बोललात
In reply to काका by नाखु
से थँक्स टू मी फॉर कंकाका.
In reply to एकदम मनातलं बोललात by जगप्रवासी
"पुरेसे फोटो नसले तरी
एक भाजेलेणी भेट झालीय.
हम्म्म
In reply to एक भाजेलेणी भेट झालीय. by कंजूस
हल्ली जावंसं नाही वाटत नाही
In reply to हम्म्म by स्वच्छंदी_मनोज
तिथे लेणी नसल्याने तेवयेणार
In reply to हल्ली जावंसं नाही वाटत नाही by प्रचेतस
आहेत रे. खाली कोंडाणे आहेत.
In reply to तिथे लेणी नसल्याने तेवयेणार by स्पा
पावसाळ्यात नुसतं फणसराईपर्यंत
In reply to आहेत रे. खाली कोंडाणे आहेत. by प्रचेतस
येक दर्पण सुंदरी
In reply to हल्ली जावंसं नाही वाटत नाही by प्रचेतस
मस्त हो....
खिक्क
In reply to मस्त हो.... by मुक्त विहारि
छान...
In reply to खिक्क by स्पा
आम्हाला भेटलेला रतनवाडीत. :)
In reply to मस्त हो.... by मुक्त विहारि
सुरेख
विनंती कशाला,धडाधड धागे काढीन
काही ओरड होत नाही. झाली तरी
In reply to विनंती कशाला,धडाधड धागे काढीन by कंजूस
+१
In reply to काही ओरड होत नाही. झाली तरी by प्रचेतस
काका शेवटचे राजगडावर कधी
किसना राजांचा मावळा आहे.
In reply to काका शेवटचे राजगडावर कधी by किसन शिंदे
राजगडावर जायला
In reply to किसना राजांचा मावळा आहे. by प्रचेतस
राजगड- किसणा जन्मो जन्मीचे
In reply to किसना राजांचा मावळा आहे. by प्रचेतस
तसं नाही.
In reply to किसना राजांचा मावळा आहे. by प्रचेतस
दहा वर्ष झाली.आता सुधारलंय का
In reply to तसं नाही. by किसन शिंदे
किसनदेवा
In reply to दहा वर्ष झाली.आता सुधारलंय का by कंजूस
किसनाच्या दोन्ही डोळ्यात फक्त
In reply to किसनदेवा by नाखु
असेल असेल
In reply to किसनाच्या दोन्ही डोळ्यात फक्त by स्पा
हा लेख वल्लीच्या खवत कालच
In reply to किसनदेवा by नाखु
फोटो आणि वर्णन,
फार आवडलेलं ठिकाण. आणि एक
ती आमराईतंनं जाणारी दगडी
मिसळपाववर भटकंतीचा धागा
छान वृत्तांत
एका दिवसात अशक्य आहे हो काकु
In reply to छान वृत्तांत by अजया
आणखी काही फोटो
अरे वा भारी!!
अप्रतिम
अभीनंदन पण जरा जपून
In reply to अप्रतिम by Rahul Sable
धन्यवाद
In reply to अभीनंदन पण जरा जपून by स्वच्छंदी_मनोज
खूप सुंदर लेख. मस्तच लिहिलय.