भीमाशंकर अभयारण्य

निओ's picture
निओ in मिपा कलादालन
14 May 2016 - 11:05 pm

भीमाशंकर अभयारण्य
मी काढलेले फोटो प्रथमच मि पा वर सादर करत आहे. इथे असलेल्या दिग्गजांकडून मार्गदर्शन मिळाले तर उत्तमच.


1


2


3


4


5

प्रतिक्रिया

निओ's picture

14 May 2016 - 11:09 pm | निओ

१,२,३,५ क्रमांकाचे फोटो सुस्पष्ट दिसत नाहीत, कोणी कारण सांगू शकेल काय?

अभ्या..'s picture

15 May 2016 - 12:59 am | अभ्या..

ब्येस्टच.
न्याशनल जोग्राफीकला पाठवा राव.
फ्रेम तर लै आवडल्या मला.

चांगले आहेत. छायाचित्रणाला शुभेच्छा!

नुसत्या फोटोन चा असाच एक धागा मी काढला होता माझाही तो पहिलाच धागा होता.
पण नुसते फोटो म्हणून तो उड़व्ला गेला.तुम्ही मात्र लकी ठरलात तुमचा धागा नाही उड़वला.
लाडके दिस्ता मिपाचे.

प्रचेतस's picture

15 May 2016 - 6:58 am | प्रचेतस

लै ली भारी फोटू.
मजा आली

तुम्ही वाटरमार्क टाकून फोटो सुरक्षित केलेत हे छान केलेत. कुणाचा भरवसा नाही हो आजच्या जगात.

आमच्याकडे एक भूतकथावाला आहे तो ढापेल असले वॅाटरमार्कवाले फोटू.त्यामुळे नावं काढा.खरं अरण्य असंच असतं .खूप काळोख दुपारीही असतो.तुम्हाली भिती नाही वाटत? एकीने इकडे अरण्यरुदनही करून घेतलंय म्हणजे किती प्रत्ययकारी फोटोग्राफी आहे तुमची.आम्ही वीसपंचवीस फोटो टाकतो तर दोन टिपं नाही गाळत कोणी.वर तक्रारी करतात फेबुचे फोटो इथे टाकू नका.जाऊ दे आमचे फोटो गेले अन फ्रेमा राहिल्यात.

अजया's picture

15 May 2016 - 9:05 am | अजया

:)
छान आहेत फोटो.

विवेकपटाईत's picture

15 May 2016 - 11:07 am | विवेकपटाईत

फोटो सुंदर आहेत. पुढच्या वेळी त्या मागची पृष्ठ भूमी हि सांगा. वाचायला आवडेल.

आपल्या कलाविष्काराला आपला लाल सलाम,
इतके सुंदर अभयारण्य भिमाशंकर ला आहे हे माहीतच नव्हते.
अनेकविध प्राणी, वनचर पाहून डोळ्यंचे पारणे फिटले

हँट्स आॅफ

निओ's picture

17 May 2016 - 5:57 pm | निओ

फोटो प्रत्यक्षात जसे आहेत तसे इथे दिसत नाहीत....म्हणून मन थोडं खट्टू झालं. Upload करताना काही चुकत आहे का?...इथे मदत या सत्रात सांगितल्या प्रमाणे पिकासा वरून load केले आहेत. दुसरी कोणती चांगली पद्धत आहे का जिच्यामुळे फोटो च्या स्पष्टते मध्ये फरक पडत नाही.

एस: Thanks Sir.... तुमच्या छायाचित्रणाच्या मालिकेचा मी आधीपासूनच पंखा आहे.
त्रिवेणी: Thanks पुढच्या वेळेपासून माहिती हि लिहित जाईन. तुम्ही परत प्रयत्न करून पहा ..कदाचित आता चालत असेल. :)
अजया, प्रचेतस Thank you :)
कंजूस काका : तुमची भटकंती खूप वेळा वाचली आहे. धागा सुरु करण्याचा माझा पहिलाच प्रयत्न होता म्हणून पाचच फोटो टाकून पाहू म्हटलं.
पटाईत काका : Thank you . तुमचे भावस्पर्शी लिखाण आवडते.

शान्तिप्रिय's picture

17 May 2016 - 6:07 pm | शान्तिप्रिय

सर्व फोटो सुंदर आहेत.

सतिश पाटील's picture

18 May 2016 - 11:18 am | सतिश पाटील

मस्त फोटो आहेत. अगदी डोळ्याचे पारणे फिटले फोटोतील हिरवळ शोधून.
कोणता क्यामेरा वापरला आपण?

इरसाल's picture

18 May 2016 - 3:37 pm | इरसाल

पिच्चरमधला निओ इतका भाबडा नव्ह्ता जेव्हढा हा निओ वाटतोय.

बाबारे बाकीच्यांनी फुल टॉस वर विकेट घेतली तुझी. मिपा"वरचे" दिसतात त्यापेक्शा तीन पट खाली असतात.

जुइ's picture

18 May 2016 - 11:15 pm | जुइ

फोटो आवडले!

समर्पक's picture

19 May 2016 - 2:31 am | समर्पक

चित्र ४ व ५ आवडले. दोन्हीला स्वतःची चौकट व विषय आहे.

सुस्पष्टता : तुमची मूळ चित्रे ही लहान आकाराची आहेत (३४८*५१२) आणि इथे ती ताणून बसवली आहेत (५५०*८०९) त्यामुळे त्यातील स्पष्टपणा हरवला. शिवाय फार अंधार असल्याने क्र. ४ शिवाय काहीच स्पष्ट नाही. काळ्या जाड फ्रेम मुळे जागा वाया गेली व चित्रही झाकोळले.

चित्रावरील नामांकनाविषयी : जगाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवावा. कोणी इथे तुमची चित्रे चोरायला बसलेले नाही. आणि चोरली तरी कुठे लाखाचं नुकसान आहे? त्या जागेच्या सौंदर्याचा किंवा तुमच्या छायाचित्रण कौशल्याचा लोकांना आनंद व्हावा असे जर चित्राचे प्रयोजन असेल तर त्याला नामांकनाने बाधा येते. चित्र, चित्रातील जागा/विषय/व्यक्ती व कलाकार यांतील कोण कौतुकास सर्वाधिक पात्र आहे यावर चित्र नामांकित करावे की नाही हे ठरवावे असे माझे वैयक्तिक मत.

… ओव्हर टू दिग्गज फॉर मार्गदर्शन