✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

नाडलेल्या लोकांची कहाणी .............

म — माम्लेदारचा पन्खा, Sat, 04/30/2016 - 21:11
मागून मागून थकलेली माणसं आली कोणी , उतरले तोंड डोळा सुटलेले पाणी ला ला ला ला , ला ..ला ला गेलेच आहेत पैसे आता खिशात काही नाही पैसे कुणा मागू आता मला कोण देई बडबडत बसतो सारखा गेले पैसे पाण्यात व्याज गेले माझे तरी मुद्दल द्या हातात सांगायची आहे माझ्या शहाण्या मुला नाडलेल्या लोकांची ही कहाणी तुला ..... ला ..ला ला ला ला , ला ..ला ला ला ला.... ||2|| आट-पाट नगरात वेडे होते फार एकाकडे पैसे मागता काढून देती चार ||2|| रोज सकाळीस टोपीवाला टोपी सर्वा घाले , नवी टोपी लावायचे काल राहुनिया गेले जमलेच नाही तुम्हा पैसे देणे जरी आज परी काढणार तुमच्या खिशातून तरी बातांच्या त्या गावामध्ये मारू मग फेरी खरया खुऱ्या माणसांसाठी गोष्टीतली तुरी बसवीन मी सगळ्यांना टेम्पोत चला नाडलेल्या लोकांची ही कहाणी तुला .... ला ..ला ला ला ला , ला ..ला ला ला ला.... ||2|| ऑफिसात उशिरा मिपावरी असायचो बसून भंडावले डोके जाई व्यनी याचनेत द्रवून एक एक पैसा गेला कधी कळेना निघून एक एक क्षण जाई टोप्या त्या लावून अशावेळी काही सांगू काय काय वाटे भाकड कथांसोबत पाणी डोळ्यातून दाटे वाटते कि उठूनिया तयापाशी जावे त्याच्यासाठी मी मात्र कर्ण तो व्हावे त्याने मागावे आणि मी द्यावे हातासरशी आर्त त्याचे शब्दखेळ भिडावे मनाशी दात विचकत तो बोले सर्वा काही ऐकताना सारासार विचार उरणार नाही ||2|| मनापासून सल्ले द्यायचे लोक काही लक्ष त्यांच्या बोलण्याकडे दिले कधी नाही टोपीवाला सगळ्या जणा गंडा घाले कसा क्षणा क्षणा आता ढाळतो अश्रू हा असा सांगायची आहे माझ्या शहाण्या मुला नाडलेल्या लोकांची ही कहाणी तुला ..... ला ..ला ला ला ला , ला ..ला ला ला ला.... ||2|| लुटलेले पैसे घेऊन टोपीवाला जाई नवीन नवीन शेंड्या लोका लावीत येई गोष्ट ऐकायला टाळकी जमायची कशी मस्तकातला मेंदू मग गोठून बशी तोच मेंदू सांगत आहे ऐक गाढवा काही मी जरी पडलो खड्ड्यात तू पडायचे नाही पोटापुरता पैसा अडका मिळतो ना तुला दुपटीची हाव कधी धरू नकोस मुला ||2|| कितीतरी पैसे गेले देणाराच पण खुळा अजूनही एकांतात मी गुपचूप रडतो रे बाळा सांगायची आहे माझ्या शहाण्या मुला नाडलेल्या लोकांची ही कहाणी तुला .... ला ..ला ला ला ला , ला ..ला ला ला ला.... ।।२।। मनाला ह्या भिडलेली टोपीची पहिली गोष्ट फार आणि लगेचच देऊन टाकले वीस तीस हजार परत मिळण्यासाठी तेच सगळे म्हणती थांबा तरी पण देत गेलो जसा धबधबा लुटू -लुटू उभा राहत त्याने टाकलं पाउल पहिलं दूरचंच पाहत राहिलो फक्त , जवळचं नाही दिसलं आता गेलो आहे बाळा पुरा मी अडकून हल्ली कोणी मदत मागता पाहतो दुरून ||2|| अश्या कश्या टोप्या तो सगळ्यांना लावतो काहीही सांगतो आणि पैसे घेऊन खातो शहाणपण ठेवले होते बासनात गुंडाळून उरले काही नाही आता माझ्या बॅंकेमधून जरी येती ओठी शिव्या त्याच्यासाठी तसे नजरेत त्याच्या काही लवलेश नसे ह्या जगातून माणुसकी हरवली का रे ? मदत करणाऱ्या माणसा वेडा ठरवती सारे ? ||2|| खरी मदत मागायला कोणी येई दारामध्ये त्याच्यासाठी जाईल का हात खिश्यामध्ये ?.... ला ..ला ला ला ला , ला ..ला ला ला ला.... ।।२।। ला ..ला ला ला ला , ला ..ला ला ला ला.... ।।२।।

प्रतिक्रिया द्या
8130 वाचन

💬 प्रतिसाद (24)

मी पयला आणि खि खि खि

टवाळ कार्टा
Sat, 04/30/2016 - 21:19 नवीन
मी पयला आणि खि खि खि
  • Log in or register to post comments

मी दुसरा....ख्या ख्या ख्या...

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 04/30/2016 - 21:20 नवीन
मी दुसरा....ख्या ख्या ख्या....एका नुतन चिट फंड मालकाची आठवण येउन ड्वॉळे पाणावले =))
  • Log in or register to post comments

आमची पेर्ना हाये ती..........

माम्लेदारचा पन्खा
Sat, 04/30/2016 - 21:23 नवीन
आसुसून मिपावर् यावसं वाटलं त्यामुळे.........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

तुजी पेर्ना वायली, चिमण्या

टवाळ कार्टा
Sat, 04/30/2016 - 21:23 नवीन
तुजी पेर्ना वायली, चिमण्या म्हणतोय ते वायले =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

ते वायले नव्हेत ते आपणचं मालक

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 04/30/2016 - 21:51 नवीन
ते वायले नव्हेत ते आपणचं मालक. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मला वाटतेय त्यांची पेर्णा

टवाळ कार्टा
Sat, 04/30/2016 - 22:24 नवीन
मला वाटतेय त्यांची पेर्णा वेगळी आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

टका चिट फंडाबद्दल बोल्तोय बे

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 04/30/2016 - 22:19 नवीन
टका चिट फंडाबद्दल बोल्तोय बे मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

शिर्षका वरुन गंभीर वाटली पण..

जेपी
Sat, 04/30/2016 - 21:25 नवीन
शिर्षका वरुन गंभीर वाटली पण.. =))=))=))=))
  • Log in or register to post comments

पार बाजार उठवला.!

कानडाऊ योगेशु
Sat, 04/30/2016 - 21:32 नवीन
पार बाजार उठवला.! बाकी त्या तो मल्ल्या मला ६५०० ची शेंडी लावुन पळाला दूरदेशी!
  • Log in or register to post comments

गंभीरच प्रकार दिसतोय राव.

प्रचेतस
Sat, 04/30/2016 - 21:48 नवीन
गंभीरच प्रकार दिसतोय राव. सावध करा भो.
  • Log in or register to post comments

कधीची गोष्ट ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 04/30/2016 - 22:02 नवीन
ज़रा स्पष्ट सांगता का ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सावकाशीने वाचतो. लय मोठी हाय

खटपट्या
Sat, 04/30/2016 - 22:41 नवीन
सावकाशीने वाचतो. लय मोठी हाय कविथा...
  • Log in or register to post comments

मनाला भिडला विषय

आदिजोशी
Sat, 04/30/2016 - 22:53 नवीन
मल्ल्या निदान युके मधे आहे हे माहिती तरी आहे, इथे तर ठावठिकाण्याचीही बोंब. पुलंनी लिहील्यावर जसं आपल्याच मनातलं लिहिले असं लोकांना वाटायचं, तसंच ही कविता वाचून शे दोनशे मिपाकरांना वाटेल ह्यात शंका नाही. असो. रात गई बात गई असं म्हणुन पुढे जायचं. किसका मिला है जो तेरा मिलेगा.
  • Log in or register to post comments

शे-दोनशे?????

टवाळ कार्टा
Sat, 04/30/2016 - 22:56 नवीन
शे-दोनशे?????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

जास्त का?

आदिजोशी
Sat, 04/30/2016 - 23:16 नवीन
हजार पाचशे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

विषय जुना आहे का नवा काही

वैभव जाधव
Sun, 05/01/2016 - 04:42 नवीन
विषय जुना आहे का नवा काही किस्सा आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

मलाही फोन आला होता.

मितभाषी
Sat, 04/30/2016 - 22:58 नवीन
मलाही फोन आला होता. कानाकानसुळावरून गेलं. थोडक्यात बचावलो.
  • Log in or register to post comments

ह्या जगातून माणुसकी हरवली का रे ?

मुक्त विहारि
Sat, 04/30/2016 - 23:51 नवीन
खरी मदत मागायला कोणी येई दारामध्ये त्याच्यासाठी जाईल का हात खिश्यामध्ये ? ========================================= अजिबात जात नाही... दूधाने तोंड पोळले की मांजर पण सुधारते..... असो, == ===
  • Log in or register to post comments

क्या हुवा मा. प? .

अत्रुप्त आत्मा
Sun, 05/01/2016 - 06:34 नवीन
क्या हुवा मा. प? .
  • Log in or register to post comments

कुछ तो गडबड

चांदणे संदीप
Sun, 05/01/2016 - 06:51 नवीन
कुछ तो गडबड है दया! तोडदो... नाही... असूदे! मस्त विडंबन! यामागची पेर्णा काकू मध्ये घ्या आता! :) Sandy
  • Log in or register to post comments

खिक्क

माझीही शॅम्पेन
Sun, 05/01/2016 - 09:21 नवीन
खिक्क :) कुच तो लोग कहेन्गे
  • Log in or register to post comments

जेन की हिंदु धर्म हो?=))

स्पा
Sun, 05/01/2016 - 09:38 नवीन
जेन की हिंदु धर्म हो?=))
  • Log in or register to post comments

मल्या?

कपिलमुनी
Sun, 05/01/2016 - 10:13 नवीन
या कवितेला मल्याशी जोडणे मंजे काखेत कळसा न् गावाला वळसा !
  • Log in or register to post comments

हाहाहा सही बोल रैला

मितभाषी
Sun, 05/01/2016 - 10:16 नवीन
हाहाहा सही बोल रैला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा