पुस्तकांची काळजी कशी घ्यावी? (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

Primary tabs

अनाहिता's picture
अनाहिता in लेखमाला
19 Apr 2016 - 11:21 pm

Header

 • पुस्तकं स्वच्छ हातांनी हाताळावीत.
 • शक्यतो पुस्तक वाचातांना / हाताळतांना खाण्यापिण्याचे पदार्थ दूर ठेवावेत.
 • खुणेसाठी पानं कोपर्‍यात दुमडण्याऐवजी पुस्तकखुणा (बुकमार्क्स) वापरावेत.
 • नविन पुस्तक घेतल्यावर प्लॅस्टीक अथवा कागदी कव्हर घालावं.
 • पुस्तकांचं कपाटं सूर्यप्रकाश थेट पुस्तकांवर पडेल अशा ठिकाणी नसावं.
 • पुस्तकं अधून मधून हाताळत रहावी.
 • पुस्तकांच्या कापाटात पुस्तक लावतांना खूप गर्दी करुन लावू नयेत. पुस्तकाच्या कपाटाची वेळोवेळी साफसफाई करावी.
 • पुस्तकं शक्यतो उभी लावावीत. एकाच उंचीची, आकाराची पुस्तक जवळजवळ लावावीत.
 • पुस्तक लावताना विषयानुरूप वा लेखक/लेखिकेच्या नावानुसार लावावीत.कमीतकमी हाताळली जातात.ठेवताना सोयीचे होते.
 • बुकशेल्फमध्ये चंदनाची काडी, लवंग ठेवावेत.
 • दर तीन - चार महिन्यांनी पुस्तकांना ऊन दाखवावे.
 • पुस्तकं सतत शेल्फफमधून काढून ती जागा पुसून घ्यावी.
 • पुस्तकाच्या कपाटात डांबर गोळ्या ठेवाव्यात.
 • बकुळीचे सुकलेले गजरे.वेखंडाचे तुकडे पुस्तकांचे वाळवीपासून संरक्षण करतात.
 • पुस्तकाचे कपाट पातीचहाच्या तेलाच्या बोळ्याने पुसून काढावे.त्यानेही पुस्तके चांगली रहातात.
 • पुस्तके ठेवण्याआधी कपाटात.फळीवर वर्तमानपत्र पसरावे.
 • लहान मुलांची पुस्तक त्यांना काढता येतील अशा जागी ठेवावीत.
 • पुस्तकांवर क्रमांक टाकुन एक यादी केल्यास त्याप्रमाणे पुस्तक शोधायला सोपे जाते.
 • पुस्तकांचे शेल्फ शक्यतो बंद काचेचे असावे. धूळ कमी बसते आणि पुस्तकं नीट दिसतात.
 • पुस्तकावर खुणा,चित्र रंगवणे,रेघा मारणे टाळावे.पुस्तकाचे सौंदर्य नष्ट होते.
 • पुस्तकावर सुवाच्य अक्षरात नाव व तारीख टाकावी. जास्त मजकूर लिहून पुस्तक खराब दिसायची शक्यता असते.
 • दुसर्‍या व्यक्तीस पुस्तक वाचायला दिल्यास तशी नोंद करुन ठेवावी.
 • पुस्तक पाणी वा इतर काही सांडून ओले झाल्यास पंख्याखाली वाळवावे. फडक्याने पुसायचा प्रयत्न करू नये.पुस्तक आधिक खराब होते.
 • पुस्तक पाणी वा इतर काही सांडून ओले झाल्यास पंख्याखाली वाळवल्यानंतर त्या पानांवरुन मध्यम गरम इस्त्री फिरवावी.
 • लहान मुलांची पुस्तक कितीही काळजीपूर्वक हाताळली तरी थोडीफार फाटतातच. अशावेळेस घरात 'बुक अँब्युलन्स' म्हणून एखादं छोटंसं बास्केट अथवा खोका ठेवता येईल. त्यात अशी फाटलेली पुस्तकं मुलांना एकत्र करायला सांगून फावल्या वेळात पुस्तकांची डागडूजी करायला शिकवता येऊ शकेल. या 'बुक अँब्युलन्स' मधे रिपेयरिंगसाठी लागनारं सामान जसं - गोंद, सेलोटेप, कात्री, स्टेपलर, सुई-दोरा अशा वस्तू 'पुस्तकांची प्रथमोपचार पेटी ' म्हणून ठेवता येतील.
 • वाचनालयातून आणलेलं पुस्तक आपल्या हातून फाटलं तर त्याची डागडुजी घरी करु नये. वाचनालयात पुस्तकांची डागडुजी करण्याकरीता खास सोय असते.
 • पुस्तक उघडून उपडं ठेऊ नये. अशाने पुस्तक जिथे सांधलं गेलेलं असतं (क्रिझ) त्याठिकाणी खराब होऊ शकतं. जर पुस्तकाचा या भागाचं फार नुकसान झालेलं असेल तर तो पूर्णपणे काढून टाकून पुस्तक नव्याने सांधावं लागतं.

पुस्तकाची डागडुजी करण्यासाठी वापरली जाणारी काही साधनं (बुक रिपेयर किट) -

 • कात्री
 • गोंद
 • बोन फोल्डर
 • खोडरबर
 • सेलोटेप
 • करेक्शन टेप
 • ब्लेड
 • पुस्तक शिवण्याची खास सुई (Sewing Awl)
 • पुस्तक शिवण्यासाठी वापरला जाणारा खास दोरा
 • वॅक्स पेपर
 • बुक वेट (सॉफ्ट्/हार्ड)
 • बुक रिपेयर नाईफ
 • पंच मशिन
 • सँड पेपर (पुस्तकाचे कोपरे साफ करण्यासाठी वापरतात)
 • बुक क्लॉथ (पुस्तकाच्या आत वापरलं जाणारं जाळीचं कापड)
 • सिलीकॉन रिलीज पेपर
 • ग्लू ब्रश
 • कटींग मॅट
 • स्प्रिंग डिवायडर

व्यावसायिकरित्या केलं जाणारी पुस्तकाची डागडुजी पुस्तकाची रचना व प्रकारावर अवलंबून असते. पुस्तकाच्या रचनेची (Book Anatomy)थोडक्यात ओळख -

BookTip1

 • डस्ट जॅकेट - पुस्तकाची सर्वात बाहेरची बाजू अथवा कव्हर. यावर बरेचदा पुढच्या बाजूस पुस्तकाचं मुखपृष्ठ व मागच्या बाजूस मलपृष्ठ, पुस्तकाचा सारांश ( blurb) छापलेला असतो. हे कव्हर पुस्तकापासून वेगळं करता येतं. पुस्तकाच्या कव्हरबोर्डच्या तुलनेने हे वजनाने हलकं असतं. जाहिरातीसोबतच ड्स्ट जॅकेट पुस्तकाचं संरक्षक कवच म्हणून काम करतं.
 • कव्हरबोर्ड - ड्स्ट जॅकेटच्या आतलं पुस्तकाचं कव्हर.
 • BookTip2

 • स्पाईन - पुस्तकाची पानं सांधलेली बाजू. पुस्तकं शेल्फवर उभं केलं असता या बाजूवर पुस्तकाचं नाव दिसतं. स्पाईन अर्थातच पुस्तकाचा कणा.
 • हेडर कॅप - स्पाईनचा वरचा भाग.
 • बॉटम कॅप - स्पाईनचा खालचा भाग.
 • क्रिझ - बुक स्पाईनच्या कडांना क्रिझ असं संबोधतात.
 • सिग्नेचर - सिग्नेचर अर्थात पुस्तकांची दुमडलेली पानं. हि पानं चाराच्या पटीत दुमडतात. जसं की ४,८,१२,१६,३२ पानांची मिळून एक सिग्नेचर बनते.
 • ट्युब - बुक स्पाईन आणि सिग्नेचर यांच्या मधल्या भागाला ट्युब असं संबोधतात.
 • एंड पेपर - पुस्तकाचं सर्वात पहिलं व मागचं पान. याचा अर्धा भाग कव्हरबोर्डला चिकटवलेला असतो व उरलेला अर्धा भाग मोकळा असतो त्याला 'फ्लाय लीफ' असं म्हणतात.
 • पेपर लायनिंग - पुस्तकं बाईंड करतात तिथे चिकटवलेला कागदाचा अथवा कार्डबोर्डचा तुकडा. पुस्तकाला आधार देण्यासाठी वापरतात. पेपर लायनिंगच्या आत जाळीचं पातळ कापड लावतात त्याला 'सुपर' असं संबोधतात.
 • Footer

प्रतिक्रिया

अजया's picture

27 Apr 2016 - 7:04 am | अजया

नेहमीप्रमाणेच मस्त!
वाटेल तशी पुस्तकं वापरणारी माणसं तशीही डोक्यात जातात! त्यांना लिंक पाठवते लेखाची!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Apr 2016 - 7:08 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

अजुन एक. लोकं किती दुखावली तरी चालतील पण आपली पुस्तकं अजिबात दुसर्‍याला देउ नये. अजिबात नीट वापरत नाहित. :(
वरनं निर्लज्जपणे सांगतात अरे पुस्तक तर आहे कशाला डोकं खातोस म्हणुन.

कोणीतरी "हौ टु से नो टु बुक बॉरॉअर्स" वगैरे आर्टिकल टाका रे.

पुस्तके दुसर्यांना देऊ नये. दिलीच तर परत घेण्याचा दिनांक ठरवावा. त्या दिवशी मित्राला पुस्तकाच्या नावाने सुप्रभात करावे. लोक कंजूस, हलकट वगैरे म्हणतात त्याकडे दुर्लक्ष करून सुप्रभात नंतर सुदुपार संदेश पाठवावा. मेहनत करून परत मिळवलेले पुस्तक सुस्थितीत नसेल तर खुशाल फटकळ वाणी सढळ वापरावी. पुढ्च्या वेळी तो मित्र घरी आला असता पुस्तकाच्या कपाटा ला लावायचे कुलूप कुठे मिळते असे त्यास विचारावे.
तूर्त एवढं पुरे.

स्मिता श्रीपाद's picture

27 Apr 2016 - 12:15 pm | स्मिता श्रीपाद

अजुन एक. लोकं किती दुखावली तरी चालतील पण आपली पुस्तकं अजिबात दुसर्‍याला देउ नये. अजिबात नीट वापरत नाहित. :(
वरनं निर्लज्जपणे सांगतात अरे पुस्तक तर आहे कशाला डोकं खातोस म्हणुन. >>

अगदी अगदी....माझं एकाशी याविषयावर झालेलं कडाक्याचं भांडण आठवलं...
त्याने रागारागात नण्तर ते पुस्तक मला नवीन विकत घेउन दिलं होतं....

विशाखा पाटील's picture

27 Apr 2016 - 12:43 pm | विशाखा पाटील

एक डायरी करावी, त्यात पुस्तक दिल्याची नोंद करून पुस्तक नेणाऱ्याची सही घ्यावी. ही ग्रंथालयाची पद्धत अवलंबल्यावर तो/ती निघताना पुस्तक तिथेच ठेवून जातो/जाते. कायमची कटकट मिटते.

सानिकास्वप्निल's picture

27 Apr 2016 - 7:46 am | सानिकास्वप्निल

संकलन छान झालेय शिवाय बुक अनाॅटोमीबद्दल छान माहिती दिलीये.
मी स्वत: माझे पुस्तक फारसे कुणाला देत नाही हाताळायला, दिलेच तर वारंवार आठवण करुन देते रिटर्न द्यायचे. पुस्तकांवर रेखाटणे, खुणेसाठी कोपरे दुमडणे हे प्रकार अजिबात आवडत नाही.

स्पा's picture

27 Apr 2016 - 8:12 am | स्पा

छान माहिती

किंडल मुळे हा प्रकार येत्या काही वर्षात बाद होइल असे वाटते, मी ही एक किंडल घ्यायच्या विचारात आहे

किलमाऊस्की's picture

27 Apr 2016 - 8:17 am | किलमाऊस्की

चांगला मुद्दा आहे. किंडलची काळजी कशी घ्यावी? असा धागा काढावा लागेल काही दिवसांनी. (वेळ मिळाल्यास या विकांताला किंडलविषयी लिहू शकेन.)

स्पा's picture

27 Apr 2016 - 8:41 am | स्पा

नक्की लिहा. किंडल घेण्यापुर्वी मला त्याबाबत जमेल तेवढी सगळी माहिती हवी आहे :)

पिवळा डांबिस's picture

27 Apr 2016 - 9:34 am | पिवळा डांबिस

कशाला उगाच पैशे वाया घालवतोस?
त्या किंडला-बिंडलात काही तथ्य नाही हो!!
माझ्याकडे किंडल आहे. पहिले दोन-चार महिने उत्साह असतो किंडलवर वाचायचा.
नंतर गेली काही वर्षे तसंच पडून आहे.
पुस्तकं हीच खरं वाचनाचं समाधान देतात!!!
शिवाय ती घरभर पसरूनही ठेवता येतात!! :)

यशोधरा's picture

28 Apr 2016 - 1:43 am | यशोधरा

अगदी, अगदी. लैच सहमत!

प्रचेतस's picture

27 Apr 2016 - 9:30 am | प्रचेतस

किंडलमुळे मुद्रित पुस्तकं काही बाद होणार नाहीत. जी मजा कोर्‍या पुस्तकांचा वास घेण्यात, पुस्तकांची पाने पलटवण्यात आहे ती मजा किंडलमध्ये कधीच येणार नाही.

अजया's picture

27 Apr 2016 - 9:37 am | अजया

पिडां प्रचेतसशी सहमत.
का कोण जाणे त्या निर्जीव पुस्तकाशी रिलेट होता येत नाही किंडल वापरताना. सुरुवातीच्या उत्साहानंतर बाजूला पडलं ते.

क्रेझी's picture

27 Apr 2016 - 9:51 am | क्रेझी

मी तर चुकुनही कोणालाच माझ्याकडची पुस्तकं देत नाही पण, घरी आलेली मंडळी जेंव्हा पुस्कातकांना हातात घेतात तेंव्हा तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था होते खासकरून, सासरची असतील तर!!

चायला उत्सहावर पाणी फेरलत:)

रिसेल ला विकतय का कोण ;)

पिवळा डांबिस's picture

27 Apr 2016 - 9:58 am | पिवळा डांबिस

चायला उत्सहावर पाणी फेरलत:)

तुझे पैशे वाचवले त्याचं काहीच नाही!!!
:)

जेपी's picture

27 Apr 2016 - 9:58 am | जेपी

मस्त लेख..

प्रीत-मोहर's picture

27 Apr 2016 - 12:29 pm | प्रीत-मोहर

मस्त टिप्स. मितानतैशी सहमत. मला तर पुस्तक चोरीचाही अनुभव आहे. म्हणजे मी कुणाची चोरली नाहीत पण माझी पुस्तक चोरली गेली. तेव्हा एखाद्या खजिन्यातल्या हिर्‍यांसारखी जपून ठेवते मी पुस्तकं, कड्या कुलपात.

मी फक्त माझ्या मावशीसोबत पुस्तक शेअर करते. तिनीच आवड लावली होती मला वाचनाची. :) तिची पुस्तक वाचायला आणते, अर्थात परतही करते

पूर्वाविवेक's picture

28 Apr 2016 - 10:00 am | पूर्वाविवेक

आमच्याकडीलही बरीच पुस्तके चोरीला गेलीत. चोर कोण आहे हे माहित असूनही दाद मागायची सोय नही. आता कुणालाही दिसणार नाहीत अश्या ठिकाणी ठेवली आहेत. मग कुणालाही वाटो की 'क्या आपके घरमे किताबे नही है' (क्या आपके टूथपेस्टमे नमक नही है ?....या चालीवर.)

मधुरा देशपांडे's picture

27 Apr 2016 - 1:38 pm | मधुरा देशपांडे

छान संकलन आणि माहिती.

पैसा's picture

27 Apr 2016 - 2:18 pm | पैसा

छान संकलन. पुस्तके कधीच कोणाला देऊ नयेत. ती परत मिळत नाहीत हे एक आणि त्या लोकांकडून हरवली किंवा खराब झाली तरी त्यांना त्याचं काही नसतं. हे जास्त वाईट.

नूतन सावंत's picture

27 Apr 2016 - 7:15 pm | नूतन सावंत

ती परत मिळत नाहीत हे एक आणि त्या लोकांकडून हरवली किंवा खराब झाली तरी त्यांना त्याचं काही नसतं. हे जास्त वाईट.

त्यांना त्याचं काहीच वाटत नसतं म्हणून तर त्यांच्याकडून ती हरवतात किंवा खराब होतात ग पैताई.

छान माहिती. या सर्व संज्ञांना बहुतेक मराठी प्रतिशब्द आहेत. ते कुणाला माहीत असल्यास जरूर सांगावेत.

सर्वात महत्वाचं म्हणजे बेग बॉरो स्टील सम्प्रदायातील स्टीलवाल्यांपासून सावध रहावे.

नाखु's picture

27 Apr 2016 - 4:48 pm | नाखु

सुंदर माहीती संकलन...

कमी परंतु फक्त स्वतःची, (वेळ प्रसंगी वाचनालयाची) पुस्तके वाचणारा उधारीबंद नाखु पुस्तकार

त्रिवेणी's picture

27 Apr 2016 - 6:06 pm | त्रिवेणी

छान संकलन झालाय.

इडली डोसा's picture

27 Apr 2016 - 9:33 pm | इडली डोसा

बुक अँब्युलन्सची कल्पना आवडली...

विषेश टीपः ज्यांना किंडल नको असेल त्यांनी कृपया आमच्या सारख्यांना दान करावा. प्रवासात नेण्यासाठी उत्तम आहे, आमची लायब्रारी किंडलवर पुस्तकं लोन करते. घरबसल्या कोणतेही पुस्तकं वाचता येते. शिवाय चालत्या गाडीत, जास्त कमी उ़जेडात वाचताना डोळ्यावर ताण येत नाही. आपल्या कडची पिडिएफ पुसतके पण किंडल मधे टाकता येतात आणि एका वेळी हाजारो पुस्तकं ह्या छोट्याश्या किंडल मधे मावतात.

आमच्याकडे एक किंडल पेपरव्हाईट आहे आणि त्याचा आत्तापर्यंत घरी असताना आणि प्रवासातही प्रचंड वापर झाला आहे. एकदम पैसे वसुल. त्यामुळे जे घ्यायचा विचार करत आहेत अश्यांनी आपण नक्की कुठे आणि कसा वापर करणार आहोत याचा विचार करुन घ्यावा.

किलमाऊस्की's picture

12 May 2016 - 11:55 pm | किलमाऊस्की

जे घ्यायचा विचार करत आहेत अश्यांनी आपण नक्की कुठे आणि कसा वापर करणार आहोत याचा विचार करुन घ्यावा.

+ १. माझ्या किंडलला वर्ष होईल. पैसा वसूल आहे.

पूर्वाविवेक's picture

28 Apr 2016 - 10:03 am | पूर्वाविवेक

संकलन उत्तम. छान माहिती दिलीये.

विजय पुरोहित's picture

28 Apr 2016 - 6:44 pm | विजय पुरोहित

छान माहिती व सूचना...

जुइ's picture

8 May 2016 - 3:03 am | जुइ

विशेष करून बुक अँब्युलन्सची कल्पना आवडली.

पिशी अबोली's picture

12 May 2016 - 1:29 pm | पिशी अबोली

छान माहिती.

किंडल मलाही घ्यायचाय. क्रेझ आहे किंडलची. किंडलवर पुस्तक वाचणार्‍याचा मला फार हेवा वाटतो..
माझ्या एका पुस्तक चुकूनही हातात न घेणार्‍या मित्राला वाचनाची आवड किंडलने लावली. त्यामुळे किंडल या प्रकाराबद्दल एकूणच खूप चांगलं मत आहे.