रंडीबाज कवी

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जे न देखे रवी...
20 Mar 2016 - 11:30 am

काल मी माझ्या कविता एका पोत्यात भरुन टाकल्या
पोत्यात भरता भरता काही मधल्यामध्येच फाटल्या

'तुझ्या'वरच्या कविता मात्र एक एक करुन कापल्या
घरामागे शेकोटी करुन मग त्यात काही फेकल्या

'रंडी'वरच्या कविता मात्र पुन्हा पुन्हा वाचल्या
घडी घालून त्यांना मग पोत्यातच घातल्या

तरीही काही कागद उडतच राहीले
अर्धे मुर्धे जळालेले तुकडे फिरतच राहीले
काही आभाळी जाऊन पुन्हा खाली झरतच राहीले
तर काही राख होऊन वेदनांना कुरवाळत मरतच राहीले

अजूनही काही कविता या पोत्यात सडतच आहेत
एक 'ही' सोडली तर बाकी सगळ्या रडतच आहेत

तुझ्या कवितांवर मी डाव साधला आहे
तिरमिरीत का होईना पण एक घाव घातला आहे

होरपळलेल्या मनाने अजून एक निर्णय घ्यायचा आहे
या रंडीच्या कवितांचाही असाच एक घोट प्यायचा आहे

- जव्हेरगंज
[औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह]

जिलबीमुक्त कविताकवितासाहित्यिक

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

20 Mar 2016 - 11:55 am | अभ्या..

जव्हेरभाऊ,
गजाआड राहती का वो कविता कधी?
दोन पापण्यातून जळणारी ती,
दोन व्हटात कुचंबलेली ती,
दोन हातात बांधलेली ती,
अडकती का वो कधी दोन गजात?

चांदणे संदीप's picture

20 Mar 2016 - 12:34 pm | चांदणे संदीप

जव्हेरभाऊ, ही कविता 'गजाआडच्या कविता' या कवितासंग्रहातून घेतलेली आहे का त्यावरून प्रेरणा घेऊन तुम्हीच लिहिली आहे?
.
.
.
जो भी हो.... लिहिलंय परिणामकारक!

Sandy

जव्हेरगंज's picture

20 Mar 2016 - 12:41 pm | जव्हेरगंज

काल त्यातल्या दोन चार कविता वाचल्या.
पण त्यातून प्रेरित होऊन फक्त शेवटची ओळ ' [औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह]' तेवढीच घेतली आहे! बाकी तसा काही संबंध नाही.

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Mar 2016 - 12:36 pm | ज्ञानोबाचे पैजार

साली ही कविता कागदावरच्या शब्दांपुरती मर्यादित असती तर बरे झाले असते.
जिवापाड जपलेला कागद केव्हाही फेकता येतो
जाळता येतो फाडता येतो चुरगळता येतो
हरवला तर पुन्हा एकदा आठवुन लिहिता येतो
त्यावर लिहिलेल्या कवितेचे मात्र दुर्दैवाने तसे नसते .
या तुरुंगातुन सुटका नाही
ही जन्मठेप आहे
(अंधारकोठडी मध्ये जन्मठेप भोगणारा) पैजारबुवा,

रातराणी's picture

20 Mar 2016 - 11:58 pm | रातराणी

सहमत.

स्पा's picture

20 Mar 2016 - 12:46 pm | स्पा

जे ब्बात

स्पा's picture

20 Mar 2016 - 12:47 pm | स्पा

जे ब्बात

अत्रुप्त आत्मा's picture

20 Mar 2016 - 2:12 pm | अत्रुप्त आत्मा

जबय्रा!

चाणक्य's picture

20 Mar 2016 - 2:16 pm | चाणक्य

.

निनाव's picture

16 Sep 2016 - 11:07 pm | निनाव

जब्ब्बर्दस्स्स्स्त्त!!!!
आज सर्व जुन्या पोस्त वाचतो आहे.. इतके दिवस न येण्याची खन्त आहे. खूप सुन्दर कविता सुट्ल्या ..