कोकण दर्शन

जानु's picture
जानु in भटकंती
11 Mar 2016 - 3:29 pm

मला सहकुटुंब, सहपरिवार होळीच्या वेळेस कोकण पाहावयाचा आहे. दोन दिवस निवांत राहणे व शक्यतो एकाच ठिकाणी निवास असा विचार आहे. मागे गविंनी यावर एक छान टुर सांगितला होता. मला लिंक द्या. किंवा कोणास निवांत आणि शांत जागा माहित असेल तर सांगा. मुळात होळीला कोकणात जावे का हा मुळ प्रश्न आहे. या व्यतिरिक्त कोणती वेगळी जागा असेल समुद्रकिनारा सोडुन तरी चालेल. तीन जोड्या चार मुले असा लवाजमा आहे. मुख्य म्हणजे शुध्द शाकाहरी हे लक्षात असु द्यावे ही कळकळीची विनंती.

प्रतिक्रिया

अलिबाग मध्ये फारस कोणास ठाऊक नसलेला पण सुरेख आणि नितांतसुंदर समुद्रकिनारा म्हणजे नांदगावचा समुद्रकिनारा.
हा किनारा काशिद आणि मुरुड-जंजिरा यांच्यामध्ये आहे. काशिदहून जंजिराकडे जाताना वाटेत नांदगाव आहे. गावात श्री सिद्धिविनायकाचे सुरेख मंदिर आहे. मंदिराजवळच राहण्याची उत्तम सोय होऊ शकते. राहण्याची सोय (तांबडकर - ९४२२३५९०२८)
घरगुती राहण्याची व्यवस्था होऊ शक्ते. किनारा अत्यंत शांत आणि गजबजाटापासून दूर आहे.
खर्याखुर्या अस्सल कोकणाची अनुभूती इथे मिळते. नांदगावचा समुद्रकिनारा खूपच सुरक्षित आहे. खोलवर चालत जाता येते. कुटुंबासाठी अगदी योग्य जागा आहे. कारण इथे गर्दी अजिबात नसते .

कोकणातली होळी कशी साजरी करतात वगैरे अगोदर लेख आला असेल तल लिंक द्या.नसेल तर तिकडच्या कोणितरी लिहा.फोटू नवीन हवेत.