Skip to main content

अफझल गुरू : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 06/03/2016 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
दहशतवादाच्या आरोपावरून फाशीची शिक्षा झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतीही कटुता न बाळगता संयमितपणे, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती समर्पक उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल. Afzal Guru’s last interview यापूर्वी त्याचा आजतक वर डिसेंबर २००१ मध्ये घेतलेला इंटरव्यू तितकाच सादगीपूर्ण आहे. तो पाहिल्यावर त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो. त्याच्या वरचे चार्जेस न्यायालयात सिद्ध झाले असल्याने असल्यानं सध्या त्यावर काही भाष्य करता येणार नाही, पण या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते.

वाचने 65946
प्रतिक्रिया 339

प्रतिक्रिया

भले!

मला मोदीभक्तांच कायम कौतुक वाटतं ते ह्याच कारणासाठी. जो त्यांच्या विरोधी तो देशद्रोही (इथे अफजल गुरु!). आणि नेमकं हेच तर कन्हैया सांगतोयं, `सत्ताद्रोह आणि देशद्रोह यात फरक आहे. आम्हाला भारतापासून स्वातंत्र्य नको तर भारतात स्वातंत्र्य हवंय'. तुम्ही तर इथले आद्यभक्त आहात. त्यामुळे तुमची मतं म्हणजे बिजेपीची विचारसरणीचं एकदम सहीसही प्रदर्शन आहे. कन्हैयाचा मुद्दा तुम्ही ही पोस्ट टाकून बरोब्बर पटवून दिलायं.

In reply to by विवेक ठाकूर

अफझल गुरूला मोदींना विरोध केल्याबद्दल फाशी झाली आणि मोदींना विरोध केल्यामुळे त्याला मोदीभक्त देशद्रोही म्हणतात हा नवीन शोध लावल्याबद्दल धन्यवाद! मला मोदीद्वेष्ट्यांचं कायम कौतुक वाटतं ते ह्याच कारणासाठी. तुम्ही इथले आद्यमोदीद्वेषी आहात. त्यामुळे तुमची मतं म्हणजे बिजेपीविरोधी विचारसरणीचं एकदम सहीसही प्रदर्शन आहे. कन्हैयाच्या समर्थनार्थ धागा काढून तुम्ही ते बरोब्बर पटवून दिलायं.
नेमकं हेच तर कन्हैया सांगतोयं, `सत्ताद्रोह आणि देशद्रोह यात फरक आहे. आम्हाला भारतापासून स्वातंत्र्य नको तर भारतात स्वातंत्र्य हवंय'.
हे तो तुरूंगात २० दिवस राहून आल्यावर सांगतोय. त्याच्याआधी तो काय सांगत होता तेही जरा सांगा. आणि जर त्याला भारतात स्वातंत्र्य नसतं तर असे देशद्रोही कार्यक्रम करणे, देशद्रोही घोषणा देणे, इ. गोष्टी करता आल्या असत्या का?

In reply to by श्रीगुरुजी

हेच तो पहिल्यापासून सांगतोयं. अफझल गुरूला मोदींना विरोध केल्याबद्दल फाशी झाली आणि मोदींना विरोध केल्यामुळे त्याला मोदीभक्त देशद्रोही म्हणतात हा नवीन शोध लावल्याबद्दल धन्यवाद! पहिला शोध तुमचा आहे आणि दुसरी वस्तुस्थिती आहे, ती तुम्हीच हा धागा काढून दाखवून दिली आहे. आता दोन गोष्ट करा. भाषा स्वतःची वापरा नाही तर सतत प्रॉब्लममधे याल आणि लगबगीनं हा धागा काढायची विनंती संपादकांना करु नका. बिजेपीचे भक्त देशद्रोह आणि सत्ताद्रोह कसा एक करतात हे लोकांना कळू द्या. तुम्ही एकदम भारी काम केलंय.

In reply to by विवेक ठाकूर

पहिला शोध तुमचा आहे आणि दुसरी वस्तुस्थिती आहे, ती तुम्हीच हा धागा काढून दाखवून दिली आहे.
मी असले अतर्क्य शोध लावत नसतो. हा शोध तुमचाच आहे. "मला मोदीभक्तांच कायम कौतुक वाटतं ते ह्याच कारणासाठी. जो त्यांच्या विरोधी तो देशद्रोही (इथे अफजल गुरु!)." म्हणजे अफझल गुरू मोदीभक्तांना देशद्रोही वाटतो कारण तो त्यांच्या विरोधात होता, असा स्पष्ट अर्थ तुमच्या वरील वाक्यातून आहे. न्यायालयाने मात्र त्याला दहशतवादी हल्ल्याबद्दल शिक्षा दिली होती. पण तुमचा अतर्क्य शोध वेगळेच सांगतो.
आता दोन गोष्ट करा. भाषा स्वतःची वापरा नाही तर सतत प्रॉब्लममधे याल आणि लगबगीनं हा धागा काढायची विनंती संपादकांना करु नका. बिजेपीचे भक्त देशद्रोह आणि सत्ताद्रोह कसा एक करतात हे लोकांना कळू द्या. तुम्ही एकदम भारी काम केलंय.
मी कुठल्या प्रॉब्लेममध्ये आलोय? याचाही काही अतर्क्य शोध लागला असेल तर मला सांगा. आणि धागा काढायला मी कशाला संपादकांना विनंती करू? कशासाठी धागा काढायचा? उगाच स्वप्नरंजन करू नका. बीजेपीद्वेष्टे बीजेपीविरोधाकरीता कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि देशद्रोह्यांच्या कसे पाठीशी उभे राहतात हे लोकांना दिसत आहेच (अफझल गुरूच्या खटल्यावर संशय, इशरत जहांला निष्पाप ठरविणे, जेएनयूमधील देशद्रोही घोषणांना पाठिंबा, अफझल गुरू/हफिझ सईद्/लादेन इ. चा आदरार्थी उल्लेख इ.). तुमाच्यासारख्या बीजेपीद्वेष्ट्यांनी देशद्रोह्यांना पाठिंबा देणारा धागा काढून तुम्ही पण एकदम भारी काम केलंय.

In reply to by श्रीगुरुजी

आणि अफजल आणि कन्हैयाच्या प्राजंळपणाचा आगाध संबंध जोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. किमान आपण काय लिहीतो याचं तरी भान ठेवा म्हणजे पुन्हा हसं होणार नाही. मला मोदीभक्तांच कायम कौतुक वाटतं ते ह्याच कारणासाठी. जो त्यांच्या विरोधी तो देशद्रोही (इथे अफजल गुरु!) याचा `अफजल गुरु देशद्रोही नाही' इतका विद्वत्तापूर्ण अर्थ तुम्हीच काढू शकता. आणि शेवटी पुन्हा लाईनवर येऊन अंतस्थ हेतू स्पष्ट केलायं! पाहा : बीजेपीद्वेष्टे बीजेपीविरोधाकरीता कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि देशद्रोह्यांच्या कसे पाठीशी उभे राहतात हे लोकांना दिसत आहेच (अफझल गुरूच्या खटल्यावर संशय, इशरत जहांला निष्पाप ठरविणे, जेएनयूमधील देशद्रोही घोषणांना पाठिंबा, अफझल गुरू/हफिझ सईद्/लादेन इ. चा आदरार्थी उल्लेख इ.). माझ्या कोणत्याही धाग्यात किंवा प्रतिसादात मी असं काहीही म्हटलेलं नाही. पण तुमचे विचार इतके एकांगी झालेत की तुमच्या डोक्यात सतत तेच घोळत असतात आणि मग ते कुठेही पुन्हा चिटकवले की झाली भक्तीपूर्ण !

In reply to by विवेक ठाकूर

मी श्रीगुरुजींना विनंती करतो की त्यांनी या महावाक्यावर एक धागा काढून विवेचन करावे. एकाच वेळी पूरक आणि विरोधी अर्थ वाक्य निघणारे हे वाक्य "तत्वमसि" या महावाक्यापेक्षा काकणभरदेखील कमी भरणार नाही. तस्मात या वाक्याचे धागामूल्य लक्षात घेऊन एक लेख लिहिण्यात यावा. खरी ही विनंती विठांना करायला हवी होती, पण ते पूर्वजन्मीचे निराकार असल्यामुळे या जन्मात ते अशी वाक्ये किती गांभीर्याने घेत असतील याची कल्पना नाही

In reply to by आनन्दा

हे ते वाक्य -
मला मोदीभक्तांच कायम कौतुक वाटतं ते ह्याच कारणासाठी. जो त्यांच्या विरोधी तो देशद्रोही (इथे अफजल गुरु!)

In reply to by विवेक ठाकूर

आणि अफजल आणि कन्हैयाच्या प्राजंळपणाचा आगाध संबंध जोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. किमान आपण काय लिहीतो याचं तरी भान ठेवा म्हणजे पुन्हा हसं होणार नाही.
प्रांजळपणा! हहपुवा. तुमचंच सर्वत्र हसं होतंय. मोदी व भाजपद्वेषाने अंध झाल्यामुळे आपण काय लिहितोय तेच तुम्हाला समजत नाहीय्ये.
याचा `अफजल गुरु देशद्रोही नाही' इतका विद्वत्तापूर्ण अर्थ तुम्हीच काढू शकता.
तुमच्या पहिल्या प्रतिसादातले हे वाक्य सोयिस्कररित्या विसरलात की काय. "मला मोदीभक्तांच कायम कौतुक वाटतं ते ह्याच कारणासाठी. जो त्यांच्या विरोधी तो देशद्रोही (इथे अफजल गुरु!). " अगदी बालवाडीतल्या मुलाला सुद्धा या वाक्याचा अर्थ विचारला तरी 'अफझल गुरू मोदींच्या विरोधी असल्याने तो मोदीभक्तांना देशद्रोही वाटतो' ते हाच अर्थ काढतील.
माझ्या कोणत्याही धाग्यात किंवा प्रतिसादात मी असं काहीही म्हटलेलं नाही. पण तुमचे विचार इतके एकांगी झालेत की तुमच्या डोक्यात सतत तेच घोळत असतात आणि मग ते कुठेही पुन्हा चिटकवले की झाली भक्तीपूर्ण !
पुन्हा तेच. आधीच्या प्रतिसादातील वाक्ये विसरलात की काय? माझे विचार जर एकांगी असतील तर तुमचे विचारही तसेच आहेत. सतत मोदीद्वेष, भाजपद्वेष मस्तिष्कात भिनल्यामुळे तुम्हाला आता देशद्रोह्यांचंही कौतुक वाटायला लागलंय. तुम्ही पूर्वी मोदीद्वेषपूर्तीसाठी केजरीवाल नावाचं झाड धरलं होतं. पण ते वठलेलं निघालं. म्हणून आता कन्हैय्या नावाचं नवीन झाड धरलंत. झाड कितीही विषारी असलं तरी तुम्हाला ते चालतं कारण ते पकडून मोदीद्वेषाची तल्लफ भागते.

In reply to by श्रीगुरुजी

हेच जर तुम्हाला कळत नसेल तर तुमच्या विचारांचा आणि लेखनाचा संबंध संपलायं .

In reply to by विवेक ठाकूर

आणि स्वाभिमानाचा संबंध संपलाय तसंच ना? अजून किती अपमान करुन घेणार तुम्ही? कुणीतरी चपला द्या रे यांना! बघवत नाही यांची ही दयनीय अवस्था!

In reply to by श्री गावसेना प्रमुख

म्हणजे आतापर्यंतचे तुमचे प्रतिसाद आणि एकूण विचारसरणी किती सखोल आहे याची कल्पना आली.

In reply to by विवेक ठाकूर

ब्वा आम्ही सरळ सरळ मोदींची बाजू घेतो आणि त्यात बिलकुल लाज बाळगत नाही, मोदींनी काही घातक निर्णय घेतले असतील भ्रष्टाचारी असतील तर ते सांगा नुसते मोदी मोदी कराल तर त्यात त्यांचा प्रचारच होणार आहे।

In reply to by श्री गावसेना प्रमुख

अफझल गुरूला संसदेवरील हल्ल्यातील सहभागामुळे शिक्षा झालेली नसून मोदींना व भाजपला विरोध केल्यामुळे शिक्षा झाली हा जावईशोध अजून तुमच्यापर्यंत आला नाही का?

काय विवेक ठाकूर तुम्ही एवढेच सांगा की अफजल गुरु देशद्रोही आहे की नाही .

In reply to by viraj thale

आणि खरं तर तो मुद्दाच नाही. पण लेखकानं माझी सगळी पोस्ट जशीच्या तशी कॉपी-पेस्ट मारुन, त्याच्या विडिओचा संबंध कन्हैयाच्या प्रांजळपणाशी जोडलायं हे तुमच्या लक्षात आलं की नाही हा मुद्दा आहे !

In reply to by विवेक ठाकूर

अफजल गुरु ने संसदे वर हल्ला केला हा तितकासा महत्वाचा मुद्दा नाही किंबहुना हा काही गंभीर गुन्हा नाही. महत्वाचा मुद्दा हा आहे कि धागा कर्त्याने कॉपी-पेस्ट मारुन धागा काढला...हा गंभीर गुन्हा आणि देशद्रोह आहे... ह्या गुन्ह्या बद्दल धागा कर्त्याला फाशी देण्यात यावी. अशी नम्र इनंती !!!

ते माझ्या कधीच लक्षात आले .

((वरील सर्व वाचून मी मा़हे आपले मत मांडतो. कुणालाहि आवडणार नाही, त्यामुळे कुणीच प्रतिसाद देणार नाहीत, नि भांडणे होणार नाहीत. फक्त एक दोन दिवस मला शिव्या घालाल नि परत आपले मोदी वगैरेंच्या मागे लागाल. जरा गंभीरपणा कमी करायला थोडी गंमत. लहान मुले पाहिली की त्यांच्यात खेळावेसे वाटते. )) पण मी म्हणतो इथल्या वादाला मुद्दाच असायला पहिजे असे थोडेच आहे? शिवाय जे ऐकले, वाचले ते खरेच असायला पाहिजे असेहि नाही. आपण आपले नुसते एकाने अरे म्हंटले की आपण का रे म्हणायचे नि शेवटी एकमेकांना मोदीभक्त किंवा मोदीविरुधी ठरवायचे. मा़झ्यासारखे निरुद्योगी लोक जगात अनेक! येतीलच दोन्ही बा़जूंनी भांडायला, नि आणखी काहीतरी खरे खोटे पुढे आणायला. मागे एकदा सोहिरा नावाचे संत म्हणून गेले होते (ऐका यू ट्यूबवर - जितेंद्र आभिषेकी) - विवेकाची ठरेल ओल, ऐसे बोलावे बोल आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे पण काय, वय नि शरीर वाढले तरी अक्कल दोन वर्षाच्या मुलाइतकी - काय फरक पडतो, चिखल असला तरी? त्यातहि खेळण्यात गंमतच वाटते. रामदास स्वामी म्हणून गेले आहेत - उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करायला मग काय चिखलात यथेच्छ खेळावे, स्नान करावे, नि संध्येला इतर द्र्व्याची आचमने घेत बसावे. म्हणजे पाण्याची बचत केली असे म्हणता येते, मग दुसर्‍या दिवशी पुन्हा वाद! असे म्हणतात - Argument is exchange of ignorance, discussion is exchange of information. पण यार, Argument मधे जो मझा है, लुत्फ का असले काहीतरी आहे वो discussion मे कहां! ऐ कंबख्त, तूने Argument कियाहि नही! जियो मेरे लाल!

मला दहशतवादी किंवा गेला बाजारी नक्षलवादी व्हायच होत. पण बापुस पेकाडात लाथ घालील"पोट्या या साठी जलम दिला का ?,गप मिळतय ते गिळा" अश्यातरेने एक दहशतवादी जन्मायच्या आधी गेला.. (विडंबन आहे)

मला मोदीभक्तांच कायम कौतुक वाटतं ते ह्याच कारणासाठी. जो त्यांच्या विरोधी तो देशद्रोही (इथे अफजल गुरु!). यूह नीड अ सायकिअ‍ॅट्रीस्ट.

In reply to by प्रचेतस

का का आता का ? मागे आम्ही यानावालां चे धागे वात आणतात असे म्हणालो होतो तर 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' किव्वा 'धर्म हि वैयक्तिक बाब नसून सार्वजनिक बाब असल्याने त्यावर यथेच्छ टीका करता येते' वगैरे किती समर्थन केले होते। इथेही तोच तर्क वापरा कि। देश ही देखील सार्वजनिक बाब आहे , वैयक्तिक नव्हे, त्यामुळे कन्हैय्या कुमार ला अफजल ना मांडू द्या की त्यांचे मत। अन मिपावरही होऊद्या काथ्याकूट !! गुरुजी , संक्षी तुम आज बढो , हम तुम्हारे साथ (नही) है। हमे चाहिये आजादी , मिसळपाव में आजादी दुहेरी तर्क वापरानारोंे से आजादी । लल्लल्लल्लऊऊऊ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ

In reply to by प्रसाद गोडबोले

कुणालाही कशावरही, कसेही आणि कुठेही अभिव्यक्त होण्याचा अधिकार "मिपा"सदस्यत्व मिळाल्याबरोबरच प्राप्त होतो तस्मात अता "गाळगळचेपी" करू नये अन्यथा आम्ही निषेध व्यक्त करू. सगळ्या अज्ञ मिपाकरांना ज्ञानाम्रुत पाजण्याचे पुण्यकर्म करणार्या यना ते गुणा (व्हाया विठा) यांचा असा संकोच कसा करवतो याचे आम्हाला फार फार आशचर्य वाटते आणि तेही माजी संपादकाकडून !!! हन्त हन्त अता पुन्हा भांडे वाचन करावे लागणार तुम्हाला प्रायश्चेत्त म्हणून. अखिल मिपा सुटक तुटक मटक चटक घटक वाचक संघ

In reply to by नाखु

ज्ञानाम्रुत नीट लिहा हो नाखुसाहेब... त्यातला र् चुकीचा आहे त्याबद्दल तक्रार नाही (तो तुमचा प्रकटीकरण हक्क आहे) पण सहजपणे दिसत नाहीय त्याचे काय ?!

In reply to by आनन्दा

वास्तविक अफझल गुरु लेखातल्या मुलाखतीत प्रांजळपणे खरं तेच (त्याचा अतिरेकी कारवायांत असलेला सहभाग) स्पष्टपणे सांगत आहे ! मात्र त्याचे पाठीराखे त्याचेच बोलणे खोटे आहे असे म्हणत आहेत ! =)) =)) =)) खरं बघायचं तर कम्युनिस्ट व इस्लामिक टेररिस्ट यांची युती (भारतात आणि जगात इतर कोठेही) प्रचंड विरोधाभासी आणि स्वार्थी ढोंगीपणा आहे. कारण, कम्युनिझम "धर्म ही अफूची गोळी आहे" असे ठासून म्हणतो आणि इस्लाममधे धर्माबाबत असे काही म्हणणे हा मृत्युदंडयोग्य गुन्हा आहे !!! थोडक्यात, निदान या मुलाखतीत अफझल गुरु प्रांजळ आहे आणि त्याकडे डोळेझाक करणारे त्याचे समर्थक तद्दन ढोंगी आहेत !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

च्यामारि हेच सकाळपासून शोधत होतो. डावे आणि मुस्लिम युति यासारखा विनोद नसेल दुनियेत! मकबूल बट, अफझल गुरु आणि मार्क्स वर डोक्यावर हात मारून घेत असतील. इथे मुस्लिम काश्मिरिना बोलत आहे नाहीतर ठाकुर साहेब डोक्यावर हात मारून घेतील. काश्मीरमधील मुस्लिमच आझादी मागत आहेत ना वो ठाकुरजी? का काश्मिरी पंडित यामागे आहेत? कोंग्रेस आणि डावे, लालू आणि नितिशकुमार , लय भारी बाबा. आईशप्पथ तो खालिद उमर सच्चा म्हटला पाहिजे , आपण बोललो हे कबुल करतो तो, कन्हैया सारखा टोप्या नाही फिरवत तो!

In reply to by भंकस बाबा

डावे आणि मुस्लिमच कशाला, आता आंबेडकरवादीही ओढल्या जात आहेत. ह्या तिघांची युती म्हणजे आत्मघात आहे. हे फक्त हिंदुत्ववादी विचार रोखण्यासाठी असेल तर हजार टक्के आत्मघात असेल. संघाविरुद्धची ही मोर्चेबांधणी देशासाठी घातक आहे. भारतीयांनी वेळीच सावरले पाहिजे. गरिबी, भुखमरी, जातिवाद इत्यादी समस्या आहेत हे खरे असले तरी त्यांच्या नावाने बासरी वाजवत सगळे उंदीर भलतीकडेच नेले जातील. आत्ताच सावध होणे आवश्यक. - (देशप्रेम ही सर्वोच्च नशा मानणारा) तर्राट जोकर.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

खरं बघायचं तर कम्युनिस्ट व इस्लामिक टेररिस्ट यांची युती (भारतात आणि जगात इतर कोठेही) प्रचंड विरोधाभासी आणि स्वार्थी ढोंगीपणा आहे. कारण, कम्युनिझम "धर्म ही अफूची गोळी आहे" असे ठासून म्हणतो आणि इस्लाममधे धर्माबाबत असे काही म्हणणे हा मृत्युदंडयोग्य गुन्हा आहे !!!
प्रचंड सहमत आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

यात फरक करता येत नसेल तर तो वैचारिक दुष्काळाचा परिपाक म्हणायला लागेल !

In reply to by विवेक ठाकूर

अफजलचा देशद्रोहीपणा आणि कन्हैयाचा देशद्रोहीपणा यातील साम्य लक्षात येत नसेल तर ती वैचारिक दिवाळखोरी म्हणायला लागेल !

In reply to by श्रीगुरुजी

एकुण प्रकार अंतु बर्वा स्टाईलचाच आहे आपण सोडुन कोणी विचार करायला लागला की (वैचारीक) दिवाळखोरीचा अर्ज मागवुन ठेव म्हणावं !! (कृपया ह घे) :)

सोलापूरात कामगारांचे गांव असल्याने आधीपासून कम्युनिस्ट पक्षाचा जोर आहे. एक आमदार पण होता. त्यामुळे गावात लालबावट्याचे काहीनाकाही सतत चालू असते. रोहीत वेमुला प्रकरणावेळी (त्यावेळी कन्हैया प्रकरण नव्हते उद्भवलेले) त्यांचे धरणे सभा चालू होत्या. काही विचित्र कारणाने मला ती भाषणे तासभर ऐकावी लागली. जी वेगवेगळी कारणे सांगून देशाची अराजक परिस्थिती सांगितली जात होती ते सारेच हास्यास्पद वाटत होते. समोर बसलेल्या तीस चाळीस भाडोत्री श्रोत्यांना काही कळत होते का नाही कुणास ठौक. आंबेडकर, मुस्लीम अन कम्युनिस्ट असा त्रिवेणी संगमाचे विचार ऐकून त्याच वेळी धन्य झालो. आता त्याची सुधारीत आवृत्ती कन्हैय्या प्रकरणात दिसतेय.

In reply to by अभ्या..

आंबेडकर, मुस्लीम अन कम्युनिस्ट असा त्रिवेणी संगमाचे विचार ऐकून त्याच वेळी धन्य झालो.
पॉलिटिक्स मेक्स स्ट्रेंज बेडफेलोज. म्हणजे आता तुम्हाला हे कळतंय हे ठीक आहे. पण आम व्होटरला हे समजलं पाहिजे ना! त्यांना ही कडबोळी आवडली तर? आता १९७७ च्या निवडणुकीच्या वेळी जनसंघ आणि समाजवादी आणि इतर कोणकोण एकत्र आलेले होते. तेव्हा काय झालं? दिलंन निवडून लोकांनी जनता पार्टी म्हणून. बिहारमध्ये लालू आणि नितीश एकत्र आले. काश्मीरमध्ये भाजपा आणि पीडीपी. पॉलिटिक्समध्ये कोणीच कोणाचं शत्रू नसतं. आपल्या विरुद्धपक्षांना एकत्र येण्याची संधी देणं हीच राजकारणातली हार असते. नंतर 'आमची भरपूर शक्ती होती, पण ते हरामखोर शत्रू एकत्र आले म्हणून हरलो' या रडगाण्याला फारसा अर्थ नसतो.

In reply to by राजेश घासकडवी

पॉलिटिक्स मेक्स स्ट्रेंज बेडफेलोज.... आता १९७७ च्या निवडणुकीच्या वेळी जनसंघ आणि समाजवादी आणि इतर कोणकोण एकत्र आलेले होते. बिहारमध्ये लालू आणि नितीश एकत्र आले. काश्मीरमध्ये भाजपा आणि पीडीपी. विरोधी असून आदर ठेवत किमान ध्येयात समानता ठेवत एकमेकांबद्दल आदर असणे आणि त्याउल्ट केवळ स्वतःच्या वैयक्तीक स्वार्थासाठी एकत्र येत राजकीय शैय्यासोबत करणे, यात फरक आहे. यातील लालू आणि नितीश यांचे एकत्र येणे अथवा अगदी भाजपालाच नावे ठेवायची असतील तर, नितीश आणि भाजपाचे आधी एकत्र येणे हे एकवेळ स्ट्रेंज बेडफेलोजची उदाहरणे आहेत असे म्हणता येईल. १९७७ साली आणिबाणी नंतर "इंदिरा इज इंडीया" या मानसिकतेपासून जर देशाला बाहेर काढायचे असले तर त्याला सर्व विरोधकांनी पर्याय नव्हता. तेच आत्ता भाजपा आणि पीडीपी संदर्भात... कोणत्याच एका पक्षाचे सरकार येणे शक्य नव्हते. एकतर काँग्रेस + पिडीपी + नॅशनल कॉन्फरन्स असा पर्याय होता. पण त्याला दोन्ही प्रमुख काश्मिरी पक्षांचा विरोध असल्याने ते शक्य नव्हते. दुसरा पर्याय हा पिडीपी + भाजपा इतकाच होता. तो जर मान्य नसता तर परत निवडणुका होई पर्यंत राष्ट्रपती राजवट आणावी लागली असती, जी कुणालाच नको होती. त्यात परत जम्मू०काश्मीरच्या निवडणुका या दर सहा वर्षांनी होतात. त्यामुळे अधिकच पेच होता. अशा वेळेस समान कार्यक्रम मान्य करत, इतर मुद्यांना बाजूला सारत प्रशासन देण्यात काही चुकलेच नाही. किंबहूना मेहबुबा मुफ्तींनी पण हाच मार्ग मान्य केला तर त्यातून एक चांगलाच इतिहास घडू शकेल... पॉलिटिक्समध्ये कोणीच कोणाचं शत्रू नसतं. आपल्या विरुद्धपक्षांना एकत्र येण्याची संधी देणं हीच राजकारणातली हार असते. यातील दुसर्‍या वाक्याशी पूर्ण सहमत! मात्र "पॉलिटिक्समध्ये कोणीच कोणाचं शत्रू नसतं" या संदर्भात, म्हणावेसे वाटते की भारताच्या बाबतीत, पॉलीटीकल पार्टीज् नी विरुध्द टोके गाठलेली आहेत - एकतर विचारसरणींमुळे (भाजपा - कम्युनिस्ट) अथवा आचारसरणींमुळे (काँग्रेस आणि त्यातून निघालेले इतर पक्ष). मोदी आवडोत अथवा न आवडोत, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. वास्तवीक मला व्यक्तीगत अशा पद्धतीने कुठल्याच राजकीय व्यक्तीबद्दल १००% बाजू घेऊन अथवा विरोधात बोलायला आवडत नाही. सगळे समविचारी नसावेत असे माझे मत आहे. पण द्वेष नसावा हे देखील महत्वाचे आहे. जे सध्याच्या भारतीय विरोधीपक्षातील राजकारण्यांना गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत, अथवा किबोर्डपासून ते प्रत्यक्षात जमत नाही, हे दुर्दैव.. पण मोदींच्या बाबतीत अथवा गुजरात दंगल आणि त्यावरून मोदींचा वापर करत आधी मोदी आणि नंतर मोदींची विचारसरणी असलेला पक्ष "भाजपा" आणि संघटना "संघ" यांना गेल्या दहावर्षात टोकाचे बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. बरं तो करत असताना त्याला पर्याय काहीच दिला नाही... फक्त द्वेष एके द्वेष! परीणामी लोकसभेत मार खाल्ला. यातील सगळ्यात गंमत अशी आहे की याचा पुरस्कार करणारे सर्वाधीक कोण आहेत तर ते काँग्रेसी नाहीत तर डावे आहेत ज्यांना जनमत हा प्रकार काहीच नाही! तरी आरडा-ओरडा कसा करायचा, इन्किलाब चे नारे कसे देयचे ह्याच्या जीवावर सगळा खेळ चालला आहे. असो.

In reply to by विकास

फक्त
१९७७ साली आणिबाणी नंतर "इंदिरा इज इंडीया" या मानसिकतेपासून जर देशाला बाहेर काढायचे असले तर त्याला सर्व विरोधकांनी पर्याय नव्हता.
'अमुक मानसिकतेतून देशाला बाहेर काढणं' वगैरे फारच उच्च, मूल्याधिष्ठित वगैरे वाटतं. माझ्या मते 'आत्ता, या परिस्थितीत मला/आपल्या पक्षाला सत्ता मिळवण्यासाठी काय करावं लागेल?' ते सर्व लोक करतात. मग त्यात भलत्याशी हातमिळवणी करण्याची गरज पडली तरी हरकत नाही. असं तुकड्यातुकड्यांनी बनलेलं सरकार फार टिकणार नाही, याची बहुतेकांना कल्पना असते. पण जितका काळ टिकेल तितक्या काळात आपल्याला पोलिटिकल बेस जास्त घट्ट करून घेता येईल का? त्याचं उत्तर हो असेल तर बऱ्याच तडजोडी करायला लोक तयार होतात. कोणीच कोणाचंच शत्रू नसतं हे वाक्य थोडं नाइव्ह आणि सरधोपट आहे हे खरं आहे. मला म्हणायचं होतं की सगळे ऑप्शन उपलब्ध असतात, काही तडजोडी करणं पोलिटिकल बेसला इतकं मारक असतं, की तो पर्याय प्रचंड तोट्याचा असतो. त्या अर्थाने हो, काही टोकं जोडली जाऊ शकत नाहीत. असो. व्यक्तीद्वेषपेक्षाही 'व्यक्तींबद्दल चर्चा' ही राजकीय चर्चेचा आधारस्तंभ बनलेली आहे. कधी कधी ती वाचताना टीनेजर ड्रामा पाहिल्यासारखं वाटतं. कोण कोणाबरोबर फिरतंय, कोणी कोणाशी ब्रेकअप केला, कोणी कोणाचा अपमान केला... याच पातळीवर ते राहातं. दशकानुदशकं चालणारे, थोडे बदलणारे विचारप्रवाह; राजवटी बदलल्या तरी कायम राहाणाऱ्या योजना - त्यांचं यश, अपयश; त्यांतून जनतेचा होणारा फायदा याबद्दल स्थिर, गंभीर चर्चा होत नाही. काहीही साधक बाधक चर्चा सुरू झाली की ती डायरेक्ट 'तू भक्त - तू मोदीद्वेष्टा' या तूतू मैमै वर उतरते. एक उदाहरण सांगतो. यूपीएने पुढच्या काही वर्षात २० गिगावॉट सोलर पॅनेल्स बसवायचं ठरवलं होतं. ते उद्दिष्ट सद्य सरकारने बदलून १०० गिगावॉट केलं. हे प्रचंड महत्त्वाकांक्षी आणि उत्तम पाऊल आहे. आता यात अमेरिकेने खोडा घालून भारतीय उत्पादकांना सबसिडी दिल्याबद्दल तक्रार केली आहे. आणि त्याचे काही दूरगामी परिणाम दिसतीलही. पण हा विषय मांडला रे मांडला की 'लेखक नक्की कोण आहे, मोदीभक्त आहे का? मोदीद्वेष्टा आहे का? त्याला राळ उडवायची आहे का? सध्याच्या सरकारचं काहीच चुकत नाही हे कसं सिद्ध करायचं? सगळंच चुकतं हे कसं सिद्ध करायचं?' असे विचार बाळगून मतप्रदर्शन होतं. त्यामुळे अशा गंभीर चर्चा सध्याच्या परिस्थितीत आंतरजालावर घडणं मला फार कठीण वाटतं.

In reply to by राजेश घासकडवी

आजच्या काळात संतुलित किंवा तटस्थ वृत्तीने लिखाण करण्याची वृत्ती अभावाने दिसते . तुम्ही दिलेल्या उदाहरणात अमेरिकेने भारताच्या पाठीत खंजीर किंवा शुद्ध हलकट पणा किंवा व्यापार आणि आपले व्यापारी त्यांची हित महत्वाचे मग नैतिकता जगाचे पर्यावरण इतर गोष्टी ह्यांचे दर्शन घडवले आहे. हे उद्या कोणी संधर्भ देऊन मांडले तर त्यात आक्षेप घेण्याचे कारण नाही. किंबहुना हे उदाहरण अमेरिकन अध्यक्ष पदाच्या धाग्यावर अचूक आहे. खुपजण ट्रम निवडणून आला तर ह्या कल्पनेने ग्रस्त आहेत त्यासाठी ते उदाहरणे देतात त्याची विधाने व धोरणे पण एकदा सत्तेचा काटेरी मुकुट घातला कि तिला चालवणारे भांडवलदार व त्यांचे हित जपतांना अनेक तडजोडी कराव्या लागतात. प्रदूषण विरहित उर्जेचा पुरस्कार हे ओबामाचे धोरण मात्र जाताजाता ज्या पद्धतीने यातसरकारने खोडा घातला ते पाहता बिबीसी मध्ये चक्क भारताची तळी उचलणारा अमेरिकेच्या धोरणाविरुद्ध लेख छापून आला. बीबीसी ने भारताच्या बाजूने लिहिणे व त्यासाठी अमेरिकन धोरणावर टीका काही हि हा बी बी सी असेच म्हणावेसे वाटते. आंजा वर जेटली वर अनेक जण मध्यमवर्गीय त्यांच्या निवृत्ती वेतन त्यावर कर ह्या अनुषंगाने मनस्वी टीका करत आहे तेव्हा जेटली ह्यांचे बरोबर अशी मल्लीनाथी करणारे मी तरी अजून पाहीले नाही. दुर्दीवाने ह्या मुद्यांचा राजकीय लाभ प्रसार माध्यमे व राजकीय पक्ष न घेत संजय दत्त ची सुटका नव्या विद्यार्थी नेत्याचा जन्म अश्या फुटकळ गोष्टीत अडकून पडत आहे. खुद केजू सुद्धा ह्या जाळ्यात अडकला इतरांची काय व्यथा

In reply to by राजेश घासकडवी

दशकानुदशकं चालणारे, थोडे बदलणारे विचारप्रवाह; राजवटी बदलल्या तरी कायम राहाणाऱ्या योजना - त्यांचं यश, अपयश; त्यांतून जनतेचा होणारा फायदा याबद्दल स्थिर, गंभीर चर्चा होत नाही. काहीही साधक बाधक चर्चा सुरू झाली की ती डायरेक्ट 'तू भक्त - तू मोदीद्वेष्टा' या तूतू मैमै वर उतरते.
१००% सहमत.

In reply to by राजेश घासकडवी

अहो, म्हणुनच अशा चर्चा जास्त जोरकसपणे मांडायच्या ना. इन फॅक्ट, मिपावर जे अनेक उपक्रम चालतात, त्यात गेल्या काहि वर्षातल्या सर्वात सफल/असफल योजनांवर चर्चा घडवुन आणण्याचा उपक्रम झाला पाहिजे.

In reply to by राजेश घासकडवी

पॉलिटिक्समध्ये कोणीच कोणाचं शत्रू नसतं. आपल्या विरुद्धपक्षांना एकत्र येण्याची संधी देणं हीच राजकारणातली हार असते.
सहमत. ज्या राज्यात खांग्रेस वि. भाजप असा सरळ सामना आहे (म.प्र., छत्तीसगड, राजस्थान, हि.प्र., उत्तराखंड, गुजरात), तिथे भाजपला फारशी भीति नाही. परंतु इतर राज्यातील पूर्णपणे परस्परविरोधी असलेले पक्ष आपले अस्तित्व गमाविण्याच्या भीतिने एकत्र येत आहेत (उदा. बिहार) आणि तिथे भाजपला जड जाणार आहे.

In reply to by श्रीगुरुजी

खांग्रेस वि. भाजप
इतक्या साध्या प्रतिसादातही इतकं तुच्छतेने थुंकल्यासारखं 'खांग्रेस' म्हणणं आवश्यक आहे का? मिपाच्या बिल्डिंगीबाहेर उगीच पचाक्कन पिंक टाकल्यासारखं वाटतं. मिपावर भाजपावर टीका होत असली तरी इतक्या सहजपणे इतक्या खालच्या पातळीवर कोणी जाताना दिसत नाही. अशा उल्लेखांमुळे चर्चा खालच्या पातळीवर गेली तर त्यात नवल ते काय?

In reply to by राजेश घासकडवी

शब्दाशब्दांतून दिसणारा किळसवाणा द्वेष ही काँग्रेस/आप/विचारवंत/पुरोगामी/डावे यांच्या विरोधकांची स्पष्ट ओळख आहे.

In reply to by तर्राट जोकर

कमॉन! एवढं सेन्सिटिव का व्हायचं? थोडी थट्टा केली तर किळसवाणा द्वेष डायरेक्ट? भक्त, नमोरुग्ण, इंटरनेट हिंदू आदी शब्दांची रेलचेल असते की बर्‍याच ठिकाणी. ती लोक स्पोर्टिंगली घेतात. मौत का सौदागर वगैरे बाजूला ठेऊ.

In reply to by अनुप ढेरे

सेन्सिटीव तर खांग्रेस म्हणणारे असतात. साध्या शब्दांतून व्यक्त होण्यापेक्षा कैक अधिक विखार भरलेला असतो तेव्हा असे होते. तसेच थट्टा माझी थोडीच करतंय कोणी जे मी सेन्सिटीव होऊ. बाकी भक्त, नमोरुग्ण, इण्टरनेट हिंदू हे शब्द बिन्डोक भाजपसमर्थकांसाठी आहेत. भाजपला नव्हे. बाकी, 'मौत का सौदागर' एवढी टिप्पणी हाताशी असायला बरी असते.

In reply to by अनुप ढेरे

अहो ही थोडी थट्टा नाही. मला वाटतं हे भाषेला लागलेलं वळण आहे. जेव्हा थट्टा करताना म्हटलं जातं तेव्हा कोणी आक्षेप घेताना दिसत नाही. पण 'कॉंग्रेस विरुद्ध भाजपा' असा साधा सरळ उल्लेख येण्याऐवजी असलं का येतं? ती इतकी भिनलेली सवय आहे की आपोआपच कॉंग्रेसऐवजी खांग्रेस असंच टंकलं जातं. त्यामुळे ती सवय बदला असं सांगावंसं वाटतं. काही जणांना नाकात बोटं घालण्याची सवय असते, ते लोकांना गलिच्छ वाटू शकतं. म्हणून आपलं असं प्रतिक्षिप्त क्रियेने काही झालेलं दिसलं की सांगावं लागतं. अशा अनावश्यक पिचकाऱ्यांनी उगीच भिंती घाण होण्यापलिकडे काहीही साध्य होत नाही. आता त्यांनी जर अत्यंत विचार करून मुद्दाम खांग्रेस असं लिहिलं असलं तर गोष्ट वेगळी. पण या विचारपूर्वक तुच्छतेमागची त्यांची नक्की कारणं काय आहेत हे जाणून घ्यायला आवडेल.

In reply to by तर्राट जोकर

अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ तर्राट जोकर - Mon, 07/03/2016 - 12:26 अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ संघटनेने सेल्फी घेणे हा एक मनोविकार असल्याचे दोन वर्षापूर्वीच अधिकृतरित्या जाहीर केले आहे ! >> विद्यमान पंतप्रधानांनाही ???
यातून काय सिद्ध होतं? उत्सुकता म्हणून विचारतोय.

In reply to by बोका-ए-आझम

१. विद्यमान पंतप्रधानांना सेल्फी घेण्याची सवय आहे. १. सेल्फी घेणे हा मनोविकार आहे ह्यातलं कोणतं विधान चूक वा खोटं वा ताणलेलं आहे का?

In reply to by तर्राट जोकर

शब्दाशब्दांतून दिसणारा तर्राट जोकर - Mon, 07/03/2016 - 17:47 शब्दाशब्दांतून दिसणारा किळसवाणा द्वेष ही काँग्रेस/आप/विचारवंत/पुरोगामी/डावे यांच्या विरोधकांची स्पष्ट ओळख आहे.
हेच तुम्हालाही लागू पडतं. असो.

In reply to by बोका-ए-आझम

आता इथला साधासा उपरोध तुम्हाला कळत नाही असा प्रश्न विचारु का? बाकी, किळस ह्या शब्दाबद्दलची तुमची समज वेगळी असण्याची शक्यता मान्य करतो.

In reply to by बोका-ए-आझम

बोका सेठ आपला तो उपरोध दुसर्याची ती किळस हे हि समजू नये तुम्हाला?

In reply to by तर्राट जोकर

दोन्ही.
एका दिवसात कमीतकमी तीन सेल्फी काढणे. पण, हे फोटो कोणत्याही सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट न करणे
आपले पंतप्रधान फक्त कुणी बाहेरचे त्यांच्या बरोबरीचे असतील तर सेल्फी काढताना दिसतात. कधीतरी सेल्फी घेणे मनोविकार नाही. उगाच ओढूनताणून संबध जोडायचा.

In reply to by शलभ

आणि दाखवून दिलं की why so serious असं म्हणायचं. असो. चालायचंच.

In reply to by राजेश घासकडवी

मनावर नका घेऊ कॅाग्रेस हा शब्द आमच्याकडे शिवी म्हणून पण वापरायला लागलेत लोक आणि तरीसुद्धा सगळे लोकप्रतिनीधी कॅाग्रेस किंवा राकॅाचेच असतातत

In reply to by राजेश घासकडवी

इतक्या साध्या प्रतिसादातही इतकं तुच्छतेने थुंकल्यासारखं 'खांग्रेस' म्हणणं आवश्यक आहे का? मिपाच्या बिल्डिंगीबाहेर उगीच पचाक्कन पिंक टाकल्यासारखं वाटतं. मिपावर भाजपावर टीका होत असली तरी इतक्या सहजपणे इतक्या खालच्या पातळीवर कोणी जाताना दिसत नाही.
(१) खांग्रेस म्हणणे म्हणजे काँग्रेसचा तुच्छ उल्लेख कशावरून? (२) याच संकेतस्थळावर भाजपचा उल्लेख अनेकवेळा "भारतीय जुमला पार्टी", "शेटजी भटजींचा पक्ष" असा उल्लेख झालेला आहे. असे उल्लेख तुच्छ समजावे का?

In reply to by श्रीगुरुजी

(३) डाव्या पक्षांचा उल्लेख याच संकेतस्थळावर "वाममार्गी" असा द्व्यर्थी करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचाही उल्लेख भ्रष्टवादी काँग्रेस असा झालेला आहे. याबद्दल आपले काय मत आहे? भाजप, डावे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस इ. चा उल्लेख वर लिहिल्याप्रमाणे केल्यावर आजतगायत कोणीही (तुम्ही सुद्धा), काहीही आणि कधीही आक्षेप घेतलेला नाही. मग आजच खांग्रेस हा उल्लेख का खटकला?