कन्हैया कुमार : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!

विवेक ठाकूर's picture
विवेक ठाकूर in जनातलं, मनातलं
5 Mar 2016 - 12:44 am

देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतिही कटुता न बाळगता संयमितपणे, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती समर्पक उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल.

यापूर्वी त्याचा जेएनयू कँपसमधे बरखा दत्तनं घेतलेला इंटरव्यू तितकाच सादगीपूर्ण आहे. तो पाहिल्यावर त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो. त्याच्या वरचे चार्जेस नायप्रविष्ट असल्यानं सध्या त्यावर काही भाष्य करता येणार नाही पण या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते.

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

तर्राट जोकर's picture

5 Mar 2016 - 12:47 am | तर्राट जोकर

गदारोळास शुभेच्छा! =))

तेंव्हा त्याची बाजू तर लोकांसमोर आली पाहिजे. मग भाषिक गदारोळाची काय पर्वा ?

विकास's picture

5 Mar 2016 - 4:34 am | विकास

जर एखादा व्यवस्थेविरुद्ध इतक्या बिनदिक्कतपणे लढू शकतो

हे आपले न्यायप्रविष्ट चार्जेस वर भाष्य तर नाही ना?

पण या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते.

स्टालीन च्या विचारधारेच्या भारतीय पक्षसदस्य असूनही विद्यार्थ्यांसमोर बोलताना आवर्जून हिटलरची आठवण काढतो यातून सुस्पष्टता आणि वेगळा विचार सुस्पष्टपणे दिसला. "जबतक जेल मे चना रहेगा, तबतक आना जाना रहेगा" असे म्हणणार्‍याचे जेल आणि बेल या दोन्हीबाबतीतले निर्भयत्व दिसते.

ते वाक्यात जेल नसून JNU असं होतं, असं आठवतं

देशद्रोह आणि सत्ताद्रोह या दोन वेगळ्या गोष्टी आहेत याची तुम्हाला कल्पना आहे. व्यवस्थेविरुद्ध विद्रोह अमान्य केला तर सगळा विरोधीपक्ष एकसंधपणे गुन्हेगार ठरेल. अर्थात, सध्या सत्तेविरुद्ध बोलणं म्हणजे देशद्रोह ठरतो अशी जनमानसाची कल्पना झाली आहे, अशा वातवरणात या मुलाखतीला महत्त्व आहे.

एनी वे, इतिहासात काय झालं होतं यापेक्षा सध्या काय चाललंय हे जास्त महत्त्वाचं ठरतं.

महाराष्ट्र टाइम्सचा आजचा हा अग्रलेख विद्यार्थी नायकाचा जन्म, कन्हैयाच्या विचारांची नि:पक्ष दखल घेतो.

श्री गावसेना प्रमुख's picture

5 Mar 2016 - 3:41 pm | श्री गावसेना प्रमुख

मटा ला आलेला लेख विद्यार्थी नायकाचा जन्म ,मटा आणि लोटा हे सारखे थर्ड क्लास लेख का छापतो। विद्यार्थी नायकाचा जन्म हा झिका व्हायरस ग्रस्त डोक्याने झाल्याची दाट शक्यता असू शकते,कारण त्याचा मेंदूच काम करीत नसल्याची माहिती आहे।

तर्राट जोकर's picture

5 Mar 2016 - 3:56 pm | तर्राट जोकर

विद्यार्थी नायकाचा जन्म हा झिका व्हायरस ग्रस्त डोक्याने झाल्याची दाट शक्यता असू शकते,कारण त्याचा मेंदूच काम करीत नसल्याची माहिती आहे।
>> अरे वा. कन्हयाला बरंच महत्त्व देत आहात तुम्ही. असं झालंय तरी काय हो?

श्री गावसेना प्रमुख's picture

5 Mar 2016 - 4:10 pm | श्री गावसेना प्रमुख

का नको उदयाला तो जर pm झाला तर, त्यापेक्षा आजच तजवीज केलेली बरी

तर्राट जोकर's picture

5 Mar 2016 - 4:13 pm | तर्राट जोकर

कशाची तजवीज करताय नेमकी?
काही लोक पाच लाख, अकरा लाखाची तजवीज करु र्‍हायलेत.

श्री गावसेना प्रमुख's picture

5 Mar 2016 - 4:30 pm | श्री गावसेना प्रमुख

कोण कोण करू ऱ्हायले हो

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Mar 2016 - 9:58 pm | llपुण्याचे पेशवेll

हाहाहा तिकडे गुरुजींच्या धाग्यावर इतकी जळजळ का ते आता कळले. गावसेनाप्रमुख तुम्हाला नाहीये हे.

इष्टुर फाकडा's picture

5 Mar 2016 - 1:05 am | इष्टुर फाकडा

निळ्या कोल्ह्याची गोष्ट आठवली...बाकी चालुद्या :)

वैभव जाधव's picture

5 Mar 2016 - 2:32 am | वैभव जाधव

अरविंद बरोबर दीड तास ची आठवण झाली.
लौ यु विठा सर!

अर्धवटराव's picture

5 Mar 2016 - 3:17 am | अर्धवटराव

मुलाखतीत पण बरच साम्य आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

5 Mar 2016 - 4:55 am | निनाद मुक्काम प...

प्रांजळ पणे हा तरुण रविश ची चक्क खोटे बोलतो आणि ते बोलतांना आपण आधी अश्याच मुलाखतीत काय बोललो होतो ते सुद्धा ह्याचा लक्षात येत नाही
तर ह्याची लोणकढी थाप मला ह्या कार्यक्रमाबद्दल माहिती नव्हती
अरे बाबा ह्या कार्यक्रमाचे पोस्टर त्याचे मुख्य मुद्दे तुझ्या विद्यापिठ्याच्या सर्व परिसरात होते
त्याहून महात्व्याचे तूच एका मुलाखतीत हा कार्यक्रम नियोजित वेळेच्या एक तास आधी रद्द झाला तेव्हा तो का झाला ह्या बद्दल तू विध्यार्थ्यांचा अध्यक्ष म्हणून प्रशासनाला विचारणा केली असे बोलला होता तेव्हा ज्या कार्यक्रमाविषयी तुला कल्पना नाही त्यासाठी तू प्रशासनासाठी भांडला
तुझ्यापेक्ष्य उमर बरा
त्याचे विचार देशद्रोही आहेत पण तो इकडची थुंकी तिकडे करत नाही ,
त्यांचे विचार तुला पटत नाहीत तर त्याच्या कार्यक्रमाला प्रोत्साहन म्हणून तू स्वतः सुरवातीपासून एक कार्यक्रम केला ज्यात तू त्याला बाजूला घेऊन तुझ्या पक्षाचे गीत म्हटले
तेव्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यावर तू आणि उमर ने कार्याकार्म केला हे नियमबाह्य असून तुझ्यावर अजून त्यांनी कारवाई केली नाही
आणि उमरचा कार्यक्रम काय आहे हे सुरवातीपासून तुला माहिती असून तू त्यात सहभागी झाला
गुन्ह्यास मदत करणारा गुन्हेगार असतो
एवढी माझी समज
बाकी ह्या कार्यक्रमात बाहेरच्या लोकांनी नारे दिले असे तूच एका मुलाखतीत म्हटले तेव्हा अश्या गोष्टी होऊ शकतात हीच शक्यता ध्यानात घेऊन प्रशासनाने परवानगी नाकारली
तर त्यांना च्यु समजून तू उमर ला पाठिंबा देण्यासाठी आला
आणि प्रकरण अंगावर शेकले तर मी उमर च्या विचारांशी सहमत नाही असे म्हणतो
मग त्याला तुझ्या सोबत व्यासपीठ का शेअर करू दिले
मुळात त्यांची विचारधारा देशविरोधी आहे हे माहिती असतांना त्याला पाठिंबा का दिला
कनैह्यच्या जामिनावर टिप्पणी करतांना जज ने जी निरीक्षणे नोंदवली त्यात ह्यांच्या भाषण स्वातंत्र्यावर भाष्य झाले ते बरे झाले
सोनाराने कान टोचलेले बरे असतात
ह्याची अश्याच एका मुअखतित अजून एक लोणकढी थाप
एका विदियोत दोन विद्यार्थी संघटना भांडत आहेत व त्यांच्या मध्ये कानैह्या दिसत होता
तू तिथे काय करत होता असा पत्रकाराने प्रश्न विचारला
त्यावर साहेब मला फोन आला कि विद्यापीठाचा परिसरात दोन समूह भांडत आहेत तेव्हा मी अध्यक्ष ह्या नात्याने ते भांडण सोडवायला गेलो ,
म्हजे ह्याच्या आधी एका विदियोत हा भला माणूस सामंत वाद से आझादी म्हणतांना दिसला तो हा नव्हता ह्याचे भूत असावे
ह्याला तर फोन आला तेव्हा हा घटना स्थळी पोहचला ,
असो
जे एन न्यू प्रकारानंतर हा इसम टीव्हीवर येउन जे एका मागोमाग खोटी विधाने करत होता त्यांचा पर्दाफाश मी करण्याचा प्रयत्न केला त्याउलट देशद्रोही उमर सुरवातीपासून आपलं जे केले ते का केले हेच सर्वांना सांगितले उगाच केल्यावर मी केले नाही असा आव आणला नाही म्हणूनच
त्याच्यास भविष्यातील राजनेता न दिसल्याने रविश सारखे लोक
कनैह्या च्या पाठी लागले

तर्राट जोकर's picture

5 Mar 2016 - 10:04 am | तर्राट जोकर

फॅक्ट्सची मोडतोड करु नका जर्मनीकर. तुम्हीही इथली थुंकी तिथे लावत आहात.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

5 Mar 2016 - 2:56 pm | निनाद मुक्काम प...

तुम्हाला हरीतात्यांच्या भाषेत पुराव्याने शाबित हवे आहे का
देतो त्याच्या प्रांजळपणे खोटारडे पणाचा पुरावा
वरील मुलाखतीत २.२६ मिनिटावर रविश प्रश्न विचारतो त्या रात्री कोणी नारे दिले काय झाले .
ह्यावर कनैह्या चे उत्तर मी त्या कार्यक्रमाचा आयोजक नव्हतो बरोबर तो आयोजक उमर होता पण पुढे तो म्हणतो नारे लागे नही
लगे हे मला माहिती नही मी तेथे उपस्थित नव्हतो
हे धडधडीत खोटे आहे
कनैह्या तेथे उपस्थित होता हे अनेक विडीयो मध्ये दिसते , त्याने जरी भारत विरोधी नारे प्रत्यक्ष दिले नाहीत तरीही तो तेथे होता
हे सिद्ध झाले आहे मग हा खोटारडेपणा कशाला.
मुळात ज्या विडीयो ला कनैह्या भारत विरोधी नारे देत होता असे सांगितले व पुढे असे कळले की हा सामंतवाद से आझादी असे नारे देत होता म्हजे साहेब सुरवातीपासून तेथे उपस्थित होते मग रविश शी एवढे धडधीट खोटे कशाला
ह्याच प्रांजळ मुलाखतीत पुढे अजून खोटे बोलणे कि उमर च्या कार्यक्रमाला माझा पाठिंबा असल्याचा पोलिसांचा आरोप आहे
आणि रविश ने विचारले पाठिंबा होता का तो नाही म्हणतो , एवढे धडधाडीत खोटे बोलणे पुढे अजून एक खोटे बोलणे म्हणजे
जो कहर आहे कि रविश ने ३,१८ ला प्रश्न केला कि अध्यक्ष ह्या नात्याने हा कार्यक्रम का नाही थांबवला ह्यावर त्याचे उत्तर असे असा काही कार्यक्रम होणार आहे ह्या बाबत त्याला अजिबात माहिती नव्हती
उमरला बगलेत घेऊन सामंत वाद से आझादी अश्या घोषणा देत जो कार्यक्रम केला तो काय होता. वेळ जात नव्हता म्हणून उमरच्या कार्यक्रमात येउन घोषणाबाजी केली का ,
दीपक चौरासिया च्या कार्यक्रमात हाच कनैह्या १६.२८ मिनिटावर त्यास ह्या कार्यक्रम होणार होता हे त्याला माहिती होते असे सांगून हा कार्यक्रम प्रशासनाने परवानगी देऊन मग रद्द का केला ह्या बाबत प्रशासनावर ताशेरे ओढले म्हणजे प्रशासनाने उमर चा देशद्रोही कार्यक्रम का रद्द केला ह्याबाबत विचारणा कैनैह्या ने केली असे तोच म्हणतो .

तर्राट जोकर's picture

5 Mar 2016 - 3:02 pm | तर्राट जोकर

जरा विडियोवार पुरावे द्याना इथेच. दिनांकवारही येउ देत विडियो. डॉक्टर्ड विडियो कोणते तेही सांगा. आधी विडियो येऊ देत मग त्याचं काय खरं काय खोटं ते बघू.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

5 Mar 2016 - 4:30 pm | निनाद मुक्काम प...

हे पहा दीपक चौरासिया सोबत चा विडीयो जे एन न्यू च्या घटनेच्या नंतर एका लाइव डिबेट चा आहे ज्यात कनैह्याला प्रश्न विचारला गेला व त्याने उत्तर दिले, उमर ने सुद्धा अश्या अनेक लाइव डिबेट मध्ये कनैह्या सोबत आपली मते मांडली.
जे जनतेने ह्याची देही ह्याची डोळा पहिले
लाइव डिबेट मध्ये ह्या दोघांनी जी मते मांडली ती त्याच क्षणी जनतेच्या समोर आली
उद्या तुम्ही म्हणाल भारतने पाकिस्तान वर क्रिकेट सामन्यात विजय मिळवला व ते जनतेने लाइव प्रक्षेपण पहिले तो खरे तर डॉक्टर्ड विडियो होता ,
मुळात दिल्ली पोलिसांनी कनैह्या विरुद्ध केस फक्त विडीयो च्या आधारावर दाखल केली असा गैरसमज तुम्ही स्वतःहून करून घेतला आहे ,
कोर्टापुढे दिल्ली पोलिसांनी कनैह्या च्या विरुद्ध विडीयो नाही हे सांगितले पण इतर जे मुद्दे मांडले त्या आधारावर त्यास संपूर्ण जामीन न देता अंतरिम जामीन दिला , कोर्टात केस जशी सरकेल तेव्हा दिल्ली पोलिस नेमक्या कोणत्या पुराव्या वर त्याच्या विरुद्ध खटला भरला आहे ते सिद्ध होईल ,
दिल्ली पोलिसांच्या कडून कोर्टात कनैह्या च्या विरुद्ध चार्ट शी ट दाखल होऊ द्या राव , मग नक्की काय पुरावे आहेत ते कळून येईल , आतापासून दिल्ली पोलिसांच्या कडे कही पुरावे नाही अशी बांग मारून स्वताचे मनोरंजन करून घेण्यास काय हशील.

तर्राट जोकर's picture

5 Mar 2016 - 4:58 pm | तर्राट जोकर

मुळात दिल्ली पोलिसांनी कनैह्या विरुद्ध केस फक्त विडीयो च्या आधारावर दाखल केली असा गैरसमज तुम्ही स्वतःहून करून घेतला आहे ,
>> हे मी कधी म्हटलंय ते दाखवता का जरा?

कोर्टात केस जशी सरकेल तेव्हा दिल्ली पोलिस नेमक्या कोणत्या पुराव्या वर त्याच्या विरुद्ध खटला भरला आहे ते सिद्ध होईल ,
>> मग चार्जशीट तरी येऊ देता की नाही. अजुन चार्जशीटचा पत्ता नाही तुम्ही त्याला गुन्हेगार ठरवून मोकळे.

मी कुठेही कोणतीही बांग मारत नाही. मी फक्त तुम्ही जे म्हणताय ते सिद्ध करा असे म्हणतोय. बाकीचा कल्पनाविलास ठेवा तुमच्याकडेच. तुम्हीच कन्हया खोटा बोलत आहे ह्याची टकळी वाजवत आहात.

खोटेपणा दाखवणारे ते विडियो इथे डकवा ना. कारण त्याच आधारावर तुम्ही वरचा प्रतिसाद दिला आहे असे दिसते. तुम्ही जणू जेएनयुत आहात किंवा दिल्ली पोलिसात आहात अशाच आविर्भावात प्रतिसाद देत आहात. मी काय म्हणतो, तुम्ही आधी एक टाइमलाईन ऑफ इवेंट्स बनवा. त्याबरहुकूम एक एक विडियो इथे डकवा. कोण कोणत्या ठिकाणी काय बोलला ते सांगा. उगाच कुठेतरी काहीतरी वाचून ते इथे टाइप करुन संभ्रम निर्माण करुन, न्यायाधिश होऊ नका. तुमच्या मनोरंजनासाठी तुम्ही कोणावर खोटे आरोप करु शकत नाही.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

6 Mar 2016 - 2:54 am | निनाद मुक्काम प...

तुम्ही माझा प्रतिसाद हरीतात्याचा पुरवणे शाबित
हा नीट वाचला का
दीपक चौरासिया ह्यांच्या लाइव डीबेत मध्ये कनैह्या स्वतः जे बोलला त्याची लिंक मी अडकवली आहे
ती कृपया पहा ,
तो गुन्हेगार आहे का नाही हे कोर्ट ठरवेल पण तो खोटारडा आहे. हे त्याच्याच मुलाखतीतून स्पष्ट होते.
दीपक चौरासिया च्या त्या डिबेट मध्ये तो हे सुद्धा म्हणतो
विद्यापीठात ह्या घोषणा चालू होत्या ते थांबविण्याचा अधिकार प्रशासन व पोलिसांना आहे
मग अभाविप चे गुंडांना हा कार्यक्रम थांबविण्याचा अधिकार कोणी दिला
हे त्याचे शब्द आहे
म्हणजे त्याच्या शब्दात जे एन यु मध्ये बाहेरील लोक आले तोंडावर मफलर बांधून भारत विरोधी घोषणा दिल्या
तरीही अभाविप च्या विद्यार्थांना हा कार्यक्रम थांबविण्याचा प्रयतन करू नये असे त्याला वाटते
गंमत म्हजे खुद्द कनैह्याला हा कार्यक्रम थांबवावा असे वाटत नाही
प्रशासन व पोलिसांनी यावे असे त्याला वाटते
आणि त्याचे प्राध्यापक म्हणतात विद्यापीठात पोलिसांचे काय काम
हा माणूस तेथे उमर च्या कार्यक्रमाचे कवचकुंडल बनून अभाविप ला थोपवून धरण्याचा भीमपराक्रम केला.

बाळ सप्रे's picture

7 Mar 2016 - 11:35 am | बाळ सप्रे

कन्हैयाचा उमर खलिदला पाठींबा होता की नव्हता वगैरे खरंखोटं पुढची गोष्ट, पण ऐकलेल्या / वाचलेल्या सर्व बातम्यातून उमर खलिद हा अफझल गुरु/ मक्बूल भट यांचा उदोउदो करणार्‍यांचा म्होरक्या होता व "भारत की बरबादी" वगैरे घोषणा त्याच्या होत्या. कन्हैयाने त्या घोषणात सहभाग घेतला होता की नव्हता, व्हीडीओमधे कन्हैयाला चिकटवणे वगैरे ही हे सगळे एक क्षण बाजूला ठेवू. पण महत्वाचा प्रश्न मला पडलाय की उमर खालिदला आत का नाही टाकला?? का त्यालापण टाकलाय?? नक्की माहित नाही म्हणून विचारतोय.

बाळ सप्रे's picture

7 Mar 2016 - 12:28 pm | बाळ सप्रे

आत्ताच वाचलं की उमर खलिदलासुद्धा आत टाकलय २४फेब ला.
पण त्याच्याऐवजी कन्हैया प्रकाशझोतात का?? दोन्ही बाजूंकडून त्याला का महत्व दिलं जातय??

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Mar 2016 - 4:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

यामागे साधा राजकारणी हिशेब आहे...

उमर खालीदच्या (आताच्या आणि यापूर्वीच्या) जाहीर कारवाया पाहता त्याच्या भारतद्रोहाबद्दल आक्षेप घेणे राजकारणी कोलांट्याउड्या मारूनही शक्य होणार नाही (जनतेच्या सरळ सरळ चपला पडतील). त्यामानाने जनतेला आधीपासून फारसे माहित नसलेले कन्हैय्या हे नाव खर्‍याखोट्याची सरमिसळ करून गोंधळ घालायला जास्त सोईचे आहे. माणूस महत्वाचा नाही (तो एक्स्पेंडेबल असतो), त्याचे नावही फार महत्वाचे नाही, आपला स्वार्थ साधण्यासाठी कुठल्या नावाचा उपयोग करता येतो ते जास्त महत्वाचे !

तर्राट जोकर's picture

7 Mar 2016 - 4:43 pm | तर्राट जोकर

भाजपच्या गोटातून बघितले तर असेच चित्र दिसते.

तेच म्हणतो.. जर व्हिडीओप्रकरण झाले नसते तर कन्हैया कुठेच प्रकाशझोतात येण्याची शक्यता नव्हती. भाजपने खाजवून खरूज का काढावी याच जास्त आश्चर्य वाटते. जिथे कोलांट्याउड्यामारूनही बचाव शक्य नाही अशा उमर खालिदलाच मुख्य टीकेचे लक्ष्य का नाही केले?

तर्राट जोकर's picture

7 Mar 2016 - 5:03 pm | तर्राट जोकर

डाव्यांच्या गोटातून पाहिले तर असे दिसते.>>मुख्य लक्ष आधीपासूनच कन्हया आहे, ९ फेबच्याही आधीपासून. उमर खालिद तर बहाना आहे. उमर खालिदला लक्ष केले तर सर्व भारतीय एक होतील. डावे, काँगेस कसे देशविरोधी आहेत हे कोकलुन कोकलुन सांगायची संधी मिळणार नाही.

सामान्य भारतीयांच्या गोटातून पाहिले तर असे दिसते. >> सगळं डिस्कशन उमर खालिदवर येऊन थांबतं. तिथून पुढे कुठलेच आर्गुमेंट्स होत नाहीत. आर्गुमेंट्स नसतील तर राजकारण कसे होणार? मग कन्हया पुढे करा.

विकास's picture

7 Mar 2016 - 11:01 pm | विकास

(इंडीयन एक्स्प्रेस, थोडक्यात:)

९ फेब्रुवारीचा कार्यक्रम मुळात उमर आणि त्याच्या साथीदारांनी "सांस्कृतिक कार्यक्रम" म्हणून आयोजित केला आणि त्यासाठी विद्यापिठ प्रशासनाकडे परवानगी मागितली. मात्र कार्यक्रमाचे फ्लायर वेगळेच होते. ते इथे प्रत्यक्ष दाखवण्याचे टा़ळत आहे, पण डेलीमेल युकेच्या संस्थळावर ठेवले आहे ते पाहू शकता. त्यानुसार हा कार्यक्रम, "Against Bramhinical Collective Conscience" होता. आणि विषय हा अफझल आणि मकबुल भट्ट यांची "न्यायालयीन हत्या (? - Judicial killing) तसेच काश्मिरी अलगतावाद्यांचा (भारतापासुन वेगळे होण्याचा) हक्क या संदर्भात होती. पण अर्थात हे विद्यापिठ प्रशासनाला सांगितले गेले नव्हते.

हे अभाविपच्या विद्यार्थ्यांना समजले आणि त्यांनी ९ फेब्रुवारीस प्रशासनाकडे तक्रार केली. प्रशासनाला कळल्यावर त्यांनी हा कार्यक्रम विद्यापिठाच्या प्रांगणात करण्याची परवानगी रद्द केली. त्याला कन्हैय्या कुमार ने आक्षेप घेतला. बरं, आक्षेप घेतला तो घेतला, वर All India Students’ Association (AISA), All India Students’ Federation (AISF) and Students’ Federation of India (SFI) या सर्व विद्यार्थी संघटनांनी या कार्यक्रमाला पाठींबा देत तेथे हजर रहाण्याचा निर्णय घेतला आणि अमलात आणला.

आता एक लक्षात घेतले पाहीजे की २०१५ साली विद्यापिठ स्तरावर झालेल्या निवडणुकीमधे कन्हैय्या हा इतर विद्यार्थि संघटनांच्या उमेदवारांना हरवून ज ने विद्यापिठ विद्यार्थ्यांच्या संघटनेचा अध्यक्ष झाला होता. अर्थात जे काही विद्यार्थी संघटनात्मक कृती करतील त्याला अध्यक्ष म्हणून तो काही प्रमाणात का होईना जबाबदार ठरू शकतो. इथे तर त्याने उमरच्या भारतविरोधी आणि अलगतावादी कार्यक्रमास जाहीर पाठींबा देऊन आपले अध्यक्षिय वजन पणाला लावले.

अर्थात या सार्‍याचा परीणाम म्हणून कोर्ट त्याला एकदम जबाबदारीतून (का बेजबाबदारीतून?) मुक्त करू शकेल असे वाटत नाही. एक गोष्ट स्पष्ट झालेली नाही, पण विद्यापिठ स्तरावरील समितीने, बहुदा त्याला आणि अजून ८ विद्यार्थ्यांना त्यावेळेस निलंबीत केले होते. कदाचीत ती कारवाई तुर्तास स्थगित केलेली असावी नाहीतर तो परत तिथे जाऊ शकला नसता.

त्यात भर म्हणून की काय भारतीय तरूणाईचे लाडके नेते राहूल गांधी तेथे त्याला पाठींबा देयला गेले आणि नवीन राजकारण चालू झाले.

भाजपने खाजवून खरूज का काढावी याच जास्त आश्चर्य वाटते.
अभाविपने जे केले ते त्यांनी करायलाच हवे होते आणि तो त्यांचा हक्क देखील आहे. जर यात राहूल गांधी अथवा इतर राजकारणी, राजकारण करायला गेले नसते तर कदाचीत गोष्टीला वेगळे वळण लागले असते. पण त्यांनी राजकारण केल्याने भाजपाला आयते कोलीत मिळाले. ;) म्हणूनच त्याला जामिन मिळून बाहेर आल्यावर देखील हायकोर्टातले अनुभवी वकील आणि काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल ज्यांनी देखील कन्हैय्याच्या बाजूने वकीली केली, यांची अवस्था "सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही" अशी झाल्याने, अजून गप्प आहेत ;)

बाळ सप्रे's picture

8 Mar 2016 - 11:59 am | बाळ सप्रे

कन्हैयाला सगळं माहीत होतं त्याने उमरला साथ दिली सगळं जरी खरं असलं/मानलं तरीही उमर हाच मुख्य पात्र आहे या सगळ्यात. त्यामुळे उमरऐवजी कन्हैया प्रकाशझोतात का याचं उत्तरं नाही मिळत.

देशद्रोहाला विरोध हा केवळ मुद्दा असता तर मुळात घाव घालणे म्हणजे उमरचा बंदोबस्त करणे हेच एकमेव ध्येय हवे होते. पण त्यापेक्षाही जो कोणी विरोधी नेता असेल त्याला लक्ष्य करणे, त्याच्यावर टीकेचा भडीमार करणे यातच धन्यता मानतायत.

हे आणि हैद्राबाद विद्यापीठ (आणखीही काही ठीकाणं असतील) दोन्हीकडे असं जाणवतयं की अभाविपच्या विरोधी ज्या संघटना आहेत त्यांना येनकेन प्रकारेण नेस्तनाभूत करणं.. भाजपची हीटलिस्टच आहे असं जाणवतयं..

विद्यार्थी संघटनांची भांडणं त्याच पातळीवर राहू द्यावीत. केंद्र सरकारने त्यात अति हस्तक्षेप करणे खटकतयं.

कन्हैया, रोहीत वगैरे काही धुतल्या तांदळासारखे नाहीतच. पण हे सर्व विद्यापीठ पातळीवरच हाताळलं जावं.

तर्राट जोकर's picture

8 Mar 2016 - 12:02 pm | तर्राट जोकर

सही पैचाना सप्रेसाब. :-)

कन्हैय्या, रोहित प्रकरणात काँग्रेस, केजरीवाल, नितीशकुमार, कम्युनिस्ट वगैरे सर्व मंडळींनी उडी घेतली. बजेट सेशन त्यात गुंडाळलं जाणार आणि सरकारला यथेच्च शिव्यांची लाखोली वाहिली जाणार हे ही उघड होतं. शेवटी दोन्हि बाजुंनी राजकारणाचा आखाडा रंगलाच. अन्यथा विद्यापिठीय राजकारणाला कोणतं केंद्रसरकार फुकटचं अंगावर घेतं? त्याला पर्याय काय होता?

शलभ's picture

8 Mar 2016 - 2:10 pm | शलभ

+१११११

श्रीगुरुजी's picture

8 Mar 2016 - 2:42 pm | श्रीगुरुजी

कन्हैयाला सगळं माहीत होतं त्याने उमरला साथ दिली सगळं जरी खरं असलं/मानलं तरीही उमर हाच मुख्य पात्र आहे या सगळ्यात. त्यामुळे उमरऐवजी कन्हैया प्रकाशझोतात का याचं उत्तरं नाही मिळत.

कन्हैय्याबरोबर उमर व इतर ४-५ विद्यार्थ्यांवर कारवाई होणार याची कुणकुण लागल्यावर इतर सर्वजण भूमिगत झाले. कन्हैय्या लपला नव्हता, त्यामुळे त्याला लगेच अटक झाली. उमर व अनिर्बान ला काही दिवसानंतर अटक झाली. कन्हैय्याला अटक झाल्यावर त्याला प्रकाशझोतात आणले ते विरोधी पक्षांनी. राहुल गांधींनी तातडीने विद्यापीठात धाव घेऊन देशद्रोही विद्यार्थ्यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे सर्व प्रकाशझोत एकदम कन्हैय्यावर गेला. दुसरीकडे केजरीवाल ट्विटर माध्यमातून त्याला पाठिंबा देत होतेच. इतर विरोधी पक्ष व नेते (नितीशकुमार, साम्यवादी, काँग्रेसचे नेते) लगेच कन्हैय्याच्या पाठीशी उभे राहिल्याने इतर विद्यार्थी मागे पडले व सर्व झोत एकट्या कन्हैय्यावरच आला.

विद्यार्थी संघटनांची भांडणं त्याच पातळीवर राहू द्यावीत. केंद्र सरकारने त्यात अति हस्तक्षेप करणे खटकतयं.

कन्हैया, रोहीत वगैरे काही धुतल्या तांदळासारखे नाहीतच. पण हे सर्व विद्यापीठ पातळीवरच हाताळलं जावं.

ते जर दोन विद्यार्थी संघटनातील भांडण असते, तर पोलिस किंवा केंद्र सरकार त्यात पडले नसते. अनेक देशद्रोही घोषणा दिल्याची चित्रफीत सर्वत्र प्रसिद्ध झाल्यावर पोलिसांना थंड बसून राहणे शक्यच नव्हते. विद्यापीठात डाव्या विचारांच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा भरणा असल्याने विद्यापीठाने यावर स्वतःहून काहीही कारवाई केली नसती. एकदा देशविरोधी घोषणा दिल्यावर संपूर्ण प्रकरण विद्यापीठाच्या अधिकार कक्षेच्या बाहेरच गेले होते.

तर्राट जोकर's picture

8 Mar 2016 - 2:48 pm | तर्राट जोकर

अनेक देशद्रोही घोषणा दिल्याची चित्रफीत सर्वत्र प्रसिद्ध झाल्यावर पोलिसांना थंड बसून राहणे शक्यच नव्हते. विद्यापीठात डाव्या विचारांच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा भरणा असल्याने विद्यापीठाने यावर स्वतःहून काहीही कारवाई केली नसती. एकदा देशविरोधी घोषणा दिल्यावर संपूर्ण प्रकरण विद्यापीठाच्या अधिकार कक्षेच्या बाहेरच गेले होते.
>> मग जादवपूर विद्यापिठात का नाही कारवाई झाली? तिथे काय झालं? जादवपूरच्या चित्रफितीत घोषणा देनार्‍यांचे चेहरेही स्पष्ट दिसत आहेत.

श्रीगुरुजी's picture

8 Mar 2016 - 3:46 pm | श्रीगुरुजी

(१) जादवपूर विद्यापीठ राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे (जसे पुणे विद्यापीठ हे महाराष्ट्र राज्याच्या अखत्यारीत आहे). ते केंद्रिय विद्यापीठ नाही. त्यामुळे केंद्र त्यात लक्ष घालू शकत नाही.

(२) जेएनयु केंद्रीय विद्यापीठ आहे. केंद्र त्यात हस्तक्षेप करू शकते.

(३) जेएनयु दिल्लीत असल्याने व दिल्लीतील पोलिस केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने दिल्लीच्या पोलिसांना तिथे जाऊन कारवाई करायचा अधिकार आहे. जर दिल्ली पोलिस दिल्ली राज्याचा अखत्यारीत असते तर तेथील आआप सरकारने याबाबतीत काहीही केले नसते. सुदैवाने दिल्ली पोलिस आआपच्या अखत्यारीत नाहीत.

(४) जादवपूर विद्यापीठातील कोणतीही पोलिस कारवाई फक्त राज्य सरकारच करू शकते. केंद्र सरकार त्याबाबतीत सक्ती करू शकत नाही. परंतु राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

(५) केंद्र सरकारचे स्वतःचे पोलिस दल नाही. त्यामुळे जर राज्याने केंद्राकडे एखादे गुन्हेगारी प्रकरण सोपवायचे ठरविले तरच केंद्र सरकार सीबीआय, एनआयए इ. द्वारा प्रकरणात हस्तक्षेप करू शकते. राज्याने ते प्रकरण स्वतःच हाताळायचे ठरविले तर केंद्र सरकार काहीही करू शकत नाही.

तर्राट जोकर's picture

8 Mar 2016 - 4:14 pm | तर्राट जोकर

(१) पोलिसांच्या कार्यकक्षेमुळे देशद्रोही घोषणांचा अर्थ बदलतो काय? राज्याप्रमाणे गुन्ह्यांची प्रतवारी, महत्त्व बदलतं काय?

(३) माझ्यामते पोलिस कुणाच्या अधिकाराखाली आहेत ह्यापेक्षा गुन्हा काय घडलाय, तक्रार काय आली आहे ह्यावर काम करत असावेत. तसे नसेल तर पोलिसांना सत्ताधार्‍यांच्या हातचे बाहुले आहेत, ज्या पक्षाचे सरकार राज्यात आहे त्या पक्षाच्या कोणत्याच कार्यकर्त्यावर पोलिस कारवाई करनार नाहीत तसेच सत्ताधारी पोलिसांचा वापर करुन विरोधकांचा कायमचा बंदोबस्त करु शकतात असा तुमच्या विधानाचा अर्थ निघतो.

(४) माझ्यामते कोणतीही पोलिस कारवाई भारतीय दंड संहितेनुसार करते, राज्यसरकारच्या मनमर्जीप्रमाणे नाही.

(५) म्हणजे सरकार कोणाचे आहे ह्यावरुन देशद्रोह झाला की नाही, त्याला शिक्षा करायची की नाही हे ठरते. भारतीय राज्यघटनेनुसार नाही. असे म्हणायचे आहे काय?

तुमच्या म्हणण्यानुसार एखादे राज्यसरकार देशद्रोही तत्त्वांना पाठिशी घालत असेल तर केंद्रसरकार काहीच करु शकत नाही? हे त्या राज्यसरकारचे देशद्रोही वागणेच नाही का ठरणार?

विवेक ठाकूर's picture

8 Mar 2016 - 4:39 pm | विवेक ठाकूर

माझ्यामते कोणतीही पोलिस कारवाई भारतीय दंड संहितेनुसार करते, राज्यसरकारच्या मनमर्जीप्रमाणे नाही

हे गुरुजींच्या आकलना पलिकडे आहे!

सुबोध खरे's picture

8 Mar 2016 - 7:07 pm | सुबोध खरे

असे असते तर काश्मीर किंवा पूर्वोत्तर राज्यांमध्ये AFPSA लागू करण्याची गरज का पडली असती? किंवा काश्मीर मध्ये सहा वर्षे आठ महिने राष्ट्रपती राजवट का ठेवावी लागली? १९९० ते १९९६. या काळात कॉंग्रेसचीच केंद्रात राजवट होती. काश्मीर मधील पोलीस हे दहशतवाद्यांबद्दल "सहानुभूती" बाळगून आहेत हे सत्य आहे. तेथे सर्रास होणारा पाकिस्तानचा उदो उदो आपण पाहत नाही का?
पोलिसांचा "बोलविता धनी" कोण असतो ते आपणास ठाऊक नाही काय?
असो
काळा चष्मा लावला कि जग काळे किंवा करडेच दिसणार

श्रीगुरुजी's picture

8 Mar 2016 - 10:49 pm | श्रीगुरुजी

खाली सविस्तर उत्तर दिले आहे. दुर्दैवाने सर्वच गोष्टी तुमच्या आकलनापलिकडे आहेत.

विकास's picture

8 Mar 2016 - 8:48 pm | विकास

पोलिसांच्या कार्यकक्षा ठरलेल्या असतात. एका कार्यकक्षेतील पोलीसांना जर दुसरीकडे जाऊन कुणाला पकडायचे असेल तर तिथल्या पोलीस प्रमुख (जे काही टायटल असेल ते) त्याची आणि मला वाटते न्यायालयीन (मॅजिस्ट्रेट, कोर्ट वगैरेची) परवानगी घ्यावी लागते.

माझ्यामते कोणतीही पोलिस कारवाई भारतीय दंड संहितेनुसार करते, राज्यसरकारच्या मनमर्जीप्रमाणे नाही.

पण मग याचा अर्थ जेएनयु ला जे काही झाले ते पोलिसांनी भारतीय दंड संहितेनुसार केले आहे, केंद्र सरकारच्या मर्जीने नाही, असेच तुमचे मत आहे का? का परत एकदा वातकुक्कुट? ;)

तर्राट जोकर's picture

8 Mar 2016 - 10:13 pm | तर्राट जोकर

प्रश्न एवढाच आहे की पोलिस कायद्याने वागतात की सरकारी मर्जीने?
१. जादवपुरमधे पोलिस सरकारी मर्जीने वागले असतील तर दिल्लीतही सरकारी मर्जीनेच कारवाई झाली का?
२. दिल्लीत जर पोलिसांच्या कायद्याने वागले असतील तर मग जादवपूरमधे का नाही वागले?
३. जादवपूर आणि दिल्ली दोन्ही पोलिसांसाठी देशद्रोहाचा कायदा वेगवेगळा आहे का?
४. देशद्रोहाच्या कायद्यानुसार फक्त केंद्राच्या पोलिसांनाच कारवाईचा अधिकार आहे का?

बोला, कुणीकडं वाहतोय वारा?

विकास's picture

8 Mar 2016 - 10:22 pm | विकास

तुम्ही तुमच्या मुळच्या वाक्यात या सगळ्याचे उत्तर दिले आहेत. ते मूळ वाक्य खालील प्रमाणे:

माझ्यामते कोणतीही पोलिस कारवाई भारतीय दंड संहितेनुसार करते, राज्यसरकारच्या मनमर्जीप्रमाणे नाही.

थोडक्यात, जादवपुरच्या पोलीसांनी भादंवि प्रमाणे कारवाई करायला हवी होती. पण ज्या अर्थी केली नाही त्या अर्थी त्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले नाही. अशा वेळेस पोलीस खाते ज्या मंत्रालयाच्या अख्त्यारीत येते त्या मंत्रालयाला, अर्थात गृहमंत्रालयातील गृहसचीव आणि त्यांचे बॉस गृहमंत्री यांना लक्ष घालणे हे त्यांचे कर्तव्य आहे. अर्थातच जादवपूर संदरर्भात ते पार पडलेले नाही....

बरं दिल्ली पोलीसांनी केलेले भादंविच्या कक्षेबाहेरील असते तर कोर्टाने कन्हैय्याला विनाशर्त सोडले असते. कानपिचक्या देत आणि त्याच्या घरच्या उत्पन्नाचा संदर्भ घेत कमीत कमी जामिनावर, काही काळापुरते सोडले नसते. आणि हो, कन्हैय्याला देखील हे माहीत आहे की तो बोलताना बॉर्डरलाईन बोलतोय... म्हणूनच परत परत तुरूंगात जावे लागू शकेल असे तो म्हणाला आहे.

आता पुढची खेळी - प. बंगालच्या निवडणुकांच्या प्रचारात प्रक्षोभक बोलेल. मग इसी सुनावतील अथवा कारवाई करतील. मग परत सगळे भाषणस्वातंत्र्य म्हणून बोंबलायला लागतील.

श्रीगुरुजी's picture

8 Mar 2016 - 10:48 pm | श्रीगुरुजी

(१) पोलिसांच्या कार्यकक्षेमुळे देशद्रोही घोषणांचा अर्थ बदलतो काय? राज्याप्रमाणे गुन्ह्यांची प्रतवारी, महत्त्व बदलतं काय?

नाही. परंतु कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल करायचा याचे अधिकार पोलिसांकडे आहेत. राज्याप्रमाणे गुन्ह्यांची प्रतवारी किंवा महत्त्व न बदलणे अपेक्षित आहे. परंतु त्या राज्यात कोणत्या पक्षाचे सरकार आहे व गुन्हेगार कोण आहेत यावरच गुन्हेगारांवर कोणते कलम लावायचे का लावायचेच नाही, तपास वेगाने करायचा का संथ करायचा का करायचाच नाही इ. गोष्टी ठरविल्या जातात.

(३) माझ्यामते पोलिस कुणाच्या अधिकाराखाली आहेत ह्यापेक्षा गुन्हा काय घडलाय, तक्रार काय आली आहे ह्यावर काम करत असावेत. तसे नसेल तर पोलिसांना सत्ताधार्‍यांच्या हातचे बाहुले आहेत, ज्या पक्षाचे सरकार राज्यात आहे त्या पक्षाच्या कोणत्याच कार्यकर्त्यावर पोलिस कारवाई करनार नाहीत तसेच सत्ताधारी पोलिसांचा वापर करुन विरोधकांचा कायमचा बंदोबस्त करु शकतात असा तुमच्या विधानाचा अर्थ निघतो.

अगदी बरोबर आहे.

(४) माझ्यामते कोणतीही पोलिस कारवाई भारतीय दंड संहितेनुसार करते, राज्यसरकारच्या मनमर्जीप्रमाणे नाही.

तसे करणे अपेक्षित आहे. परंतु तसे नेहमीच होते असे नाही. ज्यावेळी गुन्ह्यात राजकीय पक्षांशी संबंध नसलेल्या नागरिकांचा संबंध असतो तेव्हा पोलिस कायद्यानुसार जातात. पण जेव्हा राजकीय पक्षाशी संबंधित, सेलेब्रिटीज इ. चा गुन्ह्यात संबंध असतो तेव्हा तेव्हा त्या व्यक्तीच्या राजकीय ताकदीनुसार पोलिसांची कारवाई ठरते.

(५) म्हणजे सरकार कोणाचे आहे ह्यावरुन देशद्रोह झाला की नाही, त्याला शिक्षा करायची की नाही हे ठरते. भारतीय राज्यघटनेनुसार नाही. असे म्हणायचे आहे काय?

देशद्रोह झाला की नाही किंवा देशद्रोहाचे कलम लागू पडते का नाही हे न्यायालय ठरविते. न्यायालय राज्यघटनेनुसार चालते. पोलिसांनी गुन्हा नोंदविताना देशद्रोहाचे कलम लावले तरी ते वैध आहे का नाही हे न्यायालय ठरविते. हार्दिक पटेल व कन्हैय्या यांच्यावरील देशद्रोहाचे कलम न्यायालयाने रद्द केलेले नाही. परंतु असीम त्रिवेदीवर लावलेले देशद्रोहाचे कलम न्यायालयाने रद्द केले होते.

तुमच्या म्हणण्यानुसार एखादे राज्यसरकार देशद्रोही तत्त्वांना पाठिशी घालत असेल तर केंद्रसरकार काहीच करु शकत नाही? हे त्या राज्यसरकारचे देशद्रोही वागणेच नाही का ठरणार?

कायदा व सुव्यवस्था हे राज्याचा अधिकारातले विषय आहेत. त्यात केंद्र सरकार स्वतःहून हस्तक्षेप करू शकत नाही. जर राज्य सरकारने केंद्र सरकारची मदत मागितली तरच केंद्र त्यात उतरते. एखादे राज्यसरकार देशद्रोही तत्वांना (उदा. जादवपूर) पाठीशी घालत असेल तर केंद्र त्याबाबत सक्ती करू शकत नाही. केंद्राशी संबंधित विषय असतील (उदा. सैन्यातील हेरगिरी, सीमेवरील तस्करी, शस्त्रास्त्रांची/अंमली पदार्थांची चोरटी आयात इ.) तरच केंद्र त्यात थेट कारवाई करू शकते.

विकास's picture

8 Mar 2016 - 9:01 pm | विकास

त्यामुळे उमरऐवजी कन्हैया प्रकाशझोतात का याचं उत्तरं नाही मिळत.

विद्यापिठ प्रशासनाने जेंव्हा उमरने आयोजित केलेल्या तथाकथीत सांस्कृतिक कार्यक्रमाची परवानगी नाकारली, तेंव्हा जेएनयु विद्यार्थी संघटनेने (ही सर्व विद्यार्थ्यांची संघटना आहे, विद्यार्थि प्रशासन असल्यासारखे आहे, एका पक्षाची नाही) त्याला विरोध करत या कार्यक्रमाला पाठींबा दिला. अर्थात तो देण्यासाठी कन्हैय्याने स्वतःचे अध्यक्षिय वजन वापरले आणि स्वतः हजर राहीला, ह्याचे पुरावे आहेत... तितकेसे कारण, पोलीसांना कारवाई करण्यासाठी पुरेसे आहे.

विद्यार्थी संघटनांची भांडणं त्याच पातळीवर राहू द्यावीत. केंद्र सरकारने त्यात अति हस्तक्षेप करणे खटकतयं.
"विद्यार्थी संघटनांची भांडणं त्याच पातळीवर राहू द्यावीत" हे मान्यच. मात्र जर का केंद्राकडे कोणिही तक्रार केली तर केंद्रातील त्या संदर्भातील जबाबदार व्यक्तीस काहीतरी अ‍ॅक्शन घ्यावीच लागेल. कन्हैय्याने देखील माध्यमांकडे जाण्याऐवजी केंद्राकडे तक्रार केली असती तर केंद्राला तेच करावे लागले असते.

कन्हैया, रोहीत वगैरे काही धुतल्या तांदळासारखे नाहीतच.

कन्हैय्याच्या बाबतीत हे १००% मान्य आहे. रोहीथच्या बाबतीत आता कळायला मार्ग नसल्याने काहीच बोलणे योग्य ठरणार नाही. तो वेगळा विषय आहे, तरी देखील किंचीतः त्याच्या फेसबुकवरील वाटचालीवरून त्याची दिशाभूल नंतरच्या काळात केजरीवाल आदींनी केली असावी असे वाटते. अर्थात त्यात देखील ती मुद्दामून केली असावी असे मी म्हणणार नाही (जरी मला केजरीवाल अजिबात मान्य नसले तरी). पण कुठेतरी त्याचा भ्रमनिरास झाला असावा असे वाटते. आणि भ्रमनिरास हा आपल्याला आवडणार्‍या अथवा आदर्श वाटणार्‍या व्यक्ती/संघटनेकडून होतो, ज्यांच्याशी वैर केले आहे त्यांच्याकडून नाही... असो.

बाळ सप्रे's picture

9 Mar 2016 - 11:48 am | बाळ सप्रे

तितकेसे कारण, पोलीसांना कारवाई करण्यासाठी पुरेसे आहे.

यातच सगळं आलं. तो टारगेट होता फक्त कारणं शोधायच काम होतं.. की आत टाकलाच त्याला.

विकास's picture

8 Mar 2016 - 9:36 pm | विकास

कम्युनिस्ट ज्या प्रकारे संघस्वयंसेवकांची हिटलिस्ट करून खरेच हिंसक वागले आहेत, तसे किमान अजून तरी अभाविप वागले आहेत असे वाटत नाही. आवाज करण्याचे स्वातंत्र्य पक्षी: भाषण-विचार स्वातंत्र्य आपल्याला मान्य असेलच असे गृहीत धरतो. त्यामुळे त्याला आणि कायद्याला अनुसरून कोणीही काही करण्यात काहीच चूक नाही. अगदी कन्हैय्याने देखील... म्हणूनच तर त्याने जामिनावरील अटी मान्य केल्या आहेत. (त्या तो पाळतो आहे का नाही, ते काही दिवसातच बाहेर येईल. इतक्यात अपेक्षा नाही)

पण मध्यंतरी एका तरूण संघस्वयंसेवकाला केरळ मधे त्याच्या आईवडीलांसमोर मारले. आता आज चक्क एनडीटिव्हीला देखील खालील बातमी द्यावी लागली.

RSS Worker Stabbed As Schoolchildren Watch In Horror In Kerala's Kannur

हे सर्व कम्युनिस्ट गुंड का करू शकत आहेत कारण तेथे कम्युनिस्टांचे राज्य आहे आणि तो भाग कम्युनिस्ट बहुल आहे. पण ते कायद्याने करण्याऐवजी कायदा हातात घेऊन हिंसेने करत आहेत...

ट्रेड मार्क's picture

8 Mar 2016 - 10:50 pm | ट्रेड मार्क

चक्क NDTV ने RSS Worker लिहिलंय म्हणजे सुधारणा म्हणायची. नाहीतर नुसतेच रिक्षा ड्रायवर म्हणले असते.

बाळ सप्रे's picture

9 Mar 2016 - 11:44 am | बाळ सप्रे

हेच म्हणायचय मला.. कम्युनिस्टांइतकं वाईट नाही वागत बीजेपी.. असं समर्थन का?? चुकतय काहितरी हे चुकुनही येत नाही.. प्रत्येक गोष्ट जस्टीफाय करायची धडपड.

"जीभ कापून आणणार्‍यास बक्षीस" वगैरे गोष्टीदेखिल
अजून कापली कुठेय जीभ, नुसतच म्हटलय, कम्युनिस्टांसारखं, अतिरेक्यांसारखं मारलं नाहिये ना.. असं जस्टीफाय व्हायची वाट बघतोय.

हे सर्व कम्युनिस्ट गुंड का करू शकत आहेत कारण तेथे कम्युनिस्टांचे राज्य आहे

तसचं अभाविपचे गुंड प्रतिस्पर्ध्यांचे कार्यक्रम बंद पाडतात.

भारतविरोधी घोषणांचे समर्थन नाही, पण संशयावरून कार्यक्रम बंद पाडून आधीच मुस्कटदाबी करायला नको होती. मूळ कार्यक्रम होउ दिला असता आणि त्यात तसे विचार मांडले गेले असते तरी देशद्रोहाचा आरोप लावता आलाच असता ना.. कोणी सांगावं काश्मीर विषयक विचार संयमित भाषेतही आले असते त्यात.

प्रतिस्पर्ध्याला आधीच संशयावरून मिटवणं हीदेखिल अभाविपची गुंडगिरिच.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 Mar 2016 - 4:24 am | निनाद मुक्काम प...

कानैह्या विरुद्ध प्रत्यक्ष साक्षीदार आहेत आणि आणि अजून अनेक पुरावे आहेत असे दिल्ली पोलिसांनी एन डी टीव्ही ला सांगितले
कनैह्या वर भारतातील महागड्या वकिलांची फौज तैनात खर्च कोण करणार पक्ष
येचुरी विद्यापीठात येतात गृह मंत्र्यांना भेटतात ,थोडक्यात आपल्या पक्षाचा विद्यार्थी नेता अडचणीत आला कि हस्तशेप करतात
पण खबरदार स्मृतीजी तुम्ह्च्या पक्षाचा विद्याथी नेता अडचणीत आला आणि तुम्ही त्याला मदत केली तर
हम करे तो साला केरेक्तर ढिला हे

श्री गावसेना प्रमुख's picture

5 Mar 2016 - 7:46 am | श्री गावसेना प्रमुख

येचुरी म्हणाले कि कन्हैय्या आता बंगाल मध्ये आमचा प्रचार करणार,इथून कोणी कम्युनिस्ट असतील प्रचाराला जाण्यासाठी तर त्यांच्याशी संपर्क करा,भांडवलशाहीवर टीका करण्यासाठी भांडवल शाही चॅनेल चीच गरज असते,आणि आता प्रचार चॅनेल इंटरनेट वरून न करता जीप मधून करा ,जसे 10 20 वर्षांपूर्वी करायचे तसे।

विकास's picture

5 Mar 2016 - 9:59 am | विकास

त्याचं असं आहे...लोकसभा निवडणुकीत कन्हैय्या सभासद असलेल्या कम्युनिस्ट पक्षाला केवलळ ३.७% मते पडले होती. म्हणजे ९६.३% जनतेने त्यांना नाकारले होते. म्हणून किमान आता प. बंगाल तरी आपले करायला हवे ना! तरी बरं नास्तिक आहेत, नाहीतर प्रश्नच पडला असता की कालीची प्रार्थना करायची का महीषासुराची म्हणून!

श्री गावसेना प्रमुख's picture

5 Mar 2016 - 10:55 am | श्री गावसेना प्रमुख

ते नास्तिक जरी असले तरी ते अपवाद म्हणून महिषासुराला पूजतील ते, इथल्या कम्युनिस्टांनी बंगाल मध्ये एक दोन वर्ष राहायला जाऊन तिथेही नोंदणी करून घ्यावी म्हणजे कस डबल मतदान करता येईल ,प्रवास भत्ता कन्हैय्या चे वैचारिक व आर्थिक पालक पेड करतीलच।राग लोभ असावा कम्युनिस्टांन्नो

पैसा's picture

5 Mar 2016 - 8:09 am | पैसा

हे डॉ म्हात्रेंच्या स्मृती इराणी च्या भाषणाच्या धाग्याचे विडंबन आहे का? शीर्षक कंसात टाकायला पाहिजे होते.

शलभ's picture

5 Mar 2016 - 11:47 am | शलभ

+१११

कॅम्पसमधून कोर्स पूर्ण होण्याआधीच थेट लाखो डॉलरवाला गूूगल, मायक्रोसॉफ्ट उच्च जॉब मिळवल्याच्या बातम्या ऐकू येतात तसं यश वाटतंय हे.

शलभ's picture

5 Mar 2016 - 11:49 am | शलभ

चपखल..;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Mar 2016 - 3:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद आवडला.

-दिलीप बिरुटे

नंतर हेच लोक्स त्याच कंपनीत कुठे सीईओ वगैरे गेलाबाजार एखाद्या कंपनीचे प्र्मुख म्हणून बनलेत अशा बातम्या नाही एकू येत. ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Mar 2016 - 8:39 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

किती करायचे?

स्वामी संकेतानंद's picture

5 Mar 2016 - 8:53 am | स्वामी संकेतानंद

हेहेहे! मज्जा आली!! :D

अनुप ढेरे's picture

5 Mar 2016 - 8:57 am | अनुप ढेरे

बटाटाच्या चाळीतलं गच्ची आंदोलनातल्या कुशाभाऊच्या भाषणासारखं वाटलं. नंतर नंतर जसे तिथे लोक आधी 'जय' ओरडायचे आणि नंतर घोषणा यायची तसच इथेही झालय.

पुलंची उदाहरणं देता? नीचभ्रू कुठचे.;-)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Mar 2016 - 9:24 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

नीचभ्रु शब्द प्रचंड आवडलेला आहे. हुच्चं बरोबर हाही लोक्प्रिय होईल यात लघुशंका नाही.

Anand More's picture

5 Mar 2016 - 9:21 am | Anand More

:D

इतकी सर्टिफिकेट वाचायची सवय नाही राव.

तिमा's picture

5 Mar 2016 - 10:04 am | तिमा

भांडवलशाही आणि साम्यवाद ह्या दोन्हीही आदर्श व्यवस्था नाहीत. दोन्हीतही व्यक्तिगत स्वातंत्र्यावर घाला वगैरे होतोच. फक्त, एकात तो भरल्यापोटी होतो तर दुसर्‍यांत तो उपाशीपोटी होतो.

सतिश गावडे's picture

5 Mar 2016 - 12:03 pm | सतिश गावडे

सहमत. मात्र भांडवलशाहीत कर्तृत्ववानांना प्रगतीला वाव असतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Mar 2016 - 11:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कन्हैयाकुमार फार मोठा भारतीय नेता होणार आहे हे नक्की. दुसरे केजरीवाल मला त्यात दिसले. भारतीय गरीब लोक, शेतकरी, आदिवासी, दीन दलिताबद्दल कोणी बोल्लं की मला ती व्यक्ती राजकीय शाळेतील शिक्षणाचे धड़े गिरवत आहे, असे वाटते.

देशाची एकात्मता धोक्यात येईल, देशातील लोकच एकमेकाकडे संशयाने पाहतील असे वक्तव्य करणा-याला मग तो कोणत्याही पक्षाचा नेता अथवा नागरिक असो, नागडं करून मिरचीची धुरी दिली पाहिजे.

-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

5 Mar 2016 - 12:19 pm | माहितगार

लालूंना जेएनयुतून शिकवून बाहेर काढल्यास कसे वाटले असते ? बाकी हा गडी मास बेस भाषंणांसाठी डाव्या चळवळींना उपयोग करुन घेण्या जोगा आहे पण डावी चळवळ कॅडर बेस्ड असते त्यामुळे याची डाव्यांसोबतची गाडी किती दूर पर्यंत जाईल याची शंका आहे, बहुधा डाव्यांपासून फुटून नंतर एखाद्या तथाकथित समाजवादी पक्षात जाऊन रमेल.

निशांत_खाडे's picture

5 Mar 2016 - 3:56 pm | निशांत_खाडे

भारतीय गरीब लोक, शेतकरी, आदिवासी, दीन दलिताबद्दल कोणी बोल्लं की मला ती व्यक्ती राजकीय शाळेतील शिक्षणाचे धड़े गिरवत आहे, असे वाटते.

असेच म्हणतो..

भंकस बाबा's picture

5 Mar 2016 - 5:24 pm | भंकस बाबा

तो राजकीय नेताच होईल, ते कैम्पस मधे मुलाखत घेऊन लाखोंचे पॅकेज, कोण आपल्या पायावर धोंडा मारून घेईल?
रच्याकने तो काय अभ्यासक्रम करतो आहे तो पास होईल काय? बेणं नाय ते करण्यात जास्त गुंतल आहे.
त्याच्या एकूण भाषणावरुन डाव्याचां पप्पू बनणार बहुतेक!

विकास's picture

5 Mar 2016 - 5:32 pm | विकास

तो राजकीय नेताच होईल, ते कैम्पस मधे मुलाखत घेऊन लाखोंचे पॅकेज, कोण आपल्या पायावर धोंडा मारून घेईल?
हो अगदी खरे आहे.

डाव्याचां पप्पू बनणार बहुतेक

तो पप्पू नाही आहे. महा चालू आहे. कम्युनिस्टांना सध्या खोगिरभरती करायची आहे. आधीच जनता भिक घालत नाही, केजरीवाल कडून अपेक्षा होती, पण त्याने वेगळेच दुकान थाटले, त्यात असलेले नेते कमी होऊ लागले आहेत. म्हणून त्याला तयार केले जात आहे.

तसे मला राजकारणातल्या आदीपप्पू राहूलजींची खरेच दया येते. बिचारा! काँग्रेस शेंदूर फासला आणि हा नको त्या क्षेत्रात फसला...

कुंदन's picture

5 Mar 2016 - 6:07 pm | कुंदन

जे एन यु मधले भाषण तर धडाक्यात झालेले दिसतेय.
वेशभुषा पण एखाद्या रॉकस्टार सारखी होती , फारच गरीब घरातुन आल्यासारखा वाटतोय हा.
wardrobe courtesy कुणाची ते मात्र कळले नाहीये अजुन.

माहितगार's picture

5 Mar 2016 - 7:36 pm | माहितगार

वेशभुषा पण एखाद्या रॉकस्टार सारखी होती , फारच गरीब घरातुन आल्यासारखा वाटतोय हा.
wardrobe courtesy कुणाची ते मात्र कळले नाहीये अजुन.

वॉर्डरोबपे मत जाइएगा, रावसाहेबांना मैत्रिणी पण आहेत. आणि लिडर म्हटल्यावर अगदीच अवघड नसावे, कम्युनिस्टांपासून सुरवात करेल पण कम्युनीस्ट पठडीत फार काळ टिकणार अवघड रहावे.

पैसा's picture

5 Mar 2016 - 8:06 pm | पैसा

वृंदा कारत च्या साड्या बघून आमच्यासारखे लोक तोंडात बोटे घालतात असल्या भारी कॉटन साड्या आम्हाला का परवडत नाहीत!

माहितगार's picture

5 Mar 2016 - 11:36 pm | माहितगार

राजीव गांधी पंतप्रधान होण्याच्या पुर्वि त्यांना कुणितरी तुमच्या घरी सिमिंग पूल ठेवणे कसे काय (आर्थीकदृष्ट्या) जमते असे विचारल्यावर त्यांनी त्यात काय एवढे प्रत्येकाच्या घरी असावयास हवे असे उत्तर दिले, तसेच काहीसे वृंदा करातही उत्तर देतील का ?

विकास's picture

6 Mar 2016 - 1:04 am | विकास

तुम्हाला कोणी अडवलयं? ;)

एखाद्या चळवळीत तुम्ही देखील उडी घेऊ शकता. हवी असली तर एखादी एनजीओ चालू करा. धरणे धरा, घोषणा-निषेध करा, धर्मोच्छेदक होण्याचा समाजाला मार्ग दाखवा, परदेशी फंडींग मिळवा.. मग कॉटनच्या साड्याच कशाला, ड्रायवरसकट गाड्यापण मिळतील. :)

जेपी's picture

5 Mar 2016 - 11:36 am | जेपी

मला उच्चशिक्षणासाठी युनिव्हर्सिटीत जायच.माझी देशासाठी काहि तरी करायची इच्छा होती.
पण बापुस पेकाडात लाथ घालील"घोडा झालास आता.काम धंदे करा,अभ्यासाची थेर बंद करा."

अश्या तर्हेने एक नेता वाया गेल?

तर्राट जोकर's picture

5 Mar 2016 - 11:55 am | तर्राट जोकर

आधी बापुसच्या लाथेपासून आजादी मिळवा. मग देशाची काळजी करा. =))

नाखु's picture

5 Mar 2016 - 12:10 pm | नाखु

आधी कुठल्यातरी युनेवर्शीटीमध्ये ५-७ वर्षे तळ ठोक्कून दाखव (कोण रे तो डिग्री मिळव म्हणतोय हाणा त्याला व्य्क्तीस्वातंत्र्यावर घाला घाल्तात लेकाचे)
नंतर माधोपूर्,हुशांगबाद्,बोलीकुट्टी असल्या ठिकाणी एखादी विद्यार्थी विरूद्ध प्रशासन अशी घटना असेल तर लगेच सभा घे तुझ्या उनिवर्सीटीत आणि त्या सभेआडून ज्यांना ज्यांना शिव्या घालायच्यात, आणि अजून कुणाला कंडशमनार्थ बेलगाम निर्ल्लज नारेबाजी कर.अगदी अंगाशी आले तर मी नारेबाजी करायला सांगीतली नव्हती,मी त्या नार्यांच्या विरोधात होतो (हे पोलिसांचे फटके किती पडतात त्या नुसार)

तदनंतर चुकुन पोल्सांनी चौकशी साठी बोलावले तर बगल बच्च्यांना सांगून तुझ्या जंगी आगमनीची तयारी कर (आधिक माहीतीसाठी संजूबाबा+सल्लुबाबा दोस्तांची मदत घे)

पुढे कुणी ना कुणी दुखावलेला/पराभुत खासदार+आमदार तुला हार्दीक अरविंद स्वारी अभिनंदन करेलच करेल.

पुढे काही वर्षानी कोण जेप्या हे ही होईल (मधल्या काळात एखादा साखर कारखाना,शिक्षाण संस्था काढलीस तर मग अडचण नाही)

तर्राट जोकर's picture

5 Mar 2016 - 12:18 pm | तर्राट जोकर

अगदी अगदी. तंतोतंत.
ह्याच मार्गाने आपल्याला अभाविपच्या माध्यमातून कितीतरी दिग्गज नेते मिळालेत.

हो ना. कालच संगमा गेले. वाईट वाटले. :(

बोका-ए-आझम's picture

5 Mar 2016 - 12:20 pm | बोका-ए-आझम

एखादं नाव?

तर्राट जोकर's picture

5 Mar 2016 - 12:47 pm | तर्राट जोकर

लैच शिरेस घेता ब्वा तुम्ही. एबीव्हीपीतून भाजपात आलेल्या नेत्यांची नावं सांगू म्हणता?

सतिश गावडे's picture

5 Mar 2016 - 12:48 pm | सतिश गावडे

नांव घ्यायला लाजताय की काय? ;)

तर्राट जोकर's picture

5 Mar 2016 - 1:09 pm | तर्राट जोकर

छचोर आणि मूल्यहिन प्रतिसाद.

सतिश गावडे's picture

5 Mar 2016 - 1:17 pm | सतिश गावडे

अहो मी गंमतीत लिहिला होता. एव्हढं मनाला लावून घ्याल असं वाटलं नव्हतं. एकदा योद्धा रणात उतरला की त्याला त्वेष चढतो तसं झालं की काय तुमचं?

असो. दुखावणे हा हेतू नव्हता.

तर्राट जोकर's picture

5 Mar 2016 - 1:50 pm | तर्राट जोकर

व्हाय सो सिरियस? तुम्ही पण माझा प्रतिसाद अतिशय विनोदपूर्ण घेतला नाही ह्याचे आश्चर्य वाटले.

सतिश गावडे's picture

5 Mar 2016 - 2:20 pm | सतिश गावडे

=))

हे म्हणजे एकादशीच्या घरी शिवरात्र गेली असे झाले.

बोका-ए-आझम's picture

5 Mar 2016 - 1:28 pm | बोका-ए-आझम

आधी कुठल्यातरी युनेवर्शीटीमध्ये ५-७ वर्षे तळ ठोक्कून दाखव (कोण रे तो डिग्री मिळव म्हणतोय हाणा त्याला व्य्क्तीस्वातंत्र्यावर घाला घाल्तात लेकाचे)
नंतर माधोपूर्,हुशांगबाद्,बोलीकुट्टी असल्या ठिकाणी एखादी विद्यार्थी विरूद्ध प्रशासन अशी घटना असेल तर लगेच सभा घे तुझ्या उनिवर्सीटीत आणि त्या सभेआडून ज्यांना ज्यांना शिव्या घालायच्यात, आणि अजून कुणाला कंडशमनार्थ बेलगाम निर्ल्लज नारेबाजी कर.अगदी अंगाशी आले तर मी नारेबाजी करायला सांगीतली नव्हती,मी त्या नार्यांच्या विरोधात होतो (हे पोलिसांचे फटके किती पडतात त्या नुसार)

तदनंतर चुकुन पोल्सांनी चौकशी साठी बोलावले तर बगल बच्च्यांना सांगून तुझ्या जंगी आगमनीची तयारी कर (आधिक माहीतीसाठी संजूबाबा+सल्लुबाबा दोस्तांची मदत घे)

पुढे कुणी ना कुणी दुखावलेला/पराभुत खासदार+आमदार तुला हार्दीक अरविंद स्वारी अभिनंदन करेलच करेल.

पुढे काही वर्षानी कोण जेप्या हे ही होईल (मधल्या काळात एखादा साखर कारखाना,शिक्षाण संस्था काढलीस तर मग अडचण नाही)

ते सगळे असे पाहिजेत पण. तुम्हीच तुमच्या प्रतिसादात तंतोतंत असं म्हटलंय.अभाविपमधून भाजपमध्ये आलेले विनोद तावडे, आशिष शेलार, पराग अळवणी, पूनम महाजन, आधीच्या पिढीतले गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन - हे सगळे माहिती आहेत. याव्यतिरिक्तही असतील. वरती नाखुकाकांचा प्रतिसाद दिलाय, तसा एखादा आहे का?