टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
एक शृंगारीक कविता
प्रेषक रामदास ( सोम, 09/15/2008 - 19:05) .
भिरभिरते अशी नजर कशाला
का, पदर चाचपून बघते ग.
भाळावरचे थेंब टिपूनी
का ,उगाच खुद्कन हसते ग.
एकांतामधी चावेचिमटे
कोण तपासून बघते ग
दाताखाली ओठ चावूनी
कोण उसासून थकते ग.
झिम्म्ड फुगडी मिठी रांगडी
कुठे सांडली बुगडी ग
दहीवर आले उंबरठ्याशी
रात्र तोकडी पडली ग
बोटावरती दिवस मोजूनी
हिशोब कसला धरते ग
लुटून गेले पीक पहाटे
गोफण आता कसली ग.
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

वा...
बोटावरती दिवस मोजूनी
हिशोब कसला धरते ग
लुटून गेले पीक पहाटे
गोफण आता कसली ग.
वा फक्कड कविता.... आवडली......
सुरेख...
विद्याधर
प्रष्न
http://vipravani.wordpress.com/
दहीवर म्हण्जे काय. खुप गोंधळ होतो आहे.
पीक लुटायला पहाटेपर्यंत वाट बघावी लागली.
फोर्मुला सांगा. सहजरावाच्या फेव्रिट धिरुभाई पेक्षा अमिर होईन.
गोफण कसली मध्ये कसली प्रश्नार्थक आहे का दुसरे काही.
दुसरे काही असले तर त्याचा पण फोर्मुला सांगा.
जगातल्या ३०% पूरुशांचे प्रोब्लेम सुट्तील.
बर आहे बाबा पहाटे पीक लुटुन गोफण कसलेली.
आय्ला कशाला काका लो़कांचे त्रास वाढव्ताय.
आपला चेला विनायक प्रभु
मास्तर
१ दहीवर म्हणजे सकाळी पडणारं धुकं +दव.
२ पीक बर्याच वेळा लुटलं गेलं.
३ गोफण म्हणजे साधी गोफण.
अंकल ,काय विचार आहे?
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
मास्टर पीस
http://vipravani.wordpress.com/
कळत नकळत तुम्ही एक मास्टर पीस लिहिला आहे. बहुदा कळतच. मराठी भाषेच्या लवचिकतेचा आधार घेत. इंग्रजी मध्ये अनुवाद ह्याच प्रतीचा झाला तर मास्टर जॉन्सनचे प्रकाशक डॉलर मध्ये पैसे देतील. कॉपी राईट घ्या. रुटीन ला कंटाळ्लेल्या किंवा रुटीन च्या बाहेर चे जग माहित नसलेल्याना ही कविता संजिवनी आहे. विश्वास ठेवा मला लोणी लावायला अजिबात जमत नाही.
विनायक प्रभु
चित्रदर्शी
लडिवाळ प्रसंग नाजुकपणे डोळ्यासमोर उभा राहिला.
शेवटच्या दोन ओळी पुन्हापुन्हा वाचाव्या लागल्या.
या ठिकाणी माझ्या डोक्यात पेरणीचे चित्र इतके घट्ट बसले आहे, (विशेषतः दिवस मोजायच्या संदर्भात) की पीक लुटले, गोफणीने रक्षण करायला उशीर झाला हे उपमाचित्र काही केले तरी चपखल बसत नाही.
तरी वेदकाळापासून रखडत आलेल्या तप्तमुद्रांकित "पेरणी"पेक्षा कापणीची तुमची उपमा तजेलदार, आह्लाददायक, गोड-वात्रट आहे. त्यामुळे कविता पुन्हापुन्हा वाचून पूर्ण अर्थ लावायचा प्रयत्न करतो आहे.
सहमत !!!
शृंगारातल्या नाजुकपणाचा तोल शब्दात मस्त बांधलाय वाचायला मजा आली.
एकांतामधी चावेचिमटे
कोण तपासून बघते ग
दाताखाली ओठ चावूनी
कोण उसासून थकते ग.
क्या बात है ! उघड्या रानात चाव्याचिमट्यांच्या आठवणींनी उसासा नाही टाकायचं तर काय !
अप्रतिम चित्र उभ केलंय, जब्रा रे !
झिम्म्ड फुगडी मिठी रांगडी
कुठे सांडली बुगडी ग
दहीवर आले उंबरठ्याशी
रात्र तोकडी पडली ग
बोटावरती दिवस मोजूनी
हिशोब कसला धरते ग
लुटून गेले पीक पहाटे
गोफण आता कसली ग.
गोफनीची गरज पीक लुटून नये म्हणुन,तो केवळ धाक. पण आता बुगडी सांडली आहे, याच्यातच पीक नेल्याची खूण दिसते. तेव्हा बोटावर आता कोणता हिशोब करायचा ! असो, बर्याच दिवसानंतर एक चांगली कविता वाचायला मिळाली.
अतिशय सुंदर
कविता फार फार आवडली.
(शृंगारप्रेमी)बेसनलाडू
अनुभव
अनुभवास प्राधान्य आहे. छान.
(आपला पुणेरी)
अ. अ. जोशी
;)
मस्त! एकदम मस्त!
-(लब्बाड!) ऋषिकेश
सुरेख, अस
सुरेख,
अस फक्त अनुभवि लोकच लिहु शकतात का हो काका?
काका...
मिपावर इंजिनियरींगला असणारी, नुकतीच इंजिनियरींग कॉलेज सोडलेली पोरंही आहेत बरं का...
बाकी,
बोटावरती दिवस मोजूनी
हिशोब कसला धरते ग
लुटून गेले पीक पहाटे
गोफण आता कसली ग
हे अगदी क्लास !!!
(शृंगाराचं पुस्तकी ज्ञान असलेला
)
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
रामदासराव,
रामदासराव,
साधी, सोपी परंतु तेवढीच सुंदर कविता आवडली....!
आपला,
(दहिवरप्रेमी) तात्या.
बदल
लुटून गेले पीक पहाटे
ह्या ऐवजी
लुटून नेले पीक पहाटे
असा बदल करावा, जर 'गेले' हाच शब्द हवा असेल तर -
लुटले गेले पीक पहाटे
असा बदल करता येईल..
पटलं तर व्हय म्हना
आप्पा
लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होते
बदल करून बघतो.
नेले काय आणि गेले काय...
भरतपूर लूट गयो, मोरी अम्मा हे खरे..
टे.इ.इ.
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
त्यानंतरची समस्यापूर्ती नावाची एक कविता
वाचून बघा. त्यात थोडी त्रुटी आहे.जो अपेक्षीत तो इंपॅक्ट आला नाही असं वाटतंय.
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
फर्मास कवीता!
रामदासशेठ
आपण कवी सुद्धा आहात हा शोध आज लागला
आपण कवी
आपण कवी सुद्धा आहात हा शोध आज लागला
सहमत आहे...!
स्वगत : आयला, हा रामदाससुद्धा अंमळ पोचलेला वाटतो!
तात्या.
शेअर
शेअर बाजारातुन डायरेक्ट कविता ?
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
क्या बात है!
लुटून गेले पीक पहाटे
गोफण आता कसली ग.
क्या बात है!!!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
जोरात
रामदास,
कविता जबरदस्त. लयबद्ध. फार आवडली.
आपण महान आहात !
--लिखाळ.
व्वा ! सहीच, अप्रतिम . . .
चित्रंच् डोळ्यासमोर उभं राह्यलं
काय सुरेख वर्णन !
बोटावरती दिवस मोजूनी
हिशोब कसला धरते ग
लुटून गेले पीक पहाटे
गोफण आता कसली ग.
व्वा ! इथल्या इथे नमस्कार घ्या रामदास.
बर्याच दिवसांनी महानोरांसारखी सकस कविता महानोरांशिवाय कुणाकडून तरी आली
लिखते जियो !