आरोग्यपूर्ण प्रवासासाठी

अजया's picture
अजया in विशेष
8 Mar 2016 - 12:00 am

LekhHeader

body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/x...");
background-repeat: repeat;
}

.inwrap {
border: 0.5em solid transparent;
-webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Safari 3.1-5 */
-o-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Opera 11-12.1 */
border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round ;
}

आंतरजालामुळे जग कितीही जवळ आले असले तरी माणसाची एक आवड त्याला कधी एकाजागी बसू देत नाही. ती म्हणजे भटकंती! पूर्वी परदेश प्रवास, विमान प्रवास या सर्वाची तरी अपूर्वाई असे. आता मात्र आपण सहजगत्या जालावरून माहिती घेतो, पैसे पाठवतो, प्रवास ठरवतो आणि भटकायला निघतो. अशा सुंदर आखलेल्या प्रवासात जर कोणी आजारी पडले तर मात्र चांगलीच पंचाईत होते आणि सहप्रवाश्यांचा हिरमोड. म्हणूनच प्रवासाच्या पूर्वतयारीत अगदी महत्त्वाची तयारी हवी ती म्हणजे संभाव्य प्रवासी आजारपणांना तोंड देण्यासाठी लागणारे प्रथमोपचार आणि औषधांची.

MedicalTravel

मागच्याच महिन्यात आमचे काही नातेवाईक इंदौर उज्जैनला फिरायला गेले होते. रात्री तिथे पोहोचता पोहोचता उशीर झाला. रस्त्यात एका ढाब्यावर सर्वांनी जेवण केले आणि लस्सी प्यायली. दुसर्‍या दिवशी खोल्या खोल्यांतून ओकारीगर्जना ऐकू येऊ लागल्या. सोबत अगदीच जुजबी औषधं नेल्याने सर्वांना तिथल्या सरकरी रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागली. असे प्रसंग बर्‍याच लोकांना प्रवासात येतात. ते टाळण्यासाठी आपण काय काळजी घ्यायला हवी, काय औषधं सोबत बाळगावी हे या लेखात आपण बघूया.

कोणताही लांबचा प्रवास ठरला की सर्वात आधी आपल्या फॅमिली डॉक्टरांची गाठ घ्यावी. त्यांच्याकडून आपल्याला बीपीचा त्रास नसेल तरी चेक करून घ्यावे. डायबेटीस असल्यास साखर चेक करून घ्यावी. रोज लागणार्‍या औषधांचे एक नवे प्रिस्किप्शन डॉक्टरांकडून लिहून घ्यावे. ते प्रवासात सोबत असू द्यावे. तसंच रोज लागणार्‍या अत्यावश्यक गोळ्या इमर्जन्सीमध्ये जास्त राहावे लागले तर या हिशेबाने निदान दहा गोळ्या जास्त ठेवाव्या. परदेश प्रवासासाठी जाताना प्रिस्किप्शनवर डॉक्टरांची सही ,शिक्का असणे आवश्यक आहे. तसेच आपण ज्या देशात जाणार तिथे कोणती औषधे नेणे निषिद्ध आहे का जरूर तपासून घ्यावे. आपला आरोग्य विमा मूळ प्रत आणि कार्ड आपल्या सोबत असावेच. प्रवास कुठलाही असो, कितीही अंतराचा असो, ट्रॅव्हल कंपनीबरोबर प्रवास करताना ते आपला विमा बर्‍याचदा त्याच खर्चात उतरवून देतात. त्याची मूळ प्रत सोबत असणे आवश्यक आहे. तसेच घरीही एक प्रत देऊन ठेवावी.

लहान मुलं सोबत असताना :- अगदी लहान बाळ सोबत असेल तर बाळाची स्वतंत्र पिशवी सामानाच्या वजनाशिवाय घेता येते. त्यामुळे बाळाचे पुरेसे डायपर, वेटटिश्यु पेपरचे बंडल, कोरडे टिश्यू पेपर्, बाळाची पावडर हे सहज हाताला येईल असे ठेवावे. बाळासाठी दूध न घेता दूध पावडर घ्यावी. विमान प्रवासात गरम पाणी मिळू शकते. पोर्टेबल किटली असल्यास त्यात खोलीतही पाणी गरम करता येते. विमानातले खाणे, दूध बाळाला कधीही देऊ नये. यामुळे संसर्गाचा धोका असतो. विमान उडताना कानाला दडे बसून कान जोरात दुखून बाळ रडायला लागते. अशा वेळी बाळाच्या तोंडात पॅसिफायर देणे उत्तम. त्याच्या सकिंग अ‍ॅक्शनमुळे बाळाला दडे बसत नाही. प्रवास कोणत्याही वाहनाने असू दे, सोबत हँड सॅनिटायझर हवेच. मुलांना खायला देताना आधी सॅनिटायझर लावून हात वाळू द्यावा. मग खाण्यास द्यावे. मुलांना काहीही खायला देण्याआधी हात धुवायला लावणे आवश्यक आहे.

प्रवासातले अन्नपदार्थ- :- प्रवास म्हंटला की रोजचे बाहेर खाणे होणारच. त्यात संसर्ग होऊ नये म्हणून काय काळजी घेता येईल. प्रवासात आहोत म्हणून पॅकबंद ज्यूस इ. मुलांना देणे टाळावेच. हे पुढच्या संसर्गाचे कारण होऊ शकते. त्याचप्रमाणे थंड पेये, आइस्क्रीम, दुग्धजन्य पदार्थ शक्यतो टाळावेच. शक्यतो ताजे गरम अन्न खावे. आपल्या सोबत प्रवासात टिकणारे खाद्यपदार्थ जरूर असावेत. शक्यतो प्रवासात आडवा हात मारून जेवणे, अति तिखट, मसालेदार जेवण करून पुढचा प्रवास करणे टाळावे. एक तर त्याने अपचन होऊन अस्वस्थता येते, तसंच आम्लपित्ताने जळजळ सुरू होऊन स्वतः ड्रायव्हिंग करत असल्यास चित्त विचलित होऊ शकते. पाणी शक्यतो हॉटेलात प्युरीफायर चांगल्या अवस्थेत आहे याची खात्री करून तिथले किंवा बाटलीबंद घ्यावे. मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे प्रयोग प्रवासात अजीबात करू नयेत. रात्रीचे जेवण हलकेच घ्यावे. तसंच लहान मुलांना अगदी उठल्या उठल्या दूध वगैरे देऊन प्रवासाला निघू नये. त्यांना काहीतरी कोरडे खाद्यपदार्थ द्यावे उदा. बिस्किट. नुसत्या दुधाने मुलांना मळमळून येऊ शकते. तसंच नवीन पदार्थ खाऊन बघताना त्यात कशाचा अंतर्भाव केलेला आहे हे जरूर जाणून घ्यावे. आपल्याला अ‍ॅलर्जी असणारा एखादा घटक त्यात असल्यास उगाच त्रास होऊ शकतो.

आम्ही काही वर्षांपूर्वी कौसानीला गेलो असता आमच्या सोबत असणार्‍या कुटूंबमित्राच्या मुलाने इतर मुलांनी मागवले म्हणून ऑम्लेट मागवले. त्याचे आई बाबा सावकाश उठून ब्रेकफास्टला येणार होते. या मुलाला अ‍ॅलर्जी होती अंड्याची. काही तासातच तो पोट दुखून हैराण झाला. मग आई बाबाच्या लक्षात आले काय गडबड झाली. त्याच्या दुखण्यामुळे रात्रभर जागरण होऊन या कुटूंबाला कौसानीचा अद्वितीय सुर्योदय बघताच नाही आला. असे हिरमोड करणारे प्रसंग येऊ नयेत म्हणून काळजी घेणे अत्यावश्यक आहे. तसंच शक्यतो रस्त्यावर मिळणारे पदार्थ प्रवासात खाऊ नये. हे एक धाडस चांगलेच अंगाशी आलेला एक किस्सा आमच्याच कोडाईकनालच्या वास्तव्यात घडलेला. आमच्यासोबत तेव्हा मांसाहार मनापासून आवडणारे एक कुटुंब होते. येता जाता रस्त्याने त्यांना तंदूर लावलेल्या गाड्या बघून चिकन खायची हुक्की आली. नंतर ते शिळे चिकन बाधून कुटुंब रंगलं ना उलट्या जुलाबात! अशा वेळी जर पुढचा ठरलेला ट्रेन, विमान आदी प्रवास असेल तर फार पंचाईत होते. आणि आपली गाडी घेऊन प्रवास असेल तर पाण्याचे गॅलन आणि सामान कसे माववावे हाही एक प्रॅक्टिकल प्रश्न उभा राहू शकतो! प्रवासात हॉटेलमध्ये अ‍ॅरेंज केलेले सॅलड ताजेपणाची खात्री असेल तरच खावे. तरीही शक्यतो शिजवलेले अन्न खाणे कधीही चांगले. कुठुनही आलो तरी जेवणाआधी हात स्वच्छ धुवून्, निदान सॅनिटायझर वापरून स्वच्छ करूनच जेवावे.

प्रवासात उद्भवणारे आजार :-वाहन लागणे- काही लोकांना कुठलेही वाहन 'लागण्याचा' त्रास (मोशन सिकनेस) असतो. विशेषतः बस, विमान प्रवास, घाटाच्या रस्त्याने जाताना अशा लोकांना मळमळणे, उलट्या असा त्रास होऊ लागतो. हे टाळण्यासाठी जर नेह्मीच हा त्रास होत असेल तर tab avomine डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रवासाआधी एक तास घेऊनच निघावे. या गोळ्यांनी झोप येऊ शकते. त्यामुळे ड्रायव्हिंग करणार्‍या माणसासाठी या धोकादायक आहेत.

काही खबरदारी घेऊन आपण हा मोशन सिकनेस कमी करू शकतो.
* शक्यतो गाडी किंवा बसच्या मागच्या सीटवर बसू नये.
* विमानात मधल्या सीट म्हणजे पंखाजवळच्या घ्याव्या. बोटीत मध्यभागी बसावे.
* शक्यतो मोकळा वारा खिडकीतून गाडीत येऊ द्यावा.
* बाहेर बघताना दूरवर नजर केंद्रित करावी. हलत्या गोष्टी उदा. लाटा,धावती गाडी इ. बघत बसू नये.
* चालत्या वाहनात वाचू नये.
* अति जेवण करून प्रवासाला सुरूवात अजिबात करू नये.
* प्रवासात मद्यपान करू नये. तसंच अति तिखट,तेलकट, मसालेदार खाऊ नये.

जेट लॅग-
* विमान प्रवासात भरपूर पाणी पीत राहाणे आवश्यक आहे.
* मद्यपान टाळावेच.
* अती कॉफी किंवा चहा पिऊ नये.
* विमानात डोळ्यावर लावायची पट्टी देतात. ती लावून झोप घेण्याचा प्रयत्न करावा.
* सतत एका जागी न बसता थोड्या थोड्या वेळाने मधल्या पॅसेजमध्ये चालावे. बसल्या जागी पायाच्या हालचाली कराव्या.

कानाला दडे बसणे किंवा कान दुखणे- हा अनुभव विमान प्रवासात हमखास येतो. तो टाळण्याचा बेस्ट उपाय आहे च्युइंगगम चावत राहणे, जेणेकरून जबड्याची हालचाल होऊन कानावरचे प्रेशर कमी होईल.
तोंड आणि नाक बंद ठेवून नाकावाटे हवा ब्लो करण्याचा प्रयत्न केला की पटकन कानातला दडा सुटतो. शिवाय कापसाचे बोळे कानात घातले तरीही त्रास कमी होण्यास मदत होते.

पोट बिघडणे- प्रवासात अन्न पाणी बदलल्याने किंवा अन्नामुळे विषबाधा होऊन पोट बिघडणे ही अगदी कॉमन तक्रार असते.अशा वेळी काय करावे?
* सर्वप्रथम भरपूर पाणी आणि इलेक्ट्राल किंवा पुनर्जल पीत राहणे. दर जुलाबानंतर पाणी पीत राहणे अत्यंत आवश्यक आहे.
* Tab ciprofloxacin किंवा tab.normetrogyl आपल्या प्रवासी औषधात असू द्यावे. ही अँटीबायोटिक्स आहेत. यांच्यासोबत tab.loperamide खूप जुलाब होत असतील तर ते थांबवायला घ्यावी विशेषतः प्रवासात बराच वेळ टॉयलेट मिळण्याची शक्यता नसेल तर घ्यावीच्, तसंच पाण्यासारखे जुलाब नॉर्मल होण्यासाठी cap.rinifol जी आपल्या आतड्यातले चांगले बॅक्टेरिया जे जुलाबामुळे वाहून गेलेत ते परत देऊन आतड्याला ताळ्यावर आणते. य्रिनिफॉल दिवसातून दोनदा पुढे पाच दिवस घेतच राहाव्या.
* साधे गरम आणि पचायला हलके अन्न खावे.
* गोळ्यांनी लक्षणे कमी न झाल्यास नजीकच्या हॉस्पिटलात डॉक्टरना दाखवून घ्यावे.
* उलट्या होत असल्यास tab.ondem md 4mg चघळून खावी. कमी न झाल्यास हॉस्पिटल जरूर गाठावे.
* पोट जड झाल्यास किंवा नेहमी अ‍ॅसिडिटी होत असल्यास tab. pan d, tab.gelusil सोबत असू द्याव्या.

ताप सर्दी खोकला- प्रवासात प्रदूषण, हवा बदलाने विषाणूजन्य आजार होणे कॉमन आहे. अशावेळी आपल्या सोबत सर्दीची गोळी उदा. सिनारेस्ट् (Sinarest), तापासाठी क्रोसिन सोबत असलेली बरी. स्ट्रेप्सिलच्या चघळायच्या गोळ्या खोकल्याला तात्पुरता आराम देऊ शकतात.

किटकदंश अ‍ॅलर्जी anything under the sun including the sun can give you allergy. म्हणूनच सोबत अ‍ॅलर्जीची गोळी नेहमी हवी. अचानक गवतात किडा वगैरे चावल्यासदेखील या गोळ्या उपयोगी पडतात. tab.allegra सोबत असल्यास अ‍ॅलर्जीने येणारी खाज, सूज, नाक वाहाणे ही लक्षणं कमी होतात.

धडपडणे, खरचटणे- हे कधीही होऊ शकतं. सोबत एखादे अ‍ॅंटिसेप्टिक क्रीम, बँडेडच्या पट्ट्या, असू द्याव्याच. एखादे क्रेप बँडेज पण ठेवायला हरकत नाही. पाय मुरगळल्यास त्याच्याने पाय बांधून ठेवल्यास बरे वाटते.
अंग दुखून आल्यास घेण्यासाठी tab.combiflam आपल्या ट्रॅवल किटमध्ये जरूर असावी.
या सर्वांबरोबर छोट्या डबीत लवंगा, थोडा ओवा घेतला असल्यास ऐन वेळी कामाला येतो. कापूस, गॉझ्, डेटॉलची छोटी बाटली हेदेखील सोबत असावेच.

High Altitude Sickness - समुद्रसपाटीपासून जसजसे वर जाऊ, तसे कमी ऑक्सिजन आणि उंचीला जुळवून घेण्यासाठी Diamox या गोळ्या मिळतात. त्या सोबत असाव्यात पण जाण्यापूर्वी डॉक्टरांना याबाबत विचारून त्यांच्या सल्ल्याने घ्याव्यात. शिवाय कापूर जवळ ठेवावा. रोपवे ने बरंच उंचीवर जायचं असेल तर काही वेळा कानाला दडे बसतात. त्यासाठी च्युईंग गम चघळणे हा एक उपाय आहे किंवा कानात कापूस घालावा. कानाला दडे बसलेच तर नाक बंद करून श्वास बाहेर सोडण्याचा प्रयत्न करायचा.

अशा प्रकारे व्यवस्थित विचार करून जर आपण जर आपले प्रवासात आरोग्य सांभाळण्यासाठी एक किट तयार केले तर आपला प्रवास नक्कीच सुखाचा आणि आरोग्यपूर्ण होऊ शकेल.

शुभास्ते पंथानः सन्तु||

(चित्र- किलमाऊस्की)
https://lh3.googleusercontent.com/-30BrcUCiylI/Vse9f0jd4uI/AAAAAAAAAFQ/OPRqSDu-re8/s788-Ic42/footer.png

प्रतिक्रिया

डॉक्टरीणबाईंनी वेळीच आठवण केली म्हणून बरं!

भिंगरी's picture

7 Mar 2016 - 11:42 pm | भिंगरी

अतिशय उपयुक्त लेख.

नूतन सावंत's picture

8 Mar 2016 - 12:02 am | नूतन सावंत

प्रत्येक प्रवासाआधी वाचायला हवा हा लेख.धनस अजया.

मितान's picture

8 Mar 2016 - 6:34 am | मितान

उपयुक्त लेख !!

यशोधरा's picture

8 Mar 2016 - 7:04 am | यशोधरा

चांगल्या सूचना, धन्यवाद.

स्मिता_१३'s picture

8 Mar 2016 - 8:53 am | स्मिता_१३

अतिशय उपयुक्त लेख

स्नेहल महेश's picture

8 Mar 2016 - 9:50 am | स्नेहल महेश

प्रवासाआधी प्रत्येकाने वाचला पाहिजे असा अतिशय उपयुक्त लेख.
वाचानखूण साठवली आहे

राजाभाउ's picture

8 Mar 2016 - 10:19 am | राजाभाउ

+१११

सस्नेह's picture

8 Mar 2016 - 10:34 am | सस्नेह

साक्षेपी लेख. धन्यु डॉक्टरीणबै !

जेपी's picture

8 Mar 2016 - 10:37 am | जेपी

चांगली माहिती

प्रकाश घाटपांडे's picture

8 Mar 2016 - 10:43 am | प्रकाश घाटपांडे

उपयुक्त लेख.
प्रवासात आयबीएस चा त्रास होउन नये म्हणून मी अत्यंत मर्यादित खातो. पण बाकीचे हादडतात व मला पण खायचा आग्रह करत राहतात त्याचा मला त्रास होतो.त्यांना समजावून सांगण्यात एनर्जी खर्च होते. प्रत्येकाला तेच सांगत बसावे लागते.

बय्राच उपयुक्त आणि अनुभवसिद्ध गोष्टी आहेत.
शक्यतो ग्रुपबरोबर प्रवास टाळावा.एकाचं बघून दुसरा करतो/खातो आणि फसतो.
चालू हॅाटेलात चालू पदार्थ खावेत.उगाच मेन्यु कार्डात संशोधन करू नये.
दुधाचे/खव्याचे पदार्थ धोकादायक असतात बरेचदा.

पियुशा's picture

8 Mar 2016 - 11:26 am | पियुशा

त्रिवार धन्स !!

गिरकी's picture

8 Mar 2016 - 11:50 am | गिरकी

मौलिक मार्गदर्शन … 'डॉक्टरानेच दात उपटावेत' अशी कायशीशी म्हण निर्माण करण्यात आली आहे :)

पद्मावति's picture

8 Mar 2016 - 2:08 pm | पद्मावति

अतिशय उपयुक्त लेख.

ताई.. खुप उपयुक्त महिती. छान झालाय लेख.

वाखु साठवली आहे.अतिशय उपयुक्त लेख!

प्रीत-मोहर's picture

8 Mar 2016 - 8:56 pm | प्रीत-मोहर

अतिशय उपयुक्त लेख. वाखु साठवली आहेच आणि प्रिंट पण भटकंतीच्या फाईल ला टग केलीय.

अतिशय ऊपयुक्त माहिती...धन्स ग अजया !

पैसा's picture

9 Mar 2016 - 1:12 pm | पैसा

अतिशय उपयोगी टिप्स.

विभावरी's picture

9 Mar 2016 - 1:21 pm | विभावरी

अत्यंत उपयोगी माहिती .

कविता१९७८'s picture

9 Mar 2016 - 1:40 pm | कविता१९७८

उपयुक्त माहीती

मधुरा देशपांडे's picture

9 Mar 2016 - 2:08 pm | मधुरा देशपांडे

प्रिंट काढून ठेवतेय. या प्रकारच्या लेखाशिवाय अंक अपुर्ण राहिला असता, तेही अगदी सोप्या भाषेत, उदाहरणांसहित. धन्यवाद ताई.

पूर्वाविवेक's picture

9 Mar 2016 - 4:04 pm | पूर्वाविवेक

संग्रही असावा असा प्रवासासाठी अत्यंत उपयुक्त लेख. खूप खूप धन्यवाद अतिशय मौल्यवान माहिती शेअर केल्याबद्दल.

रंगासेठ's picture

9 Mar 2016 - 4:19 pm | रंगासेठ

अत्यंत उपयोगी माहिती, धन्यवाद.

शान्तिप्रिय's picture

9 Mar 2016 - 7:24 pm | शान्तिप्रिय

अजया,

अत्यंत उपयुक्त माहिति अतिशय सोप्या भाषेत लिहिल्याबद्दल धन्यवाद.

भुमी's picture

10 Mar 2016 - 12:02 am | भुमी

वाचनखूण साठवली आहे.

बोका-ए-आझम's picture

10 Mar 2016 - 10:38 pm | बोका-ए-आझम

अगदी तुमच्या आवाजात ऐकू आली!

अजया's picture

11 Mar 2016 - 7:54 am | अजया

:)

श्रीरंग_जोशी's picture

11 Mar 2016 - 2:27 am | श्रीरंग_जोशी

या लेखासाठी खूप धन्यवाद.

उगा काहितरीच's picture

11 Mar 2016 - 9:06 am | उगा काहितरीच

चांगला लेख !अगदी उपयोगी पडणारी माहिती . पण सगळ्या प्रकारच्या प्रवासात घ्यायची काळजी एकत्र झालीए. बस, विमान , स्वतःचे वाहन , ट्रेन, जहाज अशी विभागणी हवी होती.

अजया's picture

12 Mar 2016 - 9:16 am | अजया

सर्वांना धन्यवाद.
दोन दिवसापूर्वी माझाच लेख मला व्हाॅट्स अॅपवर फाॅरवर्ड आलाय! नाव वगैरे नाहीच दिलेले.शेअर करण्यास माझी हरकत नाहीये.पण निदान मिसळपावचे तरी नाव द्या.

स्वाती दिनेश's picture

15 Mar 2016 - 12:16 pm | स्वाती दिनेश

अत्यंत उपयुक्त लेख,
प्रवासा आधी प्रत्येकाने वाचावाच असा ..
वाखुसा.
स्वाती

Vasant Chavan's picture

15 Mar 2016 - 2:16 pm | Vasant Chavan

अतिशय उपयुक्त माहिती आहे.धन्यवाद

सानिकास्वप्निल's picture

20 Mar 2016 - 11:54 am | सानिकास्वप्निल

उपयुक्त माहिती. वाखु साठवलिये. अगदी छान सांगितले आहेस. या टिप्ससाठी अनेक धन्यवाद.

Maharani's picture

21 Mar 2016 - 5:16 pm | Maharani

Khupach upayukt mahiti....dhanyavaad

मीता's picture

21 Mar 2016 - 5:32 pm | मीता

अत्यंत उपयोगी माहिती

अतिशय उपयुक्त माहितीबद्दल आभार ...