✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

"तू"

प — पालीचा खंडोबा १, Mon, 01/04/2016 - 13:01
मी कितीही विखुरलो छिन्न भिन्न जाहलो तू मला गोळा करतेस लहान मुलाने चित्रकोडे एकत्र करावे तसे ......................! मी इतुका अवघडलेला तु मला सहज मोकळा करतेस ! सहजपणे सगळे कसे जमते तुला हे ? मी नेहमीच फाटलेल्या वस्त्रासारखा अलगथलग तु सगळा मला जोडुन आईच्या मायेने, माझ्या फाटलेल्या वस्त्रांची गोधडी करतेस उबदार, आश्वस्त................... सहजपणे सगळे कसे जमते तुला हे ? थंडी इतुकी कडाक्याची झाडांचे ही खराटे होतात गिळुनी सगळा उबदारपणा रात्रीही गारठ्तात तु मात्र............ मला बाहुपाशात घेऊन विश्वाची उब माझ्या शरीरात भरतेस ! सहजपणे सगळे कसे जमते तुला हे ? तुझ्या स्तनातून वाहणारे दूध नाकारून तु तुझ्या विसर्ग झालेल्या गर्भाला विसरलीस माझ्यासाठी ! सहजपणे सगळे कसे जमते तुला हे ? मी मात्र पुन्हा पुन्हा उबीसाठी तुझ्या शरीराला झोंबतो अन् तु तरीही माझ्यासाठी मोकळी होतेस हरेक रात्रीस ! सहजपणे सगळे कसे जमते तुला हे ? विजयकुमार १४/०५/०८

प्रतिक्रिया द्या
1873 वाचन

💬 प्रतिसाद (7)

मस्त.... जोरदार लिहिले आहे!!

शार्दुल_हातोळकर
Mon, 01/04/2016 - 17:37 नवीन
मस्त.... जोरदार लिहिले आहे!!
  • Log in or register to post comments

हे पण छान आहे हो वाचा ना

पालीचा खंडोबा १
Wed, 01/06/2016 - 20:51 नवीन
हे पण छान आहे हो वाचा ना क्रुपा करुन
  • Log in or register to post comments

आवडली ..

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 01/07/2016 - 09:36 नवीन
आवडली ..
  • Log in or register to post comments

कधी तू चम चम करणारी चांदण्यात...

पर्ण
गुरुवार, 01/07/2016 - 18:38 नवीन
कधी तू चम चम करणारी चांदण्यात....
  • Log in or register to post comments

छान .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 01/07/2016 - 20:29 नवीन
आवड्ली कविता. लिहित राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मस्त

कविता१९७८
Fri, 01/08/2016 - 17:50 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

कविता आवडली.

अजया
Fri, 01/08/2016 - 18:06 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा