तुझी आठवण
आठवण ही का अशी जागवी मनाला
प्रीत माझ्या या मनाची सांगु कुणाला ।।
रात्र वेडी जागताना अंतरंग मोहरे
पाहताना मी तुला चांदणे ही बावरे
का असे भास होती वेड्या मनाला
प्रीत माझ्या या मनाची सांगु कुणाला ।।
रातराणीच्या फुलांचा घेऊनी सुगंध
प्रीत वेडे पाखरू हे मनी झाले दंग
नशा तुझ्या प्रेमाची ही आवडे मनाला
प्रीत माझ्या या मनाची सांगु कुणाला ।।
आठवण ही का अशी जागवी मनाला
प्रीत माझ्या या मनाची सांगु कुणाला ।।
छान आहे
छान
सहजसुंदर शब्दरचना...
वाह, सुन्दर.
छान