रक्तदाब मापन उपकरण आणि नोंद वही तंत्र - माहिती हवी आहे

नितीनचंद्र's picture
नितीनचंद्र in तंत्रजगत
27 Nov 2015 - 9:47 am

मला एका प्रयोगासाठी रक्तदाब मापन उपकरण आणि नोंद वही तंत्र अर्थात ब्लड प्रेशर मोजणारे घड्याळासारखे बांधता येणारे व त्यातला डेटा लॉग करणारे सॉफ्टवेअर हवे आहे.

उपयोग असा की विवीध हालचाली करताना आपले ब्लड प्रेशर काय होते याचे ग्राफ रिअल टाईमबरोबर पहाता येतील.

इंटरनेट वर अश्या बर्‍याच ब्लड प्रेशर दाखवणार्‍या व बॅटरीवर चालणार्‍या यंत्रांची माहिती दिसत आहे पण त्यात रेकॉर्डेड डाटा डाऊनलोड करुन त्याचे अ‍ॅनेलिसीस करणारे सॉफ्ट वेअर याची माहिती मिळत नाही.

कुणी वापरले आहे का असे उपकरण ? असल्यास माहिती ( मेक आणि उपलब्ध होण्याचे ठिकाण - भारतात / नेटवर - व अंदाजे किंमत इत्यादी )

ब्लड प्रेशर मोजणारे घड्याळासारखे बांधता येणारे उपकरणाला मॅच होणारे पण त्या कंपनीने रेकमेंड न केलेले सॉफ्टवेअर जर कुणाच्या वापरात असेल तरी कळवावे.

प्रतिक्रिया

मोगा's picture

27 Nov 2015 - 10:06 am | मोगा

काय उपयोग करणार या माहितीचा?

...

डॉ, मोगाभाई एम बी बी एस

नितीनचंद्र's picture

27 Nov 2015 - 11:00 am | नितीनचंद्र

डॉ. मोगाभाई

मी अनेकवर्षांपुर्वी योगाभ्यास शिकलो आहे. प्राणायामाचा शरीरावर - ब्लडप्रेशर /पल्स रेटवर परीणाम असे शोध निबंध वाचलेत. सध्या नोकरी न करता व्यवसाय करत असल्यामुळे बराच वेळ उपलब्ध असतो. अश्यावेळी योगाभ्यासाने आपल्या स्वतःच्या शरीरावर नेमके काय परिणाम घडत आहे हे जाणुन घेण्याची जिज्ञासा आहे.

मिपावरचे वैद्यकीय तज्ञ अचूक माहिती देऊ शकतील, अर्थात केवळ माहिती म्हणूनच. सल्ला म्हणून नव्हे.

मला इतकंच सांगावंसं वाटतं की सोपे, घड्याळासारखे मनगटावर बांधण्याचे, पूर्ण अॉटोमॅटिक वगैरे सर्व रक्तदाबमापक खूपच चुकीची रीडिंग दाखवतात. त्यातही मोजतानाची पोझिशन ठराविकच लागते अन्यथा रीडिंग आणखीच भलतं येतं.

दंडाभोवती रुंद पट्टा पुरेसा गुंडाळून पारायुक्त नळी अन स्टेथोस्कोपने डॉक्टर जो बघतात तोच सर्वात अचूक रक्तदाब.

नोट: मी तज्ञ नाही.

संपूर्ण सहमत. एकदा माझ्या डॉ. भावाला असे यंत्र भेट देऊन खूप शिव्या खाल्ल्या आहेत.

असंका's picture

27 Nov 2015 - 11:40 am | असंका
घड्याळासारखे मनगटावर बांधण्याचे, पूर्ण अॉटोमॅटिक वगैरे सर्व

आणि

दंडाभोवती रुंद पट्टा पुरेसा गुंडाळून पारायुक्त नळी

यांच्या अधेमधे इतरपण मशिन आहेत. ती पण सदोष आहेत का? की एक मर्यादेपर्यंत चुक आहे असं गृहित धरून वापरता येतात? उदा. दंडावर रुंद पट्टा वापरणारी पण पूर्ण ऑटोमॅटीक मशिन बाजारात उपलब्ध आहेत.

मी दंडाला बांधून बिपी माॅनिटर करणारे आॅमराॅनचे डिजिटल बिपी मशिन गेली काही वर्ष वापरते आहे.घेताना मॅन्युअल मशिन बरोबर बिपी घेऊन तुलना करुन घेतले होते.यात जुने सेल वापरु नये.हात स्थिर राहील अशा ठिकाणी उदा टेबलवर ठेवुन चेक करावे.मला या मशिनचा चांगला अनुभव आहे.मधून मधून माझ्याकडच्या मॅन्युअल मशिन आणि याचे रिडिंग घेऊन चेक ठेवते.अजून तरी चुकीचे आढळलेले नाही.
धागा लेखक तुम्ही म्हणताय ते २४तास बिपी तपासणारे मशिन दिवसभर वायरने गुंडाळून ठेवतात छातीपाशी.दुसर्या दिवशी हाॅस्पिटलमधे ते यंत्र काॅम्प्युटरला जोडून रिझल्ट देतात.ते मेडिकल इंन्स्ट्रुमेंट मिळणाऱ्या कंपनीकडून मागवता येते.परिसरातील कार्डिअॅक हाॅस्पिटलमध्ये ही सेवा उपलब्ध असेल तिथे कोणत्या कंपनीचे आहे,किंमत वगैरे कळु शकेल.
अमॅझाॅन.इनवर पण चेक करा.

प्रसाद१९७१'s picture

27 Nov 2015 - 12:01 pm | प्रसाद१९७१

एकदा एका ठीकाणी पट्टा गुंडाळुन प्रेशर देऊन रक्त-दाब बघितला की लगेच पुन्हा तिथेच रक्त दाब बघु नका असे म्हणतात ( मी डॉक्टर नाही ) कारण तिथल्या रक्तवाहीन्यांवर आधी दिलेल्या दाबाचा परीणाम असतो. त्यामुळे पुन्हा लगेच जर रक्तदाब बघायचा असेल तर दुसर्‍या हातावर बघतात. इथे तर तुम्हाला कंटीन्युअस रक्तदाब बघत रहातचे आहे. कीती बरोबर येइल ते माहीती नाही.

कंजूस's picture

27 Nov 2015 - 2:03 pm | कंजूस

अगदी खरंच डेटा वापरून निष्कर्ष काढायचा असेल तर जे कोणते यंत्र घ्याल ते चुनाभट्टी/सायन येथील सरकारी संस्थेकडून( IMC असं काही नाव आहे) प्रमाणित करून घ्या.

नितीनचंद्र's picture

27 Nov 2015 - 2:27 pm | नितीनचंद्र

हा निष्कर्ष कोणत्या सम्शोधनात वापरुन पेपर पब्लीश करायचा नाही/ डिग्री मिळवायची नाही.