श्रवणयंत्राचा खरंच उपयोग होतो का? माहिती हवी अाहे

स्वधर्म's picture
स्वधर्म in काथ्याकूट
5 Nov 2015 - 11:03 pm
गाभा: 

माझ्या वडिलांना गेली काही वर्षे हळूहळू ऐकायला कमी येत अाहे. सध्या त्यांचे वय ८१ वर्षे अाहे. अांम्ही त्यांच्यासाठी श्रवणयंत्र घेण्याचा विचार करत अाहोत. अजून ते परीसरात फिरतात, माणसांना भेटतात त्यामुळे ते अावश्यक वाटते. पण इथे प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे अांम्हाला अनेकांकडून कळलेली माहिती, अनुभव असा, की त्या श्रवणयंत्राचा फारसा उपयोग होत नाही. पहिले काही अाठवडे ते वापरले जाते, पण नंतर बरेच लोक ते वापरत नाहीत. त्याचा उपयोगापेक्षा त्रासच होतो. तर कृपया खालील बाबतीत अापला सल्ला, अनुभव, माहिती शेअर करावी, ही विनंती:
- श्रवणयंत्राचा खरंच उपयोग होतो का? विशेषत: उतार वयात.
- श्रवणयंत्रामधे बरीच रेंज अाहे. रू ४००० ते १.५ लाख. यात काही चांगला अनुभव, ब्रॅंड, देशी, परदेशी इ. बाबत सल्ला
- एकदा श्रवणयंत्राची सवय झाली (जर नियमित वापरले तर) त्याचा नैसर्गिक ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो का?
- त्यामुळे इतर काही अारोग्याच्या समस्या निर्माण होतात का?
धन्यवाद.

प्रतिक्रिया

माझे बाबा वापरतात श्रवणयंत्र. त्यांचेही वय ८०+ आहे. गेली ४-५ वर्षे वापरतात. ठाण्याला श्रवणयंत्रतज्ञांकडून घेतले. त्यांच्याकडे जावून टेस्ट, कन्सल्टेशन, नंतरचे ट्युनिंग वगैरे केले. प्रत्यक्ष संभाषण, फोन, स्काइप, टिव्ही बघणे वगैरे सर्व काही जमते. बाबांना खूपच कमी ऐकू यायचे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार श्रवणयंत्राचा पर्याय शोधला. यंत्रामुळे इतर काही त्रास झाला नाही.

चांगल्या दर्जाचे वापरल्यास त्रास होत नाही. नुकतेच मांडक्यांकडून श्रवणयंत्र घेतले ते साधारणपणे बारा-तेरा हजारांना की काय असे पडले. चांगले आहे. काही त्रास नाही.

जर श्रवण इंद्रियांमधे दोष असेल तर नक्की फायदा होतो. पण पुढे मेंदू मध्ये श्रवण इंद्रियाकडून आलेली माहिती वापरण्यात अडथळा असेल तर फारसा फायदा नाही होत. सख्ख्या काकांना मेंदू मध्ये छोटे clots असल्यामुळे श्रवण यंत्र लावूनही फार उपयोग झालेला नाही.
ठाण्यालाच घेतले - ७५००. अधिकची वायर घेऊन ठेवावी जर 'हेड फोनस' सारखे यंत्र असेल तर.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Nov 2015 - 6:56 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

वर वाचक म्हणतात त्यामधे जो सिग्नल प्रोसेसिंगचा भाग आहे त्यात तथ्य आहे.

बाकी माझ्या आजोबांना सुद्धा मांडक्यांकडुन श्रवणयंत्र बसवुन घेतलं होतं. ते चांगलं आहे. आता किंमत आठवत नाही पण सुमारे ३-४ वर्षांपुर्वी ५.५ ते ६.५ हजाराच्या घरात असेल. त्यांना सुरुवातीला एकदम वाढलेल्या श्रवणशक्तीने गोंधळुन जायला व्हायचं आणि डोकं दुखायचं. पण आता छान अ‍ॅडजस्ट झालेत त्याच्याबरोबर. वयाच्या ८२ व्या वर्षी सुद्धा सगळीकडे स्वतःहुन जातात येतात (ऐकत नैत अजिबात. हट्टी दू दू दू)

जेव्हा सुरुवातीला यंत्र बसवले तेव्हा अचानक वाढणार्‍या आवाजाने किंवा येणार्‍या कुंईं अशा आवाजाने त्यांना त्रास होई त्यामुळे ते वापरण्याचे टाळत. यंत्र वापरुन ऐकणे अ‍ॅडजस्ट होण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो परंतु तेवढी चिकाटी दाखवली नाही तर मात्र उपयोग होत नाही.

दुसरे माझी मावशी वापरते हे यंत्र आणि तिला चांगला उपयोग झालेला आहे. सगळीकडे यंत्र लावून जाते. फोनवरती बोलणे गाणी ऐकणे असे सगळे व्यवस्थित करु शकते.

त्यामुळे कानाच्या डॉक्टरांकडून तपासणी करुन श्रवणयंत्राचा उपयोग होऊ शकेल असे दिसत असेल तर जरुर घ्या आणि वापरुन बघा. मात्र सराव करावा लागतो, त्या यंत्रावर आवाजाची पातळी अ‍ॅडजस्ट करण्यासाठी बटण असते ते ट्यून करुन ऐकण्याच्या पातळीचा सराव करावा लागतो एकदा ते जमले की मग त्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो कारण नीट ऐकू येत असते.

शुभेच्छा! :)

मुक्त विहारि's picture

6 Nov 2015 - 8:20 am | मुक्त विहारि

आमच्या सासू बाईंना पण बहिरेपण आहे.

त्या श्रवणयंत्र वापरतात.

सुरुवातीला थोडा त्रास होतो.

पण एकदा सवय झाली की, मग त्रास होत नाही.

वय झाल्यावर (वय झालं असं साठी नंतर मान्य करायला हरकत नसावी) श्रवणयंत्र वापरावं. त्यापूर्वी उत्तम ENT कड़े जाऊन ऑपरेशन करवून घ्यावं. एक कान व्यवस्थित असला तरी बऱ्यापैकी काम भागतं.
पुण्यात चांगले ENT आहेत. हवे असल्यास व्यनि करा.
-स्वानुभवी प्यारे(व्यनिहित)

माझं आणि सक्ख्या दोन बहिणींचं कानाचं ऑपरेशन ज्या डॉक्टरांनी केलं त्यांनी 'काही डॉक्टरांना ऑपरेशन करता येत नाही ते श्रवणयंत्र लावा असा सल्ला देतात' असं स्पष्ट विधान केलं होतं. ऑपरेशन नंतर तिघांनाही व्यवस्थित ऐकू येतंय.

-बहिरा

स्वधर्म's picture

8 Nov 2015 - 11:16 pm | स्वधर्म

केला अाहे.

शंतनु _०३१'s picture

6 Nov 2015 - 11:09 am | शंतनु _०३१

वयानुसार कानाची श्रवणक्षमता कमी होते. आधी Autography करुन घ्या डॅाक्टर कडुन.श्रवण यंत्र डिजिटल स्वरूपाचे घ्या, त्यामुळे आवाजाची तीव्रता प्रमाणात राहील. श्रवण यंत्र असे वापरा

१- पहीला दिवस : २ तास (अनुक्रमे २ दिवस)

२ - चौथा दिवस : ४ तास ( अनुक्रमे २ दिवस )

३ - सहावा दिवस : ६ तास ( अनुक्रमे २ दिवस )

४ - आठवा दिवस : ८ तास ( अनुक्रमे २ दिवस )

१००% फरक गृहित धरु नका, पण फायदा निश्चित होईल. ४ किंवा ६ चॅनल चे डिजिटल यंत्र डॅाक्टरच्या सल्याने घ्या. आणि महत्वाचे न लाजता बारगेन करा

स्वधर्म's picture

6 Nov 2015 - 11:36 am | स्वधर्म

मिळत अाहे. सर्वांना धन्यवाद.
>> सगळीकडे स्वतःहुन जातात येतात (ऐकत नैत अजिबात. हट्टी दू दू दू)
इकडं पण तेच अाहे. कधी कधी वाहनाचा अावाज ऐकू येणार नाही, म्हणून भीती वाटते, पण वडील सायकलवरून परीसरात फिरतात. ऐकत नाहीत.
>> ४ किंवा ६ चॅनल चे डिजिटल यंत्र डॅाक्टरच्या सल्याने घ्या.
धन्यवाद शंतनू. हे काहीच माहिती नव्हते. वापराबाबतही डाॅ. सांगतीलच.
@ वाचक: बहुधा ईंद्रीयांचीच क्षमता कमी झाली असावी, असे वाटते. पण तपासणी केल्यावरच कळेल.
@ कॅप्टन: मला स्वत:ला यंत्र विकण्याचा मुख्य व्यवसाय असलेल्यांकडे जाण्यापेक्षा चांगल्या कानाच्या डॅा कडे जावे असे वाटत होेते. पण वर मांडके यांचा चांगला अनुभव असल्याचे लिहीले अाहे. फॅमिली डॅाना विचारतो.
अांम्हाला बर्याचा जणांकडून फारसे सकारात्मक कळले नव्हते, पण अाता सर्वांचे एकंदर मत पाहता, हे काम प्राधान्याने करेन.

सुबोध खरे's picture

6 Nov 2015 - 11:51 am | सुबोध खरे

हे वाचून पहा बर्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील.
https://en.wikipedia.org/wiki/Presbycusis
जाता जाता
एक मारवाडी रुग्ण कमी ऐकू येते म्हणून कानाच्या डॉक्टरकडे गेला. श्रवण यंत्राची आवश्यकता आहे आणी उत्तम दर्जाच्या यंत्रा साठी २०,०००/- रुपये लागतील असे डॉक्टर ने सांगितले. मारवाड्याने सर्वात स्वस्तात काय होईल ते विचारले. डॉक्टरानी एक डमी मोडेल दिले आणी म्हणाले याचे २०० रुपये. मारवाडी म्हणाला याने स्पष्ट ऐकू येईल का? डॉक्टर शांतपणे म्हणाले याने ऐकू येणार नाही पण तुम्ही हे कानाला लावले आहे हे बघून लोक तुमच्याशी मोठ्याने बोलतील.

स्वधर्म's picture

6 Nov 2015 - 2:55 pm | स्वधर्म

पण बरेच काही समजले नाही. अर्थात माझा उद्देश फक्त यंत्राची उपयुक्तता जाणून घेऊन, योग्य तो निर्णय घेणे हा अाहे. त्यात यंत्राबाबत खालील उल्लेख अाहे (सकारात्मक). तसेच त्यामुळे काही तोटे (जसे की नैसर्गिक ऐकण्याची क्षमता कमी होणे वगैरे) होत असल्याचे म्हटलेले नाही.
• Hearing aids help improve hearing of many elderly. Hearing aids can now be tuned to specific frequency ranges of hearing loss.
अजून वाचला नाही, पण हा (https://en.wikipedia.org/wiki/Hearing_aid) दुवाही उपयुक्त अाहे असे वाटते.
धन्यवाद.

शाम भागवत's picture

6 Nov 2015 - 2:23 pm | शाम भागवत

कमीत कमी ४ बँडचे घ्या. गोंगाट थोडाफार वगळला गेल्याने जरा बर्‍यापैकी ऐकू येते. अन्यथा कोणीतरी बोलतेय हे कळते पण शब्द नीट कळत नसल्याने फक्त त्रासच होतो. व त्याचा परिणाम म्हणून यंत्र न वापरण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असते.

जेवढे बँड जास्त तेवढा गोंगाट कमी. ४ बँडचे सिमेन्स चे मी नुकतेच १४००० ला घेतले. सप्टेबर व ऑक्टोबर मधे सिमेन्सचे २०% टक्के डिस्काऊंट असते म्हणून स्वस्त पडले.

मात्र लिपरिडींग आवश्यक. त्यांच्याशी बोलताना त्यांच्याकडे बघूनच बोला. तोंडावर हात ठेऊन वगैरे म्हणजे तुमचे ओठ झाकले जातील असे काही करून बोलू नका. अंधारात बोलण्याचे टाळा. कारण अंधारात तुमचे ओठ त्यांना दिसणार नाहीत.

मोठ्याने बोलण्यापेक्षा सावकाश बोला. त्याचा जास्ती फायदा त्यांना होईल. मात्र अनेकजण एकाचवेळेस बोलत असतील तर फक्त त्रासच होतो. कोणाचेच काहीही ऐकू येत नाही. त्यासाठी १६ किंवा त्यापेक्षा जास्त बँडच्या यंत्राची जरूरी असते. अंदाजे किंमत पन्नास हजार. जास्तीत जास्त ४८ बँड असू शकतात. किंमत अंदाजे दोन लाख.

स्वधर्म's picture

6 Nov 2015 - 2:44 pm | स्वधर्म

देऊन स्वानुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद शाम. बॅंड्सची काहीच कल्पना नव्हती. बहुधा त्यांना घेण्याअाधी वापरून कुठले घ्यायचे ते ठरवता येईल. पण अजूनही थेट श्रवणयंत्राच्या दुकानात न जाता, डॅा कडे जाऊन संपूर्ण तपासणी करून त्यांच्या सल्ल्याप्रमाणे यंत्र घ्यावे असे म्हणतो.
तुंम्ही दिलेल्या टीप्सही बहुमोल अाहेत.