धर्मगंड

संदीप ताम्हनकर's picture
संदीप ताम्हनकर in जे न देखे रवी...
2 Sep 2015 - 11:57 am

I धर्मगंड I

I धर्माच्या गायीचं काढा दुध I
I वाटणारे आपणच याची असुदे शुद्ध I

I द्या थोडे थोडे काहींना, पळीपळीने I
I बाकी सगळ्याची पंचपात्रातून आचमने I

I घेऊन जा पुन्हा एकदा पुराणात I
I खात बसुदे प्रसादाचा पवित्र वांगीभात I

I करू जानव्याचा इंटरनॅशनल ब्रॅन्ड I
I कुरवाळत बसू धर्माचे बेंड I

I ब्रम्ह गाठीत मोठी शक्ती असते पहा I
I मारू मुठ्ठ्या - ओम फट्ट स्वाहा I

I जाज्वल्य अस्मितेचं वगैरे एक बरं असतं I
I स्वतःचं काही कर्तृत्व नसलं तरी चालतं I

I जातीत जन्माला तर तुझं काय त्यात I
I काढा मग जन्म-जन्मान्तरं, पुण्य आणि पाप I

I वर्तमानशून्य आणि भविष्य अज्ञान्यांना I
I काल्पनिक भूत काळाचाच तर आधार आहे I

I काय करणार बुआ, I
I प्रश्न पिढ्यानपिढ्यांच्या पोटाचा आहे I

संदीप ताम्हनकर, पुणे.

धर्म

प्रतिक्रिया

कविता छान . भावना उद्वेगाने व्यक्त झाल्या आहे. पुलेशु.