Skip to main content

मटण

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 19/08/2015 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
सूर्य मावळतीकडं आला होता . ओढ्याच्या बाजूने पलीकडच्या पा॑दीत शिरलो . पाण्याशेजारी बसून घटकाभर डोळे मिटले . तेवढ्यात मागून पक्या आला. पाटलाच्या घरातून मटणाचा वास येतोय म्हणाला . रात्री चांदीच. निघालो दोघे . खमंग वासान डोकं चवताळतय. पाटलाघरचं जेवण संपायची वाट बघतोय. दम निघना. देशमुखांच्या घरी जायची पक्यानं शिफारस केली . मी नाही म्हणालो. परवा शिळ्या भाकरीचा तुकडा नरड्यात अडकला होता . किती खोकलो तरी निघता निघत नव्हता . वाट बघू पण मटणचं खाऊ. आण्या, सुरश्या, विक्या रानात सुशीच्या मागावर होती. नाहीतर सोन्यासारख्या संधीच मातेरं झालं असतं. जीव मुठीत धरून तसंच कितीतरी वेळ बसून राहिलो. झोपायच्या आधी पाटलीनबाईनं ऊकिरड्यावर खरकटं फेकलं. मग आम्हि दोघांनी शेपट्या हलवत मटणाचा यथेच्छ स्वाद चाखला.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 9698
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

In reply to by बॅटमॅन

उन्मत्त गजाला भात-पेंडीपेक्षा अजुनही काही हवं असतं हो...

In reply to by बॅटमॅन

अस्मादिक झाडावर चढले गेले आहेत. तुर्तास काळजी नसावी.

मस्त जमली आहे कथा... आण्या, सुरश्या, विक्या रानात सुशीच्या मागावर होती. इथे शेवटाचा अंदाज आला !

In reply to by बबन ताम्बे

भादवाची वाट बघू द्या आण्या, सुरश्या, विक्या आणि सुशी ह्यांना

????? एक कथाप्रकार म्हणून वाचा. चांगलीच आहे. प्राणी नायक होऊ शकत नाहीत का एखाद्या कथेचे? त्यात चूक काय? अतिश्श्श्शय वेगळा कथाप्रकार हाताळल्याबद्दल मला तर कौतुक वाटतं लेखकाचं!

In reply to by मांत्रिक

मांत्रिक यांच्या दोन प्रतिसादावरून कथा परत वाचली. कथा मंतरलेली वाटायला लागली. कृपया मटणच्या ऐवजी बेसन व बेसनच्या ऐवजी मटण वाचावे.

In reply to by सत्याचे प्रयोग

हायल्ला!!! कथेत बेसनचा उल्लेख कुठेच नाहीये!!! पण मूळ मुद्द्याला बगल देऊ नका! कुत्रा नायक का होऊ शकत नाही एखाद्या कथेचा?

In reply to by मांत्रिक

अतिश्श्श्शय वेगळा कथाप्रकार हाताळल्याबद्दल मला तर कौतुक वाटतं लेखकाचं!>>>>>>>>> लै धन्यवाद ...!!:-)