प्रवास (कथा)
लेखनप्रकार
हैद्राबादच्या इमलीबन स्टेशनवरून रात्री ११ वाजताची महाराष्ट्र परिवहन मंडळाची सोलापूरला जाणारी एस.टी. बस निघायच्या बेतात होती . काही प्रवासी शेवटच्या मिनीटाला चढत होते .त्यानंतर बस लगेच निघाली . सुरेश हा नुकताच या रूटवर कंडक्टर म्हणून बदली होउन आला होता . तो प्रवाशांना तिकीटे देण्यात गुंतला होता . काही नवख्या उत्साही प्रवाशांनी सुरेशला विचारले 'मास्तर , बस सोलापूरला कधी पोचते हो ? ' . गेले काही दिवस अनुभवलेल्या ट्रॅफिकमूळे सुरेश या प्रश्नाला उत्तर द्यायला फारसा उत्सूक नव्हता . त्यामुळे त्याने काहिशा निरुत्साहानेच ' पोचु सकाळपर्यंत . ते आता ट्रॅफिकवर आहे ' असे गूळमुळीत उत्तर दिले . बस हळूहळू शहराच्याबाहेर आली व कुकुटपल्ली पार करून सोलापुर हायवेला लागली . रात्री १२.३० च्या सुमारास झहिराबादच्या पुढे एका ढाब्यापाशी बस जेवणासाठी थांबली . सुरेश व ड्रायव्हर रायकर एक रिकामे टेबल बघून जेवण करू लागले . ड्रायव्हर रायकर हे या रूटवर बरिच वर्षे होते . त्यामुळे सुरेशची अवस्था लक्षात घेउन त्यांनी ' आज ट्रॅफिक ठिक आहे ' असा धीर दिला . बसचा पुढचा प्रवास सुरु झाला . रात्री ३ च्या सुमारास बस कर्नाटक प्रांतातील हुमनाबादला आली . साधारण पहाटे ४ च्या सुमारास बस महाराष्ट्र हद्दीत शिरुन नळदुर्ग येथे पोचली . ५ च्या सुमारास बस उमरगा येथे पोचली . आता बरयापैकी उजाडले होते . पहाटेच्या ताज्या हवेमुळे व प्रसन्न वातावरणामुळे सर्वांचाच प्रवासाचा थकवा पळाला होता व सर्वजण चांगलेच तरतरीत झाले होते . आतापर्यंतचा प्रवास व्यवस्थित व ट्रॅफिकचा फारसा त्रास न होता पार पडल्यामुळे सुरेशचाही वैताग निघून गेला होता . तो आता बसमधील प्रवाशांना स्वताहुन उत्साहाने सांगू लागला ' आता ६ पर्यंत सोलापूरला पोचतोय बघा . '
वाचने
14356
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
फुसका बार!
कथेबद्दल
एक दुरुस्ती माझ्याकडूनच
हैद्राबाद पासून सोलापुरला
क्रमशः
क्रमशः नाही .
ह्यात कथा काय आहे ? नुसतं
कथेबद्दल
कंडक्टर नुकताच बदली म्हणून आलाय
रूट
@सिरुसेरि
मुपी मिपा
In reply to मुपी मिपा by सिरुसेरि
ऑ
प्रवासवर्णन ? मग फोटो कुठे
कथेचा आशय...
In reply to कथेचा आशय... by चांदणे संदीप
+१
धन्यवाद Sandy जी